पर्वती

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
14 Feb 2020 - 12:26 pm
गाभा: 

पर्वती चढत होतो
साथीला ५-६ तरुणाईचे टोळके होते
ते गप्पा मारत पर्वती चढत होते
मध्यावर आल्यावर तरुणाई दमली व बाजूला विश्रांती साठी बसली
मी त्यातल्या एका तरुणाला म्हणालो अरेतुम्ही जवान तरुण मुले दम्लात एव्हढ्यात ? पर्वती एका दमात चढायची असते
मी तर अजूनही एका दमात चढतो
त्यावर तो तरुण म्हणाला " काका तुमची पिढी साजूक तुपावर मोठी झाली आमची पिढी रिफाईंड ऑइल वर -तेव्हढा फरक तर पडणारच ना "
त्याच्या उत्तराची गंमत वाटली व त्या कडे पाहून हसलो
व पाय-या चढायला सुरवात केली

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

14 Feb 2020 - 2:10 pm | आनन्दा
सतिश पाटील's picture

15 Feb 2020 - 2:56 pm | सतिश पाटील

फक्त चढ म्हणा !!

अनिरुद्ध.वैद्य's picture

16 Feb 2020 - 11:39 pm | अनिरुद्ध.वैद्य

त्यानंNइ पुढल्या पिढीला रिफाईंड तेलावर मोठं केलं.

ही पिंक इथे अजून का शिल्लक आहे? या लेखकाने हीच पोस्ट जुलै 2019 मध्ये मिपावरच टाकली होती. हे मिपाच्या धोरणात बसते का?
मी पण माझे सगळे धागे आणतो वरती असे.

साजूक तूपाचा वगैरे संबंध नाही.

नेहमीचा सराव असेल तर पर्वती इतक्या उंचीची टेकडी त्या तरूणांनाही एका दमात सर करता येवू शकेल. एका आठवड्यात बरीच प्रगती होवू शकते.