भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४
.anch {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #fff !important;
background-color: #2196F3 !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
.anch-crr {
border: none !important;
display: inline-block !important;
padding: 8px 16px !important;
vertical-align: middle !important;
overflow: hidden !important;
text-decoration: none !important;
color: #000 !important;
background-color: #ccc !important;
text-align: center !important;
cursor: pointer !important;
white-space: nowrap !important;
margin: 5px;
}
२८ सप्टेंबर २०१८
तांबड्या समुद्राची घनता आणि स्वच्छ सूर्यप्रकाश यामुळे स्नॉर्कलिंग आणि स्कुबा डायविंगसाठी हा समुद्र प्रसिद्ध आहे. हुरघडा, मरसा आलम, दहाब, शर्म-अल-शेख ठिकाणे पर्यटकांनी गजबजलेली असतात. हुरघडा मधील बहुतेक रिसॉर्ट्सला प्रायव्हेट बीच असतो आणि रिसॉर्टच्या आतच संपूर्ण जेवणाची वगैरे सोय असते. आमच्या रिसॉर्टच्या बुकिंग मध्ये पण ब्रेकफास्ट, लंच, डिनर आणि अमर्यादित स्थानिक अल्कोहोल समाविष्ट होतं. रिसॉर्टच्या प्रायव्हेट बीच वर जायला रूम मधून थेट रस्ता होता.
रिसॉर्टचा कृत्रिम प्रायव्हेट बीच
रिसॉर्टचा कृत्रिम प्रायव्हेट बीच. पलीकडे मुख्य समुद्र
या समुद्राला तांबडा समुद्र म्हणत असले तरी इथलं पाणी अतिशय निळं आणि स्वच्छ. नजरेस सुखावणारा समुद्र किनारा आणि तिथेच स्नॉर्कलिंग करायची सुद्धा सोय होती. पण आम्ही हॉटेल मधून अर्ध्या दिवसाची क्रूझ आणि स्नॉर्कलिंगची टूर बुक केली. बफे ब्रेकफास्ट करून मनसोक्त समुद्रात डुंबून ११ वाजायच्या सुमारास रिसॉर्ट मधून टूर साठी रवाना झालो.
रिसॉर्टजवळ समुद्राचा रंग
अंदाजे ५० लोकांसाठी ही क्रूझ असून बोटीचा तळ काचेचं होतं. सुरवातीला बोटीला समुद्रात बऱ्यापैकी आत नेण्यात आलं. आणि मग बोटीवरचे स्कुबा डायव्हर्स समुद्रात उतरून माशांना खाद्य टाकून बोटी जवळ आणू लागले. थोड्याच वेळात विविध रंगांच्या माशांनी बोटीचा तळ भरून गेला. या समुद्राला तांबडा समुद्र बनवणाऱ्या लाल कोरल्सचं दर्शन पण अधून मधून होत होतं. अर्धा तास माशांसोबत गेल्यावर बोट पुढे निघाली.
बोट / क्रूझ निघते ती जागा. मागे हुरघडा गाव
समुद्राच्या निळाईच्या विविध छटा
...
कोरल्स आणि मासे (काचेचा तळ असलेल्या बोटीतून)
स्कुबा डायवर भोवती गोळा झालेले मासे
अंदाजे १५ मिनिटे अजून समुद्रात जाऊन एका ठिकाणी नांगर टाकला गेला. आणि स्नॉर्कलिंग करणारे गिअर्स चढवून पटापट समुद्रात उड्या मारून समुद्राची मजा घेऊ लागले. माझ्यासारखे ज्यांना पोहणे येत नाही ते बघत बसले. तेवढ्यात बोटीच्या स्कुबा डायव्हर्स म्हणाले कि ज्यांना पोहता येत नाही ते पण स्नॉर्कलिंग करू शकतात. त्यांच्या मदतीने स्नॉर्कलिंग गिअर्स चढवून, प्लास्टिक टायर घेऊन मी पण समुद्रात उतरले. कमरे इतक्या पाण्यातही माझा निभाव लागत नाही, इथे तर तळ सुद्धा दिसत नव्हता. माझी भलतीच तारांबळ उडाली. आयुष्यात घडलेल्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचा जलद पिक्चर बनून रिलीज होऊन मी तो पाहून सुद्धा घेतला. असा पिक्चर याआधी सुद्धा ३-४ परिस्थितीत बनला होता म्हणा, पण याही वेळी तो बनला. But I am still here telling you the tale. :D :D
Help म्हणायला तोंड उघडल्यावर स्नॉर्केलिंग गिअर्स मधून नाकातोंडात आणि डोळ्यांत पण पाणी जाऊ लागले. मी पॅनिक होऊ लागले म्हटल्यावर मदतीला परत डायवर आला. त्याने रिलॅक्स व्हायला सांगितलं. त्यानंतर तोंडात धरायची नळी दातांनी घट्ट दाबून ठेव म्हणाला. तोंडाने श्वास घ्यायचा आणि नाकाने सोडायचा हे सुरात करायला थोडा वेळ गेला पण जमलं. शरीर शिथिल झालं आणि आपोआप पाण्यावर तरंगू लागलं. सोबतीला प्लास्टिकचे टायर होतेच. आपण बुडणार नाही याची खात्री झाली आणि डोकं हलकेच ३ ते ४ इंच पाण्यात बुडवलं. नजर पाण्याखाली स्थिर व्हायला जरा वेळ गेला मात्र थोड्याच वेळात पाण्याखालच्या जगाचं पहिलं प्रत्यक्ष दर्शन घडलं. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मधील अभय देओलचा संवाद आठवू लागला, "ब्लु वॉटर होगा, मछलीया ऐसे तैरेंगी आस पास. It would be nice." पाण्याखाली डोकं बुडवल्याच्या त्या क्षणापर्यंत मी एका अद्भुत जगापासून अनभिद्य होते याची जाणीव झाली. चंदेरी शरीरावर काळे पट्टे असलेला सार्जंट मेजर मासा, Finding Nemo मधली डॉरी (यलो टेल सर्जन फिश) पण दिसली. मध्येच रेड सी पॅरोट फिश या हिरव्या माशाने पण दर्शन दिले. या समुद्राला तांबडा समुद्र अर्थात रेड सी म्हणायला भाग पाडणारे असंख्य लाल कोरल्स सुद्धा पाहिले.
आमची स्नॉर्केलिंग ची जागा
थोड्या वेळाने बोटीवर परत आले ते आता स्कुबा डायविंग शिकून पाण्याखालील या जगाची ओळख करून घ्यायची हे ठरवून. जाताना हळू जाणाऱ्या बोटीने येतांना वाऱ्याच्या वेगाने अंतर कापलं आणि अर्ध्या तासात आम्ही रिसॉर्टवर परत आलो. उरलेला सगळा वेळ अमर्यादित समुद्राची मजा आणि अमर्यादित वारुणीचा आनंद घेत घालवला. दुसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता कैरोला जाणाऱ्या गो बसचं तिकीट बुक केलं आणि सामान बांधून परत समुद्र किनारी येऊन समुद्राची गाज ऐकत बसलो. शांत झोप लागावी म्हणून व्हाईट नॉइजची सध्या चलती आहे. पण खऱ्या खुऱ्या समुद्राच्या गाजेला ऐकत झोपण्यात जी मजा आहे ती रेकॉर्ड केलेल्या समुद्राच्या व्हाईट नॉइज मध्ये कधीच येऊ नाही शकत. रात्रीही कोमट असणाऱ्या पाण्यात चालणं, मऊशार वाळू चुरत किनारी पहुडणं आणि आल्हाददायक खारा वारा पिणं. समुद्र किनाऱ्याची चटक वेगळीच असते ना!!
२९ सप्टेंबर २०१८
सकाळी परत समुद्राची भेट घेऊन आलो. ब्रेकफास्ट करून चेक आऊट केलं आणि गो बसच्या स्टॅन्ड वर येऊन पोहोचलो. नेहमी प्रमाणे बस वेळेवर निघाली. या खेपेची बस थोडी वेगळी होती. दुमजली आरामदायक बसच्या आत टॉयलेटची पण सोय होती. प्रत्येक प्रवाशासाठी ब्रेकफास्ट बॉक्स होता.
तांबड्या समुद्राशेजारून निघालेली बस थोड्या वेळाने सुवेझ कालव्या शेजारून जाऊ लागली. आणि अगदी सुवेझ पोर्ट नाही पण कालवा तरी पाहू शकलो याचं समाधान लाभलं. सुवेझची साथ सुटली आणि झाफराना येथील भला मोठा पवनचक्की प्रकल्प नजरेस पडला. पुढे घाटातून घाटमाथ्यावर गाडी पोहोचली आणि संध्याकाळी ६:३० च्या सुमारास कैरो मध्ये.
सुवेझ जवळील एका विश्रामथांब्यावर बस थांबली असता
बस मध्ये मिळालेले इजिप्ती ७up त्यावर पपायरस आणि देव बास्तेत यांचे इल्युस्ट्रेसशन
झाफराना येथील पवनचक्की प्रकल्पाचा छोटासा भाग
सगळे बोडके डोंगर
प्रचंड ट्रॅफिकशी झगडत आमच्या स्टॉपवर बस आम्हाला सोडून गेली. इथून उबर करून आमच्या कैरो मधील हॉटेलवर येऊन पोहोचलो. खान-अल-खलिली मार्केटच्या सर्वांत जवळ असलेले एक अगदी साधेखानी एक तारांकीत हॉटेल निवडले होते. बॅग टाकल्या आणि प्रवासाने आंबलेलं अंग मोकळं करावं म्हणून थेट झोपलो.
क्रमश:
.polaroid {
width: 80%;
background-color: white;
box-shadow: 0 4px 8px 0 rgba(0, 0, 0, 0.2), 0 6px 20px 0 rgba(0, 0, 0, 0.19);
margin-bottom: 25px;
}
.container-p {
text-align: center;
}
प्रतिक्रिया
28 Nov 2019 - 5:56 pm | यशोधरा
28 Nov 2019 - 5:57 pm | यशोधरा
हा भाग आटोपल्यासारखा वाटला. लिखाण थोडक्यात आटोपलंय, फोटोसुद्धा सुरेख, पण कमी टाकलेत. तुझ्या स्नोर्केलिंगच्या अनुभवाबद्दल लिहायचंस ना अजून. :) डायवर महाशयांनी काय तंत्र सांगितलं, पहिली डुबकी पाण्याखाली मारली तेंव्हा काय वाटलं.. तांबडा समुद्र असं नाव का पडलं आहे.
30 Nov 2019 - 9:43 am | कोमल
हो, थोडक्यात लिहिला आहे हे झालं खरं.
लवकरचं थोडं विस्तृत लिहून इथे टाकते. पुढील भागाच्या आधी.
इतिहासाबद्दल जितकं लिहावं तितकं कमी वाटत होतं. इथे तो स्कोप एकदम बदलला त्यामुळे थोडं गंडल. तुझ्या प्रश्नांनी अजून कसं लिहिता येईल याचा कच्चा मसुदा डोक्यात तयार झालाय. लवकरचं लिहिते.
धन्स :)
30 Nov 2019 - 8:49 pm | यशोधरा
लिही, लिही लवकर. वाट बघते.
28 Nov 2019 - 7:27 pm | जॉनविक्क
29 Nov 2019 - 8:16 am | प्रचेतस
अतिशय स्वच्छ, निळाशार समुद्र आहे हा.
29 Nov 2019 - 1:33 pm | अमित लिगम
छान, पुढील भागाच्या प्रतिक्षेत..
29 Nov 2019 - 2:04 pm | मुक्त विहारि
प्रवास वर्णन आवडले. ..
30 Nov 2019 - 9:44 am | कोमल
धन्यवाद जॉन, वल्ल्या, अमित आणि मुवि काका.
अपडेटेड व्हर्जन लिहिलं की कळवते. :)
30 Nov 2019 - 12:05 pm | श्वेता२४
छान लिहीत आहात. छायाचित्रेही मस्तच. या भागाचा विस्तार पुढच्या भागात करणार असाल तर उत्तमच आहे.
30 Nov 2019 - 7:54 pm | अनिंद्य
छान लिहिलं आहे. विस्तारित भागाची वाट पाहतो आहे.
4 Dec 2019 - 4:56 pm | सुधीर कांदळकर
छान. बोटीच्या तळातून दिसणार्या १ल्या अवताराचे फोटो का नाहीत असे वाटत असतांनाच ते दिसले.
छान. धन्यवाद.
11 Dec 2019 - 11:33 am | जेम्स वांड
लॉगइन केलं आणि पहिले तुमचे इजिप्तायन शोधले! मजा आली वाचून मिस्त्रचे वैविध्य जबरी मांडता आहात तुम्ही, बाकी यशोधरा ताईशी सहमत, आवरते लिहू नका भरपूर लिहा मजा येते वाचायला.
13 Dec 2019 - 4:11 pm | कोमल
सगळ्यांचे आभार.
हा भाग संपादित करून लेखातील काही भाग वाढवला आहे.
कृपया नजर टाकावी
_/\_
13 Dec 2019 - 4:23 pm | जॉनविक्क
त्यामुळे निळसर रंग परिणामी ठरला, धन्यवाद.
14 Dec 2019 - 10:24 am | अनिंद्य
नीलायन खूप ऐन्जोय केले. वाढिव लेखनाबद्दल आभार !