हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर

विनोदपुनेकर's picture
विनोदपुनेकर in काथ्याकूट
6 Dec 2019 - 12:30 pm
गाभा: 

हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर

डॉ. प्रियांका रेड्डी या एका भगिनींवर पाशवी बलात्कार झाला नंतर स्वाभाविक आणि नेहेमी प्रमाणे जनमाणसातून त्या चार नराधमांना भर चौकात फाशी ते अजून बाकी देशातील बलात्कार प्रकरणातील शिक्षेचे दाखले देत त्यांना कठोर शिक्षा (खरे तर मरण) द्यावी हि सगळ्या भारतीयांची अपेक्षा ते हि लवकरात लवकर हि अपेक्ष होती कारण दिल्ली तील निर्भया बलात्कार आरोपी आजपर्यंत कोर्ट कचेरी त्यांचा जगण्याचा अधिकार आदी कारणांनी जिवंत आहे त्यात त्या निर्भयाची आई कोर्ट कचेरीत अजूनही तिला न्याय मिळावा म्हणून कोर्टात फेऱ्या मारत आहे.

त्यात आज पोलीस कोठडी संपत असताना सादर चारही आरोपी पहाटे तीन वाजता जिथे पाशवी बलात्कार करून निर्घृण हत्या केली गेली त्या ठिकाणी आरोपीना घेऊन गेले असता त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला स्वाभाविक सर्वसामन्य जनतेने याचे स्वागत केले इतके कि सादर घटना स्थळी पोलिसावर फुलवर्षाव व फटके फोडून स्वागत केले गेले पण नेहमीप्रमाणी श्रीमती मनेका गांधी, अरविंद केजरीवाल आदिनीं सादर इनकॉउंटर विरोधात आवाज उठवत आरोप चालू केले आहेत माझे म्हणणे इतकेच आहे कि हे दुष्कर्म त्या चौघांनी केले असणारच इतकी खात्री आल्याशिवाय त्यांना यमसदनी पोलीस पाठवनार नाहीत खरे तर झाले तर खूप अभिनंदनीय आहे ...... हॅट्स ऑफ हेंद्राबाद पोलीस .

प्रतिक्रिया

मला एकंदरीतच हा एन्काऊंटर प्रकार फारसा आवडलेला नाही.
वेळ मिळाला तर सविस्तर लिहीन.
बघू

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Dec 2019 - 9:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही अशा प्रकारे पहाटे तीन वाजता आरोपिंना नेऊन ते पळून जात होते असे म्हणून त्यांना ठोकणे आवडलं नाही

हैदराबादेतील त्या डॉक्टर युवतीशी आरोपीनी जे कृत्य केलं ते माणुसकीला काळीमा फासणारे होते, अतिशय वेदनादायक ती घटना होती, चीड़ आनणारे असेच होते. समस्त भारतीयांच्या मनात आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी असे वाटत होते. काही देशांमधे अशा घटनांचे आरोपी निश्चित झाल्यावर, आरोपींना जाहीर गोळ्या घातल्या जातात किंवा अन्य क्रूर शिक्षा दिली जाते तशीच शिक्षा याही प्रकरणात द्यावी असे अनेकांना वाटत होते. आज तसेच घडले आहे.

अर्थात आता या विषयी न्यायिक चौकशी होईल, व्हायला पाहिजे. पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्न उठतील. उठले पाहिजे. न्यायव्यवस्थेवर असलेल्या देशात असे घडावे का ? हे अतिशय वाईट आहे. आज अनेकांना चांगले वाटले असेल आरोपींना ठोकले म्हणून. पण पोलिसांनी येत्या काळात जर काही हिशेब पूर्ण करायचे म्हणून कोना निरपराधला ठोकलं तर मग पोलिसांच्या नावाने बोंब मारू नका.

आपल्याकडे न्यायपालिका आहे,एक व्यवस्था आहे तिचा आदर झाला पाहिजे, काही बदल आवश्यक आहेत, पण पोलिसांच्या कृत्याचं मी समर्थन करणार नाही. न्यायपालिकेत निवाङा होऊन त्यांना फाशीचा निकाल मला बघायला आवडला असता.

विलंब करणारी न्यायव्यवस्था आणि आजची पोलिसांची भूमिका भविष्यात मोठे वाद करणार हे निश्चित.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 1:16 pm | मुक्त विहारि

मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली पाहिजे.

कुणी तक्रार करो ना करो.

मी पाचवीत असतांना, सार्वजनिक गणेशोत्सवात मिळालेला पुरस्कार , डब्यात चेंडू टाका, ह्या स्पर्धेत, परत करायच्या विचारात आहे.

पण 2 गोष्टी अडल्या आहेत.

1. पुरस्कार कुठे परत करायचा?

2. नक्की मला पुरस्कार म्हणून काय मिळाले होते ते आठवत नाही. बहुतेक "शामची आई" असेल. त्याकाळी हीच प्रथा होती.

मी पाचवीत असतांना, सार्वजनिक गणेशोत्सवात मिळालेला पुरस्कार , डब्यात चेंडू टाका, ह्या स्पर्धेत, परत करायच्या विचारात आहे.

???

जॉनविक्क's picture

7 Dec 2019 - 7:38 pm | जॉनविक्क

दया माझ्याकडेच बिनधास्त ;)

जर खरच ते चौघे पळून जाते होते आणि स्वरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या चालवल्या असतील तर ठिक आहे.....
पण जसं सगळ्यांना वाटतय तसा जर हा इंस्टंट न्याय असेल तर अशा एनकाऊंटरच समर्थन होऊ शकत नाही. अशा एनकाऊंटर चं समर्थन हे आपली न्यायव्यवस्था कमकुवत असल्याचं समर्थन आहे. न्यायालयाने दिलेली फाशीची/ जन्मठेपेची शिक्षा हा न्याय आहे. एनकाऊंटर करुन न्याय देण्याची वेळ आपल्या देशावर येऊ नये हिच अपेक्षा. पोलिसांना मदतच करायची होती तर तपास जलद गतीने करुन योग्य ते पुरावे न्यायालयासमोर सादर करायला पाहिजे होते.

स्वधर्म's picture

6 Dec 2019 - 1:56 pm | स्वधर्म

हा प्रकार सरळ वाटत नाही. पोलिस बंदोबस्तात नेलेले आरोपी, फार तर पळून जाण्याचा प्रयत्न करतील, पण ते पोलिसांच्या जीवाला कसला धोका निर्माण करू शकतील असे वाटत नाही. तसेच पहाटे चार वाजताची वेळही संशयास्पद आहे. खरोखर न्यायसंस्थेला आपल्या गतीबाबत तातडीने काहीतरी केले पाहिजे.

स्वधर्म आणि सालदार यांच्याशी सहमत,

त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे याबाबत दुमत नाहीच पण तात्पुरत्या उन्मादातून सगळीकडे जर हा प्रकार रूढ झाला तर मात्र अवघड होऊन बसेल. (या वरून गंगाजल चित्रपट आठवला)

हस्तर's picture

6 Dec 2019 - 2:14 pm | हस्तर

खाकी

अधर्म's picture

7 Dec 2019 - 2:29 am | अधर्म

हे बाकी खर आहे. तो वसुली बाहेरून ऍसिड आणून (आख दिखाता हे मा...... असं काहीस म्हणून ) घालतो डोळ्यात....

यशोधरा's picture

6 Dec 2019 - 2:13 pm | यशोधरा

पोलीस सांगतच आहेत ना, की आरोपी पळून जात होते म्हणून. पोलीस खरे सांगतच नाहीयेत असे का मानायचे?

निर्भया, उनाव, आसाराम, सेनगर, कठुआ - न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊन ह्यातील कोणत्या पीडिता महिला, मुलींना न्याय मिळाला? निर्भया मेली, तिचे आई वडील रोज मानसिक मरणे मरत असतील, आरोपी जगताहेत ना? अजून काही प्रकरणे इतक्यातच वर्तमानपत्रातून आली होती. अशी कृत्ये करणाऱयांना कायद्याची भीती राहिलेलीच नाहीये, हा मूळ मुद्दा आहे. आधी अशी व्यवस्था पैदा करा की अशा घटनाच घडणार नाही आणि मग theoretical - असं व्हायला हवं आणि तसं व्हायला हवं, आरोपीचे हक्क वगैरे गप्पा मारा. ( जनरल लिहीत आहे, तुम्हांला उद्देशून नव्हे)

जबरदस्त जरब, वचक बसवायची गरज आहे.

आरोप सिद्ध होने महत्वचे

यशोधरा's picture

6 Dec 2019 - 2:44 pm | यशोधरा

नाही कोण म्हणतंय? पण पळून जाण्यात यशस्वी झाले असते तर पोलिसांना त्याही बाजूने बोल लावला असतात ना?

जॉनविक्क's picture

6 Dec 2019 - 3:33 pm | जॉनविक्क

आणी दहशतवादी सोडून अन्य कोणीही पोलिसांच्या तावडीतून पळून जात असता सगळे च्या सगळे फक्त मारलेच जाण्याची किती विदा उपलब्ध आहे ?

बाकी जे बेकायेशीररित्या मारले म्हणून आरडाओरड करत आहेत त्यांची गरज असे आरोपी मारण्या इतकीच महत्त्वपूर्ण असल्याने त्याचा विरोधही चूकच

डँबिस००७'s picture

7 Dec 2019 - 8:27 pm | डँबिस००७

>>>>>>>पोलिसांना मदतच करायची होती तर तपास जलद गतीने करुन योग्य ते पुरावे न्यायालयासमोर सादर करायला पाहिजे होते. <<<<<<<<<
न्यायालयावर डोळे बंद करुन विश्वास ठेवावा ईतकी लायकी भारतीय न्यायालय व्यवस्थेची नाही आहे. लोअर कोर्टापासुन सुप्रिम कोर्टा पर्यंतच्या न्यायाधीशांनी कबुल केलेल आहे की सोशल मिडीयाचा खुप दबाव त्यांच्यावर असतो.
हल्लीच पाहाण्यात आलेल्या एका केस मध्ये पोलिसानी आपले काम चोख बजावत लहान मुलींना शिकार बनवणार्या आरोपीला पकडले व त्यावर वाँटर टाईट केस बनवली. एका शेतमजुर असलेल्या लहान मुलीचा बलात्कार करुन खुन केलेला होता त्याने. पण कोर्टाला आरौपीवर दया आली. मग काय आरोपी बेल वर सुटला आणी मोकाट सुटलेल्या ह्या आरोपीने तिन अजुन जीव घेतले. आता कोर्ट मान्य करणार नाही की कोर्टाकडुन चुक झालेली आहे. ना कोणी कोर्टाला जाब विचारायची हिंम्मत करेल!
म प्र मध्ये २०१७ मध्ये एक ९ वर्षाची मुलगी बेपत्ता होते. शाळेतुन घरी येणारी मुलगी शाळेकडुन विलासपुरला जाणारी २.०० ची दुपारची बस चुकली म्हणुन चालत निघते पण घरी पोहोचत नाही. पोलिस चौकशी अंती फाईल बंद होते. २०१८ वर्षाखेर व २०१९ मार्चला अजुन दोन लहान मुली तश्याच नाहीश्या होतात. आता मात्र पोलिस कसुन तपासणी करतात. त्यांना सापडतो एक गुन्हेगार ज्याने २०१७ लाच एका दुसर्या गावातल्या शेत कामगार लहान मुलीला बलात्कार करुन ठार मारलेल होत. गुन्हा दाखल झालेला पण कोर्टानेच बेल दिली. बेल दिल्यावर ह्या आरोपीने अजुन तिन मुलींचा बलात्कार करुन निघ्रुण खुन केला !!

न्यायालयाच्या लायकिबद्दल तुमच्याशी १००% सहमत आहे. पण आधीची न्यायव्यवस्था एवढी गचाळ असताना आणखी एक समांतर न्यायव्यवस्था आपण बनविण्यास प्रोत्साहन तर देत नाही आहोत हे तपासणे गरजेचे आहे. पोलिसांच्या हातात न्यायाचे कोलित देणे खुप महागात पडेल असे वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2019 - 2:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

न्यायव्यवस्था एवढी गचाळ असताना आणखी एक समांतर न्यायव्यवस्था आपण बनविण्यास प्रोत्साहन तर देत नाही आहोत हे तपासणे गरजेचे आहे. पोलिसांच्या हातात न्यायाचे कोलित देणे खुप महागात पडेल असे वाटते

सहमत.

-दिलीप बिरुटे

अपरात्री तिथे ते का गेले? याला एक उत्तर ऐकलं ते असं की क्राईम सीन रि-क्रिएट करताना टाईमलाईनही पाळतात. म्हणजे त्या त्या वेळी त्या त्या ठिकाणी घेऊन जाणे आणि मूळ गुन्हा कसा घडला ते दृश्य समजून घेणे. यामागे बहुधा दिवसाच्या / रात्रीच्या ज्या वेळी गुन्हा घडला त्या वेळची त्या ठिकाणी असलेली स्थिती (अंधार, प्रकाश, गर्दी इ) याचा अंदाज यावा म्हणून असू शकेल.

प्रतिहल्ला केला तरच गोळ्या घालणे हे तत्व पाळल्यास ते नुसते (इजा न करता) पळून गेले असते तर कसं थांबवता आलं असतं? ते तसे पळून गेलेले योग्य ठरलं असतं का? तेव्हा लोकांनी पोलिसांवर टीका जास्तच तीव्र केली असती.

अर्थातच यातून एन्काऊंटर ही एक स्टँडर्ड प्रोसेस म्हणून योग्य ठरत नाहीच.

फक्त काही मुद्दे (त्यांनी हल्ला केला असता तरच गोळ्या घालणे, आणि मध्यरात्रीच तिकडे का गेले इतक्यापुरता मर्यादित मुद्दा)

मित्रहो's picture

6 Dec 2019 - 11:39 pm | मित्रहो

पोलीस ठाण्याबाहेर सतत इतकी गर्दी होती कि त्यांना दुपारी बाहेर आणणे शक्यच नव्हते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Dec 2019 - 9:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एन्काऊंटर ही एक स्टँडर्ड प्रोसेस म्हणून योग्य ठरत नाहीच.

सहमत.विषयच संपला.

-दिलीप बिरुटे

म्हणून हो. मारले गेले, मस्तच झाले, मारणे योग्य होते की न्हवते ते न्यायालय ठरवेल तत्पूर्वीच त्यांना दोषी अथवा निर्दोष ठरवणे घटनाबाह्य ठरते.

शा वि कु's picture

8 Dec 2019 - 8:57 pm | शा वि कु

+1

शा वि कु's picture

8 Dec 2019 - 9:08 pm | शा वि कु

+1

लोकांना इतका विचार करायची सवय लागलीय की, जी पिडीत आहे तीच्या हक्कांची किती सहज पायमल्ली झाली आहे तिच्याबरोबर च्या कुटुंबियांच्या सामान्य जीवनाची पायमल्ली झाली आहे, याचा कुणीच का विचार करत नाही. केवळ व्यवस्थेत असे काही करणे बसत नाही म्हणून ज्या पद्धतीने पिडीतेला न्याय मिळालेला आहे त्यावर आक्षेप घेणार्यांना मुळात ही व्यवस्था व मिळणारी शिक्षा हीच अपूर्ण व सदोष वाटत नाही का? ज्या पद्धतीने सामान्य माणसांकडून आज या एन्काऊंटरला समर्थन मिळतेय ते पाहून तरी डोळे बंद केलेल्या न्याय व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडावे. ती पिडीता नराधमांचे पाशवी अत्याचार सहन करत गुदमरून मेली. अस्तित्वात असलेल्या न्यायाप्रमाणे याही आरोपींना फाशी मिळाली असतीही. पण पिडीतेला कणाकणाने मरताना झालेल्या यातनांची भरपाई खटक्यात मिळणार्या फाशी ने कशी भरुन निघणार? दिल्लीच्या निर्भयाला तर अजुनही न्याय मिळालेला नाही. शिवाय एक आरोपी तर कमी वयाचा फायदा घेऊन सुटला ही.असली तकलादू न्याय व्यवस्था आहे. माझे तर एन्काऊंटरनेही समाधान झालेले नाही. फटक्यात मेले सगळे. बलात्कार प्रकरणात न्याय व्यवस्था ही पिडीतेच्या बाजूने काही आश्वासक पाऊल उचलू शकली तर भविष्यात पोलिसही असली पावले उचलणार नाहीत. तसंही आत्ता पोलिसांनी मुद्दाम केलंय की नाही माहित नाही पण जरी केलं असेल तरी मी म्हणेन भले शाब्बास!

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 4:30 pm | मुक्त विहारि

सहमत आहे.

विनोदपुनेकर's picture

6 Dec 2019 - 5:17 pm | विनोदपुनेकर

सहमत

हा जर डोमेस्टिक सर्जिकल स्ट्राईक मानला ....
तर ह्याचे श्रेय हायद्राबाद पोलिसांना की मुख्यमंत्री केसीआर ला ?

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 4:32 pm | मुक्त विहारि

काळ्या रंगाच्या कोंबडीने दिले आहे की रंगीबेरंगी कोंबडीने?

हे विचारत बसू नये. ...

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 4:32 pm | मुक्त विहारि

काळ्या रंगाच्या कोंबडीने दिले आहे की रंगीबेरंगी कोंबडीने?

हे विचारत बसू नये. ...

नै ओ, ५६ इंची छाती बडवणारी जमात व त्याचे चाहते,
त्यांच्या पक्षाच्या मु मं च्या राज्यात असं काही झालं असतं, तर
गजर गाड्याचा करत असते..

विनोदपुनेकर's picture

6 Dec 2019 - 5:42 pm | विनोदपुनेकर

पोलिसांना राजकीय पाठबळ असल्याशिवाय इतक्या हाय प्रोफिल केस चे आरोपी असे इनकॉउंटर करणे खरेच शक्य आहे ?

मग् उत्तर प्रदेशातील उंनाव घटने नंतर,
तिथले मुख्यमंत्री काय धोरण घेतील ?

तिथले पोलीस दल सध्या, हाताच्या पंज्याची , (तर्जनी व मधल्या बोटांची नलकांडी) पिस्तुल करून , तोंडाने
धांय धांय, आवाज काढून एन्काऊंट करत आहेत (प्रत्यक्ष शस्त्रे दारुगोळा नसल्याने)

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 6:00 pm | मुक्त विहारि

आमच्या ओळखीच्या "चंपाबाई" पण असाच द्वेष करायच्या.

मोदी इथेच राहिल्या पण चंपाबाईला मात्र नारळ मिळाला.

त्या सध्या कोथरूडच्या लोकप्रतिनिधी आहेत.

आमच्या मिपावरील "चंपाबाई" उद्दाम, सचिन, पोटे ह्यांच्या बरोबर लावता झाल्या.

नाही हो आजीबाई, मला अजिबात दुःख झाले नाही व त्या मतदार संघात माझे मतदान नाही.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 9:28 pm | मुक्त विहारि

ताकाला जाऊन भांडे लपवायची, तुमच्या सारखीच चंपाबाईला पण खोड होतीच.

आणि त्या पण तुमच्या सारख्याच आमच्या वर खूप प्रेम करायच्या. गेल्या बिचार्‍या.....

अर्थात मोदी द्वेष तुमच्या इतका अंगात भिनला असेल, असे वाटले नव्हते. तब्येतीची जरा काळजी घ्या.

बायदवे, उद्दाम सचिन पोटे, कधी भेटले तर आमचा नमस्कार नक्की सांगा.

मुविआजीबाई, औषधे घेत जा वेळच्यावेळी.
तुझा स्किझोफ्रेनिया कंट्रोलमध्ये राहील मग.

करण्याचा, तुमचा हातखंडा आहे.

बादवे, उद्दाम सचिन पोटे, कुठे गेले?

ते तुम्हाला माहिती आजी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Dec 2019 - 10:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुख्यमंत्र्याचं कौतुक होऊन त्यांचे सीट्स भविष्यात वाढतील असे वाटते. नाय झालं तर झाल्या घटनेचा फायदा काही झाला नाही असे म्हणावे लागेल. किमान अजुन काही ठोकठाक व्हायला पाहिजे असे वाटते.

-दिलीप बिरुटे

आनन्दा's picture

6 Dec 2019 - 5:07 pm | आनन्दा

Ok..
प्रश्न ते लोक मेल्याचा नाही, प्रश्न मानावाधिकारांचा पण नाही. ते लोक तसेही मरणारच होते, आज नाही तर दोन वर्षांनी. पण आजच त्यांना मरावं लागेल असे काय त्यांना माहीत होतं हा प्रश्न आहे.

साधारण सोशल मीडिया वरती प्रतिक्रिया पहिल्या तर हे सहज समजेल की ती एन्काऊंटर फेक होती याबद्दल समर्थन करणाऱ्या एकाच्याही मनात शंका नाही.
प्रश्न हा आहे की आपण केवळ ते मेले, त्यांना शिक्षा मिळाली म्हणून आनंद व्यक्त करून शांत बसायचे का?

ती गोरक्षक होती वगैरे खूप पुढचे मुद्दे आहेत, ती गोरक्षक होती हे ऐकायच्या खूप अगोदर, जेव्हा मी ही बातमी ऐकली तेव्हाच यात काहीतरी काळेबेरे आहे याबद्दल माझ्या मनात खात्री होती. का?

१. पोलीस रोज असे अनेक गुन्हे बघतात, त्यामुळे त्यांनी राग येऊन असे कृत्य केले असे होणे अशक्य आहे.
२. अन्य कोणत्याही बाबींपेक्षा पोलीस आपल्या नोकरीची अधिक काळजी करतो, जनता जनार्दन सेवा वगैरे नंतर, पहिली नोकरी, बढती वगैरे, म्हणजेच इथे, ज्या वेळेस सगळ्या जगाला ही फेक एन्काऊंटर आहे हे कळणारे, तिथे पोलीस असा हात घालणे अशक्य.
३. याचाच अर्थ असा होतो की कोणीतरी वरच्या माणसाने दबाव / प्रोत्साहन देऊन जबाबदारी घेण्याची हमी दिल्याशिवाय हे कृत्य होणार नाही.

आता प्रश्न असा आहे, की हा वरचा माणूस कोण असेल, आणि त्याने हे पाऊल का उचलले असेल?
हे दोन प्रश्न मला सकाळपासून छळतायत. मानवाधिकार वगैरे गेले चुलीत, पण या प्रकरणात या लोकांचा बळी देऊन कोणाला वाचवायचा तर प्रयत्न होत नाहीये ना?

ती गोरक्षक होती का हे मला माहीत नाही, असेल तर कदाचित या प्रकाराला धार्मिक रंग असू शकतो. प्रत्यक्ष गृहामंत्र्याने या प्रकारची पाठराखण करणे हे या सगळ्या प्रकरणाची गुंतागुंत वाढवणारे आहे.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 6:24 pm | मुक्त विहारि

तुमच्या घरच्या व्यक्ती बाबत असा प्रसंग घडला असता तर?

(माझ्या मनात पण तुम्ही म्हणता तसे प्रश्न येऊन गेले. पण मी तुम्हाला विचारला, तोच प्रश्न स्वतःला विचारला. ...उत्तर वेगळे आले....झालं ते उत्तमच झाले. ..कारण एक संदेश असा पण गेला आहे की, जास्त सुरसुरी आली तर निकाल वेगळा पण लागू शकतो. )

जॉनविक्क's picture

6 Dec 2019 - 6:26 pm | जॉनविक्क

मी तिथे असतो तर मीही भावनावश होऊन तसाच विचार केला असता. मी कुठे त्यांना दोष देतोय?
पण मी तिथे नाहीये, आणि त्यामुळे मी भावना बाजूला ठेवून विचार करू शकतोय. प्रियंकाच्या खऱ्या गुन्हेगाराला अजून शिक्षा झालेली नाही असे माझे मत आहे.

यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे?

आणि जोपर्यंत माणूस, ह्या पृथ्वीवर आहे, तोपर्यंत ह्या घटना होतच राहणार.

त्यामुळे, ह्या घटना सतत घडू नयेत, इतपत तरी काळजी घेतली पाहिजेच.

पण पुचाट कायदे ...हो ह्या बाबतीत कायदे पुचाटच आहेत...आणि आमच्या घरात नाही ना घडलेले, ही निष्क्रिय सामाजिक मानसिकता, अशा घटनांना कळत नकळत, प्रोत्साहनच देत असते.

इथे प्रश्न फक्त त्या एका "स्त्री" पुरता मर्यादित नाही.

आपण माणूस म्हणून जगण्यासाठी नालायक आहोत, हेच आपण परत परत सिद्ध करत आहोत.

किंबहुना गुन्हेगार लोकांना पण "स्त्रिया बद्दल" आदर असतो. तितका पण आपला पांढरपेशा समाज देत नाही.

त्यामुळे ह्या घटना टाळायच्या असतील तर एकच उपाय आहे, कठोर कायदे आणि त्वरित कारवाई.

(विषय गुन्हेगारी बद्दल निघालाच आहे तर, तुरूंगात ह्या गुन्हेगारांना, चमडी-वाले, कस्पटासमान वागणूक मिळते....कृपया माहितीचा स्रोत विचारू नये. मला माझा जीव प्यारा आहे.)

यात माझा मूळ मुद्दा येतच नाही.

प्रियंकाचा खरा गुन्हेगार अजून मोकाट आहे, असे माझे म्हणणे आहे, आणि तोपर्यंत या सेलिब्रेशनला काहीही अर्थ नाही.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 9:19 pm | मुक्त विहारि

खरा गुन्हेगार कोण आहे?

4 पैकी 3 मायनर असल्याने त्यांची नावे उघड करता येत न्हवती परिणामी त्यांची जी नावे प मिडी यात दिली गेली ती काल्पनिक होती म्हणून ते तसे म्हणत असावेत

तसेही मला म्हणायचे नाहीये. पण सामान्यपणे एखादे प्रकरण आपल्या अंगावर शेकायला लागले की साक्षीदारांना संपवायचा मार्ग सर्वसामान्यपणे वापरला जातो. विशेषतः प्रकरणात हायप्रोफाईल माणसे गुंतलेली असतील तर. त्यामुळे तडकाफडकी एन्काऊंटर अनेक प्रश्न निर्माण करते.
ती व्यक्ती कोण आहे हे सांगणे खूपच कठीण आहे. आपण १०० किमीवर बसून काहीच माहिती काढू शकत नाहीत. पण झालेला घटनाक्रम संशयास्पद आहे, आणि त्यामुळे या प्रकरणात अजुन कोणीतरी उच्चपदस्थ अडकलेला असण्याचि शक्यता आहे असे माझे सकृतदर्शनी मत बनलेले आहे.

ती महिला पशुवैद्यकीय डॉक्टर होती आणि हैद्राबाद आणि आसपासच्या अनधिकृत कत्तल खान्यांसंदर्भात आवाज उठवत होती ही बाब विचारात घेतली तर बाकीचे चित्र अधिक स्पष्ट होते...

इतक्या सगळ्या चर्चा, कुचर्चा, तर्क, वितर्क वाचून, पाहून, ऐकून वाटते की बलात्कार पीडितांच्या आणि ओघाने त्यांच्या कुटुंबियांच्या नशिबात बलात्कार आणि क्लेशकारक मृत्यूनंतरही शांतता नाही.

सगळेच ह्या प्रकरणाला वेगवेगळे रंग देण्यात, फाटे फोडण्यात मश्गुल आहेत.

जाणारी गेली जीवानिशी...

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 5:53 pm | मुक्त विहारि

+1

ज्याचे जळते त्यालाच कळते.

माझ्या सगळ्या मैत्रिणी आणि बहिणी , ह्या घटनेमुळे खूष आहेत.

जॉनविक्क's picture

7 Dec 2019 - 10:51 am | जॉनविक्क

स्वधर्म's picture

6 Dec 2019 - 6:02 pm | स्वधर्म

तुंम्ही पिडीतेबाबत मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे. ९९% लोकांच्या मनात क्षोभ आहे. आरोपीला कसलीही शिक्षा झाली, तरी गेलेला जीव आणि भोगलेल्या यातनांची भरपाई कदापि होऊ शकणार नाही. पण या प्रकरणातून थोडा वेगळा मुद्दा पुढे येत आहे. य़ाचा परिणाम भयंकर होऊ शकतो. खाली आनंदा यांनी तो खूप व्यवस्थित मांडला आहे. त्यांनी मांडलेल्यातील एक जरी शक्यता खरी असेल, तर यात पाचवी हत्त्या कायद्याची झाली आहे. इतर निर्भया वगैरे प्रकरणातले खरे आरोपी वेळकाढू न्यायसंस्था आणि ढिसाळ तपास हे आहेत. पोलिसांच्या कामात आरोपी पकडणे आणि त्याला व्यवस्थित लवकरात लवकर पुराव्यांसहित न्यायालयात हजर करणे, याचे मूल्य आरोपीला खतम करण्यापेक्षा खूप खूप अधिक आहे. कसाबला फाशी देण्याबाबत पोलिसांवर असाच दबाव होता, पण मुंबई पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळून त्याला कायदेशीर न्यायालयासमोर हजर करून मग त्याला फाशी झाली. यामुळे समाजात न्यायाचे राज्य असल्याचा संदेश जातो. इथे कसला संदेश जातो ते आपणच पहा.

फ्रेंच राज्यक्रांती , हे उत्तम उदाहरण आहे.

त्यामुळे, जनतेचा जर ह्या घटनेला विरोध नसेल, तर राज्यकर्ते योग्य तो बोध घेतील, अशी भाबडी आशा आहे.

यामुळे समाजात न्यायाचे राज्य असल्याचा संदेश जातो. इथे कसला संदेश जातो ते आपणच पहा.

स्वधर्म, पोलीस खोटे सांगत आहेत, ह्या गृहीतकावर विसंबून पुढचे सारे बोलले जाते आहे का? पोलीस खरेच सांगत आहेत, ह्याचा काही पुरावा मजपाशी नाही पण ते खोटेच सांगताहेत असा पुरावा पुढे आलाय का? जर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीनी पळून जायच्या प्रयत्नात पोलिसांच्या बंदुका हिसकावल्या असतील, त्या चालवायचा प्रयत्न केला असेल, त्यांच्यावर दगडफेक केली असेल तर पोलिसांनी काय करणे अपेक्षित आहे? त्यांना स्वसंरक्षणाचा अधिकार नसावा का? तुमचा न्यायाचा मुद्दा लक्षात घेतला तरीही पोलीस विनाकारण स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतील का, असेही वाटते.

एकूणातच सगळे जण आता भयानक अराजक निर्माण झाले आहे वा होणार आहे अशा थाटात अहमहमिकेने बोलत आहेत, का बरे? लगेच सगळीकडे पोलीस एन्काऊंटर्स करणार आहेत की काय? अशा घटनाच होऊ नयेत म्हणून जे कडक व प्रभावी उपाययोजना करायला हव्यात त्याविषयी कोणी ब्र काढत नाही. उलट आता ह्या प्रकरणाला धार्मिक रंगही देत आहेत.

आजकाल कोणत्याही दिवसाचे वर्तमानपत्र पहा, ह्या अशा बातम्या असतातच, एक दिवस असा नाही की नसतात. ६१ वर्षाच्या थेरड्यापासून ते १६ वर्षाच्या पोरट्यापर्यंत सगळेच ही मर्दुमकी गाजवताना दिसतात. ज्यांच्यावर हा अन्याय होतो त्या मुली, स्त्रिया, त्यांचे कुटुंबीय ह्यांना न मिळणाऱ्या किंवा अति विलंबाने मिळत असलेल्या न्यायाचे काय? इथे कसला संदेश जातो मग? त्यांचा उध्वस्त झालेला आत्मविश्वास, जगायची उमेद, समाजातून नाकारले जाणे, दाखवली जाणारी बोटे, मागून केली जाणारी कुजबुज, डिप्रेशन ह्या सगळ्याला कधी न्याय मिळणार? मिळायला हवा की नको?

श्वेता२४'s picture

6 Dec 2019 - 6:59 pm | श्वेता२४

ज्यांच्यावर हा अन्याय होतो त्या मुली, स्त्रिया, त्यांचे कुटुंबीय ह्यांना न मिळणाऱ्या किंवा अति विलंबाने मिळत असलेल्या न्यायाचे काय? इथे कसला संदेश जातो मग? त्यांचा उध्वस्त झालेला आत्मविश्वास, जगायची उमेद, समाजातून नाकारले जाणे, दाखवली जाणारी बोटे, मागून केली जाणारी कुजबुज, डिप्रेशन ह्या सगळ्याला कधी न्याय मिळणार? मिळायला हवा की नको?

+१

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 7:22 pm | मुक्त विहारि

+2

मित्रहो's picture

6 Dec 2019 - 11:36 pm | मित्रहो

जे झालं ते सद्य परिस्थितीत योग्यच झाल बाकी चर्चांना, तर्कांना काही अर्थ नाही. आरोपी पळून गेले असते तर.. जो मेसेज हवा होता तो मेसेज गेला आहे.
न्याय व्यवस्थेने न्याय देऊन असे काही झाले असते तर अधिक योग्य होते यात शंकाच नाही. सहा महिन्यात केसचा निकाल लागूच शकला असता का? परत वर्षानुवर्षे वकिलांच्या आर्गुमेंट सहन करा. त्या कुटुंबाचे काय? एकंदरीत न्यायव्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचे आहे.

ले़खात दिशा हे नाव वापरावे.

इथे कसला संदेश जातो ते आपणच पहा.

विनोदपुनेकर's picture

6 Dec 2019 - 6:55 pm | विनोदपुनेकर

मला तरी वाटते कि निर्भया किंवा कोपर्डी मधील आरोपीना आतापर्यंत जर न्यायव्यवस्थेने फाशी किंवा घटनेप्रमाणे कुठलीही शिक्षा आजपर्यंत दिली गेली असती तर कदाचित आज सगळ्यांनी हैद्राबाद पोलिसांवर फुले उधळण्याऐवजी ते टीकेचे धनी झाले असते जनमानसात एकाच मुद्दा आहे कि आरोपी असूनही इतके वर्ष सरकारी पाहुणे बनून राहतात आणि पीडित च्या कुटुंबावर आलेली वेळ आणि रोज उगवणारा दिवस आपण कल्पनाही करू शकत नाही

श्वेता२४'s picture

6 Dec 2019 - 7:00 pm | श्वेता२४

हेच म्हणते

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 7:32 pm | मुक्त विहारि

+2

संजय पाटिल's picture

7 Dec 2019 - 12:50 pm | संजय पाटिल

नाहीतर त्यांचे काम उद्या सर्वसामान्य जनता ही करेल,सांगता येत नाही. जनतेच्या भावना आता बलात्काराच्या घटनांबाबत अधीक संवेदनशील होत आहेत. )

हे काम जनता नक्कीच करते...... अक्कु यादव आठवतो का कुणाला?
https://allthatsinteresting.com/akku-yadav

झेन's picture

6 Dec 2019 - 9:33 pm | झेन

- बलात्कार पिडीतेच्या नावाचा उल्लेख टाळावा.

- आपल्या वैयक्तिक आयुष्यात कुठल्याही मुलीचा/स्त्री चा उपभोग्य वस्तू सारखा उल्लेख विनोदाने सुध्दा करू नये. मित्र-सहकारी अशी टवाळी करत असतील तर स्पष्ट शब्दात विरोध करावा.

- स्त्रियांनी पुरूषांच्या, समाजाच्या सुधारणेचा हट्ट जरूर धरावा पण त्यासाठी स्वतःची सुरक्षितता (व्यक्ति, स्थल, कालसापेक्ष) टांगणीला लावू नये. समाजात अनेक प्रकारचे लोक असतात त्यांचे अपब्रींगिंग आपल्या सारखे नसते. नेहमीच्या ओळखीची व्यक्ति भरोश्याची आहे असल्या भ्रमात राहू नये.

- वैयक्तिक फ्रस्ट्रेशन पोलीस, न्यायपालिका, राजकारणी अशांवर काढू नये.

- मानवी हक्क पिडीत व्यक्ति पेक्षा गुन्हेगारांना जास्त असू शकत नाहीत. उघड उघड जे गुन्हेगार आहेत त्यांचे कसले आलेत अधिकार. उन्नाव च्या गुन्हेगारांचा अधिकार???

- अश्या दुर्घटना.. अपघात कुणाही बरोबर होवू शकतात सो इतरांबाबत संवेदनशील आणि स्वत: अलर्ट राहू.

बहुतांश सामान्य लोकंना आनन्द झालेला आहे आणि हे पूर्णपणे न्यय व्यवस्थेचे अपयश दर्शविते. उन्हाळी सुट्टी वगैरे ब्रिटिश कालिन लाड बंद करून न्यायव्यस्थेने (आता तरी) दर्जा ऊंचावणे मनावर घ्यावे. अन्यथा हे प्रकार वाढतच जाणार आहेत.

स्मिता.'s picture

6 Dec 2019 - 9:50 pm | स्मिता.

एन्काउंटर्ची बातमी कळल्यावर आनंद होण्याऐवजी मनात पहिली शंका आली की जे मारले गेले ते 'खरंच' गुन्हेगार होते का? (खरे गुन्हेगार असल्याची खात्री पटली असती तर मात्र नक्कीच आनंद झाला असता)

आतापर्यंतचा गंभीर आणि नृशंस गुन्ह्यांचा इतिहास बघता एवढी तत्काळ कृती किंवा 'न्यायदान' कधीच झालेले नाही. त्यामुळे झाल्या प्रकारात मूळ आरोपी/आरोपींना वाचवण्याकरता दुसर्‍याच कोणाचा तरी बळी दिल्याची शक्यता जास्त वाटते. जर माझी शंका चूकीची असेल तर आनंदच आहे, पण निर्दोष व्यक्तीला चारित्र्यहनन होवून जीव गमवावा लागणं हे ही दुर्दैवीच!

मारवा's picture

6 Dec 2019 - 10:33 pm | मारवा

१-
जर एनकाउन्टर फेक असेल म्हणजे ते आहे की नाही हे अजुन सिद्ध झालेले नाही पण ते जर उद्या फेक होते असे जर चौकशीअंती सिद्ध झाले तर फार चुकीचा संदेश
समाजात जाईल यात काहीच शंका नाही. म्हणजे अशा भविष्यकालीन घटनांमध्ये पोलिसांकडुन समाज याच प्रकारच्या इमोशनल मॉब जस्टीस ची अपेक्षा करेल.
आजही खुप आश्चर्य वाटले जेव्हा वकील वगैरे असलेल्या अनेकांनी हे जे झाले हेच योग्य होते असे म्हटलेले आहे. मायावती यांनी हैद्राबाद पोलिसांकडुन युपी
पोलिसांनी प्रेरणा घेतली पाहीजे असे ही म्हटलेले आहे. जर असे झाले तर पोलिसही न्याय प्रक्रियेची अवहेलना करुन तिला पुर्णपणे डावलुन स्वतः फिल्मी स्टाईल य
देण्यास प्रेरीत होतील. असे जर झाले तर ते लोकशाहीच्या घटनेच्या न्यायाच्या मुळ हेतुलाच तुडवुन लावण्यासारखे होइल. असा समाज हा सुसंस्कृत समाज नव्हे तर
रानटी समाजासारखा होइल जिथे प्रत्येकजण वाट्टेल तसा निर्णय घेऊन न्याय करेल.

२-
अगोदरच ब्रुटल असलेली भारतीय पोलिस व्यवस्था आणखीनच ब्रुटल होउन अनिर्बंध होऊन जाईल. जर चौकशीच करायची नाही, बाजुही मांडायची नाही सत्य असत्याचा निवाडाच करायचा नाही तर मग पोलिसांचीही गरज काय ? म्हणजे पोलिस या व्यवस्थेचीही गरज का असावी ? मग सुदान सारख्या देशात जिथे सिस्टम पुर्णपणे अपयशी होते तिथे मग पोलिसही काय न्याययंत्रणा ही काय ? कशाचीच गरज राहणार नाही. तिथे मग अनेक़जण शस्त्र बाळगतात स्वत:च्या सिक्युरीटी फोर्स असतात. मग असा समाज हा अपेक्षित समाज आहे का ? म्हणजे याने जे प्रश्न आहे ते निकालात निघतील की अजुन चिघळतील ?

३-
जर आरोपी शक्तीशाली राजकीय व्यक्ती असते किंवा कुठल्याही मनी पॉवर मसल पॉवर बाळगणारे असते तर अशी घटना घडली असती का ? याची दाट शंका वाटते.

४-
एक हायपोथेटीकल उदाहरण समजा यातील एका आरोपीच्या भावाने वा नातेवाईकाने संतापाच्या भावनेच्या भरात जर एखाद्या एनकाउन्टर करणार्‍या पोलिसावर सुडाने हल्ला करुन त्याला ठार मारले. व त्याने जर हे म्हटले की त्याचा भाऊ निर्दोष होता त्याच्यावर अन्याय्य झाला. व जर कोर्टात केस गेली असती तर तो खरा निर्दोष असल्यामुळे त्याला न्याय मिळाला असता. तर मग अशी व्यक्तीगतरीत्या केलेल्या न्यायदानाची साखळी किती दिर्घ असु शकते किती भयावह असु शकते याची कल्पनाच केलेली बरी. मग यात कोणी कोणालाच उत्तरदायी राहणार नाही प्रत्येकाला स्वतःला जो योग्य वाटेल तो न्याय असे चालेल का ? असे निवाडे रोज होतील.
असा समाज तग धरु शकेल का ? सुसंस्कृत वगैरे जाऊ द्या त्याचे मूळात अस्तित्व तरी टिकेल का ?

अजुन अनेक प्रश्न आहेत पण एक गोष्ट आवर्जुन स्पष्ट करतो की

मला या केसमधील बलात्कारी आरोपींचे कुठलेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्याही समर्थन अजिबात करावयाचे नाही. यातील पिडीतेविषयी पुर्ण सहानुभुती बाळगुन आहे. मात्र या प्रकारची प्रश्नांची हाताळणी अनेक नवे प्रश्न निर्माण करेल असेही मनापासुन वाटते.

१ जर एनकाउन्टर फेक असेल..
म्हणजे काय मिडिया ट्रायल & एलिट क्लासनी निकाल दिलेला आहेच ़एन्काऊंटर फेकच आहे, आरोपीच्या जवळच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी आणि चाळीस लाख रूपये दिले जावे, एखाद्याला निवडणूकीचं तिकीट द्यावे.

२ अगोदरच ब्रुटल असलेली भारतीय पोलिस व्यवस्था...
पोलीस भरती करताना टीवी अँकर, मानव अधिकार कार्यकर्ते, आर्मेचर अॅक्टिव्हीस्ट यांना प्राधान्य द्यावे.

मारवाजी रस्त्यावर ट्रॅफिक नियम पाळणे कमीपणा समजणारे बहुसंख्य लोक असताना, अट्टल गुन्हेगाराला पकडताना हवालदार प्रेशरमधे असतो आजकाल गल्लीतला कुत्रा पण पोलीसावर हात टाकतो पण आरोपीला कोर्ट मध्ये नेण्याआधी मेडिकल करतात, जज आरोपीला आधी विचारतात तुम्हाला पोलिसांनी काही मारहाण केली का? मोठ्या तुरूंगात कैद्यांचे डबे चेक करणा-या पोलीसाला पण स्वतः च्या कुटुंबाची सुरक्षा आठवते.

३. राजकीय गुन्हेगारांवर आज काही कारवाई करावी तर उद्या त्यांना संरक्षण द्यावे लागते. आपल्याकडे एक थोर राजकीय व्यक्तिमत्व आहे ते वरीष्ठ पोलीस अधिका-यांना बोलताना कार्यकर्यांना सांगतात म्हणे अरे त्या कुत्र्याला बोलवा... क्रूपया विदा मागू नये

४. हायपोथेटीकल .. अहो बलात्कार करणा-यांना विरोध करू नका म्हणणारे विद्वान आपल्याकडे आहेत, उन्नावच्या आरोपींनी पिडीत व्यक्तिबरोबर काय केले समोर आहेच.

जोपर्यंत पिडीत आपली कुणी नसते आपण मोकळे असतो काहीही विचार करायला.

क्रूपया वैयक्तिक घेवू नये.

जोपर्यंत पिडीत आपली कुणी नसते आपण मोकळे असतो काहीही विचार करायला.

+ infinity.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2019 - 11:05 am | मुक्त विहारि

म्हणून तर म्हणालो होतो. ..ज्याचे जळते त्यालाच कळते...

कालच, 3-4 गृपवर चर्चा झाली, ज्यांना ज्यांना मुली होत्या ते सगळेच मित्र आणि भाऊ, ह्या गोष्टी बाबत, खूष होते. कुणीही विरोधी मत प्रदर्शित केले नाही.

जॉनविक्क's picture

7 Dec 2019 - 11:07 am | जॉनविक्क

त्यांची प्रतिक्रया काय होती ?

मुक्त विहारि's picture

7 Dec 2019 - 11:16 am | मुक्त विहारि

मला तुमच्या कडून ह्याच प्रश्नाची अपेक्षा होती. ..

त्यांना आई, बहीण, बायको असल्याने, त्यांचे पण प्रतिसाद, Encounter केले ते योग्यच केले, अशीच होती. ..

शब्द रचनाच तशी रचलेली आहे. आणि जो पर्यंत तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद मी दिलेला नसेल तर आपण या धाग्यावर माझ्या प्रतिसादा ना उत्तर ही दिलेले दिसत नाही म्हणून तुम्हाला बोलते करायला तसे लिहावे लागले

असो, मला इतकेच पुन्हा पुन्हा सांगायचे आहे जे स्पश्ट न बोलता ध्यानात येईल असे वाटत नाही म्हणून बोलतो.

मला एकही स्त्री नातेवाईक नसती अथवा मी स्वतः स्त्री नसूनही मला सदरील चकमक घडून आल्याने आनंद वाटला मला बलात्काराचा धिक्कार करायला वजायनाच्या कुबड्या लागणे शरमेची बाब वाटते आणि चार लोकात त्याचा डंका पिटणे तर अजून लांच्छ नास्प द

वेळ आनंद साजरा करण्याची मुळीच नाही !!!
रेपिस्ट लोकांचे असेच अनेक एन्काऊंटर झाले तरच मनाला समाधान वाटेल !
अनेक वर्षे केस चालुन जर आरोपींना शिक्षा द्यायला सरकारे काचकूच करत असतील तर अजून घटना घडतील आणि जसजसा वेळ जाईल लोकांना पीडितां बद्दल आत्मीयता राहणार नाही .
ज्या प्रमाणे रोज अपघातात शेकडो लोक मरतात पण सार्वजनिक सुरक्षा कोणीही पाळत नाही त्याच प्रमाणे बलात्कार चे प्रमाण वाढून रोज मरे त्याला कोण रडे अशी वेळ पीडितावंर येईल .
म्हणून मी म्हणतो किमान बलात्कार मध्ये तरी फेक एन्काऊंटर झालेच पाहिजे .
अजून एक पर्याय , आरोपींना कोर्टात घेऊन जात असताना ढिली सुरक्षा ठेवणे आणि सरळ जमावाच्या हवाली करणे .
एक मात्र नक्की पोलीस आणि न्यायव्यवस्था यांचा म्हैस आणि धामिण सारखा वाद पुन्हा रंगणार !!!

तीन चार वर्षांच्या मुलींना सुद्धा हे रेपिस्ट उध्वस्त करतात तेंव्हा खरी चीड येते ! असल्या केसेस मध्ये सुद्धा ते आरोपी जेल मध्ये केस च्या सुनावणी ची वाट बघत आरामात जीवन जगत असतात .
आजच ट्विटर वर केरळ मधील एक केस बघितली , लहान मुली चे आयुष्य उध्वस्त करणाऱ्याचे कोर्टात नेतानाचे चार वर्षापूर्वीचा आणि आता अलीकडेच्या फोटोची तुलना करून दाखवण्यात आली की जेल मध्ये त्या आरोपीने किती सुखात दिवस काढले आहेत . मग काय पेटवायचीय काय ती न्यायव्यवस्था ?

निर्भया नंतर तर बलात्कार केसेस चा जणू महापूर आला आहे
भारता सारख्या भोंगळ कारभार असणाऱ्या देशात बलात्कारपीडितांना आज पर्यंत न्यायासाठी तिष्ठत राहावे लागले आहे .

आरोपीनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस जखमी असून एकाची प्रकृती गंभीर आहे म्हणे.. हे खरे असेल तर ह्या पोलिसांना कोण न्याय देईल?

यमसदनी पाठवले की आरोपींना... त्यांनीच.

क्लिनचीट ही मिळून जाईल एवढे जनमत सोबत असता, मग अजून काय हवय ? नाही मिळाली क्लीन चीट तरच प्रॉब्लेम होईल बघा...

त्या पोलिसांसाठी न्यायाची लढाई उभी करायला ?

तुम्हांला मला काय म्हणायचंय ते tangent गेलंय, तेंव्हा ते समजेपर्यंत गप्प बसलात तरी खूप झाले म्हणते मी.

तेंव्हा ते समजेपर्यंत गप्प न बसता अजून स्पष्ट करायचे शहाणपण प्रकट केले तरी समाधान पावलो म्हणतो मी.

जिथे तिथे तिरकस लिहायची घाई करण्यापेक्षा थोडा शांतपणे विचार केलात तर तुमचे तुम्हांलाच समजेल म्हणते मी.

जॉनविक्क's picture

7 Dec 2019 - 10:16 pm | जॉनविक्क

आपली नजर असावी जीचा वापर आपण माझे प्रतिसाद वाचायला करता

छे. अख्ख्या मिपावर विदा आहे.

यशोधरा's picture

8 Dec 2019 - 6:34 pm | यशोधरा

:)

गोंधळी's picture

7 Dec 2019 - 11:29 am | गोंधळी

भारतीय समाजाची एकुनच नीतीमत्ता सुधारणे हाच मुलभुत उपाय आहे असे वाटते.

कसल्यातरी धाकाने,भीतीने गुन्हा करायचे सोडुन देत असे समजणे चुकीचे वाटते.

ही अशी मानसिकता सगळ्या जगांत कमी अधिक प्रमाणात आहेच.

त्यामुळे, कठोर कायदे आणि त्वरित कारवाई, हा एक उत्तम मार्ग आहे.

पाठीवर बडगा बसला की, मांजर पण सुधारते.

नाहीतर मग आहेच, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय...

गोंधळी's picture

7 Dec 2019 - 11:56 am | गोंधळी

त्यामुळे, कठोर कायदे आणि त्वरित कारवाई, हा एक उत्तम मार्ग आहे.

भारतीय मानसिकता व सामाजिक परीस्थिति पाहता असे योग्य रीत्या होईल असे तुम्हाला खरच व प्रामाणिकपणे वाटते का ???

मुक्त विहारि's picture

7 Dec 2019 - 12:11 pm | मुक्त विहारि

आता ते शक्य नाही...

जॉनविक्क's picture

7 Dec 2019 - 12:13 pm | जॉनविक्क

ते तरी समजावा ?

मुक्त विहारि's picture

7 Dec 2019 - 12:23 pm | मुक्त विहारि

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात. ...

रांझे पाटील, ह्यांच्या बाबतीतला किस्सा आठवत असेल.

गोंधळी's picture

7 Dec 2019 - 12:40 pm | गोंधळी

मला अस म्हणायच आहे की- उदा . जर का माणसाचा एखादा अपघात झाला तर त्याला त्वरीत कारवाई म्हणजे उपाय योजना करण्याचि आवश्यकता असते पण जर का कर्करोग झाला असेल तर त्वरीत कारवाई करुन नाही चालत तर त्याच मुळ शोधुन त्या पेशींवर दीर्घ उपाय योजना करावी लागते.

आता व्यापकपणे वरिल केस कधे पाहील तर हा अपघात आहे की त्याच स्वरुप कर्करोगा सारखे आहे हे ज्याने त्याने ठरवाव.

अभिजित - १'s picture

7 Dec 2019 - 2:08 pm | अभिजित - १

तुम्हाला फर्स्ट हॅन्ड अनुभव आला पाहिजे हि प्रार्थना .. मग बघू या तुमचं मत काय ते .

मुक्त विहारि's picture

7 Dec 2019 - 2:19 pm | मुक्त विहारि

हे असे कुणाच्याच आयुष्यात नको. ...

गोंधळी's picture

7 Dec 2019 - 2:57 pm | गोंधळी

अशी मानसिकता असेल तर प्रश्न सुट्णारतर नाहीच तर अजुन जटील होणार हे निश्चित आहे.

आता यापुढे तुमच कुटुंब सुरक्षित झालेलच आहे. त्यामुळे ते रात्री अपरात्री कुठेही फिरु शकतात. तुम्हाला आता काळजीच कारणच नाही.

आणि तरीही जर का तुम्हाला चिंता वाटत असेल तर तुम्ही तुम्हालाच मुर्ख बनवत आहात.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2019 - 2:16 pm | मुक्त विहारि

त्यामुळे, जमेल तसे आणि जमेल त्या मार्गाने, ह्या रोगाला प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

कर्करोग झाला तर शस्त्रक्रिया पण आहे आणि केमोथेरपी पण आहेच.

त्यामुळे , घरचे संस्कार ही केमोथेरपी....

आणि पालकांनी योग्य ते संस्कार करावेत म्हणून कठोर कायदे आणि त्वरित कारवाई. ..

जॉनविक्क's picture

7 Dec 2019 - 12:50 pm | जॉनविक्क

की इतिहासाची पुनरावृत्ती शक्य नाही म्हणता ?

फक्त कठोर कायदे गुन्हे रोखू शकत नाहीत उलट गुन्ह्याचे क्रौर्य वाढवतात.
गुन्हे गारी रोखायची असेल तर मुळापासून प्रयत्न केले पाहिजेत.
अगदी लहानपणा पासून उत्तम संस्कार,अतिशय संवेदनशील पोलिस आणि न्याय यंत्रणा,कमीत कमी वेळात योग्य न्याय ( न्याय चुकला तर सूडाची भावना निर्माण होते).
अगदी मुळापासून प्रयत्न च गुन्हेगारी रोखू शकतात.

गुन्हे गारी रोखायची असेल तर मुळापासून प्रयत्न केले पाहिजेत.
अगदी लहानपणा पासून उत्तम संस्कार,

मुविजी लहानपणापासुन नेमके कोणते संस्कार केल्याने व कोणावर केल्याने गुन्हे घांबतील हे जरा विस्तार पुर्वक सांगितल तर सर्वांना उपयोग होइल.
तुमच्या मनात नक्कीच काहीतरी आराखडा असेल संस्कारांचा
कृपया शेअर करावा जाणुन घ्यायला आवडेल

जॉनविक्क's picture

7 Dec 2019 - 7:59 pm | जॉनविक्क

एक बिनबुडाची थिओरी,

लहापणापासूनच देवभोळे बनवलेले कितीतरी लोक नास्तिक झालेले सापडतील, संस्कार हा मुळात विषयच येत नाही गुन्ह्याच्या मानसिक ते मध्ये...

शा वि कु's picture

11 Dec 2019 - 9:16 am | शा वि कु

यांचा काही फरक नाही का पडणार ?

जॉनविक्क's picture

11 Dec 2019 - 1:18 pm | जॉनविक्क

नेमकं काय शिक्षण व संस्कार आपणास अभिप्रेत आहेत ?

लैंगिक शिक्षणाने बलात्कार थांबतील ? किंचित फरक नक्की पडेल. विशेतः लैंगिकतेबद्दलच्या निकोप मानसिकते मुळे.

बलात्कारा विषयी संस्कार नेमके कितव्या वर्षी सुरू करणे अभिप्रेत आहे ?

जिथे मोकळेपणी बोलायची बॉम्बाबोंब, जी स्त्री अथवा पुरुष असणे हा परिस्थितीनुसार कमालीचा advantage अथवा drawback असतो अशा परिस्थितीमध्ये संस्कार व शिक्षण फार कमी येईल असे वाटत नाही.

जॉनविक्क's picture

11 Dec 2019 - 1:20 pm | जॉनविक्क

नेमकं काय शिक्षण व संस्कार आपणास अभिप्रेत आहेत ?

लैंगिक शिक्षणाने बलात्कार थांबतील ? किंचित फरक नक्की पडेल. विशेतः लैंगिकतेबद्दलच्या निकोप मानसिकते मुळे.

बलात्कारा विषयी संस्कार नेमके कितव्या वर्षी सुरू करणे अभिप्रेत आहे ?

जिथे मोकळेपणी बोलायची बॉम्बाबोंब, स्त्री किंवा पुरुष असणे हा परिस्थितीनुसार कमालीचा advantage अथवा drawback असतो अशा परिस्थितीमध्ये संस्कार व शिक्षण फार कामी येईल असे वाटत नाही.

अभिजित - १'s picture

7 Dec 2019 - 2:02 pm | अभिजित - १

PUNE BPO Murder case - यातील बलात्कारी लोकांनी मानवी हक्काचा मुद्दा काढुन आपली फाशी मुंबई हाय कोर्ट रद्द करवून घेतली. सुप्रीम कोर्ट चा फाशीच निकाल धाब्या वर बसवला. हवं तर गुगल सर्च करा.
https://timesofindia.indiatimes.com/city/pune/pune-bpo-employee-rape-and...
29 July , 2019 - HC sets aside death sentence over delay in executing them

३७१ भारतीय कैदी फाशीची शिक्षा होऊनही आज जिवंत आहेत . सरकार हातावर हात ठेवून गप्प आहे. अमित शाह काय करतोय ? मिशन लोटस ?
कृपया विषय divert करू नका. भाजप सरकार फाशी द्यायला घाबरते का ? काँग्रेस घाबरत होती. भाजप पण डरपोक आहे ?
आणि न्याय व्यवस्था आपले काम करतेय. हळू हळू का होईना. ३७१ लोकांना फाशी सुनावलीय. पण सरकार झोपले आहे. मग एन्काऊंटर झालं म्हणून कोणीही गळे काढू नयेत.
https://www.business-standard.com/article/current-affairs/371-indians-ar...

सुरुवात स्वतः पासुन करावी कींवा तुमच्या घरातील मुला,मुलींना या कामाच महत्त्व सांगुन त्यांनाही तस करण्यास भाग पाडाव.

तुमच्या घरातुन एकतरी एन्काऊंटर स्पेशालीस्ट व्हावा हीच प्रार्थना करतो.

बबन ताम्बे's picture

7 Dec 2019 - 3:45 pm | बबन ताम्बे

BPO, पुणे प्रकरणातील आरोपींच्या फाशीची अंमलबजावणी म्हणे राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळून झाल्यावर प्रशासनाने लवकर केली नाही. त्या बेसिसवर कोर्टाने त्यांची फाशी रद्द करून जन्मठेप सुनावली.
हे प्रशासन कोण, त्यांना दिरंगाईमुळे जबाबदार धरून कारवाई का होत नाही?
चीड येण्याजोगी गोष्ट आहे. ज्या आरोपींनी बलात्कार केल्यानन्तर ती मुलगी गयावया करत दयेची भीक मागत असताना निर्दयपणे तिच्या डोक्यात दगड घालून ठार मारले, ते केवळ सरकारी दिरंगाईमुळे वाचले. मग हैदराबाद एन्काऊंटरचे समर्थन होत असेल तर चुकीचे काय?

टीकोजीराव's picture

7 Dec 2019 - 11:15 pm | टीकोजीराव

आता पर्यंत फाशीची शिक्षा सुनावलेल्या कितीतरी गुन्हेगारांना राष्टपतींनी जिवनदान दिलय.

https://www.amarujala.com/india-news/first-mercy-petition-rejected-in-in...

अभिजित - १'s picture

7 Dec 2019 - 2:06 pm | अभिजित - १

Punishing criminals was never priority for Congress. Same thing with BJP too.

मुक्त विहारि's picture

7 Dec 2019 - 2:17 pm | मुक्त विहारि

+1

रविकिरण फडके's picture

7 Dec 2019 - 5:46 pm | रविकिरण फडके

श्रेय अर्थातच, मोदींना. पाहा यु ट्यूब विडिओ.

मनमानी पद्धतीने आरोपी ठरवून एन्काऊंटर करण्याला कायदेशीर मान्यता मिळत नाही तोपर्यंत जास्त पुढचा विचार न करणाऱ्या अविवेकी लोकांना तो राक्षस देव आहे असा भास होत आहे.
एकदा का असा अधिकार मिळाला की हा राक्षस आपले खरे रूप दाखवेल आणि सर्व नाश घडवेल
भावना किती ही तीव्र असल्या तरी मत ही विवेकी च असावेत.
सामान्य जनते विषयी बिलकुल ऑब्जेक्शन नाही कारण ती सामान्य लोक आहेत.
पण राजकीय नेते,अधिकारी,विचारवंत,जबाबदार नागरिक ह्या लोकांनी संयमित च असावे .
कारण त्याना हा देव रूपातील राक्षस भविष्यात काय विनाश घडवेल ह्याची पूर्ण जाणीव असते

गणेशा's picture

7 Dec 2019 - 8:00 pm | गणेशा

लिहिणार नव्हतोच..पण सर्व वाचून राहवले नाही..

एनकाऊंटर ते चार जण पळून जात होते म्हणून केले हे मला तरी खरे वाटत नाही, त्यांना बेडया घालून घेऊन गेले असतीलच.. शिवाय असे चार जण कोणाच्या इतर बाह्य मदतीशिवाय पळून जात असतील असे मला वाटते नाही.

असो मुद्द्यावर बोलतो..
मारले गेलेले सोडून आणखी कोणी आरोपी असतील तर आता ते कसे शोधले जाऊ शकतील, गुन्ह्यामागे आणखी काही घटना असतील का?

येथे पोलिसांवर संशय घेत नाही, पण जर उद्या कोणी बलात्कार केला आणि पोलिसांना हाताला धरून दुसऱ्याला केस मध्ये अडकवले आणि काहीच न्याय प्रक्रिया न करता, पोलिसांकरवी त्या माणसाचा एनकौंटर केला तर?

एनकाऊंटर करायचाच असेल तर आसाराम, रामरहीम, रामपाल, कुलदीप सेंगर . बलात्काराच्या गुन्ह्यातील हे आरोपी आहेत या सर्वांचा एनकाऊंटर व्हावा का ?
न्याय लवकर व्हावा, हे मान्य आणि यासाठीच आग्रह हवा. पण तसे न करता न्याय व्यवस्था च उधळवून लावणे किंवा त्याचे समर्थन आपण करतोय.. याचे परिणाम पुढे दिसतील....

असो..

न्यायव्यवस्था उधळून लावा असे कुठे म्हटले गेल्याचे दिसत नाहीये, मिपावरच्या धाग्यातही नाही, वर्तमानवयात्रे, इतर ठिकाणी सोशल मीडियामध्येही नाही. हे म्हणजे जे नाही त्याची पुडी हळूच सोडण्यासारखे आहे. दुसरे म्हणजे पोलिसांची बाजू अगदीच विचारात घेतलेली नाहीये, म्हणजे ती खोटीच आहे, हे गृहीतक आहे. असेलही.

समाजमनाचा पाठींबा ह्या एन्काऊंटरच्या कृत्याला का मिळाला असावा असे वाटते? बरोबर, चूक हा मुद्दा थोडा बाजूला ठेवू. अशा आणि कोणत्याही प्रकरणात मुळात न्यायालयीन प्रक्रिया वेळेवारी चालून आरोपीना विना विलंब जास्तीत जास्त शिक्षा होत असतील, तर समाजमन अशा एन्काऊंटर्सना पाठींबा देईल का? यथायोग्य आणि मुंगीच्या पावलांपेक्षा संथ गतीने होणाऱ्या न्यायाची वाट बघत अजून किती मुलींनी मरावे? त्या अन्यायाविषयी बोलावे वाटते का? ह्या मुलींच्या मानसिक, भावनिक खच्चीकरणाची, जीवांची किंमत काय? की नाहीच? कधीकाळी होईल किंवा नाही अशा तकलादू "न्यायाची" वाट बघत त्यांनी दुःखी, कष्टी होत, मानसिक शारीरिक क्लेश सहन करत का मरावे?

जिथे मूळ पीडित व्यक्तीच्या असायची सुद्धा किंमत नाही - न्याय वगैरे लांबच्या गोष्टी - तो सूज्ञपणा काय चुलीत जाळायचा आहे? की त्या मुलींच्या मूलभूत हक्काच्या जाणिवेशी सूज्ञपणाला देणे घेणे नाही? मुळातच न्यायालयीन प्रक्रिया सुधारली तर कायदा हातात घ्यायची गरज कोणालाच भासू नये.

गणेशा's picture

9 Dec 2019 - 8:55 pm | गणेशा

ताई,
मी तुमच्या मताला एकदम चूकच असे म्हणत नाही. भावना प्रधान, समूहप्रिय, आणि लोकांना अपेक्षित अश्या भूमिकेपेक्षा वस्तुनिष्ठ मत मांडले मी.. कदाचित ते बऱ्याच जनांना पटणारे नसेल.

पोलिसांची बाजू हि खोटीच गृहीत धरली आहे असे म्हणताना हि तुम्ही मी विचारलेल्या 2-3 प्रश्नांना उत्तर देऊ शकला नाही.
त्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न होता, या चार आरोपी सोडून अजून कोणी आरोपी असेल तर आता तो कसा शोधणार.?. . त्यामुळे घाई पेक्षा ठोस आणि पूर्ण कार्यवाही झाली असती तर ती न्यायव्यवस्थे शी प्रतारणा ठरली नसती. आणि न्याय व्यवस्था हि आरोपी चे कृत्य, त्याने ते करताना यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? असल्यास त्या व्यक्तीला पण आरोपी म्हणून समोर आणणे, पूर्ण पाळेमुळे शोधणे हे न्यायालयाचे काम होण्या आधीच आरोपींना मारणे हे मला योग्य वाटत नाही.
भावनिक खच्चीकरण होणे, न्यायाची वाट पहात बसने क्लेश दायक आहेच हे मान्य, आणि त्या यातना कोणत्याही आई बहिणीवर येऊ नये हे मनापासून वाटते, पण म्हणून न्याय पूर्ण होई पर्यंत नं थांबणे पुढे धोकादायकच. समजा नंतर त्या फॅमिली ला कळले कि अजून एक मुख्य आरोपी त्या बलात्कारा मध्ये होता पण आधी तो समोर आलाच नाही, तर त्यावेळेस त्यांची अवस्था काय असेल? आणि ते न्याय कसे करू शकतील?

पोलिसांच्या बाजूचा मुद्दा,
न्याय प्रक्रिया पूर्ण न होता, आधी बलात्कार झाल्यावर पोलिसांना जे लोक शिव्यांची लाखोली वाहत होते ते आता त्यांचे अभिनंदन करत आहेत, हा पोलिसांचा विजय समजायचा की समाजाची हतबलता ?

राहिला मुद्दा, न्यायालयीन प्रक्रिया सुधारणेचा आणि गतिमान करण्याचा .. जसे तुम्ही क्रियेवीण वाचाळता व्यर्थ असे बोलता तो येथे हि लागू होतो.,

आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधिंकडे आपण आणि सर्वांनीही या साठी कोणती मागणी केली आहे का?
सर्वोच्च न्यायालयाला हि आपण विचारू शकतो, supremecourt@nic.in त्या ह्या मेल वर आपण कधी न्याय व्यवस्था फास्ट होण्यासाठी विचारना केली आहे का? केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाला ला आपण कधी अशी सूचना केली आहे का? किंवा जाब विचारला आहे का?
असे काही हि न करता आपण मात्र भावना विवश होऊन हाना, मारा, तोडा असे म्हणत असू तर न्यायालयाचे अस्तित्व कश्यासाठी?
असो.

यशोधरा's picture

9 Dec 2019 - 9:05 pm | यशोधरा

ह्या एका वाक्यात तुझ्या प्रश्नांची उत्तरे आहेत गणेशा. - मुळातच न्यायालयीन प्रक्रिया सुधारली तर कायदा हातात घ्यायची गरज कोणालाच भासू नये.

गणेशा's picture

9 Dec 2019 - 9:28 pm | गणेशा

Ok, थांबतो.
मी तुमच्या भावनेला समजत नाहीये असे नाहीये.

हे सारे वाचणे हि क्लेश दायक आहे, तर प्रत्यक्ष ते भोगणे, पाहणे मरण यातना देत असतील यात दुमत नाही.
त्यामुळे थांबतो.. आणि या धाग्यावर पुन्हा बोलत हि नाही.

शेतकरी आत्महत्या, बलात्कार, कोवळ्या जीवांच्या हत्या, स्त्री बालकांचा मृत्यू यावर बोलणे खूपच यातना देतात. त्यामुळे यावर लिहिणे टाळतोच मी.

यशोधरा's picture

9 Dec 2019 - 9:35 pm | यशोधरा

तो तुझा निर्णय.

माझ्यापुरते मी इतकेच म्हणेन की जोवर न्यायालयीन प्रक्रिया, पोलिसी तपास, चौकशा वगैरे सर्व "कायदेशीर" मार्ग पीडित स्त्रियांसाठी खरोखर वेगाने आणि पूर्ण शक्तीनिशी राबवले जात नाहीत, तोवर असा उद्रेक कधी होत असेल तर त्याला मी सरसकट चुकीचे मानू शकत नाही. मला कोणी कसलेही लेबल लावले तरी चालेल. :)

असो.

श्वेता२४'s picture

10 Dec 2019 - 11:38 am | श्वेता२४

त्यातील सर्वात महत्वाचा प्रश्न होता, या चार आरोपी सोडून अजून कोणी आरोपी असेल तर आता तो कसा शोधणार.?. .

मुळात जे पकडले गेले ते आरोपीच नव्हते असे तुम्हाला का वाटते? कोणत्याही महत्वाच्या वृत्तपत्रात असे धाडसी विधान केले गेलेले नाही. काल महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचलेली बातमी की एका आरोपीच्या वडीलांनी आरोपीने असे काही केले असेल तर त्याला शिक्षा व्हायला हवी असे मत व्यक्त केले(याचाच अर्थ तो असे काही करु शकतो याची त्यांना जाणीव असावी) गावातल्या लोकांचे म्हणणे होते की आरोपी मिळालेले पैसे ऐश करण्यात उडवायचे. यातील कोणतीही पार्श्वभूमी ते अगदी साधे सरळमार्गी होते व ते गुन्हा करणे शक्यच नव्हते याची पुष्टि करत नाही. तसेच अनेक बातम्यांमध्ये आरोपींना सीसीटीवी फुटेज वगैरे उपयोग करुन पकडल्याचे वाचनात आले। आरोपींना लगेच पकडल्यामुळे त्यांचे फोन डिटेल्स व वैद्यकीय तपासणी अहवाल पोलिसांजवळ असेलच आणि या चकमकी ची चौकशी होईल त्यावेळी हे पुरावे नक्कीच विचारात घेतले जातील. त्यामुळे खरे काय ते लवकरच कळेल.
बाकी तुम्ही न्याय व्यवस्थेला सुधारण्यासाठी काय केले हे विचारत आहात तर त्याचे उत्तर असे आहे की कोणत्याही राज्याचा प्रमुख सार्वभौम न्याय व्यवस्थेला सुधारायला जात नाही कारण त्यांच्या हातात त्यांच्या अनेक नाड्या असतात. मुख्य न्यायमूर्तींसमोर बैठकीत हे लोक कसे बोलतात ते पाहायला हवे तुम्ही (मी पाहिले आहे) त्यामुळे कधी प्रत्यक्ष भेट झाली तर सांगेन. इथे सार्वजनिक संस्थळावर अशा संवेदनशील गोष्टी लिहणे योग्य होणार नाही. बाकी चालुद्या

शा वि कु's picture

10 Dec 2019 - 6:55 pm | शा वि कु

अगदी पटले

जॉनविक्क's picture

7 Dec 2019 - 8:02 pm | जॉनविक्क

अन्य था हे मि पा आहे की व्हॉटसअप ग्रुप अशी शंका येऊ लागली होती विशेषत: ज्यांना सुज्ञ समजावे अशी मानसिकता प्रदर्शित करणाऱ्या म्हाभागांच्या प्रतिक्रिया वाचून

जॉनविक्क's picture

7 Dec 2019 - 8:02 pm | जॉनविक्क

अन्य था हे मि पा आहे की व्हॉटसअप ग्रुप अशी शंका येऊ लागली होती विशेषत: ज्यांना सुज्ञ समजावे अशी मानसिकता प्रदर्शित करणाऱ्या म्हाभागांच्या प्रतिक्रिया वाचून

गॉडफादर मध्ये मुलीचा बाप त्याच्याकडे न्यायाची याचिका करण्यासाठी येतो हा सीन आठवला . त्याचा स्ट्रीट जस्टीस नेहमीच आकर्षक वाटतो. मात्र त्याची किंमतही चुकवावी लागत असते.
न्याययंत्रणा डावलुन त्यातील प्रक्रिया डावलुन न्याया ची अपेक्षा पोलिंसाकडुन केली जात असेल तर मग तुम्हाला पोलिसस्टेट ची ही तयारी बाळगावी लागेल. पोलिसांकडुन मग अन्याय्य झाला तर मग पुढचा पर्याय काय असेल ?
हा प्रश्न नुसता वेगवान न्यायाचा नसुन मुलभुत समाज व्यवस्थेचा आहे. अशी व्यवस्था आपल्याला लोकशाहीला चालेल का ? मग उद्या खाप पंचायती ही फास्ट जस्टीस देतात म्हणुन त्यांचे ही समर्थन करता येइल काय ?
इथे आपण प्रगल्भ लोकशाहीत न्याययंत्रणे ला केवळ अधिकारच दिलेला नाहीये तर एक मोठी जबाबदारी एक व्यवस्था ही दिलेली आहे ज्या अन्व्यये उचित न्याय साध्य होइल याची अनेक अंगांनी काळजी घेणे अपेक्षित असते. सध्याच्या न्यायसंस्थेंत प्रचंड त्रुटी कमतरता आहेतच आहेत हे मान्यच आहे. त्यात सुधार करण्याचे प्रयत्न करणे हे हे अत्यावश्यक आहे जुने कायदे रद्द करणे कालोचित बदल करणे इ. अनेक बाबी करणे सर्व मान्य आहे योग्य आहे. पण
हे होत नाही म्हणुन ही पॉवर पोलिस वा त्याहुन झाले नाही तर इतर कोणा ला सोपवणे हा पर्याय भयावह आहे. याने जे अराजक माजेल ते भयंकर असेल.
लोकशाही न्यायववस्था या दिर्घ काळाने उत्क्रांत होत आलेल्या बेस्ट पॉसिबल व्यवस्था आहेत त्यांना डावलुन तोडुन काहीही साध्य होणार नाही.
जर त्याहुन प्रगल्भ पर्याय आला तरच ते योग्य होइल.

हेच लोकं विचारात घेत नाहीत, इथे न्याय झालाय की बदला हेच अजून स्पष्ट नाही आणि लोक सुरूही झाले न्याय झालाय म्हणायला. असो, घडले त्याचा मी विरोधक नाही एव्हढच सद्या पुरेसे आहे.

आनन्दा's picture

8 Dec 2019 - 9:39 pm | आनन्दा

जानभैया,
एको पे रैना
या घोडा बोलना, या चतुर बोलना

जॉनविक्क's picture

8 Dec 2019 - 9:55 pm | जॉनविक्क

तुम्ही स्त्री असतात तर आणि तरच
तुम्हाला बहीण आई मुलगी असती तर आणि तरच
तुम्हाला यातील वेदना कळली असती वगैरे वगैरे
पण यापैकी तुम्ही काहीही नसल्याने तुम्ही पात्र नाहीतच
शिवाय आम्ही व आम्हाला हे सर्व आहेत म्हणुन ते अधोरेखीत करुन "दाखवुन " देणे हा सर्व प्रकार व
हा पात्रता काढणारा प्रतिसाद नेहमीचाच यशस्वी असला तरी व एरवी अदखलपात्र असला तरी
यावेळेस यावरचे जॉन विक्क यांनी त्यास उत्तम प्रत्युत्तर दिल्याने तो रडारवर आला.

इथे सर्व लोकांच्या आयुष्यात स्त्री कोणत्या ना कोणत्या रूपात आहे.
त्या मुळे तुमची आई,बहीण,मुलगीअशी असती तर एन्काऊंटर योग्य ठरवलं असते असा प्रश्न काही व्यक्त करत आहेत.
पिडीत कुटुंबाच्या भावनेशी पूर्ण सहमत आहोत.
अशीच भावना सर्व लोकांची असेल.
पण कायदेशीर मार्गाने शिक्षा होणे हे आरोपी ची फायद्याचे नसून समाजातील कमजोर लोकांच्या फायद्याचे आहे

मुंबई मध्ये gangwar मोडून काढण्यासाठी पोलिस नी चालवलेली एन्काऊंटर ची मोहीम गरजेची होती.
कायदेशीर मार्गाने गॅंग वॉर संपवता आले नसते.
माथेफिरू बिहारी तरुणाचे बस मधील एन्काऊंटर ही सुद्धा गरजच होती .
तसेच सर्रास नाही
पण बलात्कार सारख्या गुन्ह्यात एन्काऊंटर तात्पुरते कायदेशीर करावे आणि काही नियम आखून द्यावेत.
एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींनी स्त्री वर बलात्कार करून तिची हत्या केली असेल किंवा गंभीर शारीरिक इजा केली असेल तर अश्या गुंडांचे एन्काऊंटर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकारात करण्यास मान्यता द्यावी.
हा प्रयोग यशस्वी झाला तर कायमस्वरूपी तरतूद करावी.
संगनमताने शारीरिक संबंध ठेवून नंतर बलात्कार ची ओरड करणारे,किरकोळ छेड छाड .
काही विशिष्ट हेतूने प्रेरित होवून विनय भंगाचे आरोप ह्या सर्व प्रकारच्या गुन्ह्यात कायदेशीर कोर्टाचा मार्ग अवलंबावा सर्व पुरावे तपासावे

mrcoolguynice's picture

8 Dec 2019 - 11:47 am | mrcoolguynice

समजा हरेन पांड्या, खुन प्रकरणातील मुख्य संशयीत, अमित शाह यांचा प्रदिर्घ न्यायालयीन प्रोसेस मधून सुटून बाहेर येण्या ऐवजी, कुणी इन्स्टंट जस्टीस म्हणून तेंव्हाच/लागलीच एन्काऊंटर केला असता.
तर भारत त्यांच्या ऑपरेशन लोटस सारख्या बहाद्दरी पाहण्यावाचून वंचित झाला असता.

ट्रम्प's picture

8 Dec 2019 - 2:33 pm | ट्रम्प

त्याच न्यायाने पप्पू ( सुकन्या देवी प्रकरण ) चे काय झाले असते हो !!!
:) :)

चांगले झाले असते की, कारण त्या नंतर,

"पप्पु" हा मुद्दा उपस्थित करून, सध्या फोफावलेले एक राजकीय बांडगुळ वाढले नसते.

झेन's picture

8 Dec 2019 - 1:01 pm | झेन

भयानक आहे वर्तमान पत्रात वाचलं नेटवर बलात्काराचे व्हिडिओ सर्च करण्यात भारत तिसरा देश आहे. असं कसं असू शकतं प्रत्येक व्यक्ति एका स्रीच्यापोटी जन्म घेते तरीही बलात्काराची घ्रूणा वाटायचं दूर नेटवर सर्च??? हीपोक्रसी.

मनानी एवढे बलात्कारी असल्यावर कुठली न्यायव्यवस्था, पोलीस,सायकीयाट्रीस काय करू शकतील

भारतीय मीडिया chya दर्जा ची तुलना नुकतेच जन्म घेतलेल्या मुलाच्या बुध्दी शी केली जाते ..
जागतिक सर्वात जास्त अपरिपक्व नादान मीडियानं

तुम्ही स्वतः आजूबाजूला बघा आणि स्वतः स्वतःचे मत बनवा

विनोदपुनेकर's picture

8 Dec 2019 - 8:02 pm | विनोदपुनेकर

मुलात बलात्कार गुन्ह्यातिल आरोपि ज्याला कोर्टाने फाशिचि शिक्शा सुनावलि आहे त्याला दयेच्या अर्जाचा अधिकार असावा का ? जर त्यचा गुन्हा सिध्द झाला असेल कोर्टात आनि फशिचि शिक्शा सुनावलि असेल तर त्यला राष्ट्र्पति कडे दयेचा अर्ज कर्न्याचा अधिकार नसावा असे वाटते

त्यात बदलही होऊ शकतो राजकीय इच्छाशक्ती असल्यास.

जॉनविक्क's picture

9 Dec 2019 - 10:49 pm | जॉनविक्क

पोलिसांची बाजू हि खोटीच गृहीत धरली आहे असे म्हणताना हि तुम्ही मी विचारलेल्या 2-3 प्रश्नांना उत्तर देऊ शकला नाही.

तुम्हांला मला काय म्हणायचंय ते tangent गेलंय, तेंव्हा ते समजेपर्यंत गप्प बसलात तरी खूप झाले असे म्हणायचे नसेल ना याची खातरजमा करावी प्रथम. मग उत्तराची अपेक्षा ठेवावी.

आता हे प्रकरण कम्यूनिजम टाईप होतय, म्हणजे तत्वज्ञान म्हणून सर्वोत्कृष्ट आहे पण implement कसे करायचे कोणालाच माहित नाही.

जेवढी आदळ आपट व शक्ती काय चुकीचे आहे सांगण्यात घालवली तेव्हढी शक्ती बरोबर काय आहे व ते कसे साध्य करावे हे सांगण्यात घालवली अस्ती तर जास्त चांगले वाटले असते.

जिथे mob lynching च्या घटना ताजा इतिहास आहे तिथे ही बाई लोकांना निवाडा करू द्यावा म्हणून बरळत आहे.... कार जस्टीस डिलेयड इज जस्टीस दिनाईड.

आणि मी जखमी पोलिसांच्या न्यायासाठी बंदूक घेऊन रस्त्यावर उतरू का विचारल्यावर माझे प्रतिसाद tangent गेले ?

महाशया यशो तुम्हाला नक्की कळत आहे आपण काय व्यक्त होताय ?

यशोधरा's picture

10 Dec 2019 - 4:14 pm | यशोधरा

चालूदेत.

चा डेमो बघायला मिळेल असे वाटले होते. :D :D :D असो.

सर्व ठीक आहे ना , की बज्जी आहात ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Dec 2019 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फटकळ बोलून होईल, तुमची हजेरी होईल, सगळं होईल. योग्य वेळी तुम्हाला फटके मिळतील. काळजी करू नका. भगवान के घर सॉरी काकू के घर देर है लेकीन अंधेर नही.

जॉवी, तुम्हाला उपप्रतिसाद द्यायचं जीवावर येतं, म्हणजे मला आवडतच नाही. माझ्या तो आनंदाचा भाग म्हणून. पण आजचा प्रतिसाद ज़रा वेगळा होता म्हणून हा प्रपंच.

(सर्वांनीच हलके घ्यावे, ओझं घेऊन फिरू नये धन्यवाद)

-दिलीप बिरुटे

-

योग्य वेळी तुम्हाला फटके मिळतील

हे फटके शारीरिक की आणखी काही ? स्पष्ट केले तर आपल्या प्रतिसादात सुस्पष्टता येईल.

जॉनविक्क's picture

10 Dec 2019 - 9:26 pm | जॉनविक्क

JUSTICE DELAYED IS JUSTICES DENIED हे ध्यानात ठेवा.

शा वि कु's picture

10 Dec 2019 - 7:02 pm | शा वि कु

जस्टीस काय हे ठरवणे कोर्टाला जास्त चांगले जमेल आपल्यापेक्षा. वरील क्वोट सारखी आणखी एक क्वोट आहे, कि एका निरपराधाला मारण्यापेक्षा चांगलं कि 10 गुन्हेगार सुटुदेत. मी म्हणत नाही की ही लोकं निरपराध होती. तरीही ह्या अशा प्रकारांमध्ये तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक सुद्धा कधी अडकू शकाल.