कदाचित हि गोष्ट तुम्ही कुठेतरी, कधितरी ऐकली असेल,
तुर्तास तरि ती वाचुया ....उ म्मिच्या स्टाइलमध्ये....
मिपाच्या वाचकान्चे यावर मत घ्यायला मला नक्कीच आवडेल,
गोष्ट सुरु.......................................
एकदा एक मनिमाऊ आपल्या उन्दिरमामान्च्या मागे लागते. पाठलाग सुरु होतो, उन्दिरमामा पुढे, मनिमाऊ मागे.....
मनिमाऊ मागे.....उन्दिरमामा पुढे,
उन्दिरमामा पुढे.....मनिमाऊ मागे,
उन्दिरमामा चलाख असल्याने मनिमाऊच्या तावडित सापडत नव्हता. पण मनिमाऊ देखिल भुकेली असल्याने उन्दिरमामाचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हती.
बराच काळ असच चालु होत, शेवटि एका वळ्णावर उन्दिरमामाना एक बिळ सापडले व ते बिळात पसार झाले.
मनिमाऊनेहि त्या बिळात शिरण्याचा प्रयत्न केला, पण बिळाच आशिर तोन्ड त्या महाकाय शरिराला आत येण्यास मज्जाव करत होते.
मनिमाऊ बराच काळ बिळाबाहेर ऊपाशिपोटी ’म्याऊ-म्याऊ’ करत राहिली.
उन्दिरमामा आतमध्ये काहिसे सुरक्षित होते.
’म्याऊ-म्याऊ’ चा आवाज त्याच्या काळजाचे वेध घेतच होता.
ब्रराच काळ हे असेच चालु होते.......
नन्तर मनिमाऊला हे कळुन चुकले की जोपर्यत आपण आवाज (म्याऊ-म्याऊ) करत राहु तोवर हा उन्दिर काहि बिळाच्याबाहेर येणार नाही.
म्हणुन मनिमाऊ शान्तपणे दबा ध्ररुन बसली.....
पण आपला उन्दिरमामा देखिल कच्च्या गुरुचा चेला नव्हता....त्याला मनिमाऊची हि लबाडि लगेच कळली....
तो काहि बिळाबाहेर आला नाहि.
असाहि बराच काळ उलटुन गेला.
उन्दिरमामा ढिम्म हलत नव्हता...........................
अचानक एक वेगळाच आवाज ऐकु येऊ लागला,
उन्दिरमामाने कान टवकारले,
’बो-भो.......’
’भो---भो----भो-----भो----’
’भोभो-----भोभो------’
अरे, हा तर कुत्तुचा (कुत्र्याचा) आवाज, म्हणजे मनिमाऊचा जानि-दुष्मन....
कुत्तु बिळाकडे आलाय म्हणजे मनिमाऊने नक्कीच धुम ठोकली असणार......
या विचाराने खुष होत स्वारि (अर्थातच उन्दिरमामाचि) बिळाच्या बाहेर आली....................आणी अलगद पन्जात सापडली.
च....च....च...
अरे, अरे, अरे........
कोणाचा बर पन्जा होता तो ??( ओळखा पाहु, ’माझ्या मिपाकरानो’)
अगदि बरोबर....
तो पन्जा होता मनिमाऊचा,
पोटासाठि आपल्या मातुभाषेला बाजुला सारुन एका परक्या भाषेचा (चातुर्याने) वापर करणार्या मनिमाऊचा......
आज आपल्यापैकी बहुत्तैकानि मनिमाऊ प्रमाणे आपल्या मातुभाषेला (म्याऊ-म्याऊ--मराठिला) बाजुला सारुन पोटासाठि परक्या भाषेचा ( भो---भोचा---इग्रजीचा ) आसरा घेतला आहे..
कदाचित या युगात तसे करण्यावाचुन आपल्याकडे दुसरा पर्यायच राहिला नाहिये.?
तरि मन्ड्ळी आपल्याला याबद्दल काय वाटते ?
पोटासाठि परक्या भाषेचा आधार घेण बरोबर आहे की चुकीचे ? आणि का ?
(ऊपाशी रहाण्यापेक्षा गरज पडल्यास परक्या भाषेचा आधार घेणारा)
(प्रायवेट कम्पनित काम करणारा एक मनिमाऊ)
(पण मायबोली मराठीला न विसरणारा)
आपला लाडका;
उम्मि.
प्रतिक्रिया
16 Nov 2008 - 6:39 pm | तिमा
वडाची साल पिंपळाला!
आयला, हा तर अगदीच निकम्मा निघाला|
16 Nov 2008 - 7:16 pm | टारझन
जेंव्हा जिवावर बेततं तेंव्हा माकडीण आपल्या पिल्लाला सुद्धा पाया खाली घेउन आपला जिव वाचवायचा प्रयत्न करते असं बिरबल अकबर कालिन इतिहास सांगतो.
अनुकुलन हा सजिव सृष्टीचा नियम आहे.
- (इतिहासकार)
टारझन शास्त्री
16 Nov 2008 - 11:49 pm | कशिद
तम्ही लहान मुलांचा शाळेत खुप छान काम करू शकता ..रविवारी गलीत ल्या मुलान ना बोलावून कथा कथानाचा कर्रेक्रम करत जा ...
मुलाना मराठी विशी माया वाटेल अणि कार्टून नेटवर्क पासून घरात्ल्याना सूती मिलील
(मराठी प्रेमी) अक्षय
कथा सांगण्याची पदत छान आहे... पण कथा पतली नही बुवा
जय महाराष्ट्र!!!
17 Nov 2008 - 8:01 pm | विकास
पोटासाठि परक्या भाषेचा आधार घेण बरोबर आहे की चुकीचे ? आणि का ?
आपला "दृष्टांत" मोठा रोचक वाटला. याच गोष्टीत पुढे काय होते याची उत्सुकता आहे. म्हणजे असे:
मनीमाऊ भो भो म्हणत उंदराला फसवून बिळाबाहेर आणते व खाते. एकदा तृप्त होऊन ढेकर दिल्यावर ती दुसर्या मनीमाऊस अथवा बोक्यास जेंव्हा आपले हे, "पोटासाठि आपल्या मातुभाषेला बाजुला सारुन एका परक्या भाषेचा वापर करण्याचे चातुर्य" सांगते ते पण "भो भो करत सांगते का म्याँव म्याँव करत सांगते?"
विचार करा ही आपल्या गोष्टीतली मनीमाऊ एका बोक्याला आपले हे चातुर्य उत्साहाने "भो भो म्हणत सांगत आहे..." तो बोका काय पुढच्या पायावर मान ठेवून कौतुकाने ऐकेल का स्वत:चे शेपुट चाटत दुर्लक्ष करेल? :-)
थोडक्यात हा दृष्टांत स्वत:ची समजूत घालण्यासाठी कदाचीत चांगला असेल पण तरी देखील तो "डोळे मिटून दूध पिणार्या मांजरासारखाच वाटला!"
17 Nov 2008 - 9:05 pm | स्वामि
मनिमाउ काय,उंदीर काय,बीळ काय,आणि भो भो काय.