परवाच्या धाग्यात गविंनी काही चांगले प्रश्न उपस्थित केले. एकच विषय चघळण्याच्या क्षमतेबाबत मानसिक मर्यादा पडतात ते समजण्यासारखे आहे. पण तरीही घोंघावणार्या मुख्य विषयांवरही चर्चा महत्वाची असावी.
येत्या काही दिवसात लॉकडाऊन शिथील होत जातील, माझा पहिला प्रश्न आहेत लॉकडाऊन सोबत वीषाणूंचे दिवस सर्वथा संपत आहेत का? नसतील तर पुढे काय काय काळजी घेतली जावयास हवी ? तुम्ही कोण कोणती काळजी घेणार आहात ?
दुसरे लॉकडाऊन काळात तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी खटकल्या / खुपल्या आणि का ?
*** मला खटकलेले प्रश्न आणि गोष्टी ***
१) COVID -19 चे वीषाणू जगात इतरत्र वावरत नव्हतेच याचा नेमका पुरावा कोणता ?
२) समजा COVID -19 यापुर्वी अस्तीत्वात नव्हते ? पण उर्वरीत संक्रमणजन्य श्वसन विकारांना (आधुनिक) वैद्यक क्षेत्र पुरेशाने गांभीर्याने घेत आले आहे का की मृत्यूदर कमी असतो म्हणून गौण समजत आले आहे ?
३) (आधुनिक) वैद्यक क्षेत्र पुरेशाने गांभीर्याने घेत आले आहे का की मृत्यूदर कमी असतो म्हणून गौण आणि गृहीत धरले नाही असा वैद्यकक्षेत्राचा दावा असेल तर, शारिरीक अंतर आणि मास्क या दोन विषयात वैद्यक क्षेत्राची वैचारीक धरसोड का झाली ?
४) माझ्या पुण्यातील एका परिचितांनी एका श्वसन विकार बाधीत रुग्णास शेजारधर्म म्हणून (सुदैवाने कोविड-१९ नव्हता आणि आठवडा भरात सुखरुप परत आला) (खर्चिक) खासगी रुग्णालयात भरती होण्यास लॉकडाऊन काळात मदत केली त्याच्या कडून कळलेले अनुभव
अ) संबंधीत रुग्णालयाच्या रुग्ण वाहिकेने येण्यास टाळाटाळ केली, १०८ क्रमांकावरील रुग्णवाहीका सेवा रुग्ण कुठून घ्यायचा आहे त्याचा पत्ता न विचारताच दूरदूरच्या केंद्रातील रुग्णवाहिका केंद्रांचे संपर्क क्रमांक देत होते आणि ते क्रमांकही रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे टाळत होते, शेवटी एका राजकीय समाजसेविकेस विनंती केल्यानंतर तिच्या मध्यस्तीने एक खासगी रुग्णवाहीका आली पण चालकाने मास्क वापरलेला नव्हता ? त्याला मास्क बांधायला सांगितल्यावर तो येत नाही म्हणाला असतात तर काय घ्या म्हणून मास्कविरहीत रुग्णवाहनसेवा स्विकारावी लागली. (माझे परिचीत त्यांच्या दुचाकीवरनं स्वतंत्र पणे सोबत गेले)
आ) रुग्णालयाच्या बाहेर खुर्च्याटाकून बसलेले सुरक्षारक्षक व्यवस्थित मास्कमध्ये नव्हते. रुग्ण वाहिकेच्या वाहकास मास्क नसल्याबद्दल कुणिही हटकले नाही माझ्या परिचितांकडे मास्क वगैरे होता पण कुणाकडे नसल्यास मास्क उपलब्ध करण्याची सुविधा, हँड सॅनिटायझर काउंटरवर उपलब्ध नव्हती
इ) रुग्णास घेऊन जाण्यापुर्वी त्यांची आधीची आरोग्य फाईल सोबत घेण्यास सांगितल्यावरही त्यांनी सोबत घेतली नाही, त्यांचे खासगी रुग्णालय ग्रेट आहे या भ्रमात ते होते, प्रत्यक्षात रुग्णालय प्रशासनाने सॉफ्टवेअर बदलल्याने जुना डाटा उपलब्ध नाही म्हणून हात वर केलेले.
(त्याच चकरेत इन्श्युरन्स कार्ड आणि एटीएम कार्ड घेतले नाही - त्यांचे जे नातेवाईक मदतीस म्हणून येणार होते ते फिरकले नाही माझ्या परिचितांना एटीअम कार्ड आणि इन्श्युरन्स कार्ड साठी मध्यरात्री दुसरी चक्कर करावी लागली तेवढे करुन त्यातील एटीएम कार्ड चालले नाही- आपण याच रुग्णालयाचे पेशंट हा पेशटंचा विश्वास होता आणि पैशावरुन हॉस्पीटल प्रशासन कर्मचारी प्रत्यक्षात वैताग येईल एवढा असहकार्यपुर्ण होता ड्युटी डॉक्टरांच्या हस्तक्षेपानंतर जरासा नरमून त्याने रुग्णास विलगीकरण आयसीयू कडे पाठवू दिले)
ई) रुग्णाचे बाजूच्या गल्लीतील (जवळचे!) नातेवाईकही (पोलीस पास अनुपलब्धतेचे कारण देऊन) नंतरच्या आठवड्याभरातही रुग्णालयाकडे फिरकले अथवा कोणतीही मदत देते झाले नाही.
उ) घरी पोहोचल्यावर सोसायटी स्वच्छता कर्मचार्यास विश्वासात घेऊन अधिक स्वच्छता आणि व्यक्तिगत सुरक्षा करण्याची सुचना केली त्या कर्मचार्याने सोसायटीत बोभाटा केला पण स्वच्छता आणि व्यक्तिगत सुरक्षा विषयक सांगितलेली सुचनांचे किमान चार दिवस पालन केले नाही.
ऊ) रुग्णाच्या घरी एकटी ज्येष्ठ नागरीक पत्नी संधीवाताने चालू शकत नव्हती तिचे घर स्वच्छ केले जाण्यात मदतीची गरज होती पण सोसायटीच्या बाहेरच्या व्यक्ती नको म्हणून घरकामगारांचे सोसायटीने प्रवेश बंद केलेले तर दुसरीकडे सोसायटीचा स्वच्छता कर्मचारी भितीने त्यांच्या फ्लोअरवरही जाण्यास नकार देत होता.
ए) माझ्या परिचितांच्या घरीही संधीवाताने अंथरुणाला धरुन असलेल्या ज्येष्ठ नागरीकाच्या सेविकेनेही नंतर आठवडाभर दांडी मारली.
ऐ) सोसायटीतील इतर सभासद मानभावीपणे दुरुन मदत देण्यास तयार होते पण त्यांच्या फ्लोअरवर जाऊन स्वतः चौकशी करण्याची कुणाचीही तयारी नव्हती. त्यांनी हॉस्पीटल मध्ये मदत साहाय्य घेऊन जाण्यासाठी कुणा दुसर्या सेविकेचा मुलगा पैसे देण्याच्या बोलीवर शोधला पण त्याला पोलीस परवानगी मिळावी म्हणून सोसायटीचे पत्र हवे होते, आणि सोसायटीला पत्र देण्यासाठी रुग्णाच्या पत्नीचे पत्र हवे होते आणि तसे पत्र लिहून घेण्यासाठी स्वतःच्या घरच्या तरुण मुलांना पाठवण्यास मात्र सोसायटीतील मानभावी मंडळी तयार नव्हती!
ओ) अॅडमीट केलेल्या ज्येष्ठ नागरीक रुग्णाचा परदेशातील कुणाही व्यक्तीशी संपर्क येण्याचा संबंध नव्हता पण तेवढाच एक प्रश्न हॉस्प्टीटल प्रशासन माझ्या परिचितांना खोदून खोदून विचारत होते एकतर शेजारी तेही वेगळ्या फ्लोअरवरचे या पलिकडे त्यांच्या बद्दल त्यांना कल्पना नव्हती आणि लॉकडाऊनमध्ये तरुणाईला घरात बसवून स्वतः बाहेर भटकणार्या म्हतार्यांमध्ये या बोलघेवड्या रुग्णाचाही समावेश होता तरीही २००-३०० मीटर अंतरातील किराणा भाजीपाला दुकान आणि वाटेत भेटलेले लोक या पलिकडे त्यांच्या संपर्काची शक्यता नव्हती
औ) कोविड निघाला नाही (ह एनंतर कळले) तरी आयसीयु पर्यंत पोहोचवणारे जिवाणू/वीषाणू कमी गंभीर असतात का ? किराणा भाजी पाला औषधी दुकानदार डॉक्टर या मंडळींनी सर्वप्रथम मास्क वापरावयास नको का ? त्यांनी वृद्ध नागरीकांना घरपोच सेवेची व्यवस्थाकरुन त्यांचे बाहेर फिरणे बंद करावयास नको का ?
रुग्णाच्या परिवारास वाळीत टाकण्यापे़क्षा परिसरातील इतर फिरणार्यांचे आणि विशेषतः एका पेक्षा अधिक व्यक्तिंना भेटणार्या किराणा भाजी पाला औषधी दुकानदार डॉक्टर यांना मास्क बंधनकारक करावयास नको का ? हे माझ्या परिचितांना पडलेले प्रश्न असो
५) नोटा, एटीएम, लिफ्ट्स जिन्यांचे रेलिंग्स दरवाज्यांचे हॅंडल्स, ते बटणे अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टींच्या निर्जंतुकीक सातत्यपुर्ण प्रयत्न आता पर्यंत किती झाले असतील आणि पुढे किती होतील ते देव जाणे पण पुण्या मुंबईतला मध्यमवर्गीय कोरोना केवळ झोपडपट्ट्यात फोफावतोय आपल्याकडे वापस येणार नाही या भ्रमात वावरत नाहीए ना? काही देशांचे राजपूत्र आणि पंतप्रधानही कोरोनाच्या विळख्यात आल्याचे भारतीय मध्यमवर्गीयास विसर पडत नाहीएना ?
६) भारतात प्रत्येक नागरीकास रेशनकार्ड आणि संकटात साहाय्य मिळण्याची गरज असताना अडचणीतील नागरीकांकडे साहाय्य पाठवण्याएवजी स्थलांतरीतांचे आणि प्रवाशांचे (मग परदेशी गेलेले असो वा भारतीय ) प्रवासाचे हट्ट गळी का उतरवले जाताहेत ? तथाकथित ग्रीन झोनमधील नांदेडहून शीख यात्रेकरुंचा जथा वाजत गाजत पंजाबात पाठवला शहाण्यांनी त्यांना आधी घरी जाऊ दिले मग वापस बोलवून चाचण्या घेतल्या बहुतेक पॉझिटीव्ह निघाले ! नेमके काय चालू आहे ?
७) अनावश्यक प्रवासाचे प्रमाण प्रवासाचे दर वाढवून कमी करणे या एवजी प्रेमाने फुकटात प्रवास का उपलब्ध करुन दिले जात आहेत . ज्यांचे प्रवास खरेच अत्यावश्यक असतील त्यांना सरकार परतफेड देऊ शकेल हे अधिक सुयोग्य होणार नाही का ? मार्केटचे तास कमी केल्याने गर्दी कमी होईल कि वाढेल? गर्दी होणार्या वेळते मार्केट बंद करावे आणि शारिरीक अंतर आणि मास्क वापरुन नंतर रात्रं दिवसही चालू ठेवल्याने असे किती बिघडणारे होते ? (शारिरीक अंतर आणि मास्क या दोन गोष्टींच्या भरवशावर चीनच्या बाजूचे हाँगकाँग आणि तैवान बर्यापैकी व्यवस्थीत चालू आहे!)
७) पुणे महापालिका :- विलगीकरण म्हणून वसहतीतून वेगळे काढलेल्यांतील संशयीत रुग्ण आणि सामान्य तब्येत असलेल्यांची रहाण्याची व्यवस्था एकत्र ठेवत होती ! (हसावे कि रडावे?) नेमके काय चालू आहे ?
झोपडपट्ट्यात किती परदेशवारी करणारे रहातात ? अजूनही आजार समाजात पसरत नाहीए हे क्लेम कशाच्या बळावर केले जात आहेत ? झोपडपट्टीत नेमक्या कोणत्या प्रकारच्या सेवकांमधून आजार पसरला जातोय याचा शोध घेण्याचा जरासाही प्रयत्न कसा होत नाही? पुण्या मुंबईत परदेशी प्रवास करुन आलेले व्यवस्थीत आहेत त्यांना घरी पोहोचवणार्या ड्रायव्हर ते त्यांच्या घरच्या सफाई कर्मचार्यांची स्थिती माहित नाही हे नेमके काय गणित आहे ? घरपोच सेवा देणार्या कुरियर सेवकांची काय स्थिती आहे त्यांना लागणारे मास्क इत्यादी बद्दल फारसे बोलले लिहिले जाताना का दिसत नाहीए ?
८) शेवटीपण शेवटचा नव्हे असा प्रश्न, पिईपी टेस्टींग किट्स आणि पॉलीप्रॉपीलीन बेस्ड मास्कच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण का नाही ?
* चर्चा सहभागासाठी , अनुषंगिका व्यतरीक्त विषयांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार
वाचने
10855
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसाद देणेच अवघड.
+१११
In reply to प्रतिसाद देणेच अवघड. by चौकटराजा
अचूक निरीक्षण
डेटॉल सेव्हलॉनला पर्याय हवा आहे.
In reply to अचूक निरीक्षण by Prajakta२१
धन्यवाद
In reply to डेटॉल सेव्हलॉनला पर्याय हवा आहे. by माहितगार
लोकसत्तातील हा लेख
आशुतोष शेवाळकरांच्या निसटत्या बाजू
In reply to लोकसत्तातील हा लेख by मराठी कथालेखक
सुथॉल वापरू शकतो
सॅनिटायझर व विषाणू
अवांतर : करोनाची भानगड उडाला तर उडू दे ....
हे धागा उडवण्याचं प्रकरण
In reply to अवांतर : करोनाची भानगड उडाला तर उडू दे .... by गामा पैलवान
मामलेदारचा मामला
ससूनची दुरावस्था
आणि हे मुंबईतल्या दुरावस्थेचे
In reply to ससूनची दुरावस्था by माहितगार
सर्व स्वच्छ,अती पुढारलेले
म्हणजे नेमके काय केले पाहीजे ते नीटसे समजले नाही
In reply to सर्व स्वच्छ,अती पुढारलेले by Rajesh188
हा बिबिसी संदर्भ दुवा
In reply to म्हणजे नेमके काय केले पाहीजे ते नीटसे समजले नाही by माहितगार
There has been a surge in
मी गेल्या २-४ दिवसात
In reply to There has been a surge in by सुबोध खरे
स्थानिक स्तरीय टेस्टींग
In reply to There has been a surge in by सुबोध खरे