मराठा साम्राज्य काही प्रश्न

चौकस२१२'s picture
चौकस२१२ in काथ्याकूट
4 Dec 2019 - 8:51 am
गाभा: 

मराठा साम्राज्य काही प्रश्न ( येथे मराठा हा शब्द जात वाचक नसून मराठा समूह म्हणून आहे .. हो नाहीतर सध्याचं "राजकीय" वातवरणात भलतेच वाद निर्माण व्हायचे !)
६ तारखेला पानिपत प्रदर्शित होईल आणि त्या निमित्ताने काही प्रश्न मनात होते बरेच दिवस .. कोणी मिपाकर यात माहितगार असेल तर ते उहापोह करतील अशी अपेक्षा
- बाजीरावापासून अनेक मोहीम आखलेल्या पेशव्यानां हे कसे कळले नाही कि सेनेबरोबर बाकी कुटुंब पाठवू नये , "जातेच आहे सेना तर बरोबर जाऊन तीर्थयात्रा पण होईल" या दबावाला ते कसे काय मानते झाले ? तयार झाले?
- या आणि आधीचया मोहिमांमध्ये ( अगदी बाजीरावापासूनच्या) अनेक सरदार आणि स्वतः पेशवे कुटुंब प्रत्यक्षात रणगांवर दिसतात पण सातारा किंवा कोल्हापूर गादीचे वंशज कुठे पुढाकाराने असल्याचा उल्लेख दिलेत नाही? असे का? कारण वंशज व्ययाने लहान होते म्हणून कि दुसरे काही कारण ?)
- उत्तरेतील ( आणि दक्षिणेतील पण) हिंदू राजांनी मराठ्यांना साथ केलेली दिसत नाही? बुंदेलखंड चा इतिहास नयेत असून सुद्धा! याला काय कारण? हे कारण असू शकते का कि, अनेक वर्षे उत्तरेतील हिंदू जनता मरठयांना "लुटेरू" म्हणून संजयची आणि त्याला मराठेच ( समूह) जबाबदार होते कारण ते तिथे कायमचे राहिले नाहीत, यायचे सत्ता स्थापित कायचे आणि कर लावून निघून जायचे?
पण मग हे कसे कि शिंदे, होळकर आणि गायकवाड मुखय मराठी भूमी पासून थोडे दूर कायमचे राहिले कि? का ते नंतर च्या काळात?

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Dec 2019 - 10:10 am | मुक्त विहारि

एखादी कादंबरी लिहीता येईल इतके...

पण. ...तरीही कमीतकमी वाक्यात सांगतो. ..

1. कुटुंबातील अंतर्गत राजकारण आणि हेवेदावे.

2. एकदा राजे झाले की, सामान्य माणसाला दूर ठेवण्यात येते. मग ते चीन मधील राजे का असेनात. नगरसेवक एकदा का खासदार झाला की असेच होते.

3. हिंदू कधीच एक न्हवते, नाहीत आणि नसणार.

- बाजीरावापासून अनेक मोहीम आखलेल्या पेशव्यानां हे कसे कळले नाही कि सेनेबरोबर बाकी कुटुंब पाठवू नये , "जातेच आहे सेना तर बरोबर जाऊन तीर्थयात्रा पण होईल" या दबावाला ते कसे काय मानते झाले ? तयार झाले?

overconfidence

- या आणि आधीचया मोहिमांमध्ये ( अगदी बाजीरावापासूनच्या) अनेक सरदार आणि स्वतः पेशवे कुटुंब प्रत्यक्षात रणगांवर दिसतात पण सातारा किंवा कोल्हापूर गादीचे वंशज कुठे पुढाकाराने असल्याचा उल्लेख दिलेत नाही? असे का? कारण वंशज व्ययाने लहान होते म्हणून कि दुसरे काही कारण ?)

त्यांनी पेशव्याची नेमणूक केली लढण्यासाठी खास,बाकी राजकारण तख्त सांभाळत होतेच

- उत्तरेतील ( आणि दक्षिणेतील पण) हिंदू राजांनी मराठ्यांना साथ केलेली दिसत नाही? बुंदेलखंड चा इतिहास नयेत असून सुद्धा! याला काय कारण? हे कारण असू शकते का कि, अनेक वर्षे उत्तरेतील हिंदू जनता मरठयांना "लुटेरू" म्हणून संजयची आणि त्याला मराठेच ( समूह) जबाबदार होते कारण ते तिथे कायमचे राहिले नाहीत, यायचे सत्ता स्थापित कायचे आणि कर लावून निघून जायचे?

कारण मराठे सारा खुद्द वसूल करायचे ,अशी नोंद इतिहासाच्या पुस्तकात ,आहे त्यामुळेच पानिपत ची लडाई संपल्यावर त्यांना स्थानिक लोकांनी मदत केली तर नाही उलट त्रास दिला

पण मग हे कसे कि शिंदे, होळकर आणि गायकवाड मुखय मराठी भूमी पासून थोडे दूर कायमचे राहिले कि? का ते नंतर च्या काळात?
कोणी दुसरे लग्न करत होते तर कोणी आपापसातील हेवेदावे

चौकस२१२'s picture

4 Dec 2019 - 11:04 am | चौकस२१२

हस्तर आपण म्हणता कि " त्यांनी पेशव्याची नेमणूक केली लढण्यासाठी खास,बाकी राजकारण तख्त सांभाळत होतेच"

छत्रपतींनी नि पेशव्यानां सुरवातीला फक्त कारभारी पंतप्रधान म्हणून नोकरीस ठेवले होते, सेनापती म्हणून नाही मग पुढे त्यांनी सेनापती ची भूमिका पण बजावली असे दिसते पण मूळ प्रश्न हा राहतो कि यूरोपातील राजे जसे स्वतः युद्धावर जायचे तसे छत्रपतींचे वारस का गेलेले दिसत नाहीत? का हे माझे म्हणणे चुकीचे आहे ,, कुठे असे दिसत नाही कि ७ वे वंशज या मोहिमेवर होते ८ वे वंशज त्या मोहिमेवर प्रत्यक्ष होते ! ...कोल्हापूरचं राजवाड्यामधील प्रदर्शनात सुद्धा त्याबद्दल काही उल्लेख नाही दिसत फक्त शिकारी आणि पुढे इंग्लड च्या दरबारशी भेटी वगैरे असेच सर्व आहे .. बार हे एक पिढीत समजू शकतो २-३ पिढया जर स्वतः राजा पुढे नाही हे ..... हा...मी जाऊदे उगा वादावादी होईल .. साधय बारामतीला जाणते राजे आहेत त्यांना आवडणार नाही असले प्रश्न !

या आणि आधीचया मोहिमांमध्ये ( अगदी बाजीरावापासूनच्या) अनेक सरदार आणि स्वतः पेशवे कुटुंब प्रत्यक्षात रणगांवर दिसतात पण सातारा किंवा कोल्हापूर गादीचे वंशज कुठे पुढाकाराने असल्याचा उल्लेख दिलेत नाही?

याची उदाहरणे आहेत. दोन देतो थोडक्यात. सातारचे महाराज प्रतापसिंह यांनी १८१८ साली गोपाळ अष्टीच्या लढाईत स्वतः नागवी तलवार घेऊन घोड्यावरून दौड केल्याची नोंद आहे. महाराज इंग्रजांच्या ताब्यात सापडले तेंव्हा चिटणीसानी उडी टाकली आणि इंग्रज सैनिकांना 'महाराज आहेत' असे सांगून थोपवले.

कोल्हापूरचे छत्रपती संभाजी आणि त्यांचे वंशज यांनी जातीने स्वतः मोहिमांत भाग घेतलेला आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी उतारवयात अंगिकारलेली जीवनशैली ही मोगल होती. माझे एक मित्र त्यांना त्या अर्थानं 'लास्ट ग्रेट मोगल' असं म्हणतात त्यात नक्कीच तथ्य आहे. त्याचा परिणाम असा झाला की पानिपतच्या दशकात तुम्हाला पेशवे कुटुंबातील जास्त व्यक्ती सापडतील. पण खुद्द शाहू महाराज १७०७ मध्ये ताराबाई आणि धनाजी जाधव यांच्याविरुद्ध लढले होतेच की.

" पण खुद्द शाहू महाराज १७०७ मध्ये ताराबाई आणि धनाजी जाधव यांच्याविरुद्ध लढले होतेच की."
अहो ते झालं अंतर्गत कलह .. मी म्हणतोय ते १०० वर्षात किती वेळा वंशज मोगलांचं/ निजामाचं विरुद्ध आघाडीवर होते? , नावे येतात ते शिंदे , होळकर, गायकवाड, पेशवे यांची ...
आज खास करून आठवण येते कारण आज सुद्धा १३ वे वंशज वैगरे दणके पिटवले जातात !
बाकी आपल्या मित्राच्या " शेवटचं मुघल" हि कोटी ऐकून मनातल्या मनात हसलो कारण कोल्हापूर राजवद्यात फक्त शिकारी आणि दरबारातील्या वस्तू एवढेच दिसले

उत्तरेतील ( आणि दक्षिणेतील पण) हिंदू राजांनी मराठ्यांना साथ केलेली दिसत नाही?

उत्तर-दक्षिण सोडा, पण खुद्द महाराष्ट्रातील कित्येक घराणी निजामाच्या पदरी होती. सिंदखेडचे रामचंद्र जाधवराव, धनाजी जाधव यांचे पुत्र चंद्रसेन जाधव, विठ्ठल सुंदर अशी कितीक नावे आहेत.

आपल्याला आज असे तीव्रतेने वाटले की सगळे हिंदू त्या वेळी एक व्हायला हवे होते, पण पोटापाण्याचा प्रश्न असलेल्या नौकरीत धर्म मध्ये आणून चालत नाही, त्यामुळं ती लोकं त्या वेळी त्यांना सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीनं वागली.

मराठ्यांच्या राज्यविस्ताराचा हेतू अर्थार्जन हा होता, धर्मवेड्या मुसलमानांच्या तावडीतून पिचलेल्या हिंदूंना सोडवणे असा नव्हता.

तिथे CEO पासून सर्व एकत्र असत व पडेल ती कामेही करत अगदी राज्याभिषेक होऊनही ते आर्थिक पातळीवर तितके बळशाली न्हवते. नंतर मात्र ते फोफावले त्यात हायरारकी आली त्याचे IBM बनले त्यामुळे CEO ने जास्त मोठ्या जबाबदाऱ्या सोबतच्या लोकांवर सोपवणे सुरू झाले व नंतर बऱ्याच गोष्टी घडल्या...

चौकस२१२'s picture

4 Dec 2019 - 12:41 pm | चौकस२१२

धर्मवेड्या मुसलमानांच्या तावडीतून पिचलेल्या हिंदूंना सोडवणे असा नव्हता.
२५% पटतंय शिवाजी महाराजांचा तरी होता, "स्वराज्याचा" होता धार्मिकतेचा असा नवहता असे म्हणू हवेतर त्याला "हिंदवी" म्हणले गेले याच कारण स्वधर्म हा हिंदू होता आणि पश्चिमेचे आक्रमक जे राज्य करीत होते त्यामागे त्यांची हि धार्मिक भावना होती फक्त सत्ता हि भावना नव्हती राजय वाढवा आणि ते धर्म वाढवा या बरोबरीने होते
महाराजांनी निदान धर्म टिकवा राज्य राखावे आणि मग वाढवा असा विचार केला असावा .

पुढे तुम्ही म्हणता तसा हेतू थोडा थोडा बदलत गेला असेल पण पूर्ण पणे "फक्त" सत्ता हा हेतू होता हे काही पटत नाही त्यामागे स्वतःचे जे आह( धर्म संस्कृती वैगरेंचा त्या काळातील जो अर्थ असेल तो ) रक्षण करणे आणि त्यात फक्त मराठी मुलुख नाही तर एकूण जो समान धागा विखुरलेली हिंदू जनता त्यांना संरक्षण देण्याचा होता ,

छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठेपण म्हणूनच तर वेगळे आहे ना. महाराजांनंतर तसा मुत्सद्दी आणि सेनानी झाला नाही.

- त्यात फक्त मराठी मुलुख नाही तर एकूण जो समान धागा विखुरलेली हिंदू जनता त्यांना संरक्षण देण्याचा होता ,

याचा काही पुरावा वाचण्यात आलेला नाही. रजपूत, जाट यांच्याबरोबर मराठ्यांनी ठेवलेलं धोरण शुद्ध व्यवहारवाद होता.

गामा पैलवान's picture

4 Dec 2019 - 6:16 pm | गामा पैलवान

चौकस२१२,

माझ्या मतीप्रमाणे उत्तरं देतो.

१.

- बाजीरावापासून अनेक मोहीम आखलेल्या पेशव्यानां हे कसे कळले नाही कि सेनेबरोबर बाकी कुटुंब पाठवू नये , "जातेच आहे सेना तर बरोबर जाऊन तीर्थयात्रा पण होईल" या दबावाला ते कसे काय मानते झाले ? तयार झाले?

मुळात पानिपतची लढाई झाली ती तत्कालीन पंजाबात. आज ज्याला आपण पंजाब, हरियाणा व हिमाचल प्रदेश म्हणतो त्याला त्या काळी सरसकट पंजाब म्हणंत. एकंदरीत दिल्लीच्या उत्तरेचा सगळा प्रदेश पंजाब होता.

ही जी मोहीम होती तिचं लक्ष्य प्रामुख्याने गंगायमुना यांच्या मधला प्रदेश होतं किंवा असावं. हा दिल्लीच्या दक्षिणेकडील प्रदेश आहे. यालाच अंतर्वेदी, दोआब अशीही नावं आहेत. तसंच ही मोहीम प्रत्यक्ष लढाया करायची नसून जिंकलेल्या मुलखाची यथोचित विल्हेवाट लावण्यासाठी होती.

अब्दालीशी पंजाबात लढाई करायचं उद्दिष्ट मुळातून नव्हतंच. त्याला नजीबखान रोहिल्याने इस्लामसाठी आक्रमण करायला लावलं. मग त्याने पंजाब ओलांडून अंतर्वेदीत प्रवेश केला व निरपराध हिंदूंच्या कत्तली केल्या. नंतर तो परत जायच्या वाटेवर होता. अंतर्वेदी सांभाळता यावी म्हणून मराठे युद्धावर निघाले. ही मोहीम प्रदेश सांभाळण्यापुरती मर्यादित असल्याने तीर्थयात्री व कुटुंबकबिला बरोबर होता.

मात्र नजीबखान रोहिल्याने अब्दालीला वारंवार डिवचलं. त्यामुळे त्याच्या मराठा सरदारांशी (दत्ताजी शिंदे, गोविंदपंत बुंदेले, इत्यादि) चकमकी झडल्या. या लढायांची अंतिम परिणती पानिपतावरच्या मोठ्ठ्या युद्धात झाली. त्या वेळेपर्यंत कुटुंबे परत पाठवायचा मार्ग खुंटला होता. अब्दालीस पुरेपूर पराभूत करणे हा एकमेव मार्ग शिल्लक राहिला. नजीबखान रोहिल्याने मराठ्यांना बरोबर फसवलं.

२.

- या आणि आधीचया मोहिमांमध्ये ( अगदी बाजीरावापासूनच्या) अनेक सरदार आणि स्वतः पेशवे कुटुंब प्रत्यक्षात रणगांवर दिसतात पण सातारा किंवा कोल्हापूर गादीचे वंशज कुठे पुढाकाराने असल्याचा उल्लेख दिलेत नाही? असे का? कारण वंशज व्ययाने लहान होते म्हणून कि दुसरे काही कारण ?)

शाहू महाराजांना त्यांच्या वडिलांचा म्हणजे शंभूराजांचा काहीच सहवास लाभला नाही. उलट ते वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत औरंग्याच्या कैदेत पडले होते. त्यांना युद्ध व राजनीतीचं शिक्षण कधीच मिळालं नाही. राजकारणाचा प्रत्येक डाव त्यांना अनुभवातनं शिकवा लागला. त्यांच्यावर राजछत्र असं काहीच नव्हतं. नाही म्हणायला आई येसूबाई होत्या, पण दोन्ही मायलेकरं कैदेत होती. शिवाय त्यांचा सांभाळ औरंग्याच्या मोठ्या मुलीने (की बहिणीने) मोठ्या मायेने केला. जेणेकरून शाहूस मोगलांचे विषयी द्वेष उत्पन्न होऊ नये (औरंग्याने भविष्यावर नजर ठेवून सांगितलं की काय!). तसंच शाहूची राहणी विलासी होती.

आता हे खरंय की ताराबाईंना लढायांच्या आयोजनाचा प्रत्यक्ष अनुभव होता. मात्र हा अनुभव शाहूकडे हस्तांतरित झाला नाही. मला आजही वाटतं की जर शाहू व ताराबाई भांडणं न करता एक राहिले/झाले असते तर मराठेशाही अधिक बळकट झाली असती.

३.

- उत्तरेतील ( आणि दक्षिणेतील पण) हिंदू राजांनी मराठ्यांना साथ केलेली दिसत नाही? बुंदेलखंड चा इतिहास नयेत असून सुद्धा! याला काय कारण? हे कारण असू शकते का कि, अनेक वर्षे उत्तरेतील हिंदू जनता मरठयांना "लुटेरू" म्हणून संजयची आणि त्याला मराठेच ( समूह) जबाबदार होते कारण ते तिथे कायमचे राहिले नाहीत, यायचे सत्ता स्थापित कायचे आणि कर लावून निघून जायचे?

शिंदे (कदाचित होळकरांनीही) पैसे घेऊन राजपुतांना पाठींबे दिले होते. त्यामुळे ज्यांच्याकडून मदत मिळू शकते असे कोणीच राजपूत भरवसा ठेवायला तयार झाले नाहीत. फक्त भरतपूरचा सूरजमल जाट कसाबसा तयार झाला. पंजाबातले शीख कदाचित तयार झाले असते, पण त्यासाठी वेळ देणं आवश्यक होतं. राघोबादादांनी पंजाब व अंतर्वेदीच्या मोहिमेसाठी २ वर्षं व २ कोटी रुपये मागितले होते. पण नानासाहेब पेशव्यांनी मंजूर केले नाहीत. त्यांना आपला पुत्र विश्वास याला पुढे आणायचा होता. मात्र त्याला राजकारणात प्रस्थापित करण्यासाठी उत्तर भारत ही चुकीची भूमी निवडली.

४.

पण मग हे कसे कि शिंदे, होळकर आणि गायकवाड मुखय मराठी भूमी पासून थोडे दूर कायमचे राहिले कि? का ते नंतर च्या काळात?

मराठा सरदारांना सतत पुणे/सातारा इकडे येऊन वसुली देणं शक्य नव्हतं. राज्याचा विस्तार इतका मोठा झाला की स्थानिक सत्ताकेंद्रे निर्माण होणं सहाजिकच होतं.

असो.

जमेल तशी उत्तरं दिली आहेत. कृपया जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

आ.न.,
-गा.पै.

Rajesh188's picture

4 Dec 2019 - 9:11 pm | Rajesh188

मराठी साम्राज्य खूप दूरवर पसरले होते .
मुघल सोडले तर फक्त मराठी लोकांनीच इथे
स्वतःचे राज्य निर्माण केले होते.
राजपूत मध्ये महाराणा प्रताप सोडले तर सर्व राजपूत राजे मुघलांचे मंडलिक होते.
महाराष्ट्र व्यतिरिक्त अनेक राज्यात मराठ्यांची सत्ता होती.
महाराष्ट्र पासून किती तरी लांब असलेल्या पानिपत मध्ये मराठी फौजा विदेशी आक्रमण थोपवून थरण्या साठी गेल्या हे खूप मोठे काम आहे..त्याचा अभिमान न बाळगता उगाच प्रश्न उभे करायचे..भारत वर्षातील एका पण राजाची हिम्मत झाली नाही अब्दाली समोर जायची ती हिम्मत मराठी राज्य कर्त्यानी दाखवली..एकदा पेशवे निवडल्या नंतर स्वतः युद्धात गेले पाहिजे होते
असे विचारणे संतापजनक आहे.
भारतात कोणता राजा स्वतः तलवार हातात घेवून प्रत्येक युद्धात लढला आहे.
हे पण शोधा आणि सांगा.
असले प्रश्न मराठी लोकांना का पडतात..हेच कळत नाही

चौकस२१२'s picture

5 Dec 2019 - 10:04 am | चौकस२१२

असे विचारणे संतापजनक आहे.

यात काय संतापजनक? जर जनकोजी शिंदे जाऊ शकतात रणांगणावर तर भोसले का नाही?
मला जे जाणवला ते विचारला ...
का वंशजांबद्दल काहीच विचारायचं नाही?

मुक्त विहारि's picture

5 Dec 2019 - 8:32 pm | मुक्त विहारि

+1

रमेश आठवले's picture

5 Dec 2019 - 6:26 am | रमेश आठवले

भारतात कोणता राजा स्वतः तलवार हातात घेवून प्रत्येक युद्धात लढला आहे.
हे पण शोधा आणि सांगा
टिपू सुलतान हा म्हैसूरचा राजा ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या यद्धात लढता लढता मारला गेला.
https://www.amazon.com/Sword-Tipu-Sultan-Bhagwan-Gidwani/dp/8129114755

काही इतिहासकार बुणगे आणि स्त्रिया, यात्रेकरू हे पानिपतच्या पराभवाला अंशतः किंवा पूर्णतः कारणीभूत झाले असा काही निष्कर्ष काढतात. त्यावरूनच तुमचा पहिला प्रश्न आलेला दिसतो.

आजच्या काळात वाचायला हे खूप कटू वाटेल, पण स्त्रिया, बुणगे, बटकी वगरे माणसांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून काहीही महत्व नव्हते. आपल्या मालकीची वस्तू म्हणून त्यांना बहुतेक वेळा वागवले जात असे. त्यामुळे त्यांना शत्रूने पकडले तरी आपली मानहानी होऊ नये एवढीच चिंता पुरुषांना दिसते.

नाना फडणीसांच्या स्वतःच्या शब्दातच पानिपतबद्दल काय म्हणाले आहे ते पहा -

"पुढे थोरले युद्ध उदईक होणार. तो पूर्व दिवशी संकेत की, पराजय आपला जाहला तरी शत्रूचे हाती श्रीमंतांचे कुटुंब व आपले हाती लागू नये. आपणच नाश करवावा. आपण तर वाचत नाही असा सिद्धांत करून श्रीमंतांनी याची ही योजना केली. "

पुढे स्वतः कसेबसे जिवंत परतल्यावर नानांनी त्यांच्या मातुःश्रींचा फार तपास केला. त्यावेळी नाना काय म्हणतात ते उल्लेखनीय आहे - जर मातुश्री सापडली आणि ती शुद्ध असेल तरच तिला पाठवा, नाहीतर परस्पर गंगेकडे रवाना करा.

यावरून स्त्रिया, बिनलढाऊ बुणगे यांच्याबद्दलचा दृष्टिकोन स्पष्ट व्हावा. त्यांची अडचण खासच होत नव्हती. याउलट मोहिमा वर्षानुवर्षे चालत, आणि पुरुषांना बिनलढाऊ माणसे अनेक प्रकारे सहाय्यक होत आणि प्रदीर्घ मोहिमेचे कष्ट सहन करण्यास मदतगार होत असत. या माणसांना रसद, जेवण वगरे पुरवण्याची जबाबदारी सैन्याची नव्हती, ते परस्पर बाजारातून आपल्या पैशाने हे सगळे विकत घेत.

त्या दिवशी भाऊंच्या पराजयाची कारणे वेगळी आहेत, तिथे एकही बिनलढाऊ माणूस नसता, तरी मराठयांना जय मिळाला असता असे म्हणणे अवघड आहे. फार तर नंतरची कत्तल वाचली असती, पण त्याची पर्वा त्या काळात फार कुणी केली आहे असे काही दिसत नाही.

विनोदपुनेकर's picture

6 Dec 2019 - 11:38 am | विनोदपुनेकर

१) बाजारबुणगे सोबत नेण्याची ती पेशव्यांची पहिलीच वेळ नव्हती त्यापूर्वीही वाटेतल्या चोर लुटारू पासून सरंक्षण हेतू प्रत्येक मोहिमेत बाजारबुणगे सोबत असायचे.
२) सदर पानिपत मोहीम भाऊंच्या अपेक्षेपेक्षा जास्त लांबली त्यात दिल्ली चा ताबा तर मिळाला पण दिल्ली त्या वेळी मोकळी केले गेली होती. सबब सोबत फोजेचे व लोकांचे खाण्याचे हाल होऊ लागले म्हणून कुंजपुरा किल्ला ज्यावर अब्दाली सैन्याचा ताबा होता त्यात भरपूर द्रव्य आणि अण्ण संचय होता म्हणून सैन्याने दिल्ली सोडून कुंजपुरा वर हल्ला केला व किल्ला रसद जिंकली ज्या युद्धामध्ये कुतुबशहा ज्याने दत्ताजी शिंदे ना मारले होते तो मराठ्यांना सापडला त्याचा जनकोजी शिंदे ने वध केला.
३) अब्दाली ने नदीला उतार शोधून मराठयांच्ये मागे म्हणजे दिल्ली ला येण्याच्या रस्त्यात येऊन तळ ठोकल्यामुळे दिल्ली शी पर्यायाने दक्खन शी संपर्क तुटला शेवटी उपासमार होऊन मारण्यापेक्षा मारून मारू म्हणून मराठी सैन्याने अब्दाली वर हल्ला केला. ज्यात शेवटी मराठी सैन्याचा पराभव झाला.
४) छत्रपती शाहूंबद्दल : थोरल्या बाजीराव पेशव्यांपासून सातारची गादि नामधारी झाली होती आणि बाजीराव पेशव्यांनी होळकर शिंदे आदी सरदारांच्या मदतीने उत्तर भारत आपल्या टाचेखाली दाबला होता.

जॉनविक्क's picture

6 Dec 2019 - 3:23 pm | जॉनविक्क

चित्रपट म्हणून कमालीचा अपुरा वाटला, पानिपत वाचल्या मुळेही असे होत असेल, त्यामानाने संजय खानची द ग्रेट मराठा सिरियल कमालीची उजवी होती.