सहदेव भाडळी

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
14 Feb 2020 - 12:24 pm
गाभा: 

सहदेव भाडळी
मार्तंड जोशी हे एक विद्वान ज्योतिषी होते. एका गावाहून दुसर्‍या गावाला जाताना एकदा त्यांना, त्या काळी एका अंत्यज समजल्या जाणार्‍याच्या झोपडीत आसरा घ्यावा लागला. घरात एक म्हातारी आणि तिची मुलगी राहत असे. आपण घरी वेळेवर पोहोचू शकत नाही या विचाराने जोशी अस्वस्थ होते. म्हातारीने कारण विचारले. त्यांनी सांगितले की आजच्या दिवशी ज्या स्त्रीची गर्भधारणा होईल तिला होणारा पुत्र हा मोठा ज्योतिषी होणार आहे; मी जंगलात अडकल्यामुळे ही सुवर्णसंधी हुकणार आहे. म्हातारीने त्यांना आपल्या मुलीबरोबर रात्र घालवायची परवानगी दिली.

मार्तंड जोशी यांना त्या अंत्यज मुलीपासून पुत्र न होता कन्या झाल्याने जोशी फार उदास झाले. कन्येचे नाव भाडळी ठेवले होते. पुढे भाडळीला घेऊन मार्तंड जोशी त्यांच्या घरी आले. कालांतराने आपल्या सहदेव नावाच्या मुलाला ज्योतिष शिकवण्याचा प्रयत्‍न करीत असताना अचानक त्यांच्या लक्षात आले की शेजारी बसलेली भाडळी मन लावून ऐकते आहे. हीच भावी ज्योतिषी हे ध्यानात आल्यावर मार्तंड जोशींनी आपली सगळी विद्या भाडळीला दिली.

भाडळीची ग्रंथनिर्मिती
भाडळीने संस्कृतचे बंधन तोडून प्राकृतात ज्ञाननिर्मिती केली. तिने 'मेघमाला' नावाचा व्यासांनी लिहिलेला ग्रंथ प्राकृतात आणला. मेघमालेच्या रूपाने भाडळी ही अत्यंत उपयोगी व त्या काळात आधुनिक विचाराचा पाया घालणारी होती असे दिसते. तिने गांधर्व विवाह, शल्यचिकित्सा, आयविचार, पिकांवरील रोग व त्यांवरील उपचार, आरोग्य व ज्योतिष, पर्जन्याचे हवामान शास्त्राच्या अंगाने केलेले विवेचन, स्त्री-प्रशंसा व इतरही अनेक आधुनिक बाबींचा विचार मांडला. तिची मते जुन्या प्रस्थापित चालीरीतींना छेद देणारी असून नव्याने आपले विचार मांडणारी होती.

तिच्या ज्ञानरचनेवर शाहीर हैबती घाडगे (१७९३-????) यांनी रचना केल्या व भाडळीचे ज्ञान लावण्यांमध्ये बद्ध करून जिवंत ठेवण्याचा प्रयत्‍न केला

सहदेव भाडळी हा ग्रंथ अनेक प्राणी/पक्षी यांच्या निरीक्षणावरून हवामानाचे अंदाज कसे करतात याचे पारंपरिक वर्णन करतो. समाजाचा प्रत्येक घटक हा ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार यंदा पाऊसपाणी कसे होईल, येते वर्ष कसे जाईल हे जाणून घेण्यासाठी सहदेव भाडळीचा आधार घेत असे. सहदेव भाडळी ही कला मूलत: पर्जन्यमानाच्या तर्काशी संबंधित आहे. तो लिहिताना भाडळीने पर्जन्य विचारांवर स्वतःचे असे काही विचारही मांडले आहेत. तिने पर्जन्याचा विचार करताना ज्योतिष शास्त्रापेक्षा हवामान शास्त्राचा विचार जास्त केला; त्याचबरोबर इतर भविष्यविषयक ज्ञानही यातून मिळते.[३]

भाडळीच्या शाखेने सामान्य आयुष्यातून शकुनातून भविष्याचा अंदाज घेण्याची पद्धत विकसित केली. भाडळीने आपल्या आधीच्या संस्कृत ग्रंथांचा आधार घेतलेला दिसतो. सुरुवातीला तिच्या ज्ञानावर हैबतींच्या रचनांच्या साहाय्याने जी रचना झाली त्या रचनेचा वापर करून एका पंथांची निर्मिती झाली पण कालांतराने तो पंथ नामशेष झाला व एकेकाळी जोशी ह्या जातीची उपजात असणारी सहदेवी ही उपजातच नामशेष झाली.

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

14 Feb 2020 - 2:12 pm | आनन्दा