अपेक्षा.. मनाची एक विविध पैलु असणारी भावना.
हि अपेक्षा वेवेगळ्या प्रकारची असु शकते. उदा. पालकांची मुलांकडुन, नवर्याची बायकोकडुन, आपली कंपनी कडुन, कंपनीची आपल्याकडुन इत्यादी.
पण हि अपेक्षा पुर्ण न झाल्यास होणारे अपेक्षाभंगाचे दु़:ख हे कधी कधी अकल्पित बदल घडवणारे असु शकते.
प्रश्न असा कि आपण अपेक्षा ठेवाव्यात का ठेवु नयेत?
मन एकदा म्हणते कि अपेक्षा जरुर ठेवाव्यात कारण एकमेकाकडुन अपेक्षा ठेवल्यामुळेच आपल्यातील नाती, संबंध हळुवार गुंफले जातात.
पण एका बाजुने असा विचार येतो कि अपेक्षा ठेवल्याने माणुस त्या विषयी आसक्त होतो व त्या अपेक्षा पुर्ण न झाल्याने तो कधी कधी या समाजापासुन विरक्त होऊ शकतो.
आपल्याला काय वाटते?
यावर अभिप्राय येतील अशी अपेक्षा मात्र मि बाळगुन आहे. 8}
प्रतिक्रिया
13 Nov 2008 - 3:00 pm | योगी९००
या ले़खात आपले अनुभव असावेत असे वाटले.
अपेक्षा ठेवून हा लेख उघडला आणि जास्त काही वाचायला न मिळाल्याने अपेक्षाभंगच झाला.
खादाडमाऊ
13 Nov 2008 - 3:47 pm | मिसंदीप
तुमचे म्हणणे बर्यापैकी खरे आहे. तसे म्हणाल तर मला बरेच लिहायचे होते, पण परत एवढे लिहुन प्रतिक्रियेची अपेक्षा बाळगायची आणि अपेक्षाभंगाचे दु:ख पदरात घ्यायचे .
13 Nov 2008 - 4:55 pm | लिखाळ
पण एका बाजुने असा विचार येतो कि अपेक्षा ठेवल्याने माणुस त्या विषयी आसक्त होतो व त्या अपेक्षा पुर्ण न झाल्याने तो कधी कधी या समाजापासुन विरक्त होऊ शकतो.
आपल्याला काय वाटते?
बरोबर आहे. मला ही तसेच वाटते. पण अशी विरक्तीसुद्धा फार काळ टिकते असे नाही, कारण अश्या विरक्तीमध्ये 'कटकटी मासून मुक्ती', ज्या व्यक्तिकडून अपेक्षा भंग झाला आहे तिच्या मध्ये सुधारणा होईल अशी आशा, असे बरेच काही असते.
सगोसोयरे ते
कवी दत्ता पाटील काय म्हणतात पाहा,
आप्तइष्ट सारे सगेसोयरे ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ
मनशांत होता पुन्हा लागे ओढ
दत्ता मांडी गोड संसाराचा थाट
-- (संसाराचा थाट लक्षपूर्वक अभ्यासणारा) लिखाळ.
13 Nov 2008 - 10:17 pm | भास्कर केन्डे
प्रश्न असा कि आपण अपेक्षा ठेवाव्यात का ठेवु नयेत?
यावर स्वां. सावरकर म्हणतात - अपेक्षित यशाच्या आनंदापेक्षा अनपेक्षित अपयशाचे दु:ख मोठे असते.... तेव्हा प्रयत्नात कसलीही कसर सोडू नये. यश मिळेलच अशी अशा न धरता आपले कर्तव्य करत रहावे. यश मिळाले तर अपेक्षाभंग होऊनही आपण आनंदी झालेले आसाल.
(मूळ वाक्ये वाचून बरीच वर्षे झाली असल्यामुळे शब्द रचनेत बदल झाला असल्याची शक्यता आहे. चु. भू. द्या. घ्या.)
आपला,
(अपेक्षेविना कर्म करणारा) भास्कर
आम्ही येथे वसतो.
13 Nov 2008 - 11:06 pm | भाषांतरकार
जीवनाकडून अपेक्षा ठेवल्याखेरीज जगण्यामधे आनंद नाही.
परंतु; जीवनाकडून अवास्तव अपेक्षा ठेवून होणारी ससेहोलपट देखील कामाची नाही.
हा एक दृष्टिकोन झाला प्रवृत्तिपर सांसारिक लोकांसाठी
दुसर्या निवृतिपर दृष्टिकोनातून ह्याच्याकडे पाहिले तर असेही म्हणता येईल की जर अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर अपेक्षाभंगाचे दु:ख कोठून येणार ?
ज्ञानी सज्जनांनी कृपया आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवाव्यात.
भाषांतर अनुदिनी संचालक :
http://freetranslationblog.blogspot.com
14 Nov 2008 - 9:44 am | विसोबा खेचर
प्रश्न असा कि आपण अपेक्षा ठेवाव्यात का ठेवु नयेत?
माझ्या मते ठेवू नयेत.. कारण त्या पूर्ण नाही झाल्या तर काही वेळेला फुक्कटचा तर्रास होतो! :)
तात्या.
14 Nov 2008 - 10:33 am | अंतु बर्वा
अपेक्षित अपेक्षांचा अपेक्षाभंग होउ नये हीच एक अपेक्षा..........
14 Nov 2008 - 10:52 am | टारझन