[शशक' २०२०] - Appraisal

ब़जरबट्टू's picture
ब़जरबट्टू in स्पर्धा
26 Apr 2020 - 11:38 pm

Appraisal

साहेब, ह्या वेळेस तरी बघा काही माझे... सालाबादाप्रमाणे यावेळी पण टपकला तो
अरे चचा, ह्या शशककथा स्पर्धा आल्या म्हणजे काय Appraisal आले असे वाटते का काय तुम्हाला ?
आणि आता तुमचा विचार पण करू शकता नाही मी .. कधी त्या हूर सोडून खाली बघत जा काय चाललेय ते .. भडकलाच तो HR पोट्टा परत..
अर्थात त्या पोराला पण दोष देण्यात अर्थ नव्हता म्हणा .. ह्यावर्षी मार्चपासून खुप स्पर्धा वाढली असे ऐकून होता तो. दररोज शेकड्याने लोक येत होते, मोठ्ठे मोठ्ठे "टार्गेट" पूर्ण करून, आणि वर येऊन पण खाली टार्गेट वाढतच आहे म्हणे ...

कसे काय जमते बुवा यांना..विचार करत याकूब परत निघाला.. कसाब रिपोर्टींगला ...

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

27 Apr 2020 - 4:56 am | अर्धवटराव

संवाद, स्वगत वगैरे जर अवतरण चिन्हांत दिले असते तर कथा वाचायला सोपी आणि जास्त परिणामकारक झाली असती...

तुषार काळभोर's picture

27 Apr 2020 - 7:01 am | तुषार काळभोर

कुणी संदर्भासहित समजावून सांगेल का?

प्रमोद देर्देकर's picture

28 Apr 2020 - 12:23 pm | प्रमोद देर्देकर

हा कसाअब आणि याकुबचा नरकातला संवाद आहे आणि ते दोघे जेवढा विनाश करुन गेलेते त्यापेक्षा जास्त काम करुन लोक खाली जात आहेत असे काही तरी सुचित होत आहे.

आवडाबाई's picture

30 Apr 2020 - 9:50 am | आवडाबाई

याकूब आणि कसाब ह्यांनी जितके टार्गेट पुर्ण केले त्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांचे इतर भाऊबंद करत आहेत आणि जन्नतमधे जात आहेत.
मस्त !

ब़जरबट्टू's picture

2 May 2020 - 5:39 pm | ब़जरबट्टू

कथा गंडली आहे हे संपादक मंडळाकडे पाठवल्या पाठवल्या कळले होते ... :) ,, मुळात पुर्ण कथा ही माझ्या जुन्या कथेचा ॲप्रायझल पुढचा भाग म्हणून प्रसिद्ध करायची होती ... अर्थात अटीप्रमाणे हे शक्य नाही हे कळेपर्यंत बारा वाजले होते .. :)
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे ... याचनिमित्याने बरेच वर्षानंतर लिहिता झालो ...