[शशक' २०२०] - मेजवानी

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in स्पर्धा
25 Apr 2020 - 5:16 pm

मेजवानी

परवा एक वटवाघूळ खाल्ले. झकास होते. च्याऊंग गुहेच्या आतल्या भागात सापडले. मेजवानीच. पण काहीही म्हणा, डोंगराखालच्या मातीत वळवळणाऱ्या गांडूळाची सर कशालाच नाही. संध्याकाळी अजगराची कातडी सोलताना ठसका लागला. मग दोन उंदीर खाल्ले तेव्हा कुठे आराम पडला. रात्री सुग्रास कुत्रं खाऊन निवांत झोपलो.
सकाळी खोकतंच उठलो. बागेत जाऊन दोन लुसलुशीत सुरवंट गिळले. मग दोन मांजरी पकडून, कापून, फोडी फोडी करून, मिरची आणि कोथिंबीर लावून बरणीत मुरवायला ठेवले. कच्च्या फोडी म्हणजे स्वर्गसुखच.
मग बेडुक फ्राय आणि झुरळांची चटणी असा खमंग नाष्टा केला. पण खोकला थांबेचना. मग माकडाचे सुप पिलो. संध्याकाळी ताप आला आणि डोके दुखायला लागले.
तेव्हा समजले, खाण्यात काहीतरी चुकलंय जरूर..

body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);

background-size: 1900px;
}

प्रतिक्रिया

मनिम्याऊ's picture

25 Apr 2020 - 10:30 pm | मनिम्याऊ

-1

मनिम्याऊ's picture

25 Apr 2020 - 10:33 pm | मनिम्याऊ

नवरसांमधील बीभत्स रस जमून आलाय.

श्वेता२४'s picture

26 Apr 2020 - 9:55 am | श्वेता२४

+१ चिनी लोक असेच काही खातात पितात असं ऐकून आहे.

मोहन's picture

26 Apr 2020 - 2:12 pm | मोहन

+१

तेजस आठवले's picture

26 Apr 2020 - 6:56 pm | तेजस आठवले

प्रचंड बीभत्स, हिंसा ठायी ठायी भरलेली आहे. गुण द्यायला हात धजावत नाहीयेत. थरथरतायत. :)

जव्हेरगंज's picture

26 Apr 2020 - 9:09 pm | जव्हेरगंज

+१

जेम्स वांड's picture

26 Apr 2020 - 9:14 pm | जेम्स वांड

फक्त एक सल्ला,

हिंदी चमगादड वापरणे ते ही चमकादड म्हणून काहीच अर्थ नाही,

हे शशक असल्यामुळे शब्दाशब्दाला महत्व आहे तरीही तुमची मर्जी असल्यास संपादकांकडून त्याजागी वटवाघूळ हा शब्द योजून घेण्याचे करावे.

तुषार काळभोर's picture

26 Apr 2020 - 11:33 pm | तुषार काळभोर

खाण्यात काहीतरी चुकलंय जरूर

काहीतरी?
एकतरी बरोबर आलंय का खाण्यात!!
Corona var आजारपण थांबलं ते नशीब!!

टर्मीनेटर's picture

28 Apr 2020 - 10:12 am | टर्मीनेटर

+१
आवडली!
ढेकणांची उसळ आणि सुकवलेल्या पालींच्या पिठापासून बनवलेले घावन खाल्ल्यास हा आजार नक्की बरा होईल 😜

आनंद कांबीकर's picture

8 May 2020 - 7:10 pm | आनंद कांबीकर
आनंद कांबीकर's picture

8 May 2020 - 7:11 pm | आनंद कांबीकर

कोरोना तयार करण्याची पाककृती