अपघाती वडे ( ऍक्सिडेंटल फ्रिटर्स )

Primary tabs

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in पाककृती
13 Mar 2020 - 5:42 am

अपघाती वडे ( ऍक्सिडेंटल फ्रिटर्स )
एकदा काय झाले , मिक्सर मध्ये कणिक मळण्यासाठी म्हणून सुरवात केली ( भांडे पारदर्शक नवहते तर स्टेनलेस स्टील चे होते ) आणि गोळा बाहेर काढून बघतो तर काय लाल भडक!... दोन क्षण काही कळले नाही ..असे कसे झाले ते? बरं नुकतेच केक वैगरे काही केले नव्हते त्यामुळे खायचा रंग आधी असण्याची शक्यता पण नवहती //// मग काय
आणि डोक्यात प्रकाश पडला कि आधी गाजर आणि बीटरूट चे सार करण्यासाठी बीटरूट यात होते ... आता ह्या कणकेचे काय करायचे .. मग काय घातल्या इतर डाळी आणि इतर मसाला, जिर, धने,हळद मीठ , तिखट, तिळ आणि एअर फ्रायर मध्ये भाजून काढले ( तळू पण शकता ) ... झटपट खमंग वडे ..बीटरूट च्या चवीचे
हे थोडेसे डाळ बाटी सारखे लागले चवीला आणि पोत पण तशीच
बरेचदा उरलेली भाजी/ अगदी आमटी , डाळ यात कणिक भिजवून आपण त्याचे पराठे/ पोळ्या करतो ना तसेच काहीसे
कोणताही कृत्रिम रंग ना घालता लाल भडक वडे
IMG_6050[1]

IMG_6051[1]

प्रतिक्रिया

नावातकायआहे's picture

13 Mar 2020 - 1:50 pm | नावातकायआहे

ह्यात अंडे नकोच!

:-)

रमेश आठवले's picture

13 Mar 2020 - 9:22 pm | रमेश आठवले

मनमोहनसिंग अशाच प्रक्रियेतून प्रधान मंत्रि झाले असावेत. https://en.wikipedia.org/wiki/The_Accidental_Prime_Minister

विनिता००२'s picture

14 Mar 2020 - 9:55 am | विनिता००२

बापरे! मिकसर सुरु करण्याआधी आत काही आहे की नाही? बघत नाही का?

चौकस२१२'s picture

14 Mar 2020 - 10:49 am | चौकस२१२

अर्थात बघतो ना .. त्यादिवशी राहिलं.... आणि म्हणून तर तांबडी डाळ बाटी तील बाटी खायला मिळाली !
पाहुण्यांना पण जरा चकित करता आलं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2020 - 11:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्थात बघतो ना .. त्यादिवशी राहिलं

टेंशनचं काम आहे ना राव हे असं.

रिस्क आहे ना.
बाकी फोटू भारी.

-दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

14 Mar 2020 - 4:03 pm | चौकस२१२

हो खरे त्यात चमचा वैगरे राहिला असेल तर ... पण त्याहून अधिक धोकादायक म्हणजे बहुतेक भारतीय मिक्सर ना सेफ्टी झाकण नसते म्हणजे झाकण पूर्ण लागल्या शिवाय मिक्सर सुरूच करता नाही आला पाहिजे ! खास करून काही पदार्थातात आपण झाकण उघडून चमच्याने ढवळतो आणि परत चालू करतो तेव्हा
अर्थात आजकाल मिळत असेल म्हणा माहित नाही