हिएन्ना - म्युनिक - ऍमस्टर्डम फिरती मदत !!

नजदीककुमार जवळकर's picture
नजदीककुमार जवळकर in भटकंती
24 Dec 2019 - 4:29 pm

नमस्कार मित्रांनो - मदत हवी आहे !! जानेवारी 10-18 युरोपात दौरा आहे. जानेवारी 12-15 ऑफिसचा event म्युनिक मध्ये.

मी आणि माझा मित्र दोघे सोबत आहोत. दोघेही शाकाहारी.
कृपया राहण्यासाठी/खाण्यासाठी स्वस्त-मस्त जागा आणि फिरण्याची ठिकाणं कळवा. रूपरेषा खालील प्रमाणे
10 मुंबईहुन ऍमस्टर्डम
11 जानेवारी - ऍमस्टर्डम फिरू शकतो
12 -15 म्युनिक मध्ये ऑफिसचा event
15 ला म्युनिकहुन व्हिएन्नाला येणार. बस कि ट्रेन कळवा ?
16 आणि 17 जानेवारीला व्हिएन्ना फिरू शकतो.

धन्यवाद !!

प्रतिक्रिया

म्युनिक वरून व्हिएन्ना ला डायरेकट्ट न जाता, साल्झबर्ग ला थांबा घ्या, मग वायेंन ला जा. रेल्वेप्रवास उत्तम, टबाक स्टोर्स (तिथले बिडी काडीची दुकानं)मधेही तिकिटे विकत घेऊ शकता

नजदीककुमार जवळकर's picture

26 Dec 2019 - 3:51 pm | नजदीककुमार जवळकर

धन्यवाद

मुक्त विहारि's picture

25 Dec 2019 - 11:20 am | मुक्त विहारि

Calling सुहास म्हात्रे.

म्युनिकहून प्रागला जा. वाटेत चेस्की क्रुमलोव हे अद्वितीय गाव अवश्य पहा. सुंदर आठवण राहील नेहमीसाठी. आधी अमस्टरडॅम बघूनच येत आहात तर प्रागने आणखी एक "लिबरल" कल्चर शहर होईल व्हिजिटून.

व्हिएन्नाला जायलाच हवंय का? की परतीची / पुढची फ्लाईट म्हणून? शक्य असेल तर साल्झबर्ग बसवा. वरती फनीक्युलर घेऊन कॅसलला जाणं चुकवू नका. तिथे वरती तटावरच्या रेस्टॉरंटमध्ये लंचची वेळ साधा.

नजदीककुमार जवळकर's picture

26 Dec 2019 - 3:54 pm | नजदीककुमार जवळकर

धन्यवाद!! परतीचा प्रवास व्हिएन्ना-पॅरिस-मुंबई असा आहे. पण आपण सांगितल्याप्रमाणे कसे जमू शकेल ते बघावे लागेल ..

शा वि कु's picture

26 Dec 2019 - 12:43 pm | शा वि कु

शुभेच्छा

नजदीककुमार जवळकर's picture

26 Dec 2019 - 3:55 pm | नजदीककुमार जवळकर

धन्यवाद!

स्मिता दत्ता's picture

27 Dec 2019 - 10:13 am | स्मिता दत्ता

व्हिएन्ना अतिशय सुंदर आहे. २ दिवस तिथेच लागतील फिरायला. रिंग स्ट्राझ्झ ला एक दिवस आणि स्कॉनब्रून पॅलेस व तिथले झू पण पाहू शकता. डेन्युब टॉवरला जाऊन शहराचा नजारा पाहू शकता. बाकी वेळ असेल तर साल्झबर्ग पाहायलाच हवं.