लॉकडाऊन
स्वयंफुर्तीने केलेली संचारबंदी झाली संध्याकाळी मस्त टाळ्या वैगरे वाजवल्या मज्जा आली !
घरी एकटाच होतोना तरी आज रात्री दिव्यांची आरास केली होती !
कंटाळा आला आता पण एकटेपणाचा , हि गेली सोडून गेल्या वर्षी
शेजारच्या गॅलरीतून चिमुकली रोज आजोबा म्हणून हात करून फ्लयिंग किस देते लब्बाड गोबर्या गालांची बया
मेडिकेकवाला मात्र न चुकता औषध देऊन जातो , तेवढाच मानवी सहवास !
का कोणजाणे छोटी आजकाल दिसेना गॅलरीत , तो मेडिकलवाला सुद्धा येत नाहीये , कुंड्यापण सुकत चालल्यात
कसली तरी अनामिक हुरहूर आणि आमची हिपण दिसतेय थोडी आनंदी !!
आता शेजाऱ्यांना कसला वास येतो म्हणे तो माझ्या घरून ?
थांबा कशाला दरवाजा तोडताय , मी निघालोयना दरवाजा उघडायला , संपलं वाटत लॉकडाऊन !!!
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
22 Apr 2020 - 4:22 pm | कुमार१
+१
22 Apr 2020 - 5:19 pm | शा वि कु
द सिक्स्थ सेन्स !
22 Apr 2020 - 5:36 pm | सौंदाळा
+1
भीषण
22 Apr 2020 - 5:56 pm | ज्योति अळवणी
भयंकर... उत्तम impact
22 Apr 2020 - 5:58 pm | मृत्युन्जय
+१
22 Apr 2020 - 6:10 pm | गणेशा
+1
22 Apr 2020 - 6:14 pm | गणेशा
खरे तर जाणून बुजून मी करोना आणि त्या संबंधित कथांना +1 देत नव्हतो, कारण आताच्या वातावरणाला त्या संबंधित आणि मनाला लगेच स्पर्श करणाऱ्या होतात.
कथेची सुरुवात ही मला तशी वाटली, पण तुमचा आयुष्य म्हणजेच एकप्रकारचे लॉकडाऊन हा कन्सेप्ट जबरदस्त.. मस्त..
कथा आवडलीच
22 Apr 2020 - 6:20 pm | जव्हेरगंज
+१
भारी मांडली आहे! 😲
22 Apr 2020 - 6:45 pm | कोण
+१
22 Apr 2020 - 6:52 pm | मोदक
+०१
22 Apr 2020 - 7:19 pm | मंदार कात्रे
+111
22 Apr 2020 - 7:21 pm | संन्यस्त खड्ग
+1
22 Apr 2020 - 7:22 pm | झपाटलेला फिलॉसॉफर
+१
22 Apr 2020 - 8:48 pm | लोथार मथायस
+1
22 Apr 2020 - 9:20 pm | श्वेता२४
+१
22 Apr 2020 - 11:05 pm | कपिलमुनी
+1
णंतर प्रथेप्रमाणे रसग्रहन करण्यात येईल
24 Apr 2020 - 12:20 pm | माझीही शॅम्पेन
श श क च सुद्धा रसग्रहण करण्याची आयडिया कशी सुचली रे :)
23 Apr 2020 - 2:40 am | मन्या ऽ
+१
जबरदस्त मांडणी!
23 Apr 2020 - 6:49 am | OBAMA80
+१
23 Apr 2020 - 8:28 am | नावातकायआहे
+१
23 Apr 2020 - 8:56 am | शेखर
+१
23 Apr 2020 - 10:13 am | प्रमोद देर्देकर
+१
23 Apr 2020 - 12:18 pm | चौथा कोनाडा
+१
काय बोलणार ?
23 Apr 2020 - 1:04 pm | गामा पैलवान
+१
-गा.पै.
23 Apr 2020 - 2:45 pm | Nitin Palkar
रत्नाकर मतकरी आठवले.
23 Apr 2020 - 3:41 pm | शलभ
+1
23 Apr 2020 - 4:14 pm | बबन ताम्बे
+१
23 Apr 2020 - 5:07 pm | संजय क्षीरसागर
आपल्या जवळच्या लोकांना कमीत कमी ताप होईल इतकं बघावं. केरळला जाऊन करण्यापेक्षा घरच्याघरी हा उद्योग करता आला असता !
23 Apr 2020 - 5:10 pm | संजय क्षीरसागर
गल्ली चुकली !
23 Apr 2020 - 6:17 pm | चिमी
+१
24 Apr 2020 - 12:47 pm | संजय क्षीरसागर
दरवाजा उघडायला कशाला जाईल ?
24 Apr 2020 - 8:57 pm | साहित्य संपादक
लेखकाकडून आलेले ऊत्तर:
24 Apr 2020 - 9:27 pm | संजय क्षीरसागर
नायकाला आपण गेल्याचा वास कसा येईल ?
दुसरी मिस्टेक >
आत्मा तर अकर्ता आणि कायम मुक्त आहे, तो दार उघडायला कशाला जातोय ?
लोक्स मतदानापूर्वी करायची गोष्ट, सत्तास्थापन झाल्यावर का करतात ?
24 Apr 2020 - 9:52 pm | संजय क्षीरसागर
कथेत म्हटलंय
> आमची हिपण दिसतेय थोडी आनंदी !!
आपले प्राणनाथ गेल्याचा खुद्द त्यांना वास लागलायं आणि नायिकेला पत्ता नाही ? आणि ती आहे म्हटल्यावर दार तोडून परत नुकसानी कशाला ?
24 Apr 2020 - 10:21 pm | जव्हेरगंज
कथेत म्हटलंय,
हि गेली सोडून गेल्या वर्षी
म्हणजे नायिकेचा ऑलरेडी गेम झालाय.आत्मा तर अकर्ता आणि कायम मुक्त आहे,
याचं काही प्रुफ आहे का.?24 Apr 2020 - 10:58 pm | संजय क्षीरसागर
कथेत वरती म्हटलंय गेली आणि खाली म्हटलंय :
>आमची हिपण दिसतेय थोडी आनंदी !!
म्हणजे लेखक नायिकेला वरुन पाहातोयं का ?
शिवाय आत्म्याची भानगड लेखकानं काढली आहे > तो मुक्त आणि अकर्ता आहे हा माझा अनुभव आहे > आणि मान्यताप्राप्त अध्यात्मिक ग्रंथांचा त्याला आधार आहे.
किमान आत्मा दार उघडायला तरी जाणार नाही !
25 Apr 2020 - 12:39 am | गणेशा
25 Apr 2020 - 12:46 am | गणेशा
उद्या देतो हा रिप्लाय येथे error येते आहे
25 Apr 2020 - 12:44 am | गणेशा
25 Apr 2020 - 9:29 am | गणेशा
संजय भाऊ,
तुमचे सगळे रिप्लाय पाहुन, कथा लेखक स्वता:चे लॉकडाऊन आणि स्वता:चा दरवाजा दोन्ही तोडून पार वरच जाईल :) बहुदा.
मला असे वाटते :
कथेतील म्हतारा नायक, लॉकडाऊन मध्ये घरी एकटाच बंद आहे... त्या नायकाची बायको गेल्या वर्षी गेली आहे.
फक्त मेडिकल वाला माणुस त्याच्याकडे येतो, तेव्हडेच काय माणसाचे सानिध्य थोड्यावेळेसाठी.
तो मेडिकल वाला येत नाही आता कदाचीत लॉकडाउन मुळे ( किंवा त्याचे लॉक्डाउन पण सुटले असु शकते :))
नंतर काही दिवसाने नायक घरात मरतो ( औषध न मिळाल्याने पण असे होउ शकते )
तो मेल्याने त्याच्या १ वर्षाभरा पुर्वी मेलेल्या बायकोला स्वर्गात आनंद झालेला असतो ( बायको स्वर्गातच म्हणायचे, नरकात म्हणणे पाप असते ) हे याला पण मेल्यामुळे कळते.
(मेल्या नंतर पण बायको आपला पिच्छा सोडत नसते हा गहन अर्थ यातुन दिसतो आहे)
आणि ह्या नायकाला मेल्याने जीवनाचे लॉकडाऊन सुटले असे वाटते..
मजेने :
१. आता येथे पण शंका घेऊ नका , की वास येइ पर्यंत आत्मा तेथे काय करत होता.. कदाचीत आत्मा पण वास घेतो, म्हणुनच आत्म्याचा वास आहे या जागेत असे बोलले जात असावे..
२. बायको कशी दिसते आनंदी, ही शंका बाकीच राहिली असली तरी, बायको वर्च्युली स्वर्गातुन मन की बात बोलली असेल आनंदाने.. डिजीलयाज्ड असेल स्वर्ग पण ..
---------
मुळ कथा लेखकाने माझ्या येव्हड्या कष्टाबद्दल लॉकडाउन उठल्यावर ( जीवनाचे नाही) चहा तरी द्यावा राव मला..
+१ तर आधीच दिलाय आपल्याला जीवनाचा लॉकडाऊन हाच कन्सेप्ट भारी वाटला एकदम.. आणि १-२ वाक्य सोडली तर कथा पण मस्त आहे
25 Apr 2020 - 9:42 am | संजय क्षीरसागर
गेलेली बायको दिसते हा कथेचा क्लायमॅक्स आहे !
कथेचं नांव आत्मवास असतं तर विजय नक्की होता !
इतके गोंधळ झालेली कथा केवळ बहुमताच्या जोरावर विजयी होणं हे देशातल्या परिस्थितीचं प्रतिबिंब असेल !
24 Apr 2020 - 1:50 pm | मोहन
+१
24 Apr 2020 - 2:09 pm | प्रशांत
+१
24 Apr 2020 - 2:13 pm | वामन देशमुख
+१
24 Apr 2020 - 11:07 pm | स्मिताके
+१
25 Apr 2020 - 12:45 am | गणेशा
25 Apr 2020 - 2:03 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
पण लेखकाला वास आलेलाच नाहीये. शेजाऱ्यांना वास आल्याचं लेखकाला दिसतंय.
आ.न.,
-गा.पै.
25 Apr 2020 - 3:57 pm | संजय क्षीरसागर
पण शेवट बघा
> थांबा कशाला दरवाजा तोडताय , मी निघालोयना दरवाजा उघडायला , संपलं वाटत लॉकडाऊन !!!
म्हणजे जो गेलेला असतांना दरवाजा उघडायला जातो त्यालाच आपण गेल्याचा वास शेजाऱ्यांना लागला हे कळतंय !
25 Apr 2020 - 4:59 pm | गामा पैलवान
संजय क्षीरसागर,
याचाच अर्थ लेखक गोंधळलेला आहे. हे गोंधळणं वय झाल्याचं आहे की मृत्यू झाल्याचं ते ही त्याला कळंत नाहीये. प्रत्यक्षात तो 'गेलेला' आहे.
वाचकाने वाचक म्हणून कथा वाचावी की लेखक बनून अनुभवावी हे मी तुमच्यावर सोडतो.
आ.न.,
-गा.पै.
25 Apr 2020 - 5:08 pm | संजय क्षीरसागर
हेच कळत नसेल तर लॉक डाऊन संपला हे कसं कळेल ?
त्या केसमधे कथाच फेल जाते ना !