लॉकडाऊन: पंचविसावा दिवस

इरसाल कार्टं's picture
इरसाल कार्टं in काथ्याकूट
18 Apr 2020 - 7:28 am
गाभा: 

"दूधपावडरचा डबाही घे किमान एक" - मी.
बायकोच्या मते मी खूपच घाबरत होतो. आधीच दोन तीन महिन्याचे रेशन भरायला सांगितल्याने ती वैतागली होती. पण लॉकडाऊन येणार हे निश्चित आहे हे मी तिला पुन्हा पुन्हा सांगत होतो.
"उद्या दुकानातील सगळी पेंडिंग कामं उरकून घे आपण परावापासून दुकान बंद ठेवतोय, अनिश्चित काळासाठी" माझा आणखी एक धक्का त्याच दिवशी तीस एप्रिलपर्यंतच्या फोटोग्राफीच्या सगळ्या ऑर्डर्स रद्द करून झाल्या होत्या .
"अख्ख्या जगाची भीती तुम्हालाच" म्हणून तिने अमूल स्प्रेचा डबा बास्केटमध्ये भरला आणि बिल घेऊन आम्ही वाणसामानाची 'गोण' घेऊन निघालो.
घरातल्या टीव्हीला केबल कनेक्शन नसल्याने रोजच्या बातम्या पाहणे होत नाही आणि एवढे दिवस थोडेफार ऐकून असली तरी मी तिला खरी परिस्थिती सांगितली नव्हती. त्यामुळे तिची चिडचिड स्वाभाविक होती पण माझी भीतीही अनाठायी नाही हे तिला तिसऱ्याच दिवशी कळले.
आम्ही नवरा बायको एक सायबर कॅफे वजा फोटो स्टुडिओ चालवतो, रेल्वे तिकीट, विमान तिकीट, मनी ट्रान्स्फर सारख्या सुविधा देत असल्याने उत्तर भारतीय, कामासाठी प्रवास करणारे हे आमचे मुख्य ग्राहक. त्यामुळे साहजिकच मी इतरांपेक्षा जास्त घाबरलो होतो. आणि माझ्या परिसरातील इतर दुकाने चालू असताना मी दुकान बंद केले. अर्थात हि परिस्थिती फक्त एक दिवसा पुरती रहिलि कारण पोलीस प्रशासनाने दुसऱ्याच दिवशी नाक्यावरची सगळी दुकाने बंद करावी लागणार हे जाहीर केले आणि अनेकांची तारांबळ उडाली.
आता एवढ्या मोठ्या सुटीत काय करायचे हे मी ठरवून ठेवले होते. वॉचलिस्टमध्ये असलेले फोटोग्राफीसंबंधित असंख्य युट्युब व्हिडीओ आधी पाहायचे आणि युडेमीवर असलेला फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी कोर्स सबस्क्राईब करून पूर्ण करायचा एवढं लक्ष्य होतं कारण रोजच्या कामाच्या वेळात हे शक्य होत नव्हते. त्याचबरोब फोटोग्राफीमध्ये काही प्रयोग करायचेच होते. पण लॉकडाऊन सुरुवातीलावाटलं तेवढं सोपं नसणार हे पहिल्या दोन तीन दिवसांत कळून चुकलं. नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त दिवसेंदिवस कडक होत असल्याने दुकानात जाणे कठीण वाटू लागले. त्यात मी राहात असलेल्या इमारतीतील लोक अत्यंत बेशिस्त आणि बेजबाबदार वागत असल्याने इथे न थांबता गावातील घरी जावं लागेल एवढं कळून चुकलं. आता गावात इंटरनेटही अगदी स्लो असल्याने फोनवर व्हिडिओ पाहणे कठीण झाले. तसेच घरी असताना मुलाला सांभाळण्याची जबाबदारी आपसूकच माझ्यावर येऊन पडल्याने काही शिकायचं झालं तरी त्यात व्यत्यय येत होता.
आता शेवटचा एकच पर्याय शिल्लक राहिला होता आणि तो म्हणजे फोटो काढणे.
गावात असल्याने एक फायदा झाला होता कि मला मॉर्निंग वॉकला जात येत होते. घरापासून गावचे निवांत असलेले शिवमंदिर दोन किमीवर आहे आणि तिथून नदी एक किमी, येऊन जाऊन सहा किमी चालणं सहज होऊन जातं. सकाळी या अख्या पायपिटीत एकही माणूस भेटत नसल्याने सोशल डिस्टंसिंग वगैरेची चिंता नव्हती. मग सकाळी कॅमेरा, एक १८-५५एमएम ची किट लेन्स आणि एक ५०एमएम लेन्स असं सामान घेऊन रोजची पायपीट सुरु झाली. सुरुवातीला फोटो कश्याचे काढायचे हा प्रश्न होता मन निसर्गाने तो सहज सोडवून दिला. उन्हाळ्यात होणारी वृक्षतोड, वणवे आणि गाव ते नदी असे झालेले रस्त्याचे खोदकाम यामुळे बरीच झाडे तोडली/उपटली गेली होती. आणि या झाडांना आता नव्या जोमाने पालवी फुटत होती. मग मनात तोच थीम ठेऊन रोजचे फोटो काढू लागलो.
(सुरुवातीला काढलेले फोटो)
1

2

3

4

( सुरुवातीला काढलेले सूर्योदयाचे फोटो) त्यातच मधले काही दिवस ढगाळ वातावरण असल्याने सूर्योदयाच्या वेळी होणारे प्रकाशाचे खेळ टिपता आले. 5

7

(बॉटल्सचे फोटो) गावातील एका मित्राने मिनरल वॉटर चा कारखाना सुरु केलाय त्याला काही दिवसांपूर्वी त्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे फोटो फ्लेक्स डिझायनरला हवे तसे काढून दिलेले. त्याचे डिझाईन आल्यावर बाटल्यांची पारदर्शकता मनासारखी नसल्याने थोडे यूट्यूबच्या मदतीने 'रिऍलिस्टिक' वाटतील असे डिझाईन बनवून दिले. त्या निमित्ताने 'प्रॉडक्ट फोटोग्राफी'चा सराव झाला.
transperant table

मूळ फोटो :
IMG_8071

(मॉन्स्टर ट्रकचे फोटो) त्यात अजून प्रयोग म्हणून मुलाच्या खेळण्यांपैकी दोन मॉन्स्टर ट्रक्स घेऊन त्यांवरही प्रोडक्ट फोटोग्राफीचा सराव केला.
10

IMG_8420

(मित्रांबरोबर काढलेला लाईट पेंटिंग फोटो)खूप दिवसांपासून लाईट पेंटिंग करायचे होते त्यासाठी बाजारातून साहित्य आणले होते त्याचे प्रोटोटाइप तयार करून काही फोटोग्राफर मित्रांबरोबर लाईट पेंटिंगचे प्रयोग करून बघितले. तेही बऱ्यापैकी यशस्वी झाले.
12

13

(मित्राने काढलेला लाईट पेंटिंग फोटो) आणखी एक फोटोग्राफर मित्राने फोनवरूनच लाईट पेंटिंगबद्दल माहिती घेतली. त्याच्या अडचणी सुधारल्या आणि त्यालाही छानपैकी लाईट पेंटिंग करता आलं.
14

15

(दिव्यांचे फोटो)माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला मान देऊन लावलेल्या दिव्यांचेही दोन तीन फोटो काढलेले.
20200405210221_IMG_8498

20200405210023_IMG_8494-01

अश्या तऱ्हेने लॉकडाऊनचे उनाड दिवस काही प्रमाणात सत्कारणी लावतोय. जसे जमेल तसे आणखी प्रयोग करीनच आणि नीट जमुन आल्यास त्याचेही फोटो एखाद्या नवीन धाग्यावर टाकेन.

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

18 Apr 2020 - 11:23 am | चौकस२१२

जरूर .. जरूर .. आणि गावाकडचे अजून फोटो टाका... अरे वाह असे फोटो काढता यायला पाहिजेत .... तर मज्जा .. आमची फटोग्राफी म्हणजे ४ थाटला निबंधाच्या प्रतीचे लेख असतात तशी ! शिकलं पाहिजे ...

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 1:58 pm | इरसाल कार्टं

नक्की टाकेन
पण बहुदा लॉक डाऊन नंतर.

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 2:08 pm | इरसाल कार्टं

थोडा वेळ मात्र द्यायला हवा

सुबोध खरे's picture

18 Apr 2020 - 11:31 am | सुबोध खरे

सुंदर फोटो

सतिश गावडे's picture

18 Apr 2020 - 11:49 am | सतिश गावडे

वाह... भारी फोटो आहेत. विशेषतः नुकतेच आलेल्या पालवीचे फोटो आवडले.

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 2:01 pm | इरसाल कार्टं

हे फोटो लॉकडाऊनच्या सुरुवातीला काढलेत. ते मी सोशल मीडियावर hope या कॅप्शनखाली शेअर केले होते. खरंतर हे फोटो काढताना मला स्वतःलाही खूप सकारात्मकता जाणवत होती.

सर्वच फोटो आवडले. कसे काढले याची उत्सुकता वाढली.

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 1:57 pm | इरसाल कार्टं

लाईट पेंटिंग/लॉंग एक्सपोजर फोटोग्राफी वर धागा काढतो लवकरच.

संजय क्षीरसागर's picture

18 Apr 2020 - 12:41 pm | संजय क्षीरसागर

लगे रहो !

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 2:02 pm | इरसाल कार्टं

धन्स हो

ज्योति अळवणी's picture

18 Apr 2020 - 12:42 pm | ज्योति अळवणी

सुंदर फोटो

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2020 - 12:43 pm | चौथा कोनाडा

वाह, सुपरभारी फोटोज ! इरसालरावांनी प्रकाशखेळच दाखवला जणू !
पु. फो. प्र.

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 2:02 pm | इरसाल कार्टं

धन्यवाद

सौंदाळा's picture

18 Apr 2020 - 12:55 pm | सौंदाळा

फोटो सुंदर आहेत,
प्रतिसादांमध्ये अजून फोटोंची भर घाला. नदीकाठ, शिवमंदिर वगैरे येऊ दे

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 2:03 pm | इरसाल कार्टं

नक्की

पाण्याच्या बाटलीचे फोटो खुपच मस्त, मागील देखावा कसा बदलला ?

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 2:05 pm | इरसाल कार्टं
प्रचेतस's picture

18 Apr 2020 - 1:33 pm | प्रचेतस

फोटो आवडले.
ह्या लेखमालिकेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मिपाकरांचे अनुभव वाचणे भलतेच रोचक झाले आहे.

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 2:07 pm | इरसाल कार्टं

धन्यवाद

Nitin Palkar's picture

18 Apr 2020 - 1:51 pm | Nitin Palkar

लेख आणि फोटोज दोन्ही सुंदर!

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 2:06 pm | इरसाल कार्टं

धन्यवाद काका

सगळेच फोटो सुंदर आहेत रे! असेच पुढे सुरू ठेव....

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 2:36 pm | इरसाल कार्टं

धन्स केडी

प्रशांत's picture

18 Apr 2020 - 7:33 pm | प्रशांत

फोटो सुंदर आहेतच. के डी सर यावर कॅप्शन येवु द्या.

आंबट चिंच's picture

18 Apr 2020 - 2:32 pm | आंबट चिंच

खुप छान आहेत फोटो खास करुन तो ट्रक्टर पाण्याचे बाजुला आहे त्याचा आणि लाईटनिंगचे विषेश करुन आवडले.

हि अशी फोटोग्राफी मोबाईलद्वारे करता येते का?

इरसाल कार्टं's picture

18 Apr 2020 - 2:35 pm | इरसाल कार्टं

तुमच्या मोबाईल मध्ये मॅन्युअल किंवा प्रो मोड असेल तर काही प्रमाणात जमेल

मोदक's picture

18 Apr 2020 - 2:47 pm | मोदक

असे एकेकाला धन्यवाद देण्यापेक्षा दोन दिवसांनी सर्वांना एकदम घाऊक धन्यवाद दे.

तू काढलेले अप्रतिम फोटो आणि केडीने त्याला दिलेले भारी कॅप्शन असा एखादा धागा काढ.

चांदणे संदीप's picture

18 Apr 2020 - 3:15 pm | चांदणे संदीप

सर्वच फोटो भारी आलेत. पहिला फोटो विशेष आवडला.

सं - दी - प

रीडर's picture

18 Apr 2020 - 3:42 pm | रीडर

छान फोटो

पाषाणभेद's picture

18 Apr 2020 - 4:20 pm | पाषाणभेद

फोटोग्राफीची कमाल!
कमालीची फोटोग्राफी!!

सस्नेह's picture

18 Apr 2020 - 5:38 pm | सस्नेह

Intelligent photo !

वामन देशमुख's picture

18 Apr 2020 - 6:57 pm | वामन देशमुख

तुम्ही लइच इरसाल कार्टं हाइत वो!
काय काय तरी फोटू टाकताय! येकदम भारी!

स्वधर्म's picture

18 Apr 2020 - 7:08 pm | स्वधर्म

लावलात, आणि फोटोही सुंदर.

अभ्या..'s picture

18 Apr 2020 - 7:14 pm | अभ्या..

मोन्स्टर ट्रक चे फोटो आवडले.
पाणी बॉटल पण.

मोन्स्टर ट्रक फोटोमध्ये कल्पकता आहे आणि ही तंत्रज्ञान, भारी ग्याजेट्स यांच्या पलिकडे असते.

सौ मृदुला धनंजय शिंदे's picture

18 Apr 2020 - 7:40 pm | सौ मृदुला धनंजय...

सगळेच फोटो अप्रतिम आहेत.अजून फोटो बघायला नक्कीच आवडेल.

मदनबाण's picture

18 Apr 2020 - 7:50 pm | मदनबाण

सुंदर फोटो !

अवांतर :- मी बबिता फोगाट चे समर्थन करतो, तिला सुरक्षिततेची गरज असेल तर तिला ती ध्यायला हवी.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aithey Aa... :- Bharat

जव्हेरगंज's picture

18 Apr 2020 - 9:49 pm | जव्हेरगंज

जाम भारी फोटोज!!!

MipaPremiYogesh's picture

18 Apr 2020 - 11:42 pm | MipaPremiYogesh

वाह एक से एक फोटो आहेत. मी पण हौशी फोटोग्राफर आहे, लोकडाऊन झाल्यावर भेटू एकदा..स्टुडिओ ची माहिती द्या..

इरसाल कार्टं's picture

9 May 2020 - 4:05 pm | इरसाल कार्टं

नमस्कार,
आपण नक्की भेटूया. माझा मोठा स्टुडिओ वगैरे नसून छोटंसं ऑनलाईन कामं करण्याचं दुकान आहे. त्यातच छोटा सेटअप केलाय.
पत्ता:कुडूस गाव, तालुका वाडा, जि. पालघर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2020 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लॉकडाऊनचा उत्तम सदुपयोग. फोटो एकसे बढ़कर एक. फोटो आणि लेखन आवडले.

-दिलीप बिरुटे

झेन's picture

19 Apr 2020 - 8:14 pm | झेन

लॉकडाउन कडे बघण्याचा अप्रोच आवडला, फोटो खूप सूरेख आहेत
, लायटिंगच्या माहिती साठी पुढील धाग्याच्या प्रतिक्षेत.

मित्रहो's picture

19 Apr 2020 - 11:51 pm | मित्रहो

मस्त फोटो

सुंदर फोटो आहेत सगळे आवडले..

तो पहिला hope हा फोटो मी चोरू का?
खूप आवडला आहे मला तो

इरसाल कार्टं's picture

9 May 2020 - 4:06 pm | इरसाल कार्टं

बिनधास्त चोरा.