सायकल घेताना निवड करण्यासाठी मदत हवी आहे.

मास्टरमाईन्ड's picture
मास्टरमाईन्ड in काथ्याकूट
30 Jan 2020 - 11:30 pm
गाभा: 

मला माझ्या मुलासाठी (वय १३ पूर्ण १४ चालू. उंची साधारण ५'६" ) सायकल घ्यायची आहे.
चिरंजीवानं स्वतः चे मित्र, आजुबाजूला दिसणारे समवयस्क आणि इंटरनेट वरुन केलेला research यावरुन असं ठरवलंय की gear चीच सायकल घ्यायची (२१ gear combination) . माझं मत असं आहे की सायकल जी मला पण कधीतरी वापरता येईल(?) (शेवटची सायकल वापरून साधारण २०-२२ वर्षं झालीयेत) अशी घ्यावी.
मी सहजच सायकलींच्या किंमती पाहिल्या तर gear च्या सायकल १२००० पासून पुढे आहेत.
मी कधीही gear ची सायकल वापरलेली नाही. एका सायकल कंपनी च्या शोरुम च्या सेल्समन नं सांगितल्याप्रमाणं normal domestic users other than professional cyclists साधारणपणे ४ ते ५ gear च्या पुढे कधीच वापरत नाहीत. आणि cycle shop / cycle dealers तुम्हाला हे कधीही सांगणार नाहीत कारण त्याना त्यात margin मिळतं.
मला १५००० पर्यंत सायकल घ्यावी असं मत आहे. आणि आज मुलगा कितीही म्हणाला तरी सायकल चा वापर किती होईल याबद्दल शंका आहेच. कारण आमच्या आणि इतरही काही सोसायट्यांमध्ये बहुतांश सायकली अक्षरशः धूळ खात पडलेल्या दिसतायत.
कमीत कमी खर्चात branded, gear ची सायकल घेण्यासाठी मिपाकरांची मदत हवी आहे.

प्रतिक्रिया

मुलाचं म्हणणं बरोबर आहे. गिअर वाली सायकल सर्व प्रकारच्या रस्त्यांसाठी उपयोगी पडते. २१ गिअर स्वतंत्र नसून ते ३ x ७ या कॉम्बिनेशन मध्ये असतात. म्हणजे पुढे ३ व मागे ७. आणि तेवढं गिअर आवश्यक आहेत जेणेकरून पाय भरून येत नाहीत. स्वस्तात एखादी मिळेल पण ती चालवायला खूप बोजड जाते आणि सायकल चालवायचा उत्साह संपून जातो.
त्यामुळे चिरंजीव ना उत्तम सायकल घेऊन द्या. किमान १००००₹ +.

मास्टरमाईन्ड's picture

31 Jan 2020 - 12:33 pm | मास्टरमाईन्ड

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
एखादा ब्रँड सुचवू शकाल का? कारण मला माहिती असलेल्या ब्रँड पेक्षा आज वेगळेच ब्रँड leading करताना दिसताहेत.
१०००० ठीक आहे. मी १५०००पर्यन्त बजेट ठेवलंय.

स्वधर्म's picture

31 Jan 2020 - 12:50 pm | स्वधर्म

मी अगदी याच परिस्थितीतून गेलो आहे २-३ वर्षांपूर्वी. मिपावरच श्री मोदक यांनी त्यावेळी चांगले मार्गदर्शन केले होते. मुलाला अखेर मॉंट्रा या नाममुद्रेची रु. १५००० ची सायकल घेतली. खूप हलकी आहे, आजिबात दमणूक होत नाही. तो अगदी खूष आहे. एकूणात निर्णयाबाबत समाधानी.

आमच्या लहानपणी बी एस ए SLR, अटलास, हर्क्युलीस (फास्टर फेणे फेम) आणि हिरो ही मुख्य आणि बहुधा इतकीच नावं होती. अगदी लहान मुलं टोबु सायकली चालवायची, पण लहान मुलांची वेगळी सायकल ही अतिश्रीमंत चैन होती (पडणारी नव्हे). आठ आणे तास भाड्याने भली मोठी काळी सायकल आणून त्यात मधल्या त्रिकोणातून एक तंगडी पलीकडे टाकून हाफ पेडल मारत मारत सायकल चालवण्याने सुरुवात व्हायची. गियरची सायकल म्हणून काहीतरी असतं एवढी फक्त ऐकीव माहिती अत्यंत उच्च सामान्यज्ञान असलेल्या पाच टक्के पोरांना होती. अशी सायकल खरंच असते की ती एक कविकल्पना आहे हे निश्चित ठाऊक नव्हतं.

आता या वरीलपैकी कोणती सायकल जीवित आहे का? मुलांना वेगळी सायकल आणि तीही खास फीचर्स असलेली इतका विचार मुलांचा त्या काळी होत असता तर आम्हीही ...

असो. गेतेदि रात्याआ.

प्रचेतस's picture

31 Jan 2020 - 1:34 pm | प्रचेतस

आठवणीने घशात आवंढा दाटला, डोळे पाणावले.

आता इतक्या वर्षांनी यावर बसून चालवण्याचा प्रयत्न केल्यास नितंबमोक्ष निश्चित.

प्रचेतस's picture

31 Jan 2020 - 1:40 pm | प्रचेतस

=))

अगदी अगदी.

त्यात अशा सायकलींची चेन वारंवार पडणे, पॅडल उलटे फिरवून ती अल्ल्द बसवणे, पॅडलच्या मधली पिन (क्वार्टर पिन का काय ते म्हणत असत त्याला) ती बदलणे. अशा गंमतीजमती व्हायच्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2020 - 2:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दवाचून कपाळमोक्ष झाला. =))

-दिलीप बिरुटे

मास्टरमाईन्ड's picture

31 Jan 2020 - 6:46 pm | मास्टरमाईन्ड

_/\_ नवीन शब्दाची भर पडली.
:))

गविशेठ, आता फॅट टायरच्या सायकलीसुद्धा आहेत. तिच्यावर स्वार झाल्यावर नितंबमोक्ष होणार नाही..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Jan 2020 - 2:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अटलास एक साठवण

एटलस सायकलची चांगली आठवण. आमच्याकडे या सायकलवर खुप जीव. आमच्याकडे पमचर काढायचं सर्व सामान होतं. सुलोचन ट्यूब, ट्यूब घासायला खरखरीत दगड, जुने ट्यूब चिठ्ठया लावायला.एक कात्री, त्याची एक लहान पेटी असायची. सर्व सामान त्यात असायचं. वडील सायकलवर ड्यूटीला जायचं तर सायकल सकाळी पुसायची जवाबदारी माझी असायची. ऑइल नसलं की खोबरेल तेल चैनीवर टाकायची ड्यूटी माझी असायची. वडील सेवानिवृत्त होईपर्यन्त सायकलवर येत जात असायचे. आम्ही शिकलोही एटलस सायकलच. किराणा, दळण ही आवडीने करायचो, ह्याण्डलच्या डाव्या उजव्या बाजूला पिशव्या लटकावल्या की चालले, हॅंडल वळवायल जड़ व्हायचे, पिशव्या गुंतल्यामुळे पडलोही अनेकदा. कॅरियरला स्प्रिंग सारखं असायचं ओढून सामान ठेवता येत होतं. सायकल मधल्या स्टैंडला लावून मागच्या चाकावर उभं करून पुढचे सायकलचं चाक उचलायचो. शाळेत स्लो सायकल स्पर्धा होती तेव्हा वडील सायकल सोडून गेलेले आणि ती स्पर्धा जिंकलो एटलस सायकलवरच. नरम शिट- खालून त्याला स्प्रिंग असायची गचके बसू नये म्हणून अशा कितीतरी Atlas सायकलच्या आठवणी.

-दिलीप बिरुटे
(एटलसवर शाला कॉलेज झालेला)

प्रचेतस's picture

31 Jan 2020 - 2:39 pm | प्रचेतस

त्या सुलोचन ट्यूबमधलं लोशन मलम हटकून गुलाबी रंगातच असायचं.

चौथा कोनाडा's picture

31 Jan 2020 - 5:17 pm | चौथा कोनाडा

आन त्यजा वास बी लै भ्भारी याय्यचा !

मास्टरमाईन्ड's picture

31 Jan 2020 - 6:47 pm | मास्टरमाईन्ड

अ‍ॅटलास वरच सायकल शिकलो.

मास्टरमाईन्ड's picture

31 Jan 2020 - 6:45 pm | मास्टरमाईन्ड

अस्संच होतं.
म्हणून तर कन्फुज हो गये. :))

बोलघेवडा's picture

31 Jan 2020 - 2:12 pm | बोलघेवडा

गवि शेट, लिवा की राव कायतरी त्या निमित्ताने.
एखादा लेख पाडा की राव

कपिलमुनी's picture

31 Jan 2020 - 2:48 pm | कपिलमुनी

मायबोली वर
सायकलविषयी सर्व काही सापडेल

मास्टरमाईन्ड's picture

31 Jan 2020 - 6:51 pm | मास्टरमाईन्ड

धन्यवाद.
आपण दिलेल्या दुव्यावर बरेच काही वाचनीय आहे.

मास्टरमाईन्ड's picture

31 Jan 2020 - 6:56 pm | मास्टरमाईन्ड

धन्यवाद
पण मी ह दुवा पूर्वी पण पाहिलाय.
यात नेमकी हवी / पसंत असलेली सायकल out of stock दाखवतंय.

जवळच्या दुकानातून घ्या. किंमतीचा अंदाज आला आहेच. व्यवस्थित घासाघीस करा.

धाग्याचा काश्मीर केलाच आहे तर त्यात माझीही एक काडी. माझ्याकडे त्यावेळेसची अपमार्केट म्हणता येईल अशी Raleigh सायकल होती. फुल चेनकव्हर, हँडलच्या मुठींना काटेरी कव्हर आणि भारदस्त काळा रंग असं एकूण तिचे स्वरूप होते. निकेलच्या कोटिंगचा दर्जा हा सर्वसाधारण सायकलपेक्षा जास्त चांगला, ब्रेक्सचे बुश असलेले फोर्क्स हे Raleigh आणि हंबर या सायकलींचे वैशिष्ट्यपूर्ण असत.

अशा या सायकलींची मी देखील मनापासून देखभाल करीत असे. अगदी फक्त पेट्रोल पंपावरच मिळणारे ऑटोपॉलिश वापरून आणि जुन्या बनियांच्या मऊसर फडक्याने अगदी घासूनपुसून मी तिची चमक वाढवीत असे. मागच्या आणि पुढच्या चाकांच्या रिम्स चमकवणे, स्पोक्स चमकवणे, पेडलच्या ऍक्सिसभोवती कुठून कसे पण केस अडकायचे ते काळजीपूर्वक साफ करणे अशी कामं मी बऱ्यापैकी नियमित करीत असे. हि सायकल नंतर मी पुण्यात घेऊन आलो आणि तिथेदेखील बरीच वापरली. नोकरी लागल्यानंतर मोपेड घेतली आणि या सायकलची संगत सुटली. नंतर ती गावी कुणीतरी नेली आणि तिथून भंगारात गेली.

सुलोचन वरून आठवले कि ते ईथरबेस्ड असायचे त्यामुळे त्याला थोडा चांगला म्हणता येईल असा वास असायचा. पंक्चर काढताना आजकाल हिटर असलेला प्रेस असतो तसा नसायचा. त्यामुळे दुकानातला मेकॅनिक पॅच लावल्यानंतर थोडं सुलोचन अजून लावून तेव्हडा भाग चक्क पेटवून द्यायचा. यात ती ट्यूब थोडीशी हुळहुळी होऊन पुढच्या पंक्चरची बेगमी होत असे.

रिक्षा सजवणारे जसे हौशी असतात तसे हौशी सायकलच्या बाबतीतही होते. दोन्ही ऍक्सलना ब्रशचे गोंडे लावणं, हॅण्डलला आरसा लावणं, मागच्या मडगार्डवर काही संदेश लिहिणं वगैरे प्रकार दिसत असत.

सायकलला दिवा असणं हा नियम होता आणि मामा मंडळी कधी कधी त्यावरून सावजांची धरपकड करायचे. हा दिवा म्हणजे टांग्यांना असणाऱ्या दिव्याचा लहानसा अवतार. पुढे दोन सेल्सवर चालणारे दिवे किंवा डायनॅमो आले. परंतु हेल्मेट वापरणारे जसे पापभिरू समजले जात तोच प्रकार व्यवस्थित दिवा लावणाऱ्या लोकांच्या बाबतीत होत असे.

मास्टरमाईन्ड's picture

31 Jan 2020 - 6:57 pm | मास्टरमाईन्ड

एक नंबर.

धाग्याचा काश्मीर केलाच आहे तर त्यात माझीही एक काडी.

:))
आवडलं

बोलघेवडा's picture

31 Jan 2020 - 10:40 pm | बोलघेवडा

Schnell, Phantom, Hero हे उत्तम ब्रँड्स आहेत.

हाय कम्बख्त! तूने चलाई ही नहीं!

तेजस आठवले's picture

4 Feb 2020 - 7:50 pm | तेजस आठवले

मला गिअर्स नसलेली साधी सायकल हवी आहे. सकाळी १०-१५ मि. व्यायाम म्हणून चालवणे एवढाच वापर होईल.दुकानात खरेदीला पटकन जाता येईल. स्त्री पुरुष दोघांनाही वापरता येईल अशी. अगदी सेकंडहॅन्डही चालेल.
अशा सायकली मिळतात ना अजून ?

दिपस्तंभ's picture

5 Feb 2020 - 2:02 am | दिपस्तंभ

Decathlon वर बघा. काही चांगल्या सायकल्स आहेत
https://www.decathlon.in/p/8359144_btwin-rockrider-340-grey-yellow-mtb-c...

मित्रहो's picture

7 Feb 2020 - 1:52 pm | मित्रहो

चांगली सायकल असेल तरच चालवायचा उत्साह टिकतो आणि सायकल चालवणे सुरु राहते. चांगली म्हणजे किती चांगली.
माझ्या मते एक चांगली अल्युमिनियम फ्रेम असलेली हायब्रीड सायकल घ्यावी. MTB जड असते त्यामुळे ती घेणे टाळावे. शॉक अॅबझॉर्वर असलेली सायकल जमत असेल तर टाळावी. सायकलचे वजन कमी होते. पुढे एक वेळ चालेल मागे तर नकोच.
१५००० बजेटमधे माँट्रा, फायरफॉक्स, बिटविन या कंपन्यांच्या सायकली येतील. माझ्या एका मित्राने जावा रोड बाईक घेतली २५००० मधे मस्त चालू आहे. त्यांची हायब्रिड असेल
दुसरा चांगला उपाय म्हणजे चांगल्या कंपनीची जुनी सायकल घेणे. बऱ्याचदा मंडळी हायब्रीडवरुन रोड बाईक कडे वळतात अशा वेळेला मेरीडा, स्पेशलाइज्ड, जायंट, ट्रेक, शुविन, स्कॉट, फेल्ट या कंपन्यांची हायब्रीड १५००० च्या आत जुनी सायकल म्हणून मिळून जाईल. सायकलला फार काही होत नाही मस्त असते तीन चार वर्षानंतरही.

मास्टरमाईन्ड's picture

11 Feb 2020 - 6:32 pm | मास्टरमाईन्ड

Finally घेतली सायकल.
Fantom Rapid 700C
चिरंजीवांना सांगितलं "आपलं जास्तीत जास्त बजेट १५००० आहे. त्यात तुला जी काय पाहिजे ती सायकल घे. तुला जो काय research वगैरे करायचाय तो करुन शांतपणे विचार करुन निर्णय घे. ही सायकल आपण किमान ६ ते ७ वर्ष तरी आपण बदलणार नाही."
Fantom, Firefox, Rodeo, Montra हे ब्रँड्स पाहिले.
शेवटी Fantom Rapid 700C with Front Suspension and 21 (7X3) gears आणि १५००० च्या आत मिळाली.
इथे मिपाकरांनी दिलेल्या सूचना आणि अभिप्रायांमुळे मला बरीच मदत झाली.
_/\_

mayu4u's picture

12 Feb 2020 - 11:24 am | mayu4u

चांगलं हेल्मेट घ्या आणि प्रत्येक वेळी वापरा. तसेच, अंधारात सायकल चालवणार असेल तर सायकल ला पुढे आणि मागे लाईट्स आणि अंगावर रिफ्लेक्टिव्ह व्हेस्ट वापरा. अ‍ॅमेझॉन्/डिकॅथलॉन वर पुष्कळ पर्याय मिळतील.

कपिलमुनी's picture

13 Feb 2020 - 12:01 pm | कपिलमुनी

अतिशय योग्य सल्ला

महासंग्राम's picture

14 Feb 2020 - 11:36 am | महासंग्राम

हे 21 (7X3) gears चं कॉम्बिनेशन कसं वापरावं कोणी सांगू शकेल का ?

mayu4u's picture

15 Feb 2020 - 4:12 pm | mayu4u

गियर चं काँबिनेशन असं ठेवायचं:
१-१, १-२, १-३
२-३, २-४, २-५
३-५, ३-६, ३-७

त्यामुळे चेन घासत नाही.

यात १-१ हे सगळ्यात हलकं आणि ३-७ हे सगळ्यात जड काँबिनेशन ; आणि २-४ हे परफेक्ट मधलं.

सपाट रस्त्यावर २-४ ने चालवायची. चढ आला की गियर उतरवत २-३, १-३... आणि उतार आला की गियर चढवत २-५, ३-५...

हे एक साधारण अनुमान आहे. गियर सोबत केडन्स (म्हणजे पेडल चे आरपीएम) कडे लक्ष द्यायला हवं. साधारण ८०-९० केडन्स मेन्टेन करावा. त्याप्रमाणे गियर बदलावेत.

गियर जेवढा खालचा तेवढा जोर कमी लागतो, पण प्रत्येक पेडल मध्ये अंतर पण कमी कापलं जातं. वरच्या गियर मध्ये प्रत्येक पेडल मध्ये जास्त अंतर कापलं जातं; पण जोर अधिक लावावा लागतो. आणि त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता वाढते. (सतत हार्ड गियर वर चालवून गुडघा दुखावल्यानन्तर आलेलं शहाणपण!)

सगळ्यात महत्वाचं: या सगळ्याचा जास्त विचार करायचा नाही. एकच लक्षात ठेवायचं: धर ह्याण्डल, मार प्याण्डल!

महासंग्राम's picture

17 Feb 2020 - 1:17 pm | महासंग्राम

धन्स, याचा लै उपयोग होणारे

बाब्बो, ह्या लिंका आणि किमती बघितल्या.

ह्या किमतीत माझी पहिली मोटारसायकल आली होती ते आठवले. :)