कसाई
एकुलत्या एका आईविना वाढविलेल्या मुलीची नवऱ्यामुलाबरोबर पाठवणी करून अप्पा मंगल कार्यालयाच्या एका खुर्चीत विसावले. छोट गाव, गरीबी, सावळी मुलगी इ. नकारार्थी गोष्टींनंतर अचानकच काही चांगले घडले होते. एस.टी मध्ये सापडलेल्या पिशवीतील स्थळांची नीटनेटकी यादी आणि त्यात तारांकीत केलेले हे स्थळ, जणूकाही वरच्याचीच कृपा म्हणत त्यांनी समाधानाने हात जोडले.
काय गजाभाऊ, हे चांगले स्थळ कसे सुटले तुमच्याकडून? दैवी इच्छाच जणू. तारांकीत स्थळांच्या माहितीत सुधारणा करण्याअगोदरच यादी एस.टीत हरवली.
हेच ते दोघे भामटे पिता-पुत्र. यांनी कित्येक गरीब मुलींशी लग्न करून त्यांना वाममार्गाला लावले आहे. आज अजून एक गाय या कसायांच्या ताब्यात फसली.
कोपर्यात छाती धरून निपचीत पडलेले अप्पा नातेवाईकांना सापडले.
body {
background: url(https://i.postimg.cc/NM70Z4Dn/147450-abstract-purple-and-white-blur-ligh...);
background-size: 1900px;
}
प्रतिक्रिया
21 Apr 2020 - 6:36 pm | शेखर
+१
22 Apr 2020 - 9:06 am | ज्योति अळवणी
बापरे! फारच वाईट घटना. शंभर शब्दात उत्तम
22 Apr 2020 - 1:31 pm | मोहन
+१
22 Apr 2020 - 6:14 pm | जव्हेरगंज
.
22 Apr 2020 - 6:14 pm | जव्हेरगंज
.
22 Apr 2020 - 6:14 pm | जव्हेरगंज
+१
(मध्ये थोडी फिस्कटलीय.. पण ओके 👍 )
2 May 2020 - 12:43 pm | OBAMA80
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. सुधारणा सुचवाल का? माझ्यासारख्या नवलेखकास मदतच होईल. धन्यवाद.
23 Apr 2020 - 3:07 pm | Nitin Palkar
+१
24 Apr 2020 - 5:40 pm | गणेशा
कथेची सुरुवात भारी, शेवट पण चांगला.. पण वरच्या ओळीत बरेच काही तरी मिस वाटते आहे...
+१
2 May 2020 - 12:41 pm | OBAMA80
दुसर्या एका कोपर्यात दुसरे लोक याच स्थळाबद्दल बोलत आहेत...त्यातल्या गजाभाऊंची ती यादी असते.....
काय मिस झाले आहे ते विस्तारून सांगितलेत धन्यवाद.
26 Apr 2020 - 7:21 pm | तेजस आठवले
+१
पण अजून चांगली करता आली असती
27 Apr 2020 - 9:22 pm | मनस्विता
+१
28 Apr 2020 - 9:09 am | टर्मीनेटर
+१
आवडली!
29 Apr 2020 - 5:55 am | सुमो
+1