लॉक---डाऊन!
खरंच आपल्यापैकी कुणालाही वाटलं नसेल अस म्हटलं तर अभूतपूर्व म्हटलं तर चिंताजनक जीवन सध्या आपण जगत आहोत. अर्थात मला ह्यामध्ये फारसा फरक वाटत नाही. कारण पौरोहित्यात चांगले एक एक दोन दोन महिने मोकळे दरवर्षी येतात. पण तरीही इतर गोष्टींसाठी मेंदू मोकळा असतो,तो आता नाही हे मात्र खरं ! रोजचं आयुष्य घरात परिपूर्ण वेळ देता येत नसे,तो आता देता यायला लागला(च) आहे. त्यातूनही माझ्या मुलाला (वय वर्षे 3) माझ्याबरोबर धुडगूस घालायला भारी आवडतो तो त्याला आता पूर्ण मिळतो आहे,म्हणून तो मेंदूने होम क्वॉरनटाईन होण्यापासून बराचसा बचावलेला आहे. नाही म्हणायला त्याला एकट्याला खेळून खेळून कंटाळा आला की मग मला येऊन ढुश्या मारत खेळण्यासाठी उकसावतो.
शिवाय ब्याचलर लाईफ जगताना स्वयंपाक व घरकामादी हरकाम करत होतो त्याचा सौला आत्ता फायदा होतो आहे. म्हणजे कांदा टोमॅटो भाज्या इत्यादी (तिला हव्या तश्या!) चिरून देणे.धान्य निवडकाम,शेंगदाणे ,रवा इत्यादी भाजणे. स्वच्छता करत राहणे. बालकास अं-घोळ-घालणे. खायला देणे, गाई गाई करवणे. ह्यात दिवस सहज निघून जातो. तिच्यावरचा ताण कमी झाल्यानी ती बहुशः सुखावली असावी असा माझा आपला (एक) अंदाज!
पौरोहित्याची पुढील बरीचशी कामं रद्द झालेली असली तरी काही ऑन लाईन चालू आहेत पण अगदी कमी.
मला मुख्य अनुभव लिहायचाय तो माझ्या आपोआप (म्हणजे मी कुठलेच कष्ट न घेता!) बदललेल्या सवयींचा! पहिली गोष्ट म्हणजे पान, सुपारी इत्यादी गोष्टी मिळत नसल्यामुळे बंद झाल्या. गायछाप काल रात्रीपासून बंद राहिली आहे.. ते हळूच मिळणाऱ्या दुकानवाल्याकडला माल काल सकाळीच संपला आहे. व आता आमच्या अखिल परिसरात अन्यत्र तो कुठेही मिळत नाही. पान सुपारी बंद झाल्याने मला होत असलेले शाररीक व मानसिक त्रास सम्पले. अर्धी लढाई शत्रू नसल्याने जिंकलीं. अर्धी किंवा पुढे शिल्लक असलेली मलाच प्रयत्न पूर्वक जिंकावि लागणार आहे. अर्थात स्वतःच्या व्यसनी मनासमोर शरणागती देऊन ! त्यासाठी समुपदेशनाची मदत दिनांक 24 पासून सुरू ठेवली आहे. मला आता या अपघातानी थांबलेल्या व्यसनामुळे स्वतःतला नाकर्तेपणा जाणवू लागलेला आहे. अजून बरीच मजल गाठायची आहे. आणि मुख्य म्हणजे जगलो वाचलो (या कोरोनारूपी संकटातून) तर पुन्हा या तंबाखू पान कुळातील एकाही गोष्टीला मन बळी न पडू द्यायची तयारी करत रहायची आहे.
दुसरा अनुभव आहे साखर थांबल्याचा. डायबेटीसची अंधुक शक्यता 4महिन्यांपूर्वी डॉक्टरांनी वर्तवली आहे. त्याचा तेंव्हापासून परिणाम इतकाच झाला होता की गोड पदार्थ खाण कमी झालं होतं. पण लॉक डाऊनच्या दुसऱ्या दिवशी एक निमित्त घडलं. मी एकदम किराणा उचलायचा म्हणून जवळच्या दुकानात गेलो. वेटिंग होतं म्हणून बसलो पण लोक जवळ जवळ येऊ लागले म्हणून बाहेर उन्हात खुर्ची टाकली व चांगला 15/20 मिनिट बसून राहिलो.. 12ची वेळ होती. चटका बसत होता,पण मनात येत होतं, एक जण चिकटलाय मगाशी असलाच कोरोनावाला तर आत्ता उन्हात-बसल्यानी आपल्याला फायद्यात जाईल. (कोरोनाविषयक तयार झालेल्या दिव्य ज्ञानाचा परिणाम! ;) ) झालं इतकंच की मला घरी आल्यावर दुपारहुन ताप सुरू झाल्याची जाणीव झाली.तो उन्हात बसल्यानीच आलेला आहे हे कळत होतं,पण तरीही मन घाबरल. दुसऱ्याच दिवशी सरकारी दवाखान्यात औषध घेतलं. त्या डॉक्टरांनी मला 'हे नॉर्मल आहे' वगैरे समजावलं. पण आम्हा एडीक्ट व्यक्तींचे शंकासूर साधे नसतात. मी पुढे 3 दिवस घरात बाजूला बसलो. मुलाला जवळ येऊ देईना . मन खिन्न करवून घेतलेलं. ताप खोकला वगैरे दुसर्याच दिवशी गायब झालं, पण मन मात्र 105 डिग्री धरून बसलेलं. त्यात मग तरतरी यायला ors घे. सरबत पी. असले प्रकार सुरू झाले .. व टेन्शन आणि ors , सरबत यांनी पोटात गेलेली जादा साखर यांनी खेळ केला. चक्कर येते ,हलकं वाटतय.. अस बोलू लागलो. ही तर वैतागली,थोडी घाबरलीही! मग मी पुढे 2 दिवस अजिबात गोड काहीही पोटात जाऊ दिल नाही. व शरीर एकदम रिफ्रेश झालं. त्यानन्तर आज आत्ता पर्यंत एकदम नॉर्मल आहे.
भय आणि नकारात्मकता एकत्र आली तर काय घडू शकतं? हे या कोरोना टेंशनीच शिकवलंय.
म्हणूनच मन आता म्हणतंय, "झालाच कोरोना तर को? रोना? अब सर्फ डरो ना... फिर जरूर भाग जाएगा कोरोना!
-----------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
5 Apr 2020 - 9:13 am | कंजूस
गुरुजी नमस्ते।
तुमचा भलताच अनुभव वाचून घाबरायला झालं.
5 Apr 2020 - 1:36 pm | सस्नेह
मीपण घाबल्ले !
आरोग्य सेतूवर जाऊन You are safe असं वाचल्यावर जीव भांड्यात पडला !
5 Apr 2020 - 9:22 am | गवि
बुवा.. छान लेख. आपत्तीतूनही काहीतरी सकारात्मक. वाह. खरेच तंबाखूयुक्त पदार्थ सुटले तर मोठा फायदाच म्हणता येईल. शुभेच्छा.
5 Apr 2020 - 9:38 am | मदनबाण
hydroxychloroquine हे औषध करोनावर जालिम उपाय असल्याचे जालावर वाचन आणि श्रवणभक्ती केल्यावर समजले आहे.
संदर्भ :- Dr. Vladimir Zelenko treated 699 coronavirus patients with 100% success
Touting Virus Cure, 'Simple Country Doctor' Becomes a Right -Wing Star
Trump requests Modi to release Hydroxychloroquine ordered by US
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye
5 Apr 2020 - 10:22 am | कुमार१
असे घाईने विधान करता येणार नाही.
१. सध्या जवळपास एक डझन औषधांचे रुग्णांवर प्रयोग चालू आहेत. त्यांचे पुरेसे निष्कर्ष यायला काही महिने जावे लागतील.
२. Hydroxychloroquine + azithromycin च्या बाबतीत ही अधिकृत तारीख 30 ऑगस्ट, 2020 आहे.
३. Hydroxychloroquine चा हृदयावर होणारा गंभीर दुष्परिणामही ध्यात घ्यावा असा इशारा American College of Cardiology ने दिला आहे.
5 Apr 2020 - 10:25 am | अत्रुप्त आत्मा
@Hydroxychloroquine चा हृदयावर होणारा गंभीर दुष्परिणामही ध्यात घ्यावा:--- एका डॉक्टर मित्राचं असच मत आत्ता ऐकलं होतं.
5 Apr 2020 - 11:02 am | मदनबाण
१. सध्या जवळपास एक डझन औषधांचे रुग्णांवर प्रयोग चालू आहेत. त्यांचे पुरेसे निष्कर्ष यायला काही महिने जावे लागतील.
६९९ रुग १००% बरे झालेले आहेत. [ज्याची लिंक मी वरती दिलेली आहे. ] मी कोणताही निष्कर्ष काढलेला नसुन जी उपलब्ध माहिती आहे तीच दिली आहे.
२. Hydroxychloroquine + azithromycin च्या बाबतीत ही अधिकृत तारीख 30 ऑगस्ट, 2020 आहे.
hydroxychloroquine, the antibiotic azithromycin and zinc sulfate असे काँबिनेशन आहे. बाकी येत्या काळात या बाबतीत अधिक माहिती वाचायला हवी.
३. Hydroxychloroquine चा हृदयावर होणारा गंभीर दुष्परिणामही ध्यात घ्यावा असा इशारा American College of Cardiology ने दिला आहे.
ओक्के.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye
5 Apr 2020 - 10:33 am | झेन
मंत्रोच्चार कर्मकांड यावरचा तुमचा विचार वाचल्यानंतर आदर लईच वाढला आहे. तंबाखू आणि बाकीच्या गोष्टी सुटण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, बाकी डायबिटीस म्हणाल तर तुम्ही नक्कीच कंट्रोल करू शकाल असा विश्वास वाटतो.
5 Apr 2020 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रामाणिक अनुभव कथन आवडलं.
सध्याचा काळ जरा संशयाचाही आहे, आपण कोणा अनोळखी व्यक्तीशी संपर्कात आलो किंवा कोणी एखाद्या वस्तूला स्पर्श केला असेल तर त्या स्पर्शाचा आपल्याला काही होणार तर नाही ना, असे वाटायला लागते, खरं तर असं काही नसतं. आपण योग्य काळजी घेत असतो त्यामुळे मनात असे काही विचार येऊ द्यायचे नाही. आपलं मन सध्या फ़ूलटाईम रिकामं झालंय. टीव्ही, गाणी, मनाला आवडेल अशा गोष्टींमधे मन रमवणे म्हणजे सकारात्मक उर्जा मनात निर्माण होत असते आणि आपोआपच एक उत्साह निर्माण होतो.
बाकी, आपल्याला काही गोष्टींची सवय असते आणि ते मोडून गेल्याने आपली पंचायत होऊन जाते. आपण जरा पाय मोकळे करायला जावे तर कुठे जावे असे वाटते. उग रिस्क नकोच. खाणे आणि झोपणे सालं भयंकर शिक्षा आहे. कधी एकदा लॉकडाऊन संपून परिस्थिती सामान्य होईल असे वाटायला लागले आहे. चार-पाच मित्र जमवून मस्त हॉटेल नाय तर ढाब्यावर पार्टी करु आणि त्या चीनच्या मातोश्रीची आठवण करु. बाकी, किरकोळ किराणा सामान पॅक, साबण-पाण्याने धुन पुसुन पापडासारखं कडक उन्हात वाळत घातलं होतं. च्यायला, काहीही करावं लागतंय.
बाकी, मिपावर पडीक आहेच. मिपाने खरंच एकटेपणात खूप चांगला सपोर्ट केला. मालक, चालक यांचे मनापासून आभार. बाकी, दीप प्रज्वलन करणार्यांना (दीपावलीच्या) शुभेच्छा आहेतच. योग्य काळजी घ्या, रस्त्यावर येऊ नका. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
5 Apr 2020 - 10:57 am | फुटूवाला
ऐन लगनसराईत हे विघ्न आल्याने नुकसान आहेच.
एप्रिल मधल्या तिथी जास्त होत्या लग्नाच्या. पण जगावर संकट आलेलं आहे असं स्वतःला समजावत शांत राहणेच योग्य(पर्यायच नाही). फक्त एक दिवस भाजीपाला आणायला गेलो होतो. तेव्हा तिथलं वातावरण आणि इटलीची बातमी पाहून ठरवलं की पुन्हा इथे यायचं नाही. बटाटे थोडे जास्त घेतले. सध्या भाजीपाल्यासाठी मरमर(माझ्या परिसरात तशी स्थिती आहे)केल्यापेक्षा डाळींवर ताव मारलेला आहे. कडधान्य मोड आणून काम चालवतोय. त्यात खोबऱ्याची आमटी हा एक माझा आवडता पदार्थ. त्यात अंडी टाकली की अंडा कर्री, शेव टाकली तर शेव भाजी आणि पापड टाकून काय म्हणतात माहित नाही पण आवडीची भाजी आहे. बायको खुश की तीला माझ्या हातची भाजी मिळतेय.
मिपावर पडीक असतोच.
अजून एक काम केलंय मी या काळात मिपा प्रशासनाला ना विचारता. चुकीचे वाटल्यास मोठ्या मनाने माफ करावे.
मला एका व्हाट्सअप समूहात बोका-ए-आझम यांची मोसाद वाचायला मिळाली. लेखकाला कसलेच श्रेय ना देता व्हाट्सअप वर लेख फिरतोय हे पाहून वाईट वाटले.
इथल्याच काही लेखकांना विचारून मी बोकोबांच्या नावासहीत मिपाचे हक्क दाखवत मोसाद ची एक पीडीएफ करून पाठवली.
योगायोग असा की बोकोबांच्या वाढदिवशी(बहुतेक दुसऱ्या दिवशी)त्यांच्या आईला वाचायला मिळाली. त्यांच्या आईशी बोलणे सुद्धा झाले माझे इथल्या सदस्यामार्फत. छान वाटलं म्हणाल्या.
5 Apr 2020 - 11:28 am | चौथा कोनाडा
सही लिहिलंत अतृप्त आत्मा !
बाकी हा कालावधी म्हणजे पोरांना आणि नवबापांना एकत्र वेळ घालवायला सुवर्णसंधीच आहे !
मी या संधीपासून मुकलो होतो, कारण आठवड्यात एकच साप्ताहिक सुट्टी आणि ती ही गुरुवारी. पोराबरोबर बालपण जगू शकलो नाही.
तुम्ही घ्या चान्स मारून.
सध्या एक बरंय, रोज 'लॉक डाऊनः अमुकावा दिवस" हे वाचून प्रतिसाद देतोय, काही तरी लिहितोय हे ही नसे थोडके.
5 Apr 2020 - 12:00 pm | प्रचेतस
काळजी घ्या भो बुवा, मुख्य म्हणजे पॅनिक होऊ नका, आनंदात जगा.
बाकी इथं वर्तमानपत्र कुणी घेत नाही म्हणून नेहमीच्या पेपरवाल्याने पेपर अंगावर पडतात म्हणून आजपासून पेपर टाकणं बंद केलं. मग जवळच्या स्टॉलवर जाऊन पेपर आणला. बाईक स्वच्छ पुसून काढली, चालू करून सोसायटीतल्या रस्त्यावर १०/१२ चकरा मारल्या. मग द फ्लॅशचा एक एपिसोड पाहिला आणि मग एक ऑनलाइन चेस मॅच खेळून रामायण आणि व्योमकेश बक्षी पाहिले. आता महाभारत.
#मी मेणबत्त्या लावणार नै, मी दिवे बंद करणार नै.
5 Apr 2020 - 12:05 pm | शाम भागवत
ठीक आहे.
निदान सुरू कधी करणार ते तरी सांगा.
९:०९ ला का?
;)
रागवू नका भाऊ.
तुमचा राग मला झेपायचा नाही.
:)
5 Apr 2020 - 12:08 pm | प्रचेतस
दिवेलागणीला :)
बाकी मी रागावत नै हो कधी, कुणालाही विचारा इथे ;)
5 Apr 2020 - 12:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
आजच्या दिवस सहमत फक्त.
तुम्ही प्रतिसाद लिहून जाता, मी तुम्हाला सहमत म्हणतो. तुम्ही वाचत बसता आणि मला निस्तरावे लागते.
तुमची करा आरास अन् तुमचे तुम्हीच लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी !
-सुरेश भट
-दिलीप बिरुटे
5 Apr 2020 - 1:38 pm | सस्नेह
मोबाईल चा लाईट लावा सर तुम्ही, तो झंझावाताने विझत नाही:)
5 Apr 2020 - 2:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आता आम्ही इतके दिवे लावले आहेत की आम्ही दिवे बंद केले तरी लोक
दिवे लावाच म्हणून मागे लागतील. ;)
बाय द वे, तुम्हाला काल लायटीच्या प्रकरणात अधिकृत माहितीसाठी
मेसेज करणार होतो. पण, नंतर विसरुन गेलो.
-दिलीप बिरुटे
5 Apr 2020 - 1:23 pm | मोदक
ही दोन सलग जोडून लिहिलेली वाक्ये वाचून असे वाटले की तुम्ही लोकसत्ता विकत आणला असावा.. म्हणजे फ्रंट पेजने हेडलाईट पुसायचा. जाहिरातींच्या पानाने टाकी.. कुबेरांच्या अग्रलेखाने फक्त टायरच पुसायचे - असे पण कांही ठरवले आहे का..? ;-)
5 Apr 2020 - 2:15 pm | प्रचेतस
नाही हो, आम्ही लोकसत्ता फक्त ऑफिसात कॉम्प्युटरवर वाचतो:)
5 Apr 2020 - 3:35 pm | कंजूस
या विनोदी वाक्यासाठी मोदकास दोन प्लेटी मिसळ चुकलो गुर्जींची आवडती शाबुदाणा खिचडी देण्यात येईल.
5 Apr 2020 - 7:45 pm | मोदक
कंजूस काका... पत्ता द्या.
:D
5 Apr 2020 - 7:22 pm | चौकटराजा
करोना वरचा सगळा राग हत्ती काकावर काढ़ा ! स्माइलयाची फ़ौज सोडा त्याच्या कायपपा वर !!!
5 Apr 2020 - 12:01 pm | बबु
गुरुत्वकर्शनाविरुधचे व्यायाम करणे हा साखरेची पातळी कमी करणेसाठी एक चान्गला पर्याय आहे.
https://www.youtube.com/watch?v=DXMo8ZbPmu8
5 Apr 2020 - 12:41 pm | arunjoshi123
गुरुत्वाकर्षणाविरूद्ध कीतीही काहीही केलं तरी ते काय नष्ट होणार आहे का?
5 Apr 2020 - 1:12 pm | कंजूस
गुरुजी आजचा दिवस तुमच्या सगळ्या ढिशाव ढिशाव स्मायली ओता करोणासाठी.
वेडावणारी,
डोके आपटणारी,
बंदुक मारणारी,
5 Apr 2020 - 1:40 pm | अत्रुप्त आत्मा
5 Apr 2020 - 3:36 pm | कंजूस
करुणाला हसून स्वागत?!!
5 Apr 2020 - 1:50 pm | Nitin Palkar
तंबाखू खाणे/चघळणे हे एक व्यसन आहे, याची जाणीव होणे आणि ते सोडण्याची इच्छा होणे, यात तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे. हे वाक्य जरी एखाद्या समुपदेशकासारखे वाटले तरी मी कुणी समुपदेशक नाही. मात्र तंबाखू, मावा, गुटखा, पान(अर्थातच एकसोबीस तीनसो), सिगारेट या सर्वांचा अनेक वर्षे उपभोग घेऊन सध्या दहाहून अधिक वर्षे सर्व प्रकारच्या तंबाखू पासून पूर्णपणे अलिप्त आहे.
थोडासा संयम आणि मनोनिग्रह या बाबींवर तंबाखू, पान, सुपारी नक्की सोडू शकाल. व्यसन मुक्ततेसाठी शुभेच्छा.
5 Apr 2020 - 2:11 pm | चौकस२१२
१) लोकशाही आहे त्यामुळेसर्वांना दिवे / मेणबत्ती वैगरे ना लावण्याचा पूर्ण अधिकार आहे,
पण हे लक्षात घ्या कि हे सांगणारा माणूस अश्या हि समजुतीत किंवा अंधश्रेद्धेत नाहीये कि हे केल्यानी काही या साथीवर परिणाम होणार आहे .
हे सर्व केवळ प्रतीकात्मक आहे हे जर समजूनच घायवयाचे नसेल तर काय बोलणार ... तुमचा अंधकार तुम्हाला लखलाभ !
२) आणि हो २१ दिवानांतर "मित्रांबरोअबर ढाब्यावर पार्टी करण्याचा अधिकार हि सर्वांनाच आहे... नाही का... पार्टी करणाऱ्यांनी हे विसरू नये कि जसे दिवे लावून karona जाणार नाहीये तसे २१ दिवस हा काही मंत्र नाही ... अजुन्हि जगभर रोगाचा आलेख हा वाढतच आहे flattening the curve हि संज्ञा ऐकली नसावी बहुदा या "पार्टी अनिमल्स" मंडळींनी
5 Apr 2020 - 2:27 pm | शाम भागवत
चौकसजी,
प्राडाॅ किंवा प्रचेतस नसते, तर आजचा ९ च्या कार्यक्रमाची चर्चा केव्हांच संपून गेली असती. तो विषय केव्हांच मागे पडला असता.
विषय सतत जिवंत रहावा यासाठी त्यांच्या चाललेल्या धडपडीला तरी दाद द्या.
मोदींच्या प्रत्येक गोष्टींची खिल्ली उडवणारी मंडळी नसती, तर मोदी त्यांचे विचार सर्व भारतभर कधीच पसरवू शकले नसते व २००२ पासून त्याच्या विजयाचा आलेख सतत उंचावू शकले नसते.
माझे तर म्हणणे आहे की मोदी विरोधक गप्प बसले तर आपण त्यांना मुद्दामहून बोलते केले पाहिजे. अन्यथा मोदिंचे काही खरं नाही.
:)
5 Apr 2020 - 2:38 pm | प्रचेतस
तुम्ही आम्हाला मोदी विरोधक समजता ह्याचा खेद वाटतो. मग आम्ही तुम्हाला मोदी भक्त म्हणालो तर कसे वाटेल?
त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन करणे मला शक्य नाही, तुम्हाला जसं दिवे लावणं योग्य वाटतं किंवा त्यांच्या ह्या कृतीचेही समर्थन करणं योग्य वाटतं तसंच मलाही त्यांच्या ह्या कृतीला विरोध करण्याचा हक्क लोकशाहीनेच दिला आहे. जे पटत नाही ते नाही पटत. मग भले तुम्ही मला विरोधक म्हणा.
आजचा सकाळ मधला शेखर गुप्तांचा लेख वाचनीय आहे.
5 Apr 2020 - 2:42 pm | शाम भागवत
म्हणा की.
त्याने मला काय फरक पडतोय.
मी फक्त चौकस यांच्या प्रतिक्रियेतील राग किंवा उद्वेग कमी करायचा प्रयत्न करतोय. पण त्यातून तुम्ही दुखावले गेले असल्यास क्षमस्व.
_/\_
5 Apr 2020 - 2:53 pm | चौकस२१२
प्रचेतसजी इथे कोण कोणाचा भक्त आहे कि नाही हा मुद्दा नाही
मी फक्त एक मुद्दा ठेवला होता कि "हे प्रतीकात्मक आहे.. त्यावर विषय टाळून , तर्क टाळून त्याची खिल्ली उडवणे हे मात्र योग्य आहे का ( मला वाटते डॉ खरे यांनी पण साधारण याच प्रकारचा तर्क सांगितलं ) मग तो आज मोदींनी वापरला , उद्या काँग्रेस ने वापरला तरी मी तेच म्हणेन .. आणि हे हि मानतो कि आंधळी भलावण करणाऱ्यांच्या विधानातील फोल पणा दाखवून द्यायचा हक्क तुम्हाला आहेच प्रश्न नाही, म्हणजे उद्या जर कोणी ९/९ चाय कृतीतून काहीतरी ऊर्जा येऊन विषाणू पळवून लावेल असे म्हणत असेल तर तो मूर्ख पानाचा आहे ( मग हे मोदींनी स दावा म्हणले तरी हि मी त्याला मूर्खपणाचा म्हणीन )
मी हि कोणाचा भक्त नाही उदाहरणार्थ मोदींनी जेव्हा त्या गुहेत जाऊन एकांतवास वैगरे केला त्याच जे इव्हेंट झाला ते सुद्धा मला तरी सयुक्तिक वाटलं नाही..दिखाऊ पण वाटलं... घ्या भक्त नाही याचाच छोटा पुरावा
दुर्दैव असे कि सर्व मोदी या व्यक्ती भोवती कशाला फिरायला पाहिजे.. आज देश संकटात आहे जग संकटात आहे ... तेवहा तारतम्य बाळगून सर्वांनी प्रयत्न करावे हे उचित नाही का? मग सुचवणार कोणीहि असो
5 Apr 2020 - 5:09 pm | प्रचेतस
खिल्ली कुठं उडवली गेली? जे मला हास्यास्पद वाटलं ते वाटलं आणि मी ते उघडपणे नमूदही केलं. हे सर्व प्रतिकात्मक जरी मानलं तरी त्या प्रतिकात्मकतेने विषाणू दूर पळू शकत नाही हे तर खुद्द मोदींनाही माहिती आहेच, तेव्हा असल्या भानगडीत न पडता त्यांनी काही ठोस उपायांचा, किंवा लोकांना नुसता धीर दिला असता तरी ते पुरेसं ठरलं असतं असं वाटतं. शाब्दिक बुडबुडयांपेक्षा धीराचे २ शब्द निश्चितच अधिक परिणामकारक ठरतात असे वाटते.
दुर्दैव असे कि सर्व मोदी या व्यक्ती भोवती कशाला फिरायला पाहिजे..
हेच म्हणतोय, जरा कुठं थोडं विरोध केला तर बचावासाठी यायलाच हवं का?
5 Apr 2020 - 5:24 pm | चौकस२१२
मोदींच्या बचावासाठी नाही तर केवळ त्या कल्पने मागचा थोडा तर्क सांगत होतो..तर केवळ त्या कल्पने मागचा थोडा तर्क सांगत होतो.. असो
5 Apr 2020 - 5:54 pm | प्रचेतस
ओक्के, हरकत नाही.
5 Apr 2020 - 10:56 pm | तुषार काळभोर
माझा मित्र जो चौकातला किराणा दुकानदार आहे, आणि सध्या भाजप समर्थक आहे. (आठ वर्षांपूर्वी मनसे चा समर्थक होता, दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचा, थोडक्यात भेळ तिकडं खेळ टाईप). शिवाय त्याचा भाऊ राजकीय कार्यकर्ता आहे (वाऱ्याच्या दिशेप्रमाने झेंडा बदलतो).
तर मला हे दिवेलागण प्रकरण ना पटल्याने लाइट्स चालू ठेवल्या होत्या. तर नऊला एक दोन मिनिट कमी असताना त्याचा फोन आला, अरे कर की बंद. मोदींनी सांगितलय ना की दिवे लावायचे.
बालमित्र असल्याने मी त्याला झापू शकतो अन् त्यालाही हे माहिती आहे. ए गप, म्हणालो आणि लाईट चालू ठेवल्या.
बाकी भक्तांना आंधळी भक्ती, सकारात्मक ऊर्जा, मानसिक शक्ती असं काही कारण चालतं. कारण त्यात डोक्याला त्रास देऊन विचार करायची गरज नसते.
5 Apr 2020 - 3:41 pm | कंजूस
याच कारणासाठी मी मोदींवर बाजूने (?)अथवा विरोधी(?) वक्तव्य करण्याचे इथे /कुठे टाळतो.
बाकी वल्ली आणखी कोणकोणते खेळ खेळतात?
5 Apr 2020 - 3:46 pm | शाम भागवत
खरं आहे.
कारण नसताना गैरसमज होऊ शकतात.
लेखन संन्यास घेतलेलाच बरा.
असो.
5 Apr 2020 - 4:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सन्यास नाही घ्यायचा. मतं पटो न पटो गप्पा करायच्या. कोणत्याही गटा तटाचा आपल्याला शिक्का मारला तरी त्याचा विचार नाही करायचा. आणि गैरसमज नै होऊ द्यायचे.
येत राहा लिहित राहा. मी तुमचे दोघांचेही प्रतिसाद आवडीने वाचत असतो.
-दिलीप बिरुटे
5 Apr 2020 - 5:09 pm | प्रचेतस
हेच म्हणतो.
येत राहा, लिहीत राहा.
5 Apr 2020 - 5:12 pm | कंजूस
पण आपण बोलणे आणि प्रसिद्ध पत्रकारांनी बोलणे ,टीका करणे यात फरक पडतो हो.
मोदींच्या कामकाज पद्धतीची समीक्षा करणारा France 24 channel लेख
5 Apr 2020 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कंजुसकाका, आम्ही बोललो की वाईट वाटतं. विरोधी पार्टीचे किंवा काहीच्या काही बोलल्या जातं.
आपण ते कै मनावर घेत नै पण तुम्हाला असलेलं सत्य बदलता येत नाही.
प्रत्येक वेळी देशभक्त, देशप्रेमी अशी लेबलं लावून चुकीच्या गोष्टींवर पांघरुन टाकताही येत नाही.
-दिलीप बिरुटे
5 Apr 2020 - 6:49 pm | कंजूस
आपलं बोलणं आवडत नाही लोकांना. म्हणजे असं की मंत्री, मुमंत्री, पंप्रच्या निर्णयांची समीक्षाही करायची नाही. वाईट म्हटले की चिकमगळुर/वायनाड/रायबरेलीला पाठवतात.
5 Apr 2020 - 4:45 pm | चांदणे संदीप
लेख वाचला आणि परतीकिर्या वाचायला घेतल्या पण डोक्याला शॉट लागेल अशी शंका आल्याने तो विचार ताबडतोब रहीत केला.
बाकी, आज मीपण एका मित्रासोबत ऑनलाईन चेस खेळलो आणि चक्क जिंकलो. आजवर कधी लिंबू चमचातही न जिंकलेला मी बांगलादेशी प्लेयर्ससारखा नाचलो जिंकल्याच्या आनंदात. =))
window.addEventListener("message",e=>{e.data&&"6585098"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});
सं - दी - प
5 Apr 2020 - 4:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगला डाव. चांगले खेळले तुम्ही.
-दिलीप बिरुटे
5 Apr 2020 - 5:10 pm | प्रचेतस
गेम मस्त झाला. सुरुवातीच्या चाली अगदी शेम टू शेम झाल्या. :)
5 Apr 2020 - 5:58 pm | प्रचेतस
सरांबरोबर एक मॅच झाली, सर खूपच छान खेळले, माझा वजीर कोपच्यात पकडला. काय करावं ते मला सुचेना झालं. शेवटी तर ते अगदी जिंकता जिंकता राह्यले. वेळेअभावी त्यांना गेम गमवावा लागला. अन्यथा जवळपास पूर्ण डावावर त्यांचीच पकड होती.
window.addEventListener("message",e=>{e.data&&"6585228"===e.data.id&&document.getElementById(`${e.data.id}`)&&(document.getElementById(`${e.data.id}`).style.height=`${e.data.frameHeight+30}px`)});
5 Apr 2020 - 6:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन, तुम्ही चांगले खेळले. टायमिंगवर का होईना तुमचा विजय होत आहे.
विजय असा समीप दिसत होता. बस एक दोन चालीत तुमचा पराभव निश्चित होता.
माझ्यासाठी हे निराशाजनक आहे. पण, मी सावरुन जाईन या धक्क्यातून.
वल्लीसेठ, काय आहे राव हे... जरा आपण मिपावर रमलो की आपल्या आनंदावर विरजन.
नऊ मिनिटाचं ठीक होतं, यांनी तासभर कसर भरुन काढायचं ठरवलं वाटतं. ;)
-दिलीप बिरुटे
5 Apr 2020 - 6:14 pm | प्रचेतस
अगदी अगदी. तासभर विश्रांती २४ तासांची न होवो म्हणजे मिळवली.
बाकी तुमच्या विजयाची मी देखील आतुरतेने वाट पाहात आहे.
5 Apr 2020 - 6:39 pm | शाम भागवत
मला वाटलं की, फक्त ९ मिनीटींची विश्रांती असेल.
हम्म्.
वेळेची सुरवात बरोबर आहे. शेवट चुकला!!!!!
:)
5 Apr 2020 - 6:05 pm | मित्रहो
करोनामुळे तंबाखू सुटु शकतो ही चांगली बातमी आहे.
भर दुपारी रस्त्यावर मोर फिरताना दिसायला लागले, माझ्या सोसायटीत कबूतरांचा त्रास वाढला. जी गोष्ट अशा वाघ, हत्ती अशा प्राण्यांना करता आले नाही ते सूक्ष्म विषाणूने करुन दाखविले. आज कुठेतरी वाचले गंगा नदी शुद्ध व्हायला लागली कारण सर्व इंडस्ट्री बंद आहेत.
दारु न मिळल्याने लोक वेडावल्यासारखे करायला लागले असे वाचले होते. माझा एक मित्र म्हणाला लगातार एकवीस दिवस ड्राय डे हा विक्रम असेल. फ्रासंमधे मूलभूत गरजांमधे दारु आहे असे वाचले होते.
कधी नव्हे ते रविवार असूनही आज ऑफिसमधे जावेसे वाटले.
सायकलचे दोन्ही चक्के पंक्चर आहेत पण दुरुस्त कशासाठी करायचे.
5 Apr 2020 - 6:54 pm | प्रचेतस
बाकी संध्याकाळी टेरेसवर फिरताना पक्ष्यांचे निरीक्षण करताना पण मौज वाटते.
बुलबुल, शिंजिर टिव टिव करत वायरींवर बसलेले असतात, शिंपी पक्षी जोरजोरात चिवचिवत कॉल देत असतो. पोपट क्याक क्याक करत उडत जातात, बगळ्यांचा थवा एरोडायनमिक आकार निर्माण करून उडत जातो आणि त्यातला एकेक बगळा पुढच्याची जागा घेत राहतो. घारी उंच आकाशात फेर मारत राहतात. मौज वाटते हे बघताना.
पूर्वी इथल्या टेल्को कंपनीत वटवाघळांची खूप मोठी वस्ती होती, संध्याकाळी अक्षरशः हजारो वटवाघळांनी आकाश भरून जायचे. आता कंपणीतली झाडं तोडली का वाघळांनी वस्ती बदलली काय माहीत, हल्ली अजिबात दिसत नाहीत.
5 Apr 2020 - 7:33 pm | अभिजीत अवलिया
१२ दिवस संपले. ०९ राहीले. लाॅकडाउन घोषित होण्याच्या ४ दिवस अगोदर गावी कोकणात आलो होतो आणि अचानक लाॅकडाउन घोषित झाल्याने परतीचे सर्व दोर कापले गेले. पहीले दोन दिवस आपण तुरुंगातच आहोत असे वाटत होते. आता थोडी सवय झालीय. टिव्हीवर , उन्हातान्हात लहान मुले व सामान घेऊन चालत जाणारे मजूर हे चित्र पाहून आपल्याकडे किती मोठी लोकसंख्या ह्या लाॅकडाउन मधे भरडून निघेल ह्याची कल्पनाच करवत नाही. ह्या लोकांची पहिल्या दिवसापासूनच ते आहेत तिथे सोय केली जाणे अत्यावश्यक होते.
वर्क फ्राॅम होमला मान्यता असल्याने आवश्यक असलेल्या गोष्टी जसे की लॅपटाॅप, टोकन नेहमी जवळ बाळगतोच. जिओच्या वर्क फ्राॅम होमच्या पॅकमधले रोजचे २ जिबी आणि रेग्युलर मिळणारे १.५ जिबी असा रोजचा ३.५ जिबीचा डेटा कामासाठी पुरतो. त्यामुळे कार्यालयीन कामावर शून्य परिणाम झालेला आहे.
बाकी रस्त्यावरची स्मशान शांतता, अपवादाने जाणारे एखादे वाहन हे पाहून 'बहुसंख्य माणसं गचकली असावीत' असा पशुपक्ष्यांचा समज झाला असेल. १४ तारखेला हा देशव्यापी लाॅकडाउन उठावा अशी मनोमन ईच्छा आहे.
5 Apr 2020 - 7:33 pm | चौकटराजा
चालताना तलत महमूद यांची ८ युगलगीते ऐकली।
नेहां राजपाल हिचे नव्या ढंगातले पण रिमिक्स चा आचरट पणा नसलेले शुक्रतारा मंदवारा हे गीत ऐकले.
भीमसेन यांची मिया मल्हार रागाताली द्रुत एकतालातील चीज वाजवून पाहिली
@ बुवा , ते ऑनलाइन पौरहित्य प्रकरण आहे. म्हणजे तुम्ही चेपू वर पूजेचा विडिओ टाकायचा व यजमानाने पूजा करायची ? ते दक्षिणेच सगळ ऑ न लाइन ठीक पण गुरुजीना दूध केळे , खिचडी ऑन लाइन कशी काय ? सिक्थ जनरेशन तंत्र ? )))))))
5 Apr 2020 - 7:53 pm | अत्रुप्त आत्मा
5 Apr 2020 - 8:04 pm | कंजूस
अरे, हळू. खिचडी दूध सांडेल ना!
5 Apr 2020 - 7:48 pm | शाम भागवत
हे आलंय कायप्पावर.
खरं आहे का ते तज्ञच सांगू शकतील.
फेक असेल तर ही पोस्ट उडवावी अशी प्रशासकांना विनंती.
फक्त घरी बसा !!
तेवढं पुरेसं आहे. हेच आवाहन सध्या जगभर प्रत्येक आरोग्य संस्था, शासन लोकाना करीत आहेत. पण आश्चर्य म्हणजे जगभर लोकांना ह्याचं महत्वच समजत नाहीये. हे सगळं होत असताना ह्याबाबतीत ३५० वर्षांपूर्वी घडलेली एक विलक्षण घटना आठवते, आणि आज त्या घटनेपासून आपण योग्य तो धडा घेणं खूप गरजेचं आहे. Ringa RInga Roses…
ह्या बडबडगीताची पार्श्वभूमी असलेली ही अद्भुत घटना आहे तरी नेमकी काय?
Ringa Ringa Roses
Pocket full of Posies
Hushaih Bushaih
We all fall down..!
हे गाणं गात फेर धरून नाचणे हा खेळ आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी खेळला असेल. हे गाणं बडबडगीत म्हणून जगभर प्रसिद्ध असलं तरी हे मूळ गाणं बडबडगीत नसून एक शोकांतिका आहे, आणि ती घटना आजच्या परिस्थितीमध्ये जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ह्याचं कारण म्हणजे ती घटना घडली तेंव्हा देखील आजच्यासारखीच परिस्थिति निर्माण झाली होती.
इसवी सन १६६५! इंग्लंडमध्ये ब्युबोनीक प्लेगची साथ आली होती आणि त्यांचं राजधानीचं शहर लंडन हे त्या साथीच्या झपाट्यात आलं होतं. तब्बल १० लाख बळी गेले होते तेंव्हा. प्लेगवर औषध तर सोडाच तो नेमका कशामुळे होतो हे देखील लोकांना माहिती नव्हतं, त्यामुळे सगळं ख्रिस्ताच्या भरवशावर चाललं होतं. सुदैवाची बाब म्हणजे त्यांचं दुसर मुख्य शहर मँचेस्टर हे अजून बऱ्यापैकी सुरक्षित होतं. लंडन इतकी भीषण परिस्थिति तिथे नव्हती त्यामुळे अजून तरी तिथे धोका नव्हता. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर लंडन पासून १४० मैलावर पण मँचेस्टरपासून जवळ ९०० इतकी लोकसंख्या असलेलं एक खेड होतं, Eyam नावाचं. ह्या खेड्यात एका शिंप्याकडे
लंडनहून काही धागे आले होते. आले तेंव्हा ते थोडेसे ओलसर होते म्हणून त्याच्या नोकराने ते वाळवण्यासाठी घेतले आणि प्लेगच्या जिवाणूंना एक नवीन शरीर मिळालं. त्या धाग्यांमार्फत Eyam मध्ये प्लेगने प्रवेश केला. बघता बघता त्या खेड्यातली परिस्थिति भीषण झाली आणि अनेक कुटुंब तिथून निघून गेली. काही दिवसांपूर्वीच त्या गावात नवीन सरपंचाची नेमणूक झाली होती. फक्त २७ वर्षे वयाच्या त्या सरपंचाविषयी गावातल्या लोकांचं मत काही चांगलं नव्हतं. मुख्यत्वे सधन कुटुंब गावातून निघून गेली होती आणि आता फक्त ३५० इतकीच काय ती लोकसंख्या शिल्लक राहिली होती. उरलेल्या लोकांपैकी बरेचसे अगदी गरीब वगैरे होते. त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते. कुठे जायचं म्हटलं तरी ते शक्य नव्हतं. इकडे आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत त्या सरपंचाच्या लक्षात एक गोष्ट आली, ती म्हणजे गांव सोडून जाणारं प्रत्येक कुटुंब हे सोबत प्लेग घेऊन जातं आहे,आणि त्यांना जवळ होतं ते मॅन्चेस्टर! आजूबाजूच्या इतर गावात प्लेग अजून आला नव्हता. त्यामुळे Eyam हाच एक स्रोत होता प्लेगचा. त्याने एक धाडसी निर्णय घेतला,सर्वांनी गावातच राहण्याचा. अगदी प्लेग झाला तरी सुद्धा. तो काही डॉक्टर नव्हता. पण इतरांसारखं त्याला इतकंच माहिती होतं की प्लेग हा रोग्याच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो. आधी लोक घाबरले पण त्याने लोकाना समजावलं की हे किती गरजेचं आहे. आपल्या सर्वांचं विलगीकरण झालं तरच हा रोग आटोक्यात येऊ शकतो. देशासाठी आपल्याला हे बलिदान द्यावंच लागेल. लोक तयार झाले आणि मग सुरू झाली एक लढाई जी १४ महिने चालली आणि २० वर्षांचा गावातला शेवटचा मुलगा जेव्हा प्लेगमुळे मृत्युमुखी पडला, तेव्हाच संपली. गावातील कोणीही शेवटपर्यंत गांव सोडून गेलं नाही. ह्या १४ महिन्यात काय झालं, त्याच्या नोंदी ह्या सरपंचाने आणि त्याच्या बायकोने आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवल्या आहेत.
गावातल्या निरोगी लोकांमध्ये प्लेग पसरू नये म्हणून त्यांनी प्लेगमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना त्यांच्या घराच्या अंगणात किंवा परसामध्ये पुरत असत. त्यांच्या अंत्यविधीला कोणीही येत नसे. इतर लोक दुरून ते बघत असत. ह्यातली एक मन सुन्न करणारी घटना म्हणजे एलिझाबेथ नावाच्या एका स्त्रीवर एकाच आठवड्यात नवरा आणि तिची सहा मुलं ह्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली, आणि तिने एकटीने ते सगळं केलं. ह्या ७ जणांची थडगी आजही एका दगडी गोलाकार जागेत गावाच्या स्मशानापासून दूर पाहायला मिळतात. आजूबाजूच्या गावातील लोकांनी Eyam वासीयांना शक्य ती सर्व मदत केली. पण शेवटी गावातील २६० लोक प्लेगला बळी पडले, आणि ८३ लोकांचे प्राण वाचले. ह्या घटनेचं वर्णन एका कवितेत खूप दिवसांनंतर आलं ती कविता म्हणजेच हे बडबडगीत होय. मूळ गीत असं आहे..
Ring-a-ring of rosies
Pocketful of posies
Achoo! Achoo!
We all fall down.
ह्यातल्या प्रत्येक शब्दाला अर्थ आहे rosies म्हणजे प्लेगमुळे रोग्याच्या छातीवर आलेले व्रण तर posies चा अर्थ होतो की लहान फुलांचा गुच्छ ज्यामुळे प्लेगला कारणीभूत असणाऱ्या वाईट शक्ति दूर जातात.
Achoo हा प्लेगमुळे येणाऱ्या सर्दी सदृश्य लक्षणांचा आवाज. शेवटची ओळ अर्थात सर्वजण मृत्युमुखी पडले आहेत. पण कालांतराने हे गाणं बडबडगीत म्हणून जगभर प्रसिद्ध झालं आणि त्यात काही बदल देखील झाले.
असं असलं तरी Eyam च्या लोकांनी quarantine ही संकल्पना यशस्वी करून दाखवली. त्यांच्या दुर्दैवाने बहुतेक लोकांना वैद्यकीय मदत मिळाली नाही. पण त्यांच्या ह्या कृत्याने प्लेग नियंत्रणात आला, इतकं नक्की सांगता येतं. त्या गावात आज तिथे प्रत्येक घरात एक संग्रहालय आहे आणि ही घटना जपून ठेवली आहे. आज वैद्यकीय क्षेत्र त्या काळापेक्षा कितीतरी पटीने प्रगत झालं आहे. आपल्याला हवी ती मदत मिळू शकते, फक्त गरज आहे ती Eyam च्या लोकांनी बनवलेल्या वाटेवर चालण्याची!
मुळात Quarantine ही संकल्पना १४ व्या शतकात इटलीत जन्माला आली आणि आज त्यांनाच त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. त्याकाळी व्हेनिस शहरातून येणाऱ्या मालवाहू जहाजांसोबत प्लेग येतो ह्या समजुतीने ही जहाजं ४० दिवस किनाऱ्यावरच थांबवून ठेवत. त्यानंतरच त्यातला माल आणि इतर लोकांना उतरण्याची परवानगी असे.
तसेच lockdown ही संकल्पना १९१० मधली. चीनचा एक डॉक्टर Wu-Lien-Teh (हे नाव मराठीत लिहिणं कठीण आहे) ह्याने प्रथम राबवली. हा मलेशियात असताना तिथे देखील प्लेगमुळे लोक हैराण झाले होते.
त्यावेळेस ह्या डॉक्टरने Harbin ह्या शहराचा संपर्क इतर जगाशी तोडून टाकला. रशिया आणि जपान इथे जाणारी संपूर्ण वाहतूक थांबवली. त्यामुळे प्लेग आटोक्यात आला. आज ही संकल्पना चीनने यशस्वीपणे राबवली आहे. इतर देश देखील ह्या काळात आपापली शहरं lockdown करीत आहेत.
ह्या दोन घटना अतिशय महत्वाच्या आहेत. इतिहास अशा प्रकारे शिकवत असतो. Social Distancing, quarantine ह्याची आज तीव्रतेने गरज आहे. Eyam चा धडा त्यासाठीच महत्वाचा आहे. कधी कधी भूतकाळातच महत्वाचे दुवे सापडतात. ज्यांनी आपलं भविष्य आधीच सुरक्षित केलेलं असतं. गरज असते ती फक्त डोळसपणे भूतकाळात डोकावण्याची.
6 Apr 2020 - 2:11 pm | सुचिता१
चांगली आहे माहिती, घरात बसून असणाऱ्यांचे मनोबल वाढवणारी माहिती आहे.
5 Apr 2020 - 8:18 pm | शाम भागवत
दिवे बंद करायच्या प्रकरणाला जपान, जर्मनी व आॅस्ट्रेलियाचे समर्थन.
अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांग्लादेश पण सहमत.
अरे काय चाललंय काय?
;)
5 Apr 2020 - 8:19 pm | शाम भागवत
पाकिस्तान व चीन घरातले सगळेच्या सगळे दिवे लावणार अशी बातमी यायची राहिलीय फक्त.
;)
5 Apr 2020 - 11:03 pm | मदनबाण
चीन ने त्यांच्या परम प्रिय मित्राला अंडर वेअर पासुन बनवलेले मास्क दिले आहेत ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Mere Beech Mein... :- Ek Duuje Ke Liye
5 Apr 2020 - 11:06 pm | धर्मराजमुटके
त्यात काही प्रॉब्लेम दिसत नाही मला. व्हायरस को व्हायरस ही मार सकता है :)
3 May 2020 - 9:02 am | गणेशा
मध्यमवर्गीय माणसाच्या मनाची घालमेल, व्यसनापासून दूर राहिल्याने वाढलेले मानसिक बळ चांगले दाखवले आहे..
लिहीत रहा.. वाचत आहे..
13 May 2020 - 6:54 pm | अत्रुप्त आत्मा
__/\__