इरसाल!

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in मिपा कलादालन
15 Apr 2020 - 7:54 am

गावाकडचा माणूस हुशार पण इरसाल कसा असतो याचा छान आणि मार्मिक चित्रण एका हलकाय फुलक्या वेब्सिरीज मधून बघायला मिळतंय ते म्हणजे "पंचायत "
उत्तर प्रदेशातील एक अगदी छोटे गाव , त्याची पंचायत आणि तिथे नाखुशीने नोकरी करायला आलेला एक शहरी तरुण यांच सगळं जुगाड आहे..
सगळ्या पात्रांचा इरसाल पणा आणि कलाकारांची निवड याबद्दल दिग्दर्शक आणि लेखकाला १० पैकी ९ गुण
रंगूवीर यादव आणि नीना गुप्ता भूमिकेत अगदी चपखल , छोटेखानी गाव PAN मस्त
(मनात विचार आला कि हि मालिका मराठीत काढली तर ! यात सरपंचाच्या भूमिकेत कोणाला घयावे????
डॉ मोहन आगाशे कि मोहन जोशी .. कि कै कुलदीप पवार ? ( सुरवातीला खलनायकी भूमिका करणारे कुलदीप जी नंतर विंडो ढंगाचं भूमिकेत चांगले रमले होते)
यावरून वळू, देऊळ या मराठीतील चित्रपटातील "गावकऱ्यांची " आठवण झाली
हळहळ यःची वाटणार आहे कि रतीब घालणाऱ्या सिरीज पेक्षा अशी चांगली सिरीज खूप वेळ बहुतेक चालणार नाही...
असले इरसाल म्हणजे पूर्वी येऊन गेलेला " वेल DAN अब्बा " हा चित्रपट पण जरूर बघा