आंबट गोड खारट अशी काहीशी चव आणण्याचा प्रयत्न आहे यात
साहित्य
-ताज्या लसणीचे काप
- पनीर चे छोटे तुकडे
-छोटे चेरी टोमॅटो
- हिरव्या ढब्बू मिरची चे माध्यम काप
- तांबडे तिखट ?( फ्लेक)
- पातीचा कांदा ( पाहिजे असल्यास कोथिंबीर)
- पांढरे व्हिनेगर
- शेंगदाणा तेल
- गोड मिरची सॉस ( स्वीट चिली सॉस)
- जाड लोखंडी तवा आणि वॊक
एकीकडे जाड लोखंडी तवा ( फोटोत ग्रीडल वापरले आहे) चांगलं गरम करून त्यावर तेल सोडावे आणि ढब्बू मिरची चे तुकडे भाजावे / परतावे
( तवा जाड असावा उपहारगृहात कबाब / सिझलर ज्यावर वाढतात चुर्रर्र आवाज करीत तसला )
कढई किंवा वॊक चांगलं तापल्यावर तेल घालून लसूण परतवूं घायवी आणि त्यावर तीखटाची भरड कूट ( फ्लेक) पण
मग पनीर परतावा ... जळणार नाही हे पहा ( माझा चाललं आणि लोखंडाच्या वॊक मुळे जरा काळसर पण आला )
जरा आच कमी करावी आणि मग व्हिनेगर आणि गोडसर चिली सॉस घालावे
आधी भाजलेली ढब्बू मीरची मग यात घालावी
शक्यतो झाकण ठेवू नये
चव घेऊन मीठ आणि थोडी साखर घालावी
थोडे पाणी सुटेल .. ते पूर्ण उडून जायच्या आत आच बंद करावी .. वरून पाणी घालू नये
वरून कापलेले छोटे चेरी टोमॅटो घालावे ( चांगले पिकलेले )
प्रतिक्रिया
23 Feb 2020 - 11:53 am | कंजूस
चांगलं दिसतंय.
नवनवीन पदार्थ करून बघता?
23 Feb 2020 - 1:09 pm | चौकस२१२
करतो काहीतरी "इधर का माल उधर" पण जरा संयम आणि शिस्त पाहिजे करण्यात ती नाही म्हणावी तेवढी !
खादाडी आणि थोडं काहीतरी वेगळं अनुभवण्याचा किंवा चाकोरीतीलच पण जरा वेगळ्या पद्धतीने कसे लागेल याचाच विचार चालू असतो
आणि जेवण बनवणे हे एकप्रकाराचरे नाट्यगृह असते तिथे "सादर" करून समोरच्याला जरा चकित करत येते का पाहायचे.. तेवढीच मज्जा
नुसते आईस्क्रीम काय आपण नेहमीच खातो त्यात हे ते घालून काही तरी करावे.. दुधाचेच का? नारळाच्या दुधाचे करावे! दह्याचे होऊ शकते ! इत्यादी
किंवा वेगवेगळ्या प्रदेशातील काय व कसे हे पाहावे.. असा प्रयतन असतो एकदा अबुधाबी ला केरळी उपहारगृहात गेलो आणि वेटरदादा नि पहिला प्रश्न विचारला कि काय घेणार तंदुरी चिकण ? मी त्याचे बौद्धिक घेतले म्हणले अरे मित्रा बाहेर नाव केरळी असे लिहिले आहे ना मग जरा केरळी काहीतरी दे कि रे.... असो
23 Feb 2020 - 1:29 pm | कंजूस
केरळात पर्यटनवाले नेत नाहीत किंवा सामान्यत: पर्यटक जात नाहीत त्या कासारगोड,कन्नुर, कोळ्हीकोड, जिल्ह्यांत खास परोट्टे, ड्रायफ्रुट शेक, इतर नानवेज पदार्थ मिळतात. तिकडचे खाल्लेत का?
कैराली चानेलवर दाखवत.
23 Feb 2020 - 2:15 pm | चौकस२१२
नाही हो मी सांगत होतो कि अबूधाबी मध्ये मुद्डमून केरळच्या हाटिलात गेलो आणि तो गध्या मला पंजाबी सांगतोय !
जेथील मूळ ते खावे या हेतूने गेलो (कारण तेवहा महाराष्ट्र्र आणि कर्नाटक सोडला तर कुठे गेलो नव्हतो ..) पण असा पोपट झाला
हि नावे लक्षात ठवून योग्य आलं कि जर खाऊ
आपला कसा "भाऊ जाऊ तिथे खाऊ"
23 Feb 2020 - 6:12 pm | कंजूस
पटलं.