आधीच क्षमा मागतो कि हि "पाककृती" नसून केवळ "प्लेटकृती" आहे ( म्हणजे फक्त तयार पदार्थही जुळवाजुळव आणि नवीन पदार्थाची ओळख)
महाराष्ट्रात जसा वडा पाव तसाच जणू "पाय" हा पदार्थ न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये .
गोल सामोसा पण तळलेला नाही तर भाजलेला आत विविध सारणे ,
चिकन आणि भाज्या
मेंढी
बीफ
थाई चिकन इत्यादी
याशिवाय इंग्लंड मध्ये प्रसिद्ध म्हणजे शेफर्ड्स पाय जायचात वारीं आवरण हे बटाट्याचे
सोबत च्या छायाचित्रात मी त्या बरोबर ज्या चिप्स दाखवलेली आहेत त्या संत्रीचं रंगाच्या असण्याचे कारण म्हणे त्या बटाटयाच्या नसून रताळ्याच्या आहेत !
आणि हो मी जरी अगदी साहेबी पद्धतीने काटा चमचा दाखवला असला आणि barbequ सॉस + सिराचा सौस वगैरे नि सजवले असले तरी स्थानिक "बंड्या" मात्र खाताना सरळ हातात धरून वरती टोमॅटो सौस ची पिचकारी मारून गरम गरम तोंड भाजत हा हू करीत खातो