सफरचंद , पाइन नट सलाड आणि भाजलेली कोंबडी

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
21 Apr 2020 - 4:48 pm

सफरचंद आणि पाइन नट सलाड आणि भाजलेली कोंबडी

य पाककृतीचा नायक कोंबडी नसून हे सलाड आहे

साहित्य: सर्व ताजे आणि फार पिकलेले लिबलंबित नसावे
- बिया काढलेला टोमॅटो चे काप
- काकडी बारीक लांबट काप ,गाजर काप
- ऑलिव्ह
- रॉकेट किंवा लेट्स चिरलेले
- ऑलिव्ह तेल
- काळी मिरी भरडी पूड
- मीठ
- सफरचंद आंबट गोड असावे आणि "क्रिस्प"
- पाइन नट च्या बिया भाजून घेणे .. त्याला भाजल्यावर स्वतःचे तेल सुटे आणि एक छान गोडवा येतो ( नसल्यास काजू चे मध्यम तुकडे पण चालतील भाजलेले )
- तयार फ्रेचन्ह किंवा ग्रीक पद्धतीचे सॅलड ड्रेससिंग ( नसल्यास ऑलिव्ह तेल, लिंबू रस , मीठ + बारीक चिरलेला यौरोपीय वनस्पती, ऑरगॅनो, शेपू , पार्सली वैगरे किंवा कोथिंबीर चालेल)
शेवटचं २ गाष्टींमुळे या सलाड ला जरा वेगळेपण येतो ( सफरचंदाचा कुरकुरीत आणि आंबट गोड पण + बियांचा भाजका स्वाद )

- भाजलेली कोंबडी:
वेगवेगळ्या प्रकारचे रस रंग याला देता येतील पण शक्यतो फार मसालेदार नको , मी येथे विनेगर + थोडी साखर, कमी तिखट पाप्रिका वैगरे यात भिजवली आहे अन मग प्रथम ओव्हन चांगला २०० अंश से. ला तापवून त्यात कोंबडी झाकून ठेवावी थोड्या वेळाने तपमान १८० अंश से वर आणावे
- शिजल्यावर थोडा वेळ बाहेर काढून तशीच ठेवून द्यावी ,, कोमट झाल्यावर सलाड बरोअबर वाढावे
IMG_7549[1]
IMG_7551[1]

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

21 Apr 2020 - 5:08 pm | चांदणे संदीप

या पाकृला दुर्लक्षित करण्यात आले आहे... कोंबडीची तंगडी तर आज्जिबात बघितलो नाही.
वाचलो तर नाहीच्च नाही. नाहीतरी पाइन नट आम्ही कुठून आणणार? ;)

सं - दी - प