कंटाळवाणा पास्ता?!?

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
14 Mar 2020 - 5:02 pm

बाजारातून तयार मॅकरोनी चीज पास्ता आणून ठेवला होता , ओव्हन मध्ये ढकलायचा आणि खरपूस झाला कि खायचा.. पण ते कंटाळवाणा वाटलं.. म्हणलं जरा त्याला रंगीत करूयात
साहित्य: तयार मॅकरोनी चीज पास्ता, भाजून घ्यावा
तांबडा (स्पॅनिश) आणि पंधरा ( अलिबाग वाला ) कांदा
चोरिझो नावाचे तिखट ( पाप्रिका वगैरे )स्वादाचे सलामी ( हे "धुरी देऊन साठवलेलं प्रकारचे कोरडे सॉसेज, ताजे ओले सॉसेज नाहीत )
चोरिझो मिळत नसतील तर इतर सॉसेज ला थोडे तिखटावर परतून घ्या
चांगले ऑलिव्ह तेल
रोजमेरी
ग्रीक पद्धतीचे फेटा चीज ( शेळीच्या दुधाचे बनवलेले ) हे बऱयापैकी खारट असते

कृती:
तेलावर कांद्याचे काप परतावे ( फार राखाडी होई पर्यंत नाही )
ते बाजूल काढून त्याच तेलात सॉसेज चे तुकडे परतावे ( सॉसेज ला स्वतःची चरबी असल्याने वागेल तेल घालू नये )
बेक केलेले पास्ता जरा कोमट होऊ द्यवा आणि छायाचित्र प्रमाणे वाढावे किंवा चक्क कला केला तरी चालेले
सोपे आहे ( पास्ता कर्णयचे काम आधीच झाले )

पेय:
चीज आणि तेलाची / सॉसेज चरबी ची चव थोडयावेळाने तोडांत रेंगाळून कंटाळा येऊ शकतो म्हणून काहीतरी थोडे आंबट पेय गेट येईल
लिबू सरबत किंवा सफेद थंड किंवा चोरिझो चाय चवीला साथ देईल अशी शिराझ जातीची तांबडी वाईन !

सर्वांना आवाहन.. याचे महाराष्ट्रातील स्थानिक पदार्थ वापरून कसे करत येईल हे कोणी तरी शोधून काढेल तर सर्वांना मजा घेता येईल ! सहज केलेली सूचना

IMG_7451[1]
IMG_7453[1]
IMG_7455[1]
IMG_7450[1]
IMG_7454[1]
IMG_7452[1]
IMG_7466[1]
IMG_7457[1]
IMG_7456[1]
IMG_7465[1]
IMG_7469[1]
IMG_7460[1]