थायलंड डायरीज !!!! - मुंबई टू फुकेत वाया सिंगापूर

अभिनाम२३१२'s picture
अभिनाम२३१२ in भटकंती
17 Apr 2020 - 2:27 am

भाग १ - मुंबई टू फुकेत वाया सिंगापूर

रात्री ११.३५ च फ्लाईट होत . घरापासून विमानतळ २० मिनिटावर होता म्हणून काही टेन्शन नव्हत. मॅडमच्या सवयी प्रमाणे ३ तास आधी छत्रपती शिवाजी मुंबई विमानतळावर पोचलो. बोर्डींग पास व इमिग्रेशनचे सोपस्कार पार पडले व साधारण ९.३० वाजता आम्ही आत शिरलो.

मुंबई विमानतळ देखणा आहे पण प्रशस्त नाहीय...याची प्रचीती आम्हाला जर्मनीच्या विमानतळावर आली होती..असो..

ड्युटी फ्रीमध्ये मदिरेची सोय केली..आणि पिक अप फुकेतला .....आता वेळच वेळ होता फिरायला...बरेच लवकर निघालो होतो त्यामुळे जेवण राहील होत, शिवाय विमानमधे पण जेवण मिळणार होत म्हणून हलका नाश्ता केला ...माझा हा अवघा दुसराच विमान प्रवास होता...मानसी मात्र हॉँगकॉँगच्या प्रवासामुळे चांगलीच सरसावली होती....पूर्ण प्रवास हा सिंगापूर एअर लाईनचाच होता...त्यामुळे आता निर्धास्त झालो होतो... पुन्हा एकदा आकाशातुन चमचमती मुंबई दिसणार या विचाराने मी खुश झालो होतो....मानसी मात्र चांगी एअरपोर्ट वर काय काय बघायला मिळणार याची लिस्ट बनवत होती... आतपर्यंत दोनच वेळा विमान प्रवास झाला पण दोन्ही वेळा नावाजलेल्या एअरलाईन मधूनच...
वेळ साधारण १०ची.... फ्लाईट नंबर आणि गेट नंबर ची घोषणा झाली...लगेच सगळयांची गर्दी झाली...गरज नसताना अशी गर्दी का करतात हेच कळत नाही मला ....तब्बल पाऊण तास लाईन मधे उभ राहून आधीच चेकइन केलेली सिटच मिळणार ना....तरी या लोकाना घाई ... आम्ही आपले लाईन संपे पर्यंत वाट बघितली....
काही मिनिटतच लाईन कमी झाली तेव्हा आम्ही पण लगेच विमानात शिरलो. उड्डाणाच्या १५ मिनिट अगोदर विमानाचे दरवाजे बंद झाले, सुरक्षा सूचना झाल्या. यानंतरचा काळ फार कठीण होता कारण विमान टॅक्सीवे मधे तब्बल ३० मिनिट उभ होत....एकीकडे भूक लागली होती आणि दुसरीकडे मुंबई दर्शनची आस ....अखेरीस रनवे मिळाला आणि आम्ही उडालो ...
अवघा ५-७ मिनिटांचा नजारा .....चमचमणारी मुंबई आता मागे पडू लागली आणि आता बाहेर फक्त अंधाराच साम्राज्य होत...काही मिनिटातच जेवण आल...पोटोबा झालयावर ताणून दिली मस्त...म्हटल आता भेटू सिंगापूर मधे....मानसी मात्र सीट समोरील स्क्रीन मधे काहीतरी उगाच काहीस शोधत बसली.

साधारण ५.३० - ६ च्या सिंगापुर वेळेनुसार विमान सिंगापूरला लँड झाल...परत इमिग्रेशन चे सोपस्कार आणि आम्ही साधारण ७ वाजता चांगी एअरपोर्ट वर फिरायला मोकळे झालो. आमच पुढच फ्लाईट तब्बल ६ तासांनी म्हणजे दुपारी १.१० च होत. त्यामुळे खाणे पिणे आणि एअरपोर्ट फिरणे एवढेच काम उरले होते.

सिंगापूर एअरपोर्ट चांगलाच प्रशस्त आहे. एका टर्मीनल वरुन दुसर्‍या टर्मीनल ला जायला मेट्रो ट्रेन आहे. हा प्रकार फ्रॅंकफर्ट एअरपोर्ट ला पण बघितला होता. खूप सारे खाण्याचे पर्याय आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक गोष्टी सुद्धा .....त्यामुळे म्हटल आता बघून घेऊ येताना खरेदी करू..मानसी ला हा पर्याय पटला ..कॉफी , बर्गर आणि क्रॉसो अस खिशाला परवडतील असे जिन्नस खाऊन भटकंतीला लागलो. इकडे कॉमन लाऊंज पण खूप मोठे प्रशस्त आणि बर्‍यापैकी सोयीसुविधानी सज्ज आहेत. उदाहरणार्थ फ्री बॉडी मसाजर...थकलेल्या शरीराला तेवढाच निवांतपणा. त्यानतर आमचा मोर्चा वळला बटरफ्लाय पार्ककडे. एअरपोर्ट मधे एक बटरफ्लाय पार्क होत. तिकडे थोडा वेळ काढला ...जागोजागी छोटी छोटी झाड आणि लाईटिंग केल होत...किंवा नुकतच नवीन वर्ष सुरू झाल होत त्यामुळे कदाचित लाईटिंग दिसत होत....असो ..एअरपोर्ट चा शृंगार छान जमला होता.

आमच्या गोप्रो साठी एक हेड स्ट्रॅप घेतला ज्यातुन काढलेले फोटो पुढे येणार्‍या धाग्यात टाकेनच...आता हिंडून पाय दुखायला लागले होते व फुकेतची ओढ लागली होती. मग गुपचुप फुकेतच फ्लाईट जिथून सुटणार त्या गेट जवळ आलो.

नेहमीसारखी फ्लाईटची उद्घोषणा झाली आणि गेट उघडले व आम्ही विमानात शिरलो. काही वेळात विमान हवेत झेपावल आणि सिंगापूर मागे पडू लागल. फारच छोटा बेटाचा तुकडा आहे सिंगापूर ... पण अतिशय नीटनेटक वाटल ... आता फक्त २ तासांचा प्रवास राहिला होता...
इतके दिवस थायलंड विषयी ऐकून होतो आता प्रत्यक्ष अनुभवायची संधी मिळणार होती ..

तासभरा नंतर छोटी छोटी बेट दिसायला लागली ...व आता मॅप वर १०-१५ मिनिटांचा प्रवास राहिला आहे कळल...बाहेर अजूनही समुद्रच दिसत होता

काही क्षणात समुद्रा वरुन आम्ही जमिनीवर उतरलो ....बाहेर 'वेलकम टू फुकेत' चा बोर्ड दिसत होता...परत इमिग्रेशनचे सोपस्कार आणि फाइनली फुकेत ला पोचलो.... ड्यूटी फ्री मधून मादिरा घेतली आणि एअरपोर्टच्या बाहेर आलो .....आता खरी सुरवात झाली होती.
एअरपोर्ट च्या बाहेरच सिम कार्ड घेतल आणि घरी फोन करून खुशाली कळवली.
आमचा पहिला मुक्काम होता 'बान कोकोनट रिज़ॉर्ट' ....एअरपोर्ट पासून अर्धा तास दूर...तिकडे बाहेरच टॅक्सीवाले होते... थोडी घासाघिस केल्यावर ४०० बाथ वर सौदा पक्का केला. पहिलीच घासाघिस जिंकली त्यामुळे एकदम जग जिंकल्यासारख वाटल ....
फुकेत एअरपोर्ट मूळ शहरापासून बराच लांब आहे...किमान ४० किमी...आमच हॉटेलही शहराबाहेर एअरपोर्टपासून २७किमी होत..
एकदम गुळगुळीत ,स्वच्छ, टापटीप रस्ते ....कुठेही खडड्यांचा मागमूस नाही ...मुंबईतल्या माणसाला याच नवल का असु नये...लोक स्वतः हून रांगेची शिस्त पाळत होते....उगाच कोणी होर्न वाजवत नव्हत....
स्पेन सारखी इथली घर रॉयल नव्हती पण व्यवस्थित मांडणी केलेली होती...थायलंड मधे वर्षाचे बारा महिने पाऊस पडतो...पावसाळ्यात तर मुंबई सारखा धो धो कोसळतो...शिवाय हवेत दमटपणा पण असतो त्यामुळे घाम पाचविला पूजलेला असतो. टॅक्सीने आम्हाला हॉटेलपर्यंत सोडल नाही ...तर एका होटेल जवळच्या रिक्षा स्टॅंडपर्यंत सोडल... विचारल तर म्हणाला की आम्ही आत पर्यंत नाही सोडू शकत....(या गोष्टीचा मला खर तर राग आला होता ) .....पुढे एका मोपेड रिक्षाने आम्ही १० मिनिटा मधे पोचलो...

रिसोर्ट फोटो मधे दाखवल्याप्रमाणे एकदम छान होत....एका छोट्या गावात ....आजूबाजूला गर्द झाडी ....
रिसोर्ट म्हणजे खर तर ते एक घरच होत ज्याला रिसोर्ट मधे परिवर्तीत केल होत... मला हे रिसोर्ट एअर बिएनबि वर मिळाल होत. माझ मालकाशी आधीच बोलण झाल होत...त्याने मला तिथल्या केअर टेकर चा नंबर दिला होता. पोचल्यावर त्याने कुठून आलात वगैरे चौकशी केली. आमची रूम दाखवली. प्रशस्त नाही पण ठीकठाक मोठी होती.
गेटमधून प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला प्रथम केअर टेकरच घर होत. तिथून पुढे मेन बिल्डींग ज्यात उजव्या बाजूला आमची आमची रूम...डाव्या बाजूला मालकाची खोली आणि त्याचा पुढे डाव्या बाजूलाच खुला किचन होता. किचनलाच लागूनच एक खुली डायनिंग रूम होती, जिथे सगले नाश्ता करण्यासाठी भेटत...तिथे मेन बिल्डींग संपली. आता बॅकयार्ड मधे स्विमिंग पूल व थोडी मोकळी जागा आणि त्याचा मागे २ रूम्स.... स्विमिंग पूल कडे फेसिंग अशा होत्या....काही क्षण अस वाटल की आपण कोकणातल्या घरातच आलो आहोत...फक्त थोड मॉडर्न घर होत...

मालकाच नाव आल्फ्रेड होत ....मुळचा जर्मनीचा होता तो ..आणि त्याचा केअर टेकर पण.... केअर टेकरच नाव आठवत नाही... पण तो सुद्धा जर्मन होता आणि त्याची पत्नी मात्र थायलंडची होती. त्याला इंग्रजी बोलता येत होत, पण तिचे इंग्रजीचे वांदे होते. पण तो तिला थाय भाषेत समजावून सांगत होता आणि ती पण विनातक्रार सर्व काही करत होती. घराचे काही नियम होते...जस की न्याहारी सकाळी १० पर्यंत मिळेल..स्वतः ला काही हव असेल तर शिजवायची परवानगी होती..मात्र मासे अजिबात वर्ज्य होते....एक पुस्तकांच कपाट होत....ज्यात जर्मन आणि इंग्लीश भाषांमधली बरीच पुस्तक होती. एकूणच घरासारख वाटत होत.

सर्व प्रवासाचा एक क्षीण आला होता त्यामुळे माझी रात्री जेवायची इच्छा मेली होती. एव्हाना संध्याकाळचे ७ वाजून गेले होते. जेवण्यापूर्वी थोडा वेळ आराम करूया अस म्हटल आणि अंग टाकल ...पण कसल काय ,जी झोप लागली ती तडक दुसर्‍या दिवशी सकाळीच जाग आली...

(क्रमशः)

मुंबई एअर पोर्टवर
At Mumbai Airport
सिंगापूर बटर फ्लाय पार्क
ban coconut

Changi Airport

Changi Airport

Changi Airport
फूट मसाजर
Changi Airport
कलरफूल चान्गि एअर पोर्ट
Changi Airport
सिंगापूर शहर आकाशातून
singapore city
मोपेड टमटम मधून प्रवास
ban coconut
बान कोकोनट रिसोर्ट
ban coconut

ban coconut
घरामागचा स्विमिन्ग पूल
ban coconut
घरातला किचन
ban coconut

ban coconut

आमची रूम
ban coconut

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

17 Apr 2020 - 4:24 am | चौकस२१२

२३१२ फोटू दिसत नाहीत !

कंजूस's picture

17 Apr 2020 - 7:50 am | कंजूस

वर्णन छान.
-------
फोटोंचे शेअरिंग झालेले नाही. या लिंकस चालणार नाहीत.
-----------
१) create new album , title,
२) add photos.
३) एडिट ओप्शनस >> share >> ok>> album sharing link is created.
४)go to menu >> albums >> this album name "shared album" असं दिसले पाहिजे.

५) आता तो shared albumउघडा.
६)एक एक फोटो मोठा करा >> copy image location >> हीच लिंक वापरा.
७) आताच्या सर्व लिंकस बदलाव्या लागतील.

अभिनाम२३१२'s picture

17 Apr 2020 - 12:32 pm | अभिनाम२३१२

धन्यवाद ...आता पुन्हा एकदा अपलोड केले आहेत....दिसत नसल्यास एकदा कळवा

कंजूस's picture

17 Apr 2020 - 2:43 pm | कंजूस

दिसत आहेत. छान.
((५, ११, १६ दिसत नाही.))

चौथा कोनाडा's picture

17 Apr 2020 - 6:12 pm | चौथा कोनाडा

वाह, मस्त वृत्तांत ! मुम्बई विमानतळाचं वर्णन मस्तच !

गरज नसताना अशी गर्दी का करतात हेच कळत नाही

ही नेहमीचीच समस्या !

फोटो एक नंबर भारी. वर उधृत केल्याप्रमाणे फक्त तीन फोटो दिसत नाहीयत, बाकीचे दिसतायत !
तिथल्या टमटमचा बाहेरून फोटो पहायला आवडला असता !
पुढिल भागा विषयी उत्सुकता वाढलीय !
पुभाप्र !

चौकस२१२'s picture

18 Apr 2020 - 11:27 am | चौकस२१२

अभिनाम .. तेथील वास्तू, जेवणातील फळातील कोरीव काम , रंगबिरंगी टुकटुक ( रिक्षा) , रस्त्यावरील जेवण ,जंगल वगैरे फोटो असतील तर जास्त आवडतील बघायला

सतिश गावडे's picture

18 Apr 2020 - 11:52 am | सतिश गावडे

"वैयक्तिक फोटोंच्या ऐवजी" हे लिहायचं राहीलं का? :)

चौकस२१२'s picture

18 Apr 2020 - 1:03 pm | चौकस२१२

हाहाहाहा.... नाही वयक्तिक अगदी नसावे असे म्हणणे नाही माझे .. फक्त फोटोत काहीतरी नावीन्य, अनवट गोष्टी, जातो तिथलं खास असे "जास्त" असावे... एक मित्रत्वाची सूचना होती मूळ धागाकरला राग आला नसावा अशी आशा करतो !

सतिश गावडे's picture

18 Apr 2020 - 11:53 am | सतिश गावडे

वर चौकस म्हणत आहेत तसे तेथील वास्तू, जेवणातील फळातील कोरीव काम , रंगबिरंगी टुकटुक ( रिक्षा) , रस्त्यावरील जेवण ,जंगल वगैरे फोटो असतील तर जास्त आवडतील बघायला.

कंजूस's picture

18 Apr 2020 - 12:08 pm | कंजूस

आता मिपाने कालानुरूप फेसबुकपोस्ट पद्धतीचं वळण घेतलं तर स्वागतच केलं पाहिजे. वैयक्तिक फोटोंही असावेत. कारण की फेसबुकच्या पोस्टी गडप होतात, read more, comments साठी पुन्हा क्लिक करावे लागणे, फक्त मित्रांपर्यंतच पोहोचणे या त्रुटी मिसळपावसारख्या संस्थळावर येत नाहीत. मग थोडं तिकडचे इकडे आल्यास अधिकाधिक वाचनीय साहित्य वाढेल.

चौथा कोनाडा's picture

18 Apr 2020 - 12:37 pm | चौथा कोनाडा

+१

अभिनाम२३१२'s picture

18 Apr 2020 - 1:10 pm | अभिनाम२३१२

प्रतिसादाची दखल घेतली आहे....असेच फोटो टाकण्यावर भर देइन...

चौकस२१२'s picture

13 May 2020 - 5:54 am | चौकस२१२

पुढचे भाग ?

माझीही शॅम्पेन's picture

13 May 2020 - 12:55 pm | माझीही शॅम्पेन

एकदम अस्सल प्रवास वर्णन , सध्या लॉक डाऊन मध्ये असे लेख वाचून स्वातंत्र्याची किमंत कळतेय !!!

Prajakta२१'s picture

13 May 2020 - 4:47 pm | Prajakta२१

पु भा प्र