कूर्ग डायरीज २

Primary tabs

अभिरुप's picture
अभिरुप in भटकंती
7 Jan 2020 - 8:22 am

पूर्वतयारी

हॉटेल बुकिंग आणि विमान तिकिटांचे आरक्षण अगोदरच झाल्यामुळे जीव तसा निर्धास्तच होता. तत्पूर्वी कूर्ग बद्दल खूप जणांकडून माहिती घेतली होती. आंतरजालावरून सुद्धा खूप माहिती मिळाली. कूर्ग हे मुळात एक थंड हवेचे ठिकाण , अगदी आपल्या महाबळेश्वर प्रमाणे . पण कूर्ग मध्ये महाबळेश्वर सारखी स्ट्रॉबेरी नाही पिकत बरं का. तिथले मुख्य आकर्षण म्हणजे कॉफिचे मळे . कूर्गचा बहुसंख्य भाग हा कॉफी आणि मिरी किंवा वेलची अश्या मसाल्याच्या पिकांनी व्यापलेला आहे.

कूर्गची कॉफि जशी प्रसिद्ध तसेच तिथले संत्र सुद्धा प्रसिद्ध आहे. आपल्या नागपूरच्या संत्र्यापेक्षा आकाराने लहान असलेले हे कूर्गचे संत्र चवीला सुद्धा थोडे आंबटच असते. मीठासोबत या संत्र्याची चव भलतीच खुलते. कूर्गची वेलची आणि मिरीसुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे.

मुळात कूर्ग हा कर्नाटकातील एक महत्वाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात कोडुगु आणि मदिक्केरी हि दोन ठिकाणे थंड हवेची ठिकाणे म्हणून प्रसिद्ध आहेत. पर्यटनाबरोबरच कॉफी आणि मसाले यांचा व्यापार हा इथला उत्पन्नाचा मुख्य स्रोत. कॉफीचे विस्तीर्ण मळे हे बड्या धेंडांच्या मालकीचेच आहेत. यात बरेचसे उद्योजकहि आहेत. कॉफी आणि मिरीचा मुख्य मोसम हा डिसेम्बर आणि जानेवारीचाच. या मोसमात कॉफीचे फळ धरते आणि पिकते सुद्धा. मी खरेच खूप नशीबवान कारण मला ह्या कॉफी बेरीज पाहायला मिळाल्या. कॉफीचे पीक हे माझ्या माहितीप्रमाणे वर्षातून एकदाच घेतले जाते. त्यामुळे आम्ही सर्व खूप नशीबवान ठरलो. मिरीच्या वेलींना सुद्धा फळ धरले होते. त्यामुळे हा अनुभव आमच्यासाठी खूपच खास ठरला. कॉफीच्या विस्तीर्ण मळ्यांमध्ये सुपारीची आणि सिल्व्हर ओक ची उंचच्या उंच झाडे आणि त्यांना लपेटलेल्या मिरीच्या वेली हे दृष्य खूपच विहंगम होते हे निश्चित.

अश्या या निसर्गरम्य कूर्ग मध्ये आम्ही आमचे ४ दिवस व्यतीत करणार आहोत ह्या कल्पनेनेच मनात आनंदाचे तुषार उसळले आणि आम्ही आमच्या प्रवासाची तयारी पूर्ण केली. माझ्या दोन्ही कन्या खूपच खुशीत होत्या कारण त्यांचा पहिलावहिला विमान प्रवास होणार होता. माझी आई सुध्दा या निमित्ताने पहिल्यांदाच विमानात बसणार होती म्हणून तिचे मनसुद्धा खूप खुश होते.

शेवटी कूर्गला प्रस्थान करण्याची सर्व तयारी झाली आणि तो दिवस जवळ येऊन पोहोचला ज्याची आम्ही जवळपास महिनाभर वाट पाहत होतो. २७ डिसेम्बर २०१९......

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

7 Jan 2020 - 10:57 am | श्वेता२४

पुढील भाग थोडे विस्तृत आणि सचित्र आले तर वाचायला अधिक मजा येईल.

अभिरुप's picture

7 Jan 2020 - 2:26 pm | अभिरुप

प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद

चौथा कोनाडा's picture

7 Jan 2020 - 11:17 am | चौथा कोनाडा

कुर्ग खुपच आल्हाददायक आहे ! तळकावेरीचे मन्दिर आणि निसर्ग अपर्तिम ! तिथली शीत हवा म्हणजे स्वर्गाचा अनुभव जणु !

तुम्ही होमस्टे मध्ये रहिला होतात का ? आम्ही ऐन ३१ डिसेंबरच्या सुमारास तिथे गेल्यामुळे होमस्टे फुल्ल होते, हॉटेलमध्ये रहावे लागले.
कॉफीच्या मळ्यात होमस्टे मध्ये राहणे सुंदर अनुभव असतो.

होमस्टे सारखेच रिसॉर्ट होते. मलाही होमस्टे आवडले असते पण माझ्या मुलींना रुममध्ये बाथटब हवा होता जो या रिसॉर्ट्मध्ये होता.

तुम्ही आता गेला होतात का?

चौथा कोनाडा's picture

7 Jan 2020 - 3:54 pm | चौथा कोनाडा

आम्ही दोन वर्षांपूर्वी गेलो होतो.
(मला वाटतं काही लक्सयुरियास होम स्टेजना बाथटब पण असतो, पुढच्या वेळी प्लॅन करता येईल)

हो खरे आहे

कूर्गला आम्हीही होतो. ३० डिसेम्बर ते २ जानेवारी. क्वेटो होमस्टे .होमस्टे खुपच छान होते

चहा आवडत असला तरी चहाचे मळे करण्यासाठी झाडे काढून टाकावी लागतात. कॉफीची झाडे मात्र इतर झाडांबरोबरच वाढतात. मिरीसुद्धा उनसावलीतच वाढते.
कोकणात कॉफी ,मिरी का वाढवत नाहीत कळत नाही.
कोडगूला एकदा जायचं आहे.

मकरंद घोडके's picture

9 Jan 2020 - 12:48 pm | मकरंद घोडके

वाचत आहे