मोका
मध्यरात्री ती एकटीच बाहेर पडली. अंधारात डोळे सरावण्यास वेळ लागला पण कमी प्रकाशात अंदाजानेच ती चालू लागली. बराच काळ ती सुरक्षा कवचात सुखरूप होती. इतका वेळ दबा धरून बसलेल्यांना ती एकटीच व असहाय्य असल्याचे जाणवल्यावर त्यांनी तिच्या रोखाने सरकण्यास व घेरण्यास सुरूवात केली....प्रत्येकालाच तिला पहिल्यांदा गाठून मोका साधायचा होता. तिला आता धोक्याची जाणीव झाली व ती एका कोपर्यात सरकली. ते सगळे तिच्यावर झडप घालणार इतक्यात चाचपडणार्या तिच्या हातांना काहीतरी लागले. तीने सपासप त्याचे वार तिच्या रोखाने येणाऱ्यांवर चालवले. निरव शांततेमध्ये तो आवाज भयानक वाटत होता. बाकीचे धूम पळून गेले.....
……….
……….
……….
……….
……….
घामाने डबडबलेली ती परत मच्छरदाणी वर करून गादीत शिरली.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
24 Apr 2020 - 2:44 pm | ऋतु हिरवा
छान मजेशीर
24 Apr 2020 - 4:27 pm | गणेशा
+१
पण मध्यरात्री ती एकटीच बाहेर पडली, हे घरातुन बाहेर पडल्या सारखेच वाचले होते मी, त्यामुळे दोनदा वाचावी लागली :) , नाहीतर बाहेर पण पडली आणि मच्छर मारुन राणी परत मच्छरदाणीत पण शिरली कशी हेच कळाले नव्हते..
आवडली पण कथा
24 Apr 2020 - 4:38 pm | जव्हेरगंज
मच्छरदाणी होती तर बाहेर पडायची काय गरज होती 🤔
24 Apr 2020 - 4:49 pm | गणेशा
दुसर्यांदा वाचताना, ती पाणी प्यायला किंवा टॉयलेट ला जायला उठली असेल असे मनात ठरवून मी कथा वाचली :)
24 Apr 2020 - 5:13 pm | जव्हेरगंज
घामाने डबडबलेली ती
� Apr 2020 - 5:24 pm | गणेशा
आता तुम्ही मला पकडले.. हसलो वाचुन.
मजेने :
पुन्हा कथा वाचली आणि मनात ती मुंबईची राणी होती असे पण मानले, ती टॉयलेट लाच गेली होती हे पण मानले, नाहितर कोणीतरी पाण्याच्या बॉटल का नाही घेतल्या आधीच जवळ असा पॉइंट काढतील , आणि मुंबईची असल्याने गादीवर किंवा बाहेर दोन्हीकडे घामाने डबलेलीच असेल ती, कथाकाराणे फक्त शेवटीच लिहिले ते असे मानले :)
असे मानता मानता माझी मानच दुखली
असो कथा खरेच आवडली मला पण
+१ पुन्हा
26 Apr 2020 - 5:33 pm | बीयस
+१
2 May 2020 - 12:38 pm | OBAMA80
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पंख्यापासून १ मि. जरी दूर गेलात तरी येथे घामाच्या धारा लागतात...डासांना पळविण्यासाठी कोपर्यातून लढली ती...घामाने डबडबणारच ना! :)
24 Apr 2020 - 4:56 pm | गामा पैलवान
+१
-गा.पै.
24 Apr 2020 - 11:26 pm | ज्योति अळवणी
इफेक्ट आवडला
25 Apr 2020 - 9:19 pm | चहाबाज
पहिली ओळ सुरेख. आणि शेवटसुद्धा. वा!
25 Apr 2020 - 9:38 pm | ब़जरबट्टू
हा हा ...
26 Apr 2020 - 10:04 am | श्वेता२४
+१
26 Apr 2020 - 7:07 pm | तेजस आठवले
वाचताना आम्हाला फार गृहीतकं करावी लागली हो.
आवाजाने किंवा सहकाऱ्यांच्या मृत्यूने धूम पळून जाणारे डास आजवर पहिले नाहीत.
डासांना मारून जर घामाने डबडबण्याइतके श्रम होत असतील तर ती फारच नाजूक असावी.... असो.
26 Apr 2020 - 7:19 pm | नावातकायआहे
मच्छरदाणीत झोपायला डास असणे गरजेचे आहे काय?
28 Apr 2020 - 9:54 am | टर्मीनेटर
+१
आवडली
29 Apr 2020 - 11:27 pm | निशाचर
+१
2 May 2020 - 12:24 pm | OBAMA80
@तेजस आठवले & @नावातकायआहे =>स्पर्धा चालू होती म्हणून प्रतिसाद दिला नाही..आता देतो. रात्रीचा हा प्रसंग मुंबईच्या एका उपनगरात घडतो. येथे नाल्यांमुळे डासांचे साम्राज्य आहे. इच्छा असो वा नसो मच्छरदाणीत झोपण्याशिवाय पर्याय नाही. ही वैयक्तिक अनुभवावरून लिहीली आहे. नायिका मध्यरात्री पाणी पिण्यास अथवा बाथरूमसाठी उठली आहे.....यावरून पुढे कथा कळण्यास सोपी जाईल....१०० शब्दांल सगळेच जमविणे जरा कठीणच आहे.