अंडा मसाला आणि गार्लिक नान

Primary tabs

प्रशांत's picture
प्रशांत in पाककृती
8 May 2020 - 6:44 pm

साहित्यः
- कांदा (२)
- खोबरं (अर्धी वाटी)
- काजू (१५/२०)
- गोडंबी (१५ /२०)
- अदरक ( दोन मोठे तुकडे)
- लसूण ( ७/८) पाकळ्या
- कोथिंबीर
- तिखट १ चमचा
- मीठ १ चमचा
- हळद १ चमचा
- गरम मसाला १ चमचा

1

प्रथम गॅस सुरु करुन त्यावर ३० सेकंद खोबरं भाजून (अर्धवट जाळून घ्यायचे), तव्यावर थोड्या तेलात कापलेला कांदा परतून घ्यावा, नंतर काजू आणि गोडंबी सुद्धा परतून घ्यावी.
वाटणं १: कोथिंबीर, आलं, लसूण मिक्सर मधून बारीक करुन घ्यावा
वाटण २ : भाजलेल्या खोबर्‍याचे छोटे तुकडे करुन कांदा, काजू आणि गोडंबी सोबत मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे (शक्यतो पाणी टाकू नये)

2
हुश्श तयारी झाली आता भाजी बनवूया...

- पॅनमधे तेल गरम झाले कि गॅस कमी करुन (मंद आचेवर) त्यात थोडी मोहरी टाकायची.
- मोहरी करपण्याच्या आत हिरवे वाटण टाकायचे आणि साधारण अर्धा मिनिट मिक्स करावे.
- काळं वाटण टाकून २ मिनिट मिक्स करत राहावे (आधीच भाजून घेतल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही)
- तिखट, मीठ, हळद, गरम मसाला टाकू्न २ मिनिट मिक्स करत राहावे.
- अर्धा ग्लास पाणी टाकावे, (तुम्हाला करी कशी पाहिजे त्याप्रमाणे कमी/अधिक)

3

- उकळी आली की गॅस बंद करावा .
4

गार्लिक नान.
करी बनवण्यापूर्वी कणीक (६ चपातीला लागेल एवढी), २ चमचे दही, बेकिंग सोडा (थोडा) , मीठ (चवीनुसार) टाकून मिश्रण के्लं आणि दूध टाकून भिजवली होती.

ही पाकृ बघून नान बनवण्याचा प्रयत्न केला.
केडी सारखे तवा उलटा करुन नान भाजायला जमलं नाही, म्हणून चिमट्याचा सहारा घेवून नान शेकले ;)

5

नान झाल्यावर वरच्या बाजूला थोडं तूप/बटर लावावे.

6

( शु. शा. लोकांनी अंड्याऐवजी पनीर किंवा शेव वापरले तरी चालेल.)

पाकृमधे केले तसे वाटण घेऊन आम्ही शेतात चिकन/मटण बनवायचो, तेव्हा घरी गॅस , मिक्सर नव्हते. आई हे वाटण बनवून द्यायची. कांदा, खोबरं चुलीत भाजून घ्यायची आणि पाट्यावर वाटून द्यायची. त्याची चव काही औरच.....!

प्रतिक्रिया

लॉक डाउन नंतर मी घरी येणारे बरका सरपंच....ते चिकन किंवा मटण तयार ठेवा...
फोटो आणि एकंदर पाककृती एक नंबर!

प्रचेतस's picture

8 May 2020 - 7:11 pm | प्रचेतस

पनीर वापरून ही पाकृ बनवून बघेन, नान मला करता येणे अशक्य, त्यासाठी खुद्द प्रशांतलाच बोलावण्यात येईल.

पाकृ मस्त.

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2020 - 7:24 pm | अत्रुप्त आत्मा

आगोबा, तुला येईल नान..
पिठाचा गोळा पोळपाटावर पीठ टाकून त्यावर ठेव मग हाताचा तळवा त्यावर दाब..दाबताना "ना"म्हण,मग ताणून पुढे नेत "न" म्हण! की झाला आगोबा नान तयार! =))

स्नेहांकिता's picture

9 May 2020 - 6:13 pm | स्नेहांकिता

बुवा आता अगदी पाककृत्यदक्ष झालेत, हो अगोबा !
त्यांचा गंडा बांधायला हरकत नाही =))

अत्रुप्त आत्मा's picture

10 May 2020 - 8:59 am | अत्रुप्त आत्मा

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2020 - 7:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाकृ फोटो नंबर एक. पाचक रस तयार झाला भो.... नान हातात घेऊन रश्श्यात बुडवून जो आनंद मिळेल त्याचा काय आनंद मिळाला असेल. अहाहा ! हेवा वाटला. कधी तरी खाऊ घाला भो, आशीर्वाद मिळतील बाकी काय...

बाकी त्या वरुटा-पाट्यावरच्या मसाल्याची चव मिक्सरपेक्षा वेगळी नक्की असते. चिकन माशाला पाट्यावरचाच मसाला पाहिजे.

-दिलीप बिरुटे

फुकनी's picture

11 May 2020 - 1:14 am | फुकनी

तुम्ही नगर चे आहात काय?

सुबोध खरे's picture

8 May 2020 - 7:38 pm | सुबोध खरे

तों पा सू

मिसळपाव's picture

8 May 2020 - 8:58 pm | मिसळपाव

क्या बात है! मेल्या तू काय गणपाची शिकवणी सुरू केल्येस की काय? शेवटचा फोटो बघून वारलो / खपलो / लिटरभर लाळ गळली - हे मी मागे पराच्या एका शिकवणीत शिकलोय !!

गोडंबी म्हणजे काय?

प्रशांत's picture

9 May 2020 - 6:04 pm | प्रशांत

गणपाची शिकवणी सुरू केल्येस की काय?

हो.
गोडंबी म्हणजे बिब्ब्याचं फळ
बाकि त्याच्या पाकृ बघुनच बनवण्याचा प्रयत्न करतो. तिरंगा मलई बोटी कबाब
हा प्रकार बरेचदा करायचा प्रयत्न केला पण...

मिसळपाव's picture

11 May 2020 - 2:04 am | मिसळपाव

ज्ञानात भर - गोडंबी पहिल्यांदा ऐकलं. 'तिरफळ' जसं मालवणी तशी गोडंबी ही स्थानिक पेश्शालीटी आहे का?

कंजूस's picture

8 May 2020 - 9:54 pm | कंजूस

वा!

छान झालेला आहे नान, हिरवे पांढरे डिजाइन मस्त. आमच्याकडेही कढईत करण्याचा प्रयत्न झाला आणि यशस्वी झाला. कढईला हँडल असले तर बरे होईल.

निनाद आचार्य's picture

9 May 2020 - 5:33 pm | निनाद आचार्य

अंडा मसाला नक्की करून बघेन. फोटो मस्त आलेत. धन्यवाद.

स्नेहांकिता's picture

9 May 2020 - 6:15 pm | स्नेहांकिता

प्रशांतभौ, प्रणाम स्वीकारा.
पहिला धागा आला तेव्हा अपघाताने जमलंय असं वाटलं. लेकिन आप तो पहुंचे हुए निकले !

सौंदाळा's picture

9 May 2020 - 9:38 pm | सौंदाळा

जोरदार बॅटिंग चालू की सरपंचांनी,
ग्रेव्ही रेसिपी मस्तच
नान काही आपल्याला जमणार नाही ब्वा

उत्तम. आवडली पाककृती.

पैलवान's picture

10 May 2020 - 9:33 am | पैलवान

नान आवडला.
रश्श्यात बटाटा टाकून चांगलं लागेल का याचा विचार करतोय.

चांदणे संदीप's picture

10 May 2020 - 10:21 am | चांदणे संदीप

अंडे घालून केलेली पाकृ कधीच फेल जात नाही.
गार्लिक नानऐवजी लसणी रोटी असं नाव फेमस केलं पाहिजे. हे उगाच! ;)

सं - दी - प

जेम्स वांड's picture

10 May 2020 - 9:12 pm | जेम्स वांड

बेत फक्कड झालाय एकदम, दोन गोष्टी विचारायच्या होत्या

१. गोडंबी नसल्यास पर्यायी घटक काय वापरता येईल, चारोळी वापरली तर चालेल का? (म्हणजे ग्रेव्ही घट्ट करायला वापरलं असेल तर नाहीतर कसं करावं?)

२. हे प्रमाण किती अंड्यांच्या ग्रेव्हीसाठी आहे ?? म्हणजे जर माणसे/अंडी जास्त घेतली तर त्याप्रमाणात घटक पदार्थ कमीजास्त करायला बरे पडेल कसे...

१. गोडंबी नसल्यास पर्यायी घटक काय वापरता येईल,

शेंगदाणे वापरा किंवा तिळ वापरा.

माझी आजी कधी कधी हरबर्‍याची दाळ व तांदुळ सुद्धा वापरायची. पुढच्या आठवड्यात हाच प्रकार करुन पाहिल.

२. हे प्रमाण किती अंड्यांच्या ग्रेव्हीसाठी आहे ?

मी दोन माणसांसाठी बनवली होती.

जेम्स वांड's picture

10 May 2020 - 10:46 pm | जेम्स वांड

पर्यायी घटक ह्या तुटवड्याच्या काळात पण सहज सापडतीलच घरात, दोन माणसे म्हणजे अंदाजे ६ अंडी झाली, ठीक आहे पाणी वाढवून कमी करून ते ऍडजस्ट होऊन जाईलच.

रच्याकने,

तुमच्या आजींची खास रेसिपी नक्की ट्राय करा, अन इथं नक्की पोस्ट करा, मिसळपाव सारखी संस्थळे अन आपल्यासारखे हौशी कुक्स कैक रेसिपीज लॉस्ट न होऊ देता जतन करायचं एक काम अनायसे अन विनासायास करू शकतो :)

मोदक's picture

10 May 2020 - 9:17 pm | मोदक

वाह.. झकास पाकृ..!!