कोरोनाचा कहर आणि लोकांची बेजाबदार वृत्ती.

सूक्ष्मजीव's picture
सूक्ष्मजीव in काथ्याकूट
31 Mar 2020 - 9:45 pm
गाभा: 

आज माझ्या घराजवळ कोरोनाचा रुग्ण सापडला. सदर इसम आफ्रिकेवरून आला होता. त्याला घरीच बंदिस्त राहण्याचा सल्ला विमानतळावर मिळाला होता व शिक्का ही मारला गेला होता. पण त्याच्या कुटुंबीयांनी त्याला ही बातमी गुप्त ठेवायला सांगितली. तो गेले पाच ते सहा दिवस बाहेर जायला बंदी असूनही संपूर्ण परिसरात फिरत होता, अनेक मित्रांना भेटला, सतत फोनवर बोलत गल्लीतून फिरत होता, दुकानांमध्ये गेला. इ. इ.

आज त्याची टेस्ट झाली व त्याला कोरोना झाल्याचे सिद्ध झाले. पोलीस व डॉक्टर येऊन त्याला घेऊन गेले.

मला ही घटना अतिशय संकुचित आणि स्वार्थी वाटते.
तो कितीजणांना कोरोनाचा प्रसाद देऊन गेला आहे हे कळेल लवकरच.....
अशा लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत असे वाटते.
मला प्रचंड संताप आला पण करणार काय?
आपल्या समोर मन मोकळे करतोय.

आशा घटना आणि प्रवृत्ती बद्दल आपले मत काय आहे?

प्रतिक्रिया

शकु गोवेकर's picture

1 Apr 2020 - 12:24 am | शकु गोवेकर

प्रथम त्याला विमानतळावरून घरी का सोडले हा प्रश्न आहे व जरी फोनवर बोलले तरी त्याला विकार होत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही असे वाटते
पोलिसांनी गुन्हे दाखल करून हा सुटेल असे नाही पोलिसांची ही कामे नाहीत तर वैद्याचे काम आहे कि त्याला बरे करणे व इतरांना होऊ न देणे

सूक्ष्मजीव's picture

1 Apr 2020 - 2:56 pm | सूक्ष्मजीव

फोन मुळे प्रसार होत नाही पण त्या निमित्ताने उघड्यावर लोकांच्या जवळ जाणे, हातमिळवणी होत होते.

हा माणुस अतिशय संकुचित आणि स्वार्थी आहे! आता भोगेल कर्माची फळे..
पण गल्लितील ईतरा॓ना टेन्शन...

बाकी " सूक्ष्मजीव " हे नाव भारी .

सूक्ष्मजीव's picture

1 Apr 2020 - 2:56 pm | सूक्ष्मजीव

धन्यवाद

उत्तर कोरिया सरळ गोळ्या घालून ढगात पोचवतो हे किती ही भयानक वाटलं तरी अशा बेजबाबदार लोकांची वागणूक बघितली की त्यांना गोळ्याच घातल्या पाहिजेत असे वाटत

धर्मराजमुटके's picture

1 Apr 2020 - 11:02 am | धर्मराजमुटके

मागे जयंत नाईकांच्या 'निष्काम कर्मयोग' धाग्यावर चर्चा चालू होती तेव्हा अनेकांना त्या श्लोकाचा नीट अर्थ लागत नव्हता. सध्याच्या परिस्थितीचे अवलोकन केल्यास त्या श्लोकाचे मर्म समजू शकते.

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
म्हणजे तुम्ही करोना टाळण्यासाठी कितीही घरात बसा, दुसरा घरात बसेल की नाही हे तुमच्या हातात नाही, त्यामुळे तुम्ही संसर्गापासून वाचालच याची खात्री नाही. आज नाही झाला तरी उद्या होऊ शकतो.
थोडक्यात तुम्ही तुमचे कार्य करा, पण त्याचे फळ तुमच्या अधिकारात नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Apr 2020 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दिल्लीच्या 'त्या'संमेलनातल्या त्या लोकांना चांगले पोकळ बांबूचे दिले पाहिजे. सालं जगाचं काय चालू आहे आणि त्यांचं काय चालू आहे. मिल्ट्रीच्या ताब्यात एक एक माणूस दिला पाहिजे. आणि तब्येतीने धुतलं पाहिजे एकेकाला. अक्कल नावाची काही व्यवस्था असते की नसते असा प्रश्न पडला. आता देशभर कुठं कुठं विखुरलेत हे लोक, व्यवस्थेला शोधणं आलं.

-दिलीप बिरुटे
(संतापलेला)

सूक्ष्मजीव's picture

1 Apr 2020 - 2:58 pm | सूक्ष्मजीव

आज पालिका वाले सर्वे करून गेले.
प्रत्येक घरात कुणीबाहेर देशातून आला का, सर्दी खोकला आहे का, किती लोक रहाता? इ. इ. .

चौकस२१२'s picture

1 Apr 2020 - 11:36 am | चौकस२१२

१००० टक्के सहमत . ज्या धर्माच्या लोकांना परवारदिगार समोर बाकी सगळं काही झूट, ना देश, ना निसर्ग, ना समाज, त्यांच्या कडून काय अपेक्षा ...पण हे फटके अजून एका जमातीला पण दिले पाहिजेत ते म्हणजे "तमाम "अवॉर्ड वापसी ग्यांग आणि त्यांचे छुपे राजकीय पाठीराखे ...

चौकटराजा's picture

1 Apr 2020 - 12:24 pm | चौकटराजा

काल पँडेमिक हा सिनेमा पाहिला. त्यात विमानात एका प्रवाशाला रक्ताच्या उलट्या होऊन तो जागीच मरण पावतो. त्याला एका किनार्यावर लागण झालेली असते. विमानातील एक प्रवासी आपल्या काही महत्वाच्या मिटिंग असल्याने सर्वाची नजर चुकवून सामनाच्या गाडीतून पळून जातो. व पुढे त्याचे रूपांतर महामारीत होते. आपल्या शेजार्याप्रमाणे तो वायझेड असाच अनेक ठिकाणी जातो . टॅक्सी वापरतो . एका मिटिंगमध्ये जो दुसर्याच्या अगदी जवळ जाऊन हास्य विनोंद करीत असतानाच रक्ताची उलटी होऊन तिथेच मरतो वगैरे . पुढे मी काय लिहिणार ? काल स्पेन व फ्रान्स मधले ड्रोन फोटो पाहिले . तिथेही असे महत्वाकांक्षी वायझेड बिझनेस ,टार्गेट चे विष पिऊन भटकत असल्याचे चित्र दिसते.

चौकटराजा's picture

1 Apr 2020 - 12:30 pm | चौकटराजा

आपले खरे दुर्लक्ष विमानतळावरच झाले आहे. तिथूनच अगदी कैद्या प्रमाणे उचलले असते तर इतकीही वेळ आली नसती . होम क्वॅरंटाईन ही एक भंपक कल्पना आहे. आपले रिसोर्सेस कमी हे त्याचे कारण आहे. आपण आता धडा घेऊन , पुतळे , मिलिटरी ,सांस्कृतिक खुळे ,पैकेजेस ची खिरापत हे खर्च कमी करून आरोग्य यावर अधिक खर्च केला पाहिजे ! राजकीय लोक ते होऊन देणार नाहीत !

सूक्ष्मजीव's picture

1 Apr 2020 - 3:00 pm | सूक्ष्मजीव

जीवनावश्यक बाबींसाठी बाहेर जावेच लागते. भाजीवाल्या जवळ किती लोकानी हात लावलेले पैसे असतात हे आपल्याला माहिती नसते.
दुकानांमध्ये पण तीच अवस्था.

फळ, भाजी पाला हे काही जीवन आवश्क्या गोष्टीत येत नाही ह्याची वाहतूक पूर्ण बंद केली पाहिजे .

अशी वस्तू ती नसेल तर माणसाचा जीव जावू शकतो त्या वस्तू जीवन आवश्यक वस्तू म्हणता येईल.
भाजी पाला आणि फळ नसतील तर जीव जात नाही.
कड धान्य ,भाकरी,चपाती,भात माणसाला जगायला खूप झाले.
पाणी,औषध,हे जीवन आवश्यक आहे.
सरकारनी कठोर होवून सर्व वाहतूक पूर्ण थांबवावी.
फक्त आजारी असेल तर दवाखान्यात जाता येईल ,बाकी कोणत्याच कारण साठी कोणीच घराच्या बाहेर दिसला नाही पाहिजे.
५० kg gahu,tantul,ज्वारी,तूर, मूग,प्रतेक ला घरपोच करा बस

तंदुरुस्त राहण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भरपूर भाज्या आणि फळे खा असे कानीकपाळी ओरडताहेत टीव्हीवाले २१ मार्चपासून.

आज फळ ,भाज्या आहारात वापरल्या की उद्या लगेच प्रतिकार शक्ती वाढते का .
ज्यांची लाईफ स्टाईल चांगली आहे आहार चांगला आहे त्यांची प्रतिकार शक्ती पण चांगली आहे.
व्हायरस आलंय म्हणून फळ ,भाज्या आहारात वापरून इन्स्टंट काही होत नाही

मराठी कथालेखक's picture

1 Apr 2020 - 7:17 pm | मराठी कथालेखक

अशी वस्तू ती नसेल तर माणसाचा जीव जावू शकतो त्या वस्तू जीवन आवश्यक वस्तू म्हणता येईल.
भाजी पाला आणि फळ नसतील तर जीव जात नाही.
कड धान्य ,भाकरी,चपाती,भात माणसाला जगायला खूप झाले.

कुणी काय खावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसंही भाज्या ह्या रोज खाल्ल्या जातात म्हणून त्या जीवनावश्यक अगदीच पिज्जा, बर्गर वा केकला जीवनावश्यक नाही म्हंटलं तरी चालेल.

अगदी असाच किस्सा माझ्या मित्राच्या इमारतीत घडला. आठ दिवसांपूर्वी शांतीप्रिय धर्माचा एक मुलगा आखातातून आला. त्यालाही घरीच बंदिस्त राहण्याचा सल्ला विमानतळावर मिळाला होता व शिक्का ही मारला गेला होता. पहिल्या दिवशी तो घरातच होता. दुसऱ्या दिवशी तो इमारतीत फिरतांना शिक्क्यावरून त्यला कोणीतरी हटकले असता, 'माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे असे तो सांगू लागला.' त्याचा भाऊ इमारतीतील लोकांना शिव्या देऊ लागला. अखेर कुणीतरी पोलिसांना फोन केला, पोलीस आले आणि त्या घरातील कुणीही बाहेर फिरकल्यास सर्वांना कास्तुरबाला दाखल करू असा दम दिला. तेव्हा पासून ते घरात बंद आहेत. त्या मुलाने पुढील चाचण्या केल्या अथवा नाहीत हे कळले नाही.

जास्त मानवता वादी आहोत हे दाखवण्याचा नादात देश संकटात सापडला .
१ मार्च पासून च सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करायला पाहिजे होती.
भारता बाहेर राहणाऱ्या लोकांना बिलकुल प्रवेश दिला नाही पाहिजे होता.
आणि लयाच प्रेम उतू चाललं होते तर राजस्थान च्या वाळवंटात त्या सर्वांची सोय करायला पाहिजे होतो मे २०२० पर्यंत.

NiluMP's picture

2 Apr 2020 - 4:38 am | NiluMP

+१०००

सूक्ष्मजीव's picture

3 Apr 2020 - 4:14 pm | सूक्ष्मजीव

+१००

मराठी कथालेखक's picture

1 Apr 2020 - 6:45 pm | मराठी कथालेखक

माझ्या मते सोशल डिस्टन्सिंग निर्विवाद आवश्यक आहे, पण लॉक डाउन हा शुद्ध खूळचटपणा आहे. जमावबंदी हवी, संचारबंदीची गरज नाही.
परदेशातून आलेल्या लोकांना टेस्ट होईपर्यंत होम क्वारंटाईन करणे आवश्यक आहे पण जर टेस्ट झाली आणि ती निगेटिव्ह असेल तर होम क्वारंटाईन कमी करण्यास हरकत नसावी.

सूक्ष्मजीव's picture

3 Apr 2020 - 4:17 pm | सूक्ष्मजीव

मला वाटते आपला समाज अजुन या स्तरावर परिपक्व झालेला नाही.

स्वतःची व्यक्तिगत स्पेस आणि दुसऱ्याची स्पेस याचे गणित आम्हाला माहितच नाही

मराठी कथालेखक's picture

3 Apr 2020 - 4:28 pm | मराठी कथालेखक

असं काही नाही. स्वाईन प्लूची साथ आली होती तेव्हा अनेक लोकांनी गर्दी टाळली होती. साथ लवकर आटोक्यात आलीसुद्धा लस बाजारात येण्यापुर्वीच.
प्रत्येक विषाणू आणि प्रत्येक साथ ही वेगळी असते हे मान्य. कोरोनाच्या साथीत लक्षण लवकर दिसत नसल्याने जास्त समस्या झाली आहे हे मान्य पण दरवेळी भारतीय जनता बेशिस्त आहे म्हणून गळा काढण्यात काही अर्थ नाही.. उलट मी म्हणेन की ईटली, जर्मनी, अमेरिका ई देशांच्या तुलनेने भारतीय जनता अधिक जबाबदारपणे वागत आहे.

धर्मराजमुटके's picture

2 Apr 2020 - 10:47 pm | धर्मराजमुटके

१५ एप्रिल जवळ येईल तसतशी अशा लेखांची संख्या वाढत जाईल. लॉकडाऊन केले तरी अडचण नसती केली तरी अडचण.
लोक घोड्यावर बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही हेच खरे !