ज्यात त्यात बटाटा

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
25 Apr 2020 - 9:56 am

"ज्यात त्यात बटाटा घालतात इथे .. " उत्तर प्रदेशात एकदा जवळ जवळ महिना घालवल्यावर अशी वैतागवाडी झाली होती... हम्बल spaD ( गरीब बिचारा बटाटा ) असे ज्याचे वर्णन केलं जाते तो हा पामर ... यात अनेक जाती असतात ..रंग /चव आणिआकार वेगवेगळे.. मराठी पद्धतीची पातळ खरपूस काचऱ्याची भाजी असो , "गर्भश्रीमंत " दम आलू असो किंवा जर्मन पोटॅटो रोस्टी असो... जगभर फिरणारा हा प्राणी... यातील एका चविष्ट बटाट्याची ओळख..
किपेंफ्लर ( kipfler उच्चार आपापल्या सोयीप्रमाणे करणे ) हि त्यातील एक चविष्ट जात.. लांबुडक्या आकाराचा हा बटाटा .. पातळ त्वचा असते त्यामुळे त्वचेसंकट वापरले तर चालतात ...
IMG_7552[1]

याची एक सोप्पी पाककृती
१)
- बटाटे धून लांबी नुरुप कापून घयावे
- उकळत्यापाण्यात ७-८ मिनिटे अर्ध शिजवावे
- टिपकागदावर ठेवणं पाणी निथळू द्वावे आणि थंड होऊ दवयेत
IMG_7557[1]

२) याला विविध प्रकारचे मसाले लावू शकत,,, मी येथे २ प्रकारचे वापरले आहरेत
एक: तेल ( उच्च तापमानाला चालेल असे वापरवे ) मीठ ( समुद्री ) आणि ताजी चिरलेली रोझमेरी यात घोळवाले आहेत
दोन: तेल ( उच्च तापमानाला चालेल असे वापरवे ) मीठ ( समुद्री ) आणि धुरी दिलेली पाप्रिका आणि थोडा मध , थोडी काली मिरी
यशीयवाय इतर हि मसाले जोड्या वापरू शकता पण ते फार जहाल नसावेत कारण यात आपल्याला मूळ बटाटयाची चव घेईची आहे
यात मी लसूण घातलेली नये
IMG_7555[1]

IMG_7556[1]

IMG_7562[1]

IMG_7567[1]

भाजणे:
ओव्हन मध्ये २०० अंश वर ठेवून ट्रे तापवून घयावा आणि मग त्यात बटाटे पसरून खरपूस होई पर्यंत भाजावे , शेवटची काही मिनटे ग्रिल करी ठेवावे
IMG_7573[1]

IMG_7576[1]

सोबत पेय: मज्जा म्हणून पीच चहा + लेमन लाइम बिटर सारखे अतरंगी पेय एकतर केले ..
- मांडणीत आम्बट लोणी ( सावर क्रीम) सोबत ( गोड नको )
IMG_7579[1]

IMG_7580[1]

IMG_7575[1]

IMG_7582[1]

सर्व मिपाकरांना जाहीर आव्हान.. आणि आवाहन
घरबंदी दारूबंदी च्या काळात घरात बटाटा तरी असावा बहुतेकांकडे .. चला तर मग बनवा काहीतरी आणि बाणा " मिपा फास्टरशेफ "
बटाट्या पासून बनविली काही दारू हि असते ती पण वापरू शकता !

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

25 Apr 2020 - 9:59 am | जेम्स वांड

पाककृती,

पण आमच्या गावठी किराणा व्यापाऱ्याकडे हे रोजमेरी फोजमेरी काहीच मिळायचे नाही, तस्मात पास...

चौकस२१२'s picture

25 Apr 2020 - 10:10 am | चौकस२१२

हे काही मला कळलं नाही ..मान्य आहे "फॊजमेरी" नाही मिळणार त्याऐवजी दुसरे वापरा ... सम्पपूर्ण भारतीय गोष्टी वापरा...
साध जिरा घाला..ओव्हन नसेल तर तव्यावर भाजा... पाकृ नाही आवडली तर हरकत नाही.. पण फाटकारायच हे काय?

जेम्स वांड's picture

25 Apr 2020 - 12:54 pm | जेम्स वांड

मी फक्त काय प्रॉब्लेम येतील तितकं मांडलं, तुम्हाला फटकारणार मी कोण टीकोजीराव लागून गेलोय साहेब, प्रतिक्रिया पूर्ण वाचा की "छानच आहे पाककृती" हे सुरुवातीलाच कबूल केलं की हो मी! वाचलं नाहीत काय ??

इतकं चिडून जाण्यासारखं काय झालं कळलंच नाही मला, का जेन्यूईन काही बोललेलं आवडत नाही तुम्हाला?? फक्त गोडगोड कॉमेंट्स हव्या असल्या तर तसं स्पष्ट सांगा की राव! त्या पण करू, माझं काही वैयक्तिक वाकडं नाहीये तुमच्याशी.

इतकं म्हणून ही जर तुम्हाला समजलं नसेल तर मला माफ करा माझी चूक झाली म्हणतो, कारण वादात वगैरे पडायची माझी अजिबातच इच्छा नाही.

चौकस२१२'s picture

25 Apr 2020 - 3:54 pm | चौकस२१२

फक्त गोडगोड कॉमेंट्स हव्या.."
अजिबात नाही... एवढा बालिश नाहीये मी
नाही आवडली एखादी पाककृती तर जरुरूलिहा, नाही भावली.. काय विशेष नाही...किंवा दुर्लक्ष करा किंवा बदल सुचवा .. पण "आमच्या इथे मिळत नाही म्हणून प्रॉब्लेम काय येतील ..सगळी कडे सगळ्या गोष्टी थोड्याच मिळतात... अहो मी किती तरी वर्षे हापूस खाल्ला नाहीये कारण येथे मिळत नाही आणि भारतात येतो ते डिसेंबर मध्ये तेवहा एखाद्याने हापूस ची पाकक्रिया लिहिली तर म्हणू का // काय हापूस "टापूस"..... हि टवालगिरी

विंजिनेर's picture

26 Apr 2020 - 5:47 am | विंजिनेर

अहो मी किती तरी वर्षे हापूस खाल्ला नाहीये कारण येथे मिळत नाही

आपण परदेशात राहतो हे आडून सांगायचा हिरवा माज ;०)
हिरवा माज म्हणजे काय म्हाईत नसेल तर "अभ्यास वाढवा" (येस, अवतरणांसकट)
कृ.ह.घे.

चौकस२१२'s picture

25 Apr 2020 - 10:13 am | चौकस२१२

आणि नसेल पीच टी मिळत तर संत्र्याचा रस + सोडा + पुदिना असला काही तरी करा... काहीतरी थोडा अतरंगी पेय करावे म्हणून लिहिले... कि वाण्याकडे/ भाजीवाल्या कडे या गोष्टी पण मिळत नाहीत ...

जेम्स वांड's picture

25 Apr 2020 - 12:59 pm | जेम्स वांड

अमुक उपलब्ध नसेल तर तमुक घाला वगैरे कोणी सुचवायचं ? धागा लिहिणाऱ्याने का वाचणाऱ्याने ? वाचकांना ऑप्शन्स देणं कोणाची जबाबदारी ?? लेखकाची का परत वाचकानेच सोय करावी ??

हा काय फालतूपणा आहे टोमणे हाणायचा ?? संपादक इतके लक्ष देतील काय ??

तरी नशीब प्रत्येक पाककृतीला 'हे अंडं न घालता कसं करायचं' किंवा हे 'व्हेज कसं करता येईल' वगैरे चेष्टा कोणी केली नाहीये इथं. लोक ती पण खेळीमेळीनं घेतात मिस्टर, आहात कुठं तुम्ही ?

अमुक उपलब्ध नसेल तर तमुक घाला वगैरे कोणी सुचवायचं ? धागा लिहिणाऱ्याने का वाचणाऱ्याने ?
हि कसली विचित्र अपेक्षा ...हे मिळत नसेल तर ते घाला हे एका मर्यादे पर्यंत सुचवता येते .. मिपावर जगातील मराठी माणसं आहेत .. तेव्हा काय प्रतेयकासाठी पाककृती करणाऱ्यांनी शोधत फिरायचं काय?
उद्या "रशियन बेलुगा कब्व्हियर" वर कोणी अनुभव किंवा ओळख म्हणून लिहिला तर त्यानं विचारणार का याला सातारच्या किराणामाल वाल्या कडे काय मिळेल ते सांगा!
फालतू गिरी तुमची चाललीय..
आणि समजा तुमच्या भागातील नेहमीचं मिळणाऱ्या पदार्थाबद्दल पाककृती टाकलीत तर.. उदाहरण चिक्कू .. तर "माझया भागात चिक्कू मिळत तर नाहीच पण माहिती पण नाही तर मी लिहू का "हे काय "चिक्कू का ठीकंकू" नाही मिळत माझ्य सुपरमार्केट मध्ये .. !
माझा जाऊद्या उद्या नवीन आलेल्या कोणी मिपाकराने काही असे लिहायचा प्रयत्न केलं आणि त्याला जर तुमच्यासारखे असे तापल्या हाणायला लागले तर नको बाब मिपा करून पळून जाईल..
खेळीमेळीने घेण्यासाठी आधी प्रश्न विचारणाऱ्याचा हेतू खेळीमेळीचा असावा लागतो...
असो ज्याच्या आवडीनिवडी मध्ये "'कुठल्याही आनंदावर उत्तम विरजण घालून देऊ'" असे आहे त्याच्या कडून काय अपेक्षा ..

जेम्स वांड's picture

25 Apr 2020 - 5:12 pm | जेम्स वांड

तुम्ही फारच मनाला लावून घेतलेलं दिसतं , तशी मी पहिले तुमची परत एकदा माफीच मागून टाकतो, मला माफ करा जरा नाही फारच मोठी चूक झाली माझी, अन हो ही माफी मागून की काही छोटा होत नाहीये, ठीक आहे ?? चार टोकाचे चार आपण घटकाभर लिहावे मोकळे व्हावे म्हणून इथे येतो हेवेदावे ठेऊन काहीच उपयोग नाही, नाही का?

दुसरं, माझ्या समग्र प्रतिसादातील 'रोजमेरी फोजमेरी' हा उल्लेख तुम्हाला विशेषच लागलेला दिसतोय, तर तो तसा मुळातच intended नव्हता ह्याची मी तुम्हाला ग्वाही देतो. अश्याप्रकारे पहिला शब्द मूळ अन दुसरा अर्थहीन असणे हे मराठी व्याकरणात अतिशय संमत असून त्याला अभ्यस्त शब्दातील अंशाभ्यस्त शब्द म्हणवले जाते उदाहरणार्थ

"अरे तू जायचं म्हणतोय पण तुला गाडीबीडी मिळेल का आत्ता ह्या वेळी??"

इथे वाक्यप्रयोगकर्ता गाडी किंवा पाहुणा कोणाबद्दलच अपमानकारक बोलत नसून ती बोलायची पद्धत आहे

दुसरं उदाहरण

"अरे लेका इतक्या दिवसांनी भेटला आहेस चहाबिहा घेऊया की"

इथे वाक्यप्रयोगकर्ता चहा किंवा परिचित कोणालाही अपमानित करू इच्छित नाही असे म्हणायला व्याकरण वाव देते आहे, दुसरं म्हणजे

गोड-धोड, चटणी बिटणी, अभ्यास बिभ्यास, शाल बिल, कोट बिट वगैरे आपल्या रोजच्या संभाषणातले शब्द असतात

आता रोजमेरी हा काही रोजच्या वापरातील शब्द नाही त्यामुळे त्याच्याशी संलग्न फोजमेरी हा शब्द तुम्हाला अपमानजनक वाटण्याचा संदिग्धपणा येतो, तो पुरेसा सुस्पष्ट करायला माझी शब्दरचना कमी पडली, परत शब्दाला शब्द मीच वाढवला

म्हणून मी आता स्पष्टीकरण संपवून तुमची सपशेल माफी मागतो, प्लीज मला माफ करा

टीप - गावठी वाटत असलो तरी बेलुगा काव्हीयार अन स्टर्जन रोला सातारा शहरात काय बदली इंग्रीडीयांट्स मिळतील हे विचारणारा मी नक्कीच पढतमूर्ख नाही, बटाटे दिसले म्हणून हा स्कोप दिसला, उद्या तुम्ही एक्झॉटिक कॉंटिनेंटल पद्धतीने जेवण बनवलेत तर त्याला पर्याय मी तरी मागणार नाही, हे आधीच स्पष्ट करून टाकतो काय :)

चौकस२१२'s picture

25 Apr 2020 - 6:42 pm | चौकस२१२

हे बघा येथे तुम्हाला गावठी वैगरे ठरवण्याचा काह्ही संबंध नाहीये...आणि हेतू पण नाही
आणि आपण दिलेलं मराठी व्याक्रणाचं कारण पण सयुक्तिक नाहीये (या उदाहरणात )
"रोजमेरी फॊजमेरी " यात मला टवाळकीच वाटली..त्यामागे ..." कसलं काय उगा सांगताय आमच्या इकडे असलं काही मिळत नाही आणि सांगू नका उगा गमज्या .." असा काहीसा भाव दिसला आणि त्यानंतर अतर्क्य म्हणजे "अमुक उपलब्ध नसेल तर तमुक घाला वगैरे कोणी सुचवायचं "
एखादा मेहनत घेऊन लिहितो .. ठीक आहे नाही आवडलं .. तर सोडून द्या, योग्य चुका दाखवा ... फुकटच्या टपल्या मारायच्या !
पण तुम्हाला "आनंदावर उत्तम विरजण घालाय्चे " असेल तर तुम्हीच बरोबर.. धन्य आहे ...

जेम्स वांड's picture

25 Apr 2020 - 7:11 pm | जेम्स वांड

मी माफी मागतो आहे हो! स्पष्टीकरण देऊन मागितली पण मागितली माफीच आहे.

जेम्स वांड's picture

25 Apr 2020 - 7:13 pm | जेम्स वांड

आता रोजमेरी हा काही रोजच्या वापरातील शब्द नाही त्यामुळे त्याच्याशी संलग्न फोजमेरी हा शब्द तुम्हाला अपमानजनक वाटण्याचा संदिग्धपणा येतो, तो पुरेसा सुस्पष्ट करायला माझी शब्दरचना कमी पडली, परत शब्दाला शब्द मीच वाढवला

म्हणून मी आता स्पष्टीकरण संपवून तुमची सपशेल माफी मागतो, प्लीज मला माफ करा

प्रचेतस's picture

25 Apr 2020 - 10:29 am | प्रचेतस

अहाहा..मस्त दिसतेय पाककृती.

चौकस२१२'s picture

25 Apr 2020 - 10:42 am | चौकस२१२

साधीच आहे पाककृ , आणि जगात कुठे हि करता येईल
नेहमीचेच तळलेलं तिखट मीठ चिप्स ऐवजी जरा वेगळे अनके प्रकारचे मसाले जोड्या वापरता येतील जरूर करून बघा .. पाहुणे, घरचे नक्कीच म्हणतील अरे साधे पण वेगळेच
- धने पुढे + मीठ
- जिरे पूड + मीठ
- थोडीशी चिंच आणि मीठ + काली मिरी
- लसूण + वरून लोणी
- उपलब्ध असेल तर झातार, सुमाक सारखा अरबी मसाला

प्रचेतस's picture

25 Apr 2020 - 10:48 am | प्रचेतस

अगदी.
नुसता बटाटा उकडूनही त्यावर चाट मसाला भुरभुरून पण चवीला छानच वाटतो.

गोरगावलेकर's picture

25 Apr 2020 - 12:39 pm | गोरगावलेकर

कालच लेकीने अंडा भुर्जी बनवली बटाटे घालून आणि आज तुमचा लेख आला

चौकस२१२'s picture

25 Apr 2020 - 3:57 pm | चौकस२१२

चांगलंय कि.. बटाटे आधी चांगले परतून घेतले कि कसे? कारण अंडे पटकन शिजते .. म्हणून विचारले

रमेश आठवले's picture

25 Apr 2020 - 10:03 pm | रमेश आठवले

बटाटा ही भाजी आहे का ?
बटाट्यामध्ये मुख्य पोषक घटक कार्बोहैड्रेट आहे. त्याला भाजीच्या जागेवर मानावे की पोळी, भाकरी अथवा भाताच्या जागेवर मानावे ?