महाराष्ट्रात घडलेल्या कि घडवलेल्या योगायोगाने शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महा विकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. त्यांचे समर्थक सर्व उत्सव एकत्रित आनंदाने साजरे करत आहेत. भारतीय राज्यघटनेच्या शपथांचाही उत्सव चालू आहे.
काळा प्रमाणे एका मागोगाग उत्सव येताहेत तशी १४ फेब्रुवारी २०२० ही व्हॅलेंटाईन डेची तारीख फक्त दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्हीत आधीची आणि नवी पिढी एकत्रपणे नांदण्याचा प्रयत्न करते आहे. चांगले दृष्ट लागू नये म्हणून महत्वाच्या व्हॅलेंटाईन डे बद्दल भूमिकेवरून ऐनवेळी त्यांच्यात आणि त्यांच्या समर्थकात संभ्रम नको म्हणून या मिपा चर्चेचे (भाजपेतरांसाठी) प्रयोजन.
भाजपायी व्हॅलेंटाईनडे चे समर्थक पुर्वी नसावेत त्यांच्या नव्या पिढीचा दृष्टीकोण माहित नाही पण या धागाचर्चेपुरते त्यांनी तटस्थता पाळावी अथवा स्वतःसाठी वेगळा धागा काढावा उगाचच मोठ्या प्रेमाने एकत्र आलेल्या महाविकास आघाडी समर्थकांच्या प्रेमालापास दृष्ट लावू नये:) महाराष्ट्रात व्हॅलेंटाईन डे साजरा करू इच्छितांना तुर्तास महा विकास आघाडी काय म्हणेल शिवसेना सरकार व्हॅलेंटाईन डे वर निर्बंध घालेल की भारतीय राज्यघटनेस जागून मोकळीक देईल आणि दिली तर किती ? म्हणजे महा विकास आघाडीतील समर्थकांनी आपापसात व्हॅलेंटाईन डेच्या प्रेममय शुभेच्छा दिल्या तर चालतील का ? कि व्हॅलेंटाईन डे टाळून केवळ इतर दिवशी तेवढ्याच द्याव्यात ?
सध्या हा प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे, सध्या सर्वचजण राज्यघटनेचे मनापासून शपथ घेत आहेत. आणि राज्यघटनेची शी शपथ शिवसैनिकही घेतील या अटीवरच सोनीया गांधी सरकारात सामिल झाल्या असे म्हणतात.
तसे पहाता भारतीय राज्यघटना बाळासाहेब ठाकरें आणि राजीव गांधींच्या काळापासून लवचिकच आहे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने भारतीय राज्य घटनेस स्मरूनच व्हॅलेंटाईन डे ला विरोध केला होता असे ऐकुन आहे, राजीव गांधींनीसुद्धा भारतीय राज्य घटनेस स्मरून सेंसॉरशीपचे काही दरवाजे घट्ट करणारे काही कायदे आणलेच (त्या बद्दल सोनीया गांधींचे मत काय होते ते कुणास ठाऊक असल्यास नक्कीच सांगावे - राजीव गांधी आणि सोनीया गांधी व्हॅलेंटाईन डे साजरा करत कि नाही हे गूगल आम्हा आस्मादिकांना तत्काळ सांगण्यास अपयशी झाल्याने अभ्यासू काँग्रेस प्रेमीं याची माहिती देऊन काँग्रेस प्रेम व्यक्त करतील असा विश्वास हो विश्वासच आहे) तर असो आता त्यांच्या नव्या पिढ्या म्हणजे राहुल गांधी सुप्रिया सुळे अजित पवार आदित्य ठाकरे यांच्या व्हॅलेंटाईन डे साजरा करु अथवा न करु देण्याच्या भुमिका १४ फेब्रुवारी २०२० साठी काय असतील म्हणजे येता व्हँलेंटाईन आठवडा त्यांनी आपापसात आणि बाहेर आणि त्यांच्या समर्थकांनी नेमका कसा साजरा करावा अथवा न करावा?
त्या शिवाया आझादी उद्घोषकांनी व्हॅलेंटाईन डेपासून आझादी असा उद्घोष करावा की व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी आझादी असा उद्घोष करावा ? आझादीचा उद्घोष करणार्या महिलांना व्हॅलेंटाईन डेच्या निमीत्ताने कुणी कुणी गुलाबी सदिच्छा दिल्या तर चालण्यासारखे असेल म्हणजे त्यांना अशा गुलाबी सदिच्छांपासून आझादी पाहीजे असल्यास गुलाबी सदिच्छा देण्याची आझादी हवी असलेल्यांनी त्यांचा प्रश्न कसा सोडवावा ? खास करून आझादीच्या उद्घोषक महिलांना आझादीच्या उद्घोषणा न करणार्यांनी गुलाबी सदिच्छा देण्याच्या आझादीचे नेमके काय करावे ? असे विवीधांगी प्रश्न महा विकास आघाडी त्यांचे सरकार पोलीस दले समर्थक आणि त्यांचे आझादी उद्घोषक यांच्या समोर १४ फेब्रुवारी २०२० च्या निमीत्ताने उपस्थित होतील ऐनवेळी अरे आता कसे करू म्हणण्या पेक्षा आपले मिपा व्यासपिठ आणि त्यावरील हा चर्चा धागा आहेच.
तेव्हा सांगा मंडळी तुम्हाला काय वाटते ते ? चर्चेसाठी काही किमान प्रश्न वर दिलेच आहेत काही अजून जोडतो आणि तुम्हीही काही जोडा आणि प्रश्नांची उत्तरेही जोडा.
१) भारतीय राज्यघटनेचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या स्वातंत्र्याचे प्रेमी युगूलांनी प्रेम करण्याच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले असते की साजरा न करण्याच्या स्वातंत्र्याचे समर्थन केले असते ?
२) असे स्वातंत्र्य आझादी उद्घोषक महिलांना आणि त्यांना गुलाबी शुभेच्छा देऊ इच्छिणार्यांना असावे का ? अशा शुभेच्छा देताना काय करणे आणि काय न करणे प्रासंगिक आणि योग्य असू शकते ?
३) उद्धवजींच्या नेतृत्वाखालील महा आघाडी सरकारची आणि त्यांच्या अखत्यारीतील सरकारी निमसरकारी तसेच विद्यापिठे आणि कुलगुरुंची व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या आझादीबाबत काय भूमिका असावी ? त्यानी व्हॅलेंटाईन डेवरची बंधने वाढवावीत ? नरो वा कुंजरो वा करावे ? बंधने कमी करावीत ? जबाबदारी न्याय संस्थेच्या खांद्यावर ढकलावी ?
४) शिवसेना सरकार व्हॅलेंटाईन डे वर निर्बंध घालेल की भारतीय राज्यघटनेस जागून मोकळीक देईल आणि दिली तर किती ? म्हणजे महा विकास आघाडीतील समर्थकांनी आपापसात व्हॅलेंटाईन डेच्या प्रेममय शुभेच्छा दिल्या तर चालतील का ? कि व्हॅलेंटाईन डे टाळून केवळ इतर दिवशी तेवढ्याच द्याव्यात ?
५) राजीव गांधी आणि सोनीया गांधी व्हॅलेंटाईन डे साजरा करत असत का ? असतील तर कसा ?
६) राहुल गांधींना एका व्हॅलेंटाईन डेला ६८ वर्षीय महिलेने चुंबन भेट दिली अशी भेट इतर कोणी कोणी द्यावी अथवा देऊ नये ? खास करून त्यांच्या आझादी गँग महिलांची आणि केरळीय काँस्टीट्यूअन्सीची भूमिका काय असावी असे तुम्हाला वाटते ?
७) त्यांच्या नव्या पिढ्या म्हणजे राहुल गांधी सुप्रिया सुळे अजित पवार आदित्य ठाकरे यांच्या व्हॅलेंटाईन डे साजरा करु अथवा न करु देण्याच्या भुमिका १४ फेब्रुवारी २०२० साठी काय असतील म्हणजे येता व्हँलेंटाईन आठवडा त्यांनी आपापसात आणि बाहेर आणि त्यांच्या समर्थकांनी नेमका कसा साजरा करावा अथवा न करावा?
*आधी वर म्हटल्या प्रमाणे भाजपायींनी चर्चा हाणून पाडण्याची कृती टाळण्यासाठी आभार
* अनुषंगिका व्यतरीक्त चर्चा, व्याकरण शुद्धलेखनादी चर्चा आणि विषयांतरे व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी अनेक आभार
प्रतिक्रिया
29 Jan 2020 - 2:51 pm | कपिलमुनी
आत्याबाईंना मिशा असत्या तर ?
जर, तर, असते, शकते, वाटते ...यावर चर्चेचे काय फलित अपेक्षित आहे ?
29 Jan 2020 - 7:52 pm | माहितगार
मला मिपाकरांच्या तोंडात शब्द टाकता येत नाहीत, त्यामुळे इतर मिपाकरांना कोणते उत्तर आणि कोणते फलित सुयोग्य वाटेल हे मी कसे सांगावे ?
दुसरे केवळ पहिला प्रश्न आत्या बाईंना मिश्या असत्यातर असा जरासा असला तरी उत्तर देण्यास खरेच कठीण आहे की उत्तर देण्यास इकडे आड तिकडे विहीर म्हणून रस्त्याच्या कडेने पळून जाणे होत आहे ?
शिवसेनेचेच सरकार आणि येऊ घातलेले व्हॅलेंटाईन डे म्हणे हा खुद्द उद्धवजीं आणि हा व्हॅलेंटाईन डे अशी स्थिती आता महाविकास आघाडी त्यांचे समर्थक कोलांट उड्या मारतील, वरच्या प्रतिसादा प्रमाणे ये कांदा हमारा नही म्हणतील की व्हॅलेंटाईनडेचा सूर्य लपवतील ?
एनीवे इतर आझादी समर्थक चर्चेत सहभागी होण्यास लाजत असता आपण उत्तरे टाळली तरी किमान उपस्थिती लावली याबद्दल अनेक आभार.
29 Jan 2020 - 8:03 pm | माहितगार
* 'हे खुद्द उद्ध्ववजी' असा आदरार्थी बदल करावा हि नम्र विनंती.
* (वाचकांनी ' हे खुद्द उद्धवजीं आणि हा व्हॅलेंटाईन डे ' आधीच्या आत्या बाईला मिश्या असत्यातर शी असलेल्या काँटेक्स्ट मध्येच घ्यावे. उद्धवजींच्या विरुद्ध अथवा माझ्या सकारात्मक रचनात्मक चर्चा प्रतिसाद विषयी गैर अर्थ काढू नयेत ही आग्रहाची विनंती)
30 Jan 2020 - 1:57 am | कपिलमुनी
बातमी १
बातमी २
30 Jan 2020 - 7:42 am | माहितगार
अरे व्वा शिवसेनेच्या माघारीतील प्रगतीचे एक पाऊल आम्हाला ठाऊकच नव्हते पण शिवसेना लाजत लाजत एक एक पाऊल मागे जाते नरो वा कुंजरो वा करते तर ठिक पण उत्तरे टंकण्यात आझादी समर्थकांनी का लाजावे कारण वर इतर प्रश्नही शिल्लक आहेत. त्यांच्या पण उत्तरांची प्रतिक्षा आहे. खास करून प्रश्न क्रमांक २ आणि ६
30 Jan 2020 - 8:59 am | कपिलमुनी
आझादी समर्थकांनी का लाजावे ? --कोण ते ?
कारण वर इतर प्रश्नही शिल्लक आहेत. -- शोधले की सापडते
30 Jan 2020 - 11:38 am | माहितगार
प्रश्न विचारलेत उत्तर देऊन चर्चा होण्यासाठी, मी स्वतःच सापडून घेतले तर चर्चा आणि विवीध मतांचा उहापोह होणार नाही जो की धागा चर्चेचा उद्देश्य आहे.
आमची उत्तरे आम्हाला शोधून हवी तशीच लिहून घेण्यासाठीचा सल्ला आम्ही धागा लेखात मागितल्याचे दिसत नाही उलटपक्षी भाजपेतरांनी पेडगावला जाऊन लपवा लपवी न करता अथवा पळून न जाता पूर्ण उत्तरे व चर्चा करण्याची हिम्मत दाखवावी अजून तरी तशी हिम्मत कुणा भाजपेतराची होताना दिसत नाहीए.
30 Jan 2020 - 6:09 am | चौकस२१२
क्षमा करा माहितगार पण एक मूलभूत प्रश्न
आपल्याला कोणत्या वॅलेंटिने डे बद्दल चर्चा हवी आहे?
१) राजकीय प्रेमी नवयुगुलांचा ( शिव सेना + काँग्रेस )
कि
२) खऱ्या युगुलांनी साजरा करावं किंवा नाही असा आणि त्यावरील या अभाजपीय पुढाऱ्यांची काय प्रतिक्रिया असेल अशी ?
नक्की काय?
यातील १) अभिप्रेत असेल तर अहो सेनेनी आणि कांग्रेस ने साजरा केलाच पाहिजे .. नवा संसार , लग्न कार्याला गेले आणि ऐनवेळी नवरा/ नवरी ला झुगारून मांडवात दुसरा/ दुसरी शी जमवले असे हे युगुल तेव्हा दणक्यात साजरा करावा त्यांनी ! साजरा . नाहीतरी सेनेनी लाज सोडलीच आहे पूर्वीच ( अर्रर्र तुमचा नियम मोडला बहुतेक भाजपयं प्रतिक्रिया दिली ...)
यातील २) वर चर्चा अभिप्रेत असेल तर ... नको चावून चोथा विषय ... एकच टिप्पणी " पाश्चिमात्यांच्या अनेक सवयी किंवा प्रथा आहेत त्या घेतात भारतीय पण त्यांची शिस्त मात्र घेत नाहीत.." आणि दुसरे म्हणजे मग फादर दे कीवा मदर्स दे का नाही दिसत साजरा होताना ?
असो
30 Jan 2020 - 7:59 am | माहितगार
चौकस साहेब अल्पसंख्यांक महिलांना व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास मिळण्याच्या आझादीची चर्चा हा मुख्य रोख आहे , तुम्हा भाजपायींना अल्पसंख्य बहुसंख्य असा भेदभाव करता येत नाही -ज्यांना भेदभाव करता येतो त्यांना प्रश्न त्यांच्या पद्धतीने विचारणे गरजेचे असते- म्हणून हे प्रश्न भाजपायींच्या लक्षात येणार नाहीत म्हणून भाजपायींना चर्चे पासून दूर रहाण्यास सुचवले होते.
भाजपायींनी चर्चेत सहभागी व्हायचे असेल तर प्रश्न क्रमांक २ आणि ६ ची उत्तरे देण्यास भाजपा विरोधकांना विचारावीत. तसे ते करणार नाहीत कारण भाजपायींची नैतिकता आडवी येईल. बहुसंख्यांकांच्या महिलांसाठी व्हॅलेंटाईन डेच्या एकतर्फी आझादीची मागणी करताना भाजपेतरांची नैतिकता आडवी येत नाही पण भाजपायीची अल्पसंख्यांक महिलांच्या व्हॅलेंटाईन डे च्या आझादी साठी नैतिकता आडवी येईल. हे गणित भाजपायींच्या लक्षात आले असते तर काश!
30 Jan 2020 - 8:18 am | चौकस२१२
अल्पसंख्यांक महिलांना व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास मिळण्याच्या आझादीची चर्चा हा मुख्य रोख आहे
कोणीहि साजरा करावा पण तो आंधळे पणाने आणि खास करून उगाच मुलींशी लगट करत येईल म्हणून नको एवढेच म्हणेन यात भाजपचा काय संबंध !
६) काही कळला नाही क्रमांक ६ चा प्रश्न
तुम्हा भाजपायींना अल्पसंख्य बहुसंख्य असा भेदभाव करता येत नाही
काय? आणि याचं आपल्या मूळ प्रश्नाशी काय संबंध कोण जाणे
क्षमा करा मी कोणताच "कीय " नाही ... सिहासन चित्रपटातील मधील एक वाक्य आठवले.( कि पुलन्चे आहे आठवत नाही ) . काहीसे असे: ..: या सरकारला मी पाठिंबा देतो परंतु जर या सरकारने .... केली तर याचा विंदभवनासमोर त्याला मी जोड्याने maren... त्यामुळे बहजपिया वैगरे काही नाही .. जे दिसते पटते ते योग्य उद्या काँग्रेस नि जर देशासाठी चांगले केले तर ते चांगलेच... असो
30 Jan 2020 - 11:27 am | माहितगार
आपला आधीचा प्रतिसाद भाजपयी पद्धतीचा होत असल्याचे आपणच व्यक्त केलेत तसा मी प्रतिसादाचा रोख केला :) ते असो. बाकी राजकीय अथवा सामाजिक पातळीवरील आपल्या भूमिकेतील जोडे केवळ शाब्दीक असतील असे गृहीत धरतो.
आपल्या प्रतिसादात वाच्यार्थाने कायदा हातात घेणे आहे तसे आमच्या धागालेख अथवा प्रतिसादात वाच्यार्थ आणि लक्षार्थ दोन्हीने कायदा हातात घेणे नाही. आम्ही 'शुभेच्छा' ह्या शब्दातच इच्छा आणि त्यासाठीचे वर्तन शुभ आहे हे गृहीत धरलेले आहे. केवळ शुभेच्छेच्या गुलाबी रंगामुळे शुभेच्छे बद्दल पुर्वग्रह अथवा गैरसमज होण्याचे किंवा शुभेच्छा स्विकारण्याचे आणि देण्याचे स्वातंत्र्य आजकालच्या शब्दात आझादी बाधीत होऊ नये असा आमचा आपला दृष्तीकोण
(ज्यांचे वर्तन शुभ नाही म्हणजे कायदा आणि कंसेंटच्या नियमा बाहेर जाणारे आहे त्यांना कायद्या प्रमाणे तत्काळ दंडीत करण्यास हरकत नसावी हे वे सा न ल)
आमचा उद्देश्य आग्रह फतवा ग्रस्त महीलांना व्हॅलेंटाईनडेच्या 'शुभ इच्छा' देणे आणि घेणे आणि कायद्यानुसार किमान वय प्राप्त झाल्या नंतर स्वतःचा जोडीदार -अगदी मुर्ती पुजक असला तरीही- निवडण्याची भारतीय राज्यघटनेच्या नुसार आणि अखत्यारीत कायद्यांच्या मर्यादेत फतव्यांनी बळी न जाता आझादी असावी, राहुल गांधींच्या अल्पसंख्यांक महिला मतदारांनाही बहुसंख्यांक महिलांप्रमाणे राहुल गांधींना चुंबन देण्याची फतवा विरहीत आझादी का असू नये ? असा आहे आपले मत काय आहे?
इतर भाजपेतर वाचत असतील तर त्यांनी या विषयावर रस्त्याच्या कडेने न जाता मनमोकळेपणाने फतवा ग्रस्त स्त्रियांच्या गुलाबी शुभेच्छा आझादीचे समर्थन करणारी भूमिका का घेऊ नये ?