करोना आणि मिपाचे कल्पक बॅनर !

Primary tabs

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in काथ्याकूट
23 Mar 2020 - 8:53 pm
गाभा: 

करोना विषाणूच्या लागणीची साथ आली, आणि आपले दैनंदिन जीवन ढवळून निघाले, अन मग मिपाकर ही या ताज्या विषयावर चर्चा करायला मागे का राहातील ?

डॉ सुबोध खरे यांचा कोविड-१९ विषयीचा लेख म्हणजे शास्त्रीय माहिती, जैविक तपशील यांचा आरसाच, बऱ्याच लोकांनी तिथं चर्चा केली, शंका विचारल्या, उत्तरं मिळून प्रबोधनही झालं.
कुमार१ यांचा हात, जंतू, पाणी आणि साबण हा देखील स्वच्छतेच्या अंगाने चर्चला गेलेला सुरेख लेख.
संदीप चांदणे यांची मास्कमधून ही जिद्द आणि जगवणं सांगणारी कविता.
ही काही वानगी दाखल उदाहरणे.

आणि या पार्शवभूमीवर मिपाचे कलाकार तरी का मागे का राहतील ?

आणि मग, मिपा सजलं आकर्षक समयोचित बॅनरनं !

आपण करोना विरुद्धची लढाई लढायला सज्ज आहोत हे आश्वस्त करणारी टॉपलाईन.

करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रमुख उपायांची आटोपशीर ग्राफिक्स मांडणी.

MPB

मास्क लावला तरी तुम्हाला कुणी डुआयडी म्हणणार नाहीत ही जबरी कोपरखळी !

आणि त्यावर कळस म्हणजे मिपाच्या लोगोला चक्क " गो करोना, करोना गो " अशी सिग्नेचर लाईन असलेला मास्क ! क्या बात हैं !!!

हॅट्स ऑफ फॉर बॅनर ! सलाम !

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2020 - 9:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव याविषयी जागरूकता आणि त्याविरुद्धचा लढा सर्वत्र लढल्या जात असतांना मिपा मागे राहणे शक्यच नाही. आपण उल्लेख केला त्या मान्यवरांनी योग्य माहिती दिली त्यामुळे त्याबद्दल काळजी कशी घ्यावी त्याची उत्तम माहिती मिळत गेली, मिळत आहे. त्याच वेळी अभ्याने केलेले बॅनर नंबर एक झालं. अभ्याच्या कलाकुसरीचा आपण जूने पंखा आहोत, त्यांच्याकडून अशीच मिपासेवा सेवा होत राहावी अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

24 Mar 2020 - 12:47 pm | चौथा कोनाडा

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटेसाहेब !
खरंच, अभ्याशेठनं केलेलं बॅनर एकदम भारी झालेय ! हे बॅनर नक्की कुणी केलंय हे माहित नव्हतं, नाही तर धाग्यात देखील उल्लेख केला असता !
हॅट्स ऑफ अभ्याशेठ !

अभ्याचे आम्ही देखिल फॅन आहोत हे या ठिकाणी सांगायला आनंद होतोय !
भेटायची इच्छा आहे या कलावंताला एकदा !

नावातकायआहे's picture

24 Mar 2020 - 1:01 pm | नावातकायआहे

अभ्याशेठनं केलेलं बॅनर एकदम भारी झालेय !

बाडिस...

मिपाच्या लोगोला मास्क लावण्याची कल्पना भारीच आवडली...
एकंदरीत बॅनर मस्तच वाटतोय! एक नंबर काम झालंय अभ्या.. _/\_

कुमार१'s picture

24 Mar 2020 - 6:58 pm | कुमार१

एकंदरीत बॅनर मस्तच वाटतोय! एक नंबर काम झालंय अभ्या.

>> +१११
संचालकांचेही अभिनंदन !

प्रचेतस's picture

24 Mar 2020 - 7:10 pm | प्रचेतस

अभ्या हाडाचा कलाकार आहे.

फुटूवाला's picture

25 Mar 2020 - 6:35 am | फुटूवाला

मिपाकर श्री शैलेंद्र कवाडे यांचे हार्दिक अभिनंदन...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2020 - 8:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कशाबद्दल ??

-दिलीप बिरुटे

शैलेंद्र कवाडे यांचे हार्दिक अभिनंदन...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2020 - 9:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वाह अभिनंदन शैलेंद्रसेठ, प्राऊड फिलिंग.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Mar 2020 - 10:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बॅनर आणि शैलेन्द्रसेठ.... दोन्ही भारी.

-दिलीप बिरुटे

सुंदर बॅनर, शैलेंद्र कवाडे यांचे हार्दिक अभिनंदन !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- On the floor baby Hit it hard baby Rock the party baby Pattoolengil podi... :- Love Action Drama

चौथा कोनाडा's picture

25 Mar 2020 - 11:45 am | चौथा कोनाडा

मिपाकर श्री शैलेंद्र कवाडे यांचेखुप खुप हार्दिक अभिनंदन... !
आम्हाला तुमचा अभिमान वाटतो !

आताच झी मराठी वर श्री. शैलेंद्र कवाडे यांची हिंदीत दिलेली मुलाखत बघीतली. एका मिपाकराला टिव्हीवर अत्यंत महत्वाच्या बातमीत बघताना आनंद झाला.