पुणे ते कन्याकुमारी: ४ कित्तुर - येल्लापुर - भाग १ आबा पाटिल यांनी लिहला आहे.
कॉल घेणे
शेफ के डी यांनी बनवुन दिलेल्या प्लॅन नुसार तिसऱ्या दिवशी एकूण १५३ किमी अंतर पार करून धारवाड येथे मुक्काम करायचे होते. आदल्या दिवशी कराड वरून निघायला उशीर झाला व निपाणीला रात्री हॉटेल शोधण्यात बराच वेळ गेला त्यामुळे पाहिजे तेवढा आराम झाला नव्हता म्हणून आम्ही धारवाड एवजी कित्तुर थांबू असा निर्णय घेतला (कॉल घेतला).
कित्तूरला पोचल्यावर हॉटेल मालकासोबत फोनवर बोलून रूम बुक केली त्यामुळे आम्हाला रूम मिळाली. नाहीतर दुसरा पर्याय शोधणे अवघड झाले असते. वेळेत पोहचल्याने आम्ही आवरून लगेच जेवण करण्यासाठी खाली आलो. जेवण करून पान खात शतपावली करत होतो तेव्हा पिटर ने सांगितले की येथे एक चांगला किल्ला आहे आपण आलोच आहोत तर उद्या सकाळी किल्ला बघून पुढच्या प्रवासाला सुरुवात करू.
मग गूगल सर्च केलं व कित्तुर पासून साधारण शंभर किलोमीटर पर्यंत कुठले शहर आहे त्याचा शोध घेतला, येल्लापुर १०७ किमी वर होते. तर उद्या येल्लापूर येते मुक्काम करू व तिथून अंकोला न जाता मुरुडेश्वर जाऊ असा असा प्रस्ताव मी मांडला (मुरुडेश्वर प्लन मधे होतच त्यामुळे प्रवसात थोडा बदल करुन प्लॅन प्रमाणे आम्हि मुरुडेश्वर गाठु), त्याला आबा आणि गुरुजींनी लगेच पाठिंबा दिला. पिटरला किल्ला बघायला मिळेल म्हणून लगेच होकार दिला. वेळ न घालवता किल्याबाबत चौकशी करायला सुरुवात केली,कोणी म्हणे किल्ला पाहण्यासारखा आहे तर कोणी म्हणे तुम्हाला फार लांब जायचे आहे त्यामुळे वेळ न घालवता सकाळी प्रवासाला लागा. पण आम्ही आधीच कॉल घेतला होता की आज येल्लापूर् ला मुक्काम करायचा.
गावात जाण्याच्या मार्गावरील पुतळा
वर आबाने म्हटल्याप्रमाणे किल्ल्याची अवस्था फार चांगली नव्हती पण म्युझियम चांगले होते, याचे उद्घाटन श्रिमती.इंदिरा गांधी यांनी १९६७ साली केले होते.
आजुबाजुच्या परिसरातील विरगळ बघुन वल्लीची आठवणं आली कारण त्यातलं आम्हाला फार काहि कळत नव्हतं, फोटो काढले आणि तिथुन बाहेर पडलो. वल्ली (प्रचु) सांग रे काय काय म्हणतात याला.
किल्यातिल अजुन एक क्लिक
आम्हि राईडला सुरुवात केली तेव्हा दुपारचे ११:५५ मिनिटे झाली होती. (भर चांदण्यात राईडला सुरुवात केली होती). आम्हाला मिळालेल्या माहिति नुसार सुरुवातीचा रस्ता (थोडाच ?) खराब आणि नंतर चांगला रस्ता हे डोक्यात ठेवुन पायडलिंग करायला लागलो. २ किमी अंतर पार केले असेल कच्चा रस्ता लागला, साधारण १ किमि असेल नंतर डांबरी रस्ता बघुन फार खुष झालो पण हा आनंद फार काळ टिकला नाहि. वर आबाने म्हटल्याप्रमाने "वाटेतले रस्ते एकदम रोलर्कॉस्टर राईडचा अनुभव देणारे होते" त्यात रस्ता कुठे रस्ता खराब तर कुठे चांगला त्यात कमि अंतराचे मोठे चढ आणि वरुन ऊन यामुळे जरा दमछाक होत होती. माझी रोड बाइक असल्याने मी जरा सावकाश सायकल चालवत होतो (एखाद्या खड्ड्यात जाऊन पंचर होवु नये म्हणुन).
एका ठिकणी आबा अचानक थांबला, काय झाले म्हटलं तर म्हणे फुलपाखरु (मला वाटल की त्याची सायकल पंचर झाली कि काय) मी काहि बोलायच्या आत म्हट्ला अहो मिठ काढा लवकर, तेवढ्यात त्याने रस्त्यावर पडलेले फुलपाखरु हाती घेतलं आंणि मला हातावर थोड पाणि घेवुन त्यात मिठ टाकयला सांगितलं, त्या पाण्यात ठेवल्याने मृत अवस्थेत पडलेलं फुलपाखरु काहि सेकंदातच पंख हलवायला लागल. काहि वेळा नंतर रस्त्याच्या बाजुच्या झाडित त्याला सोडुन दिले.
इथेच पाणि ब्रेक घेतला मिठ बॅग मधुन बाहेर काढलेच होते तर थोड आम्हि पण खाल्ले
वरील ठिकाणि एक जोड रस्ता होता डावी कडे जावे का उजविकडे काहि कळत नव्हत आणि मोबाईल ला नेटवर्क पण नव्हत. कुठले वाहन आले कि त्याना रस्ता विचारु तोवर आबाची सॅडल बॅग व्यवस्थित केली.
आबा आणि मी बॅग भरत असतांना गुरुजी ने काढलेला पिटर चा फोटो.
अण्णाकडे नारळपाणि ब्रेक घेत होतो तेव्हा हरबरे खात-खात सायकल सायकल ग्रुपमधिल कॅप्टन सोबत फोन वर बोलणे झाले व त्यानंतर आम्हि दांडेलीत मुक्काम करायचे असा कॉल घेतला.
परत एक जोड रस्ता लागला, गुरुजि आणि पिटर आमची वाट बघत होते. गुरुजी ने आम्हाला दोन बोर्ड दाखवले एक दांडेली १६ किमि तर येल्लापुर २२ किमि आणि विचारले कि बोला कुठे जायचे? आम्हि येल्लापुर ला जायचा कॉल घेतला. तोवर पिटर ने तिथल्या एका मुलाशी मैत्री केली व त्याच्या सोबत गप्पा मारत त्याने कानात काहितरी घातले होते. (पिटर फोटो टाक रे).
खायला काहि मिळाले नाहि म्हणुन आम्हि येल्लापुर कडे निघालो.
अजुन काहि फोटो
हा काय प्रकार आहे कळला नाहि.
जंगलातील एक व्हिडिओ..
थोड खाल्यानंतर गुरुजी नी गाणे म्हलायला सुरुवात केली,
-- ये वळण वळण के रस्ते (ये मोह .. मोह.. के धागे)
-- चढ इथले संपत नाहि...
असे बरेच काहि...
(रच्याकनः गुरुजी छान कविता करतात, पुढच्या भागात येतिलच काहि.)
सुरुवातीला पंधरा ते वीस जण तयार झाले होते. नंतर हळूहळू प्रत्येकाच्या काही न काही अडचणीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता,
जे या सायकल सफर मधे सोबत नव्हते त्यांच्यासाठी गुरुजींनी शुट केलेला हा व्हिडिओ.
आमच्या प्लॅनिंग बाबत थोडक्यात माहिती देताना गुरुजि , (३/४ प्लॅन बदलले होते)
पंचर काढुन झाल्यावर राईडला सुरुवात केली तेव्हा अंधार पडत होता म्हणुन सायकलचे दिवे लावले त्यावरुन गुरुजीला मोगली ची आठवण झाली..
रात्री हॉटेलला पोहचल्यावर आंघोळ केली आणि घरी फोन करुन बाहेर येवुन बसलो, वेळ होता म्हणुन मोसादाते यांना फोन केला. strava वर राईड अपलोड केली.
जेवण करण्यासाठी जवळच एक छोटस रेस्टोरंट होतं जेवण ऑडर केल, जेवण येईपर्यंत उद्या किती वाजता सायकलिंगला सुरुवात करावी हा पहिला प्रश्न. आजचा एकंदर अनुभव बघता उद्या सहा वाजता सुरुवात करायचे सर्वानुते ठरलं. तेवढ्यात जेवण आलं. जेवण फारच मस्त होतं आणि स्वस्तहि.
जेवण करुन आम्हि बाहेर पडलो तोच गुरुजी म्हटले कि उद्या आपण इथेच नाश्ता करु आणि नंतर राईड ला सूरुवात करु, सकाळी ७ वाजता नाश्ता मिळेल बिल देतांना मी चौकशी केली.
एकंदरीत आजची सायकल सफर खुपच भन्नाट, अविस्मरणीय होती.
Check out my activity on Strava: https://strava.app.link/59Xk9f3tV5
(अॅक्शन कॅमेराने बरेच व्हिडिओ घेतलेत, मिक्स करुन एक चांगला व्हिडिओ लवकरच बनवतो.)
प्रतिक्रिया
24 Apr 2020 - 3:34 pm | किरण कुमार
दांडेली अभयारण्यातून केलेली सायकल सफर अविस्मरणीय झाली , छान लिहिले आहे , पुलेशू
24 Apr 2020 - 4:07 pm | जेम्स वांड
कंसात असलेलं "यु के" कळलं नसेल म्हणत असाल तर बहुतेक तर ते यु के म्हणजे उत्तर कन्नडा चे लघुरुप असावे असे वाटते मला.
बाकी तुमची फोटोग्राफी बेस्टच,
यल्लापूर बद्दल आधी कुठेतरी वाचले आहे असे सतत वाटत होते, डोक्याला स्ट्रेस देता आठवलं की येल्लापूरच्या भागात वावरत असलेला एक नरभक्षक वाघ अन त्याची केनेथ अँडरसननं केलेली शिकार ह्यावर इथेच स्पार्टाकस ह्यांनी अनुवादित शिकारकथा शृंखला लिहिली होती, त्या शृंखलेच्याच एका भागात येल्लापूरचा उल्लेख होता असे पुसट आठवते.
24 Apr 2020 - 5:05 pm | प्रचेतस
मस्त लिहिलंय, शिल्पे आवडली. त्यात काही वीरगळ, गजलक्ष्मी आदी शिल्पे आहेत. फोटो आणि व्हिडीओ एकच नंबर.
24 Apr 2020 - 11:35 pm | गवि
उत्तम लेख..
25 Apr 2020 - 11:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रशांतसेठ, फोटो आणि वर्णन आवडले. फोटो एकदम क्लास आलेत. लिहिताय चांगलं.
बाकी, ते शिलालेख, गणपती, धनुष्यबाण वगैरे पाहून वल्लीच्या धाग्यात आलो की काय असे वाटले.
लिहिते राहा भो.
-दिलीप बिरुटे
25 Apr 2020 - 5:33 pm | प्रचेतस
प्रशांतने खरं तर रेग्युलर लिहायला पाहिजे, पण आळशी आहे जाम तो (लिहिण्याच्या बाबतीत)
28 Apr 2020 - 1:24 pm | अमित लिगम
पु भा प्र
6 May 2020 - 8:18 pm | चौथा कोनाडा
जब्राट लिहिले आहे ! फोटो भारी आहेत !
शिल्पांचे फोटो तर खासच !
13 May 2020 - 1:54 pm | सतीश विष्णू जाधव
प्रशांत,
छान लिहिता...
शिल्पांचे फोटो आवडले...
या राईडला कोणती सायकल वापरली होती