शिवसेनेची झोप की जाणिवपुर्वक राजकीय गोगपिद?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
13 Nov 2019 - 9:53 am
गाभा: 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान २१ ऑक्टोबर २०१९ निकाल २४ ऑक्टोबर २०१९ . २४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भाजपा आणि शिवसेना युतीस मतदान करणारी जनता दोहोत अगदीच सरकार बनु न शकण्या इतपत काही बिनसण्याची शक्यता आहे याबद्दल महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती की मतदार बावळट होता ?

२४ ऑक्टोबर नंतर शिवसेना नेते ५०:५० फॉर्म्युलॅच्या गोष्टी करतात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आश्वासन दिल्याचे म्हणतात. पण एकुण वाक्य रचनेवरुन मुख्यमंत्रीपद्दवर ५०:५० टक्के करण्याचे आश्वासन न देता अस्पष्टता ठेवली असण्याची शक्यता असू शकते. एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे. शिवसेना नेतृत्वासोबत बोलताना अमित शहांनी गोगपिद केले असेल किंवा नसेल पण त्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर २०१९ चा टाईम्स नाऊ या इंग्रजी टिव्ही चॅनलवरची अमित शहांची मुलाखत व्हिडीओ पुढे आला आहे ज्यात ३८मिनीटे ३८ सेकंदपासून पत्रकार नाविका कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असतील तर अमित शहा केवळ देवेंद्र फडणविसच असतील हे अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना दिसतात.

सर्वसामान्य मतदाराने दोघांचेही मुख्यमंत्रीपदी दावे ऐकले तरी गोष्टी न ताणता तोडगे निघतील कुणितरी नमते घेईल असाच सर्वसामान्य मतदार विचार करेल. पण ज्यांना आपल्या भूमिका टोकाच्या आहेत हे माहित असते त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या भुमिका जुळत नाहीत आणि टोकाच्या आहेत त्यांनी त्या टोकाच्या आहेत हे जनतेस / मतदारांना सुस्प्ष्टपणे का नाही सांगितले असा प्रश्न आहेच. अमित शहांना आधी माहित नसेल तरी १३ ऑक्टोबरला टाईम्स नाऊ पत्रकाराकडून आदीत्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्या बाबत समजलेले होते. आणि अमित शहांच्या मुलाखतीची वार्ता शिवसेना प्रमुखांच्या कानावर गेली असणार त्यांनी मतदारांना तोंडघशी घालण्यापुर्वी आपापसात चर्चा का केली नाही ? हा प्रश्न व्हॅलिड रहातोच पण..

शिवसेना प्रमुख निकाला नंतर ज्या पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत त्या एकाही पत्रकार परिषदेत १३ ऑक्टोबरच्या अमितशहांच्या मुलाखतीतील भूमिकेचा उल्लेख का करत नाहीत ?

सर्वसामान्य जनतेचे सर्वच राजकीय भाष्यांवर लक्ष नसेल पण शिवसेनेच्या राजकीय नेतृत्वापैकी कुणाचेच लक्ष नसेल तर १३ ऑक्टोबर पासून झोपले होते किंवा १३ ऑक्टोबरची मुलाखत जनतेपासून सोईस्कर लपवत आहेत ? महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ?

३८ व्या मिनीटापासून पुढे पहावे

प्रतिक्रिया

चौकस२१२'s picture

25 Nov 2019 - 4:52 pm | चौकस२१२

थोडक्यात काय स्वतःच्या हाताने खेळ खंडोबा केला अन इतरांच्या पातळीवर जाऊन बसले...
कीव येते खालील लोकांची
- लगेच लाडू वाटणारे, "मोटाभाई मास्तर स्ट्रोक असली व्यक्तवये फेकत फटाके उडविणारे ( अरे शपथविधीचा विडिओ परत बघा म्हणजे समजेल कि हा दोन पक्षांचं अधिकृत युती तुन निर्माण झालं नाहीये ..)
- राष्ट्रवादीचे उपनेते आणि आमदार..आणि बारामतीतील सर्वसाधारण दादांचे समर्थक.. पंचाईत हि कि एकदम अजितदादांना शिव्या हि घालता येत नाहीत आणि पाठिंबा हि देताना शरद पवारांचा अपमान होईल हि भीती.... हाहाहाहाहा
एकूण खाली आलेली गोमा गणेश उदाहरणे बरोबर बसतात... लाजिरवाणा महाराष्ट्र ( आधी १०५,५०,५०,५० अशी खिचडी करणारे मतदान मग सगळे राजकीय पक्ष)

मी हा चर्चा लेख लिहिताना केवळ शिवसेनेने गोमा गणेश पितळी दरवाजा केला का असा प्रश्न मला पडला होता.

आज सर्वोच्च न्यायालयीन सुनावणीचे समालोचन ऐकताना एक गोष्ट प्रखरतेने जाणवली ती ही की सर्वांच्याच चुली मातीच्या आहेत सर्वांच्याच पितळी दरवाजावर गोमा गणेशाचे प्रस्थ आहे.

आधी मुख्यमंत्री कोण या विषयावर भाजपा आणि शिवसेनेने दोघांनीही गोमा गणेश केलेलेच होते. काँग्रेसचा वेळकाढूपणा त्यांचे स्वतःचे गोमा गणेश जमेल तेवढे ताणण्याचा होता तर राष्ट्रवादीने ५४ आमदारांच्या सह्या कोणत्या पक्षाला पाठींबा हे नमुद न करता गोमा गणेश पद्धतीने घेतलेल्या होत्या. त्या गोमा गणेश सह्यांचा वापर करून अजित पवारांनी गोमा गणेशात आपण अधिक अग्रेसर असल्याची चुणूक दाखवली, आणि अजित पवारांचे गोमा गणेश आहे हे माहित असूनही देवेंद्रजी ते राज्यपाल ते केंद्र सरकार आमचा पण महाराष्ट्राच्या गोमा गणेश खेळात गोमा गणेशाकडे सोईचे दुर्लक्ष करून सहभागी झाले. विधी मंडळाचे अधिवेशन होऊन मतदान पडले तरी पक्षांतर बंदी कायद्याच्या धाकानेही काही गोमा गणेश होईल.

त्यातल्या त्यात रवि शंकर प्रसाद त्यांच्या पत्रकार परिषदेत विरोधकांवर आरोपकरण्याच्या निमीत्ताने का होईना अल्पांशाने खरे बोलले मुंबई आर्थिक राजधानी असल्याने विरोधक खिचडी बनवून अस्थायी सरकार थाटण्याचे प्रयत्न करताहेत म्हणाले पण त्याच कारणाने देवेंद्र फडणविस अगदी अस्थायी सरकारचे मुख्यमंत्री होण्यासाठीही गोमा गणेशाच्या खेळात सामील झाले.

काही तिखट प्रश्न उपस्थित करायचेच असतील तर सर्वच राजकीय पक्षात रिकाम्या कागदांवर आमदारांनी सह्या करण्याचा पायंडा दिसतो. अगदी आमदारकी साठी किमान वयो मर्यादा असते त्या वयापर्यंत रिकाम्या कागदांवर सह्या करु नयेत हे शहाणपण यावयास हवे खरे म्हणजे तुम्ही एका मतदार संघातील जनतेचे प्रतिनिधीत्व करण्याची मोठी जबाबदारी आहे. अमुक तमुक खूप मोठा नेता आहे म्हणून वर काहीही लिहिलेले नसताना तुम्ही सह्या करुन देऊ शकता ? हे मी कोणत्याही एका पक्षाच्या आमदारांबद्दल म्हणत नाही सर्वच हे करत असणार अजित दादांनी सर्वांनाच धडा दिल्याचे पुढे येत असण्याची शक्यता असावी (चुभूदेघे) अर्थात एवढ्यावरुन धडा घेतला जाईल का हे येणारा काळ सांगेल.

दुसरे विधानसभा किंवा लोकसभा हेच प्रतिनिधींचा अंतिम कल पहाण्याचे स्थान रहाणार या बाबत शंका नाही पण आज सगळ्या प्रतिनिधींकडे स्मार्टफोन उपलब्ध असताना आमदार खासदारांच्या कलाची तपासणी करण्याची सुविधा राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे असावी.

भारताच्या सार्वभौमत्वाच्या आणि एकसंघतेच्या दृष्टीने फुटीरतावादी शक्तींवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सध्याची घटनात्मक पद्धत केंद्रसरकारास राज्यपाला मार्फत राज्यपातळीवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवण्यास मदत करते हे एकी कडे योग्यच आहे. पण तशा विशेष स्थिती नसताना राज्यपाल हे संघसरकार पेक्षा अधिक स्वतंत्रपणे काम करु शकतील यासाठी काय सुधारणा करता येऊ शकतील या बाबत व्यापक राजकीय सहमतीची गरज असावी असे वाटते.

माहितगार's picture

25 Nov 2019 - 1:01 pm | माहितगार

* आज सगळ्या प्रतिनिधींकडे स्मार्टफोन उपलब्ध असताना आमदार खासदारांच्या कलाची तपासणी करण्याची सुविधा राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे असावी.

*अ‍ॅपच्या माध्यमातून

मग evm सारखे अँप ह्यॅक झाले म्हणून बोभाटा

श्रिपाद पणशिकर's picture

26 Nov 2019 - 5:46 am | श्रिपाद पणशिकर

Although I agree with all your views mentioned above but if conveyed to Government (Let Any Party in power) they will take it as "We are indirectly challenging the Federal Structure and directly the Constitution Of India" and the संविधान खतरे मे है lobby will start braying. So No Chance.

स्मिता दत्ता's picture

25 Nov 2019 - 2:24 pm | स्मिता दत्ता

जे काय चाललंय ते सामान्य जनतेच्या आकलनापलीकडचं आहे यात वादच नाही. यात नैतिकता म्हणून जी काय असते ती पूर्ण रसातळाला गेली आहे हेच प्रामुख्याने लक्षात येत. पक्ष कोणता त्याची उद्दिष्ट वगैरे सगळं बकवास आहे हेच यातून दिसते. खरेतर तशी नैतिकता फार राहिली आहे राजकारणात असं मानणारे दुधखुळे कुणी असतील असं वाटत नाही. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे सगळे कुणाच्याही बरोबर शय्या सोबत करतच आहेत गेल्या कित्तेक वर्षांपासून, त्यामुळं आता फक्त राज्याच्या राजकारणातही काहीहि करण्या पर्यंत मजल गेली इतकंच.
पण तरीही तीर्थरुपांना दिलेल्या वचनासाठी महाराष्ट्रातील जनता कशी काय बांधील असू शकते? हा लाख मोलाचा प्रश्न सतत पडल्याशिवाय रहात नाही. पहिल्या दिवसापासून शिवसेनेचे नेते असा दावा करत आहेत कि त्यांचा मुख्यमंत्री व्हायला हवा. जर त्यांनी ५४ जिंकल्या आणि भाजप चे १०५ आमदार आहेत. अशावेळी थोडी अक्कल लावून जास्तीचं काही पदरात पाडून घेऊ शकत होते. "पण मी वचन दिलंय " हेच पालुपद सुरु!!! अतिशय हास्यास्पद असं हे वर्तन आहे. हि काय जागीर आहे का? लोकशाही आहे ना? मग दोन पावलं पुढं आणि एक पाऊल मागं इतकं साधं तत्व ज्यांना कळत नाही त्यांनी राजकारणच मुळात करावं का हा प्रश्न. !!!! अशा बाळबोध हट्टासाठी सगळा महाराष्ट्र वेठीस धरला. आणि स्वतः बरोबर सगळ्या महाराष्ट्राचंही हसं केलं याला जबादार कोण?
हे सगळंच किळसवाणं असं राजकारण गेल्या महिनाभरापासून चालू आहे. कालचा गोंधळ बरा होता असं म्हणावं अशी रोज नव नवी ब्रेकिंग न्यूज इथं येतीये.

हमाम में सब नंगे !!!! हेच खरं.

जॉनविक्क's picture

25 Nov 2019 - 2:41 pm | जॉनविक्क

हस्तर's picture

25 Nov 2019 - 6:43 pm | हस्तर

https://youtu.be/CLUzgIURz24 गेम मस्त विदेओ

श्रिपाद पणशिकर's picture

25 Nov 2019 - 8:48 pm | श्रिपाद पणशिकर

म्हणा मम
आता आपले नाव व गोत्राचे उच्चारण करावे :- जितुद्दिन भट मुंब्राकर

Hey Fuhrer
इथे Nazi Oath कल्पावि

बेंचवर ;)
अश्या तर्हेने ग्रांड हयात येथे बहुमताचा प्रस्ताव पारित झाला असोन भाजपा चे जुलमि राज्य सरकार पायउतार जाहले आहे ;)

बाळ राजियांना आज सोनिया गांधी च्या नावाची शपथ घेताना पाहोन आता आम्हास आणखी आयुष्यात काहि बघावयाचे राहिले ऐसे वाटत नसोन आम्ही काशी प्रस्थान करीत आहोत. आमेन.

Like in Pakistan ISPR lead by Ghafoora drive the whole Media including Social Media for Local Consumption and to Fool the Goats. Here in Maharashtra Custodians of Sickularism today tried to Fool their Voters by Conducting a Photo Session to prove Majority but obviously Which has ZERO value in the eyes of the law.

आज ह्यांचे व्हिडीओ सेशन आणि शपथविधी समारोह बघोन मला कोण आसुरी आनंद जाहला तो शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. काय अवस्था केलि आहे मोदी - शहा ने ह्यांची.

बंगळूरास एकत्र फोटोसेशन आठवतय का कुमारस्वामी शपथविधी चालले असताना ;)

" काका फक्त शिवसेनेला खेळवतायत.."
हे खरे वाटत नाही ( शरद पवारांची ख्याती माहित असून सुद्धा) हे म्हणजे "शरद पवार कॉन्स्पिरसी थेअरी चे अजून एक उदाहरण वाटते "
कारण हे नाटक मूळ पवारांनीच केले असे गृहीत धरले तर म्हणजे असे होईल कि सरळ हातानं घास घेण्याऐवजी डोक्यमागे वळवून उलट्या हाताने घास घेण्याच्या प्रयत्न
... काय गरज त्यांना? सरळ भाजपशी हात मिळवणी करून सेनेच्या फुग्यातील हवा + लोकांचा फारसा रोष ना पत्करता काढून घेता आली असती कि वर परत "निवृत्ती" जवळ येताना आपण कसे "ग्रँड स्टेट्स्मन " आहोत ते हि दाखवयाला पण मोकळे झाले असते.. लोक काय "साहेब म्हणतील ती पूर्व दिशा" एवढे आंधळे असल्या मुले उद्या साहेब संघाच्या उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून गेले तरी लोक खपवून घेतील एवढी व्यक्तिपूजा ..
अजित पवारांनी काही तरी लोच्या केलाय आणि आता सर्वर कठीण...दिसतंय .. कास बस महाघडाई सरकार येईल असे वाटतंय आणि भाजपची लाज निघणार,, तेंडुलकर पण कधी कधी शून्यावर बाद होऊ शकतो !

जॉनविक्क's picture

26 Nov 2019 - 6:12 am | जॉनविक्क

पण या निवडणुकीत ते लक्षवेधी ठरले हे अमान्य करण्या इतका अंधसुद्धा नाही.

काका साहेब विविध परिस्थितीनुसार ऑन द फ्लाय स्ट्रॅटेजी आखण्यात व ती सुरुवातीलाच ठरवली होती असे ठसवण्यात कमालीचे यश मिळवतात, उदा मागील निवडणूकित सर्व जागांचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपाला पाठींबा जाहीर करणे व सेनेची हवा काढणे वगैरे वगैरे बरीच उदा देता येतील.

म्हणूनच काहीही घडले की त्यामागे साहेबांचा हात आधीपासून नसतो हे सिद्ध करणे किचकट काम बनून जाते. आत्ताही हा घोळ निस्तरता जे काही घडेल ती साहेबांचीच खेळी होते असे छातीठोकपणे बोलणारे बरेच सापडतील. पण नेमकी ही खेळी साहेब करतील असे कोणी स्पष्टपणे आधीच बोलणार नाही कारण... हेच.

भाजपाचा मुख्यमंत्री झाल्यावर मला आसपास कोणीही विशेष आनंदी दिसला नाही जे मला कोड्यात टाकते, जे काही भेटले ते इतरांची फजिती कशी झाली हे बोलायच्या उन्मादात होते वा, साहेबांची खेळी चा ढोल बडविण्यात मशगुल होते अथवा हे सरकार टिकेल काय याच्या चिंतेत होते वा भाजपाने असे करायला नको होते असेही म्हणणारे भक्त दिसले कारण जनमत सत्तेसाठी पूर्ण दुर्लक्षिले गेले आहे असाच भाव दाटून आला य.

भाजपाने जेंव्हा देशहित समोर ठेऊन सर्जिकल स्ट्राईक वा उत्कृष्ट नियोजनबद्ध मास्टर स्ट्रोक दिले ते लोकांनी डोक्यावर घेतले पण हेच कौशल्य ते देशहिताऐवजी पुरेसा जनादेश नसताना निव्वळ सत्ता मिळवण्यासाठी वापरताना बघून लोकशाहीची थट्टा तर होत नाही ना हीच खरी वंचना आहे.

ही खेळी भाजपाने संख्याबळाने प्रथम क्रमांक नसताना केली असती तरही ती कौतुकाचा विषय ठरली असती पण आता सर्वात मोठा पक्ष असूनही जी लाचारता ते दाखवत आहेत त्यातून मोदी करिष्म्यावर जगत असलेला पक्ष म्हणून धोकेच जास्त दिसून येत आहेत

श्रिपाद पणशिकर's picture

26 Nov 2019 - 6:49 am | श्रिपाद पणशिकर

सरळ भाजपशी हात मिळवणी करून सेनेच्या फुग्यातील हवा + लोकांचा फारसा रोष ना पत्करता काढून घेता आली

2014 च्या तुलनेत आजची भाजपा खुप वेगळी आहे निदान विरोधकांच्या दृष्टि ने तरी "विरोधक शेरलॉक विरोधक" ज्याचे काका अध्वर्यु आहेत त्यामुळे काका भाजपा सोबत ते नाही करु शकत जे त्यांनी 2014 मध्ये केले "सरळ हात मिळवणी" प्लस शरद पवारांकडे एक बाप म्हणुन सुध्दा बघितले पाहिजे ह्या बापाला आपलि खरी वारसदार असलेल्या मुलिचे करीयर सुध्दा घडवायचे आहे हे विसरुन नाही चालणार आणि त्यासाठी म्हणुन जे काहि करता येईल जितक्या तबल्यांवर हात पाय ठेवावा लागेल, ज्या काहि चाली खेळाव्या लागतील त्या तो बाप करेल. त्यापैकिच एक मागणी अजित पवारांची आहे "राज्यात मि केंद्रात सुप्रिया" तिथेहि आता शरद पवारांनी रोहित ला आणुन बसवलय तो भाग वेगळा. सगळयात महत्वाचे म्हणजे ह्या बापाकडे वेळ खुप कमी आहे हे तो जाणतो ( परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो)

माझ्या ऐवढ्याश्या प्रतिसादातच आणखी अनेक अलिखित कारणे सापडतील कि ज्यामुळे मला हे कन्फर्म आहे की ह्या मागे शरद पवार आणि अमित शहा आहे, एकाला शिवसेनेचि नेहमी ची कटकट संपवुन त्यांना नमवायचे आहे आणि एकाला आपल्या वारसा करीता एक भक्कम सक्षम करीयर आपल्या हयातीतच घडवायचे आहे.

"शरद पवार कॉन्स्पिरसी थेअरी" वगैरे आपण अंध समर्थक आणि क्लुलेस टिनपाट बिंनडोक मिडिया करता सोडुया.

माझ्यासारखे मत असलेला पहिला माणुस भेटला मला आज.

आता मी काय म्हणतो ते बघा.
निवडणूकांचे निकाल जाहीर झाले आणि सगळे सोशल मिडियावरचे राष्ट्रवादीचे स्वयंघोषित प्रवक्ते शिवसेनेला डिवचायच्या मागे लागले. ज्या दिवशी भाजपाने सत्ता स्थापन करणार नाही म्हणून सांगितले त्या दिवशी त्यांची तोंडे जी बंद झाली ती थेट शपथविधीनंतर उघडली आहेत. आणि जी उघसली आहेत ती देखील शिवसेनेला समर्थन म्हणून नाही, तर संविधानाचा आदर दाखवायला.
याचाच अर्थ केवळ काका नव्हे, तर राष्ट्रवादीमध्ये सार्‍यांना माहीत होते असे काहीतरी होणार आहे म्हणून.
बाकी शह - काटशह, साथ - घात, डाव - प्रतिडाव, पैसा - व्यवहार + राजकारण या शब्दांचे , आणि त वरून ताकभात, हलवायच्या घरावर तुळशीपत्र या सार्‍यांचे शब्दार्थ, वाच्यार्थ, लाक्षनिक अर्थ आणि प्रात्यक्षिक या चारही पायर्‍या उत्तीर्ण झाल्याशिवाय राष्ट्रवादीमध्ये प्रवेश मिळत नाहीत. त्यामुळे उद्या संध्याकाळी काय होणार ती २०-२० पहायला साक्षात परमेश्वर देखील उद्या बाल्कनीत उतरला तर आश्चर्य नको.

बाकी काहीही झाले, तरी
काकांनी पुतण्याच्या सहाय्याने शिवसेनेचा गेम केला
किंवा
काकांनी पुतण्याच्या सहाय्याने भाजपाचा गेम केला
यातले एक काहीतरी होणार.

हस्तर's picture

26 Nov 2019 - 2:14 pm | हस्तर

ती खेळी २०१४ होती ,एक तर तोचपणा नको व मागील वेळी जनतेने शिव्या खूप दिल्या होत्या पाठिंबा दिल्यावर ,आता शिव्या बसतील तर अजित दादांना बसतील

एकाला शिवसेनेचि नेहमी ची कटकट संपवुन त्यांना नमवायचे आहे आणि एकाला आपल्या वारसा करीता एक भक्कम सक्षम करीयर आपल्या हयातीतच घडवायचे आहे.

नेमकं हेच तर साहेबांना नकोय, सेनेचे कायमचे संपणे.

बघूया आज निकाल येईलच न्यायालयाचा.

श्रिपाद पणशिकर's picture

26 Nov 2019 - 7:07 am | श्रिपाद पणशिकर

ओ जानराव
माझा प्रतिसाद पुन्हा एकदा वाचा आणि मि सेनेला "कायमचे संपवणे" हे कोठे लिहियेले हे दाखवोन उपकृत करावे.

साहेब आणि न्यायालय तुम्हाला आणि सुत्रांच्या हवाल्यावाल्या मिडिया ला लला ;)

आपला तर ठाम विश्वास आहे अमित शाह आणि पवार युती असल्याबाबत आणि जरी तो खोटा ठरला ( मि सुध्दा मनुष्य प्राणी आहे चुकायला) तर मग फेरनिवडणुक कन्फर्म सौ टका.

जॉनविक्क's picture

26 Nov 2019 - 7:26 am | जॉनविक्क

श्रिपाद पणशिकर's picture

26 Nov 2019 - 7:09 am | श्रिपाद पणशिकर

लला = लखलाभ

ह्या मोबाइल आटुकरेक्ट चा मुडदा बशिवला ह्याच्या ;)

श्रिपाद पणशिकर's picture

26 Nov 2019 - 8:57 am | श्रिपाद पणशिकर

महाराष्ट्र छोडो मध्यप्रदेश संभालो ;)

ईधर दांव दिखाना कुछ और है और लगाना कुछ और :)

ग्वालियर च्या महाराजांनि आपल्या व्टिटर प्रोफाईल वर असलेली अफाट अशी माहिती काढुन फक्त "Public servant, cricket enthusiast" ठेवल्या मुळे बहुदा मल्लिकार्जुन खर्गे ह्यांना आपला खर्जातला आवाज आता
भोपाळ येथे खर्चण्याचि वेळ आलेली आहे. राजस्थान बद्दल हि बरेच गुर्हाळ सोशलमीडिया वर चालले असुन अजुन तरी ते फक्त हिअर & से ह्या तत्वात आहे.

आमच्या कॉलेज मध्ये एक मित्र सिगरेट चि जादु दाखवायचा सिगरेट ला हात हि न लावता त्याला रोल करायचा... बघणार्याचे सगळे लक्ष सिगरेट वर केंद्रीत करावयाचे मग हळूच कोणाचे लक्ष नाही हे पाहुन तो सिगरेट वर हलकी फुंकर मारायचा ;)

Let them see what you want them to see ;)

हम तुम्हारे अंदर ईतने छेद कर देंगे के समझ मे नहिं आयेगा ;)

ऐन्जाय माडि ;)

माहितगार's picture

26 Nov 2019 - 8:57 am | माहितगार

फ्लोअर टेस्ट लौकर करून मिळावी म्हणून सुप्रीम कोर्टात केस लढवण्याचा खर्च कमी की आमदारांना पंचतारांकीतात सांभाळण्याचा खर्च कमी पडेल.

पुढे मागे कुणा मिपाकरांना राजकीय पक्ष काढायचा झाल्यास उत्तर कामी पडू शकेल या आशेने उत्तर मिळावे हि नम्र विनंती

श्रिपाद पणशिकर's picture

26 Nov 2019 - 9:05 am | श्रिपाद पणशिकर

Just look at the Arguments & Questions by Sibbal and Singhavi in SC i thought they pretend to be moron in public but I was wrong they are Really Moron. They charge around 25 L per hearing ;)

वो सुप्रीम कोर्ट का चेंबर.. वो दो टांगे हवा मे 90° का कोन बनाते हुवे ओर वो नाजुक आवाज मे सवाल "मुझे जज कब बना रहे हो"?
कोणी कोणी ती क्लिप बघितलिय. बेंचवर ;) त्यांनी बेंचवर उभे रहा :)

सुबोध खरे's picture

26 Nov 2019 - 9:52 am | सुबोध खरे

श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी श्रीमती सुधा भालचंद्र सुळे
यांचा सुपुत्र श्री सदानंद सुळे यांचा
श्री शरद पवार यांच्या सुकन्या
श्रीमती सुप्रिया सुळे यांच्याशी शुभ विवाह झालेला आहे.

हि बातमी सार्वजनिक न्यासापासून कशी काळजीपूर्वकपणे लपवलेली आहे त्याचे दुवे जालावर सहजासहजी मिळत नाहीत हे पाहून आपल्याला लक्षात यावे.

http://archive.indianexpress.com/news/we-had-political-differences-but-o...

हे पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात साटेलोटे कसे असतात ते जनतेने ध्यानात घेणे आवश्यक आहे.

श्री शरद पवार शिवसेनेस का संपवणार नाही ?

किंवा

शिवसेना राष्ट्रवादी ला खड्ड्यात का घालणार नाही.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना भ्रष्टाचाराबद्दल पाच वर्षात अटक का झाली नाही? त्यात शिवसेनेचा हात होता का?

आणि आता सुद्धा अजितदादा पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न का सुरु आहेत?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे काळाच्या उदरात दडलेली आहेत. कदाचित सामान्य जनतेस ती कधीही मिळणार नाहीत.

श्रिपाद पणशिकर's picture

26 Nov 2019 - 11:07 am | श्रिपाद पणशिकर

ह्या नात्याचा उल्लेख वाचल्याचे आठवतय
शरद पवारांवर दिल्ली मध्ये ऐका तरुणाने हल्ला केला होता 2011 सालि त्यावेळी बाळासाहेब ठाकरे ह्यांनी त्या तरुणाला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली होती आणि त्याचेच आभार मानायला सुप्रिया सुळे मातोश्री वर गेल्या होत्या त्यावेळीच हे नाते कुठेतरी उल्लेखात आले होते.

मला ज्ञात होते ;)

सुबोध खरे's picture

26 Nov 2019 - 6:13 pm | सुबोध खरे

श्री अजित पवार हे काही केल्या मानायला तयार होत नव्हते.

शेवटी श्रीमती प्रतिभाताई पवार ( श्री शरद पवार यांच्या सौभाग्यवती) आणि
श्री सदानंद सुळे (श्री उद्धव ठाकरे यांचे आतेभाऊ आणि श्रीमती सुप्रिया सुळे यांचे श्रीमान) यांनी त्यांची समजूत काढल्यावर ते माघारी येण्यास तयार झाले.

महायुतीला बहुमत मिळाल्याच्या "दुसऱ्या दिवशी"च श्री उद्धव ठाकरे आम्हाला "दुसरा मार्ग" मोकळा आहे हे कसे काय म्हणाले याचा उगम इथे असू शकेल काय?

तेंव्हा हे सगळे साटेलोटेच आहेत.

यात श्री फडणवीस कुठेच बसत नाहीत.

आजचे त्यांचे (dying declaration) राजीनामा देतानाचे वक्तव्य "शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे कधीही ठरलेले नव्हते " हे याचेच द्योतक असेल काय?

चौकस२१२'s picture

26 Nov 2019 - 6:43 pm | चौकस२१२

शिवसेनेची अरेरावी
अजित पवारांची फसवेगिरी
भाजप ची अति घाई

tridant जवळ राष्ट्रवादीच्या "कार्यकर्त्यांच्या " एकाच वादा अजित दादा वैगरे घोषणा ऐकून किळस वाटली...
हे राम

यशोधरा's picture

26 Nov 2019 - 6:28 pm | यशोधरा

हे नाते ठाऊक आहे.

श्रिपाद पणशिकर's picture

26 Nov 2019 - 10:35 am | श्रिपाद पणशिकर

आपण सगळयांनी ऐकावे असे

आज 26/11 हल्ला होउन अकरा वर्ष झाली त्या निमित्ताने शिव अरुर ह्या पत्रकाराने तत्कालिन वायुसेना प्रमुख फली होमी मेजर यांना ज्यांनी यूपीए सरकार ला पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्डयांवर हवाई हल्ल्यांचा सल्ला दिला होता एक प्रश्न केला कि तेव्हाच्या आणि आताच्या काळात काय बदल झाले आहेत. त्याचे उत्तर आपण अवश्य ऐकावे असे आहे. दुर्दैवाने मि ईथे व्हिडीओ नाही चिकटवु शकत पण आपण तो व्हिडीओ त्यांच्या व्टिटर वर बघु शकता.

Shiv:-- What has changed between 26/11 & now ?
Fali Homi Major:- Political will to undertake air strikes & intelligence gathering to use air power with sure shot targets has improved.

Intelligence gathering बद्दल आपल्या दोन बिंडोक पंतप्रधानांनी (मोरारजी, गुजराल) जेव्हढे नुकसान भारताचे केलेय तेव्हढे नुकसान तर आज पर्यंत पाकिस्तान हि नाही करु शकला आणि त्यांच्या अक्षम्य चुकीने एक्सपोज होउन कित्येक फिल्ड ऐजंट प्राणास मुकले. कठिण परीश्रमाने ती कोव्हर्ट कॅपॅबिलिटि आपण परत मिळवलिय.

26/11 हा दिवस जेव्हा जेव्हा येतो मला धारातिर्थि पडलेले विर आठवतात आणि मनोमन श्रध्दांजलि देतो पण त्याचवेळेस मला आणखी काहि तरी आठवत... कॉंग्रेस पक्षाचे थोर नेते "टंचमाल" ह्या शब्दाचे उध्दारक दिग्विजय सिंह ऐका पुस्तकाचे विमोचन करत आहेत सोबत व्यासपीठावर किरपाशंकर सिंग, थोर दिग्दर्शक महेश भट ज्याच्या मुलाने अप्रत्यक्ष पणे ह्या हल्लयासाठि दाउद हेडलि ला रेकी करायला मदत केलि होति.. असे पुस्तक ज्यात म्हटलय की 26/11 हल्लयामागे पाकिस्तान नसुन हे भारतीय लोकांचेच षडयंत्र आहे.

कसाब जिवंत पकडल्या गेला हे आपले नशिब.

हस्तर's picture

26 Nov 2019 - 2:18 pm | हस्तर

गुजराल ह्यानि काय केले?

हस्तर's picture

26 Nov 2019 - 2:34 pm | हस्तर

https://www.esakal.com/mumbai/ajit-pawar-resigns-238634
अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा; महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप

चौथा कोनाडा's picture

26 Nov 2019 - 2:50 pm | चौथा कोनाडा

अवघड आहे, हे होणारच होते, भाजपचा डाव फसणार म्हणायचा.
भाजप विरोधी लोकांनी चांगलीच एकजूट केलेली दिसते.
नवे सरकार दादांना सिंचनसंरक्षण देणार याच बोली वर उमु पदाचा राजिनामा दिला असणार.

गामा पैलवान's picture

26 Nov 2019 - 6:20 pm | गामा पैलवान

हस्तर,

अजितदादांचा राजीनामा हा भूकंप नाही. कारण की न्यायालयाने उद्या गृहचाचणी (फ्लोअर टेस्ट) घ्यायला सांगितली आहे. महाविकासआघाडीस अजितदादांचा राजीनामा हवा होता कारण की ताबडतोब फडणविसांचा राजीनामा मागता येईल. त्यामुळे जी ७ दिवसांची मुदत होती तिच्या आत महाविकासआघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा दावा दाखल करता येईल.

मात्र न्यायालयानेच ही ७ दिवसांची मुदत संपुष्टात आणून उद्याच गृहचाचणी घेण्यास सांगितली आहे. त्यामुळे दादांचा व फडणविसांचा राजीनामा दोन्ही निरर्थक आहेत.

मात्र अजितदादांनी आपली घासाघीस करायची किंमत शाबूत राहावी म्हणून स्वगृही परतण्याचं सोंग केलेलं असू शकतं.

आ.न.,
-गा.पै.

हस्तर's picture

26 Nov 2019 - 2:59 pm | हस्तर

मला असे वाटतेय सिचन घोटाळ्यातून क्लीन चिट घेतली आणि पळाले

माहितगार's picture

26 Nov 2019 - 3:48 pm | माहितगार

औट घटकेचे एक राज्य पाय उतार आता पुढचा डाव पुढचा भिडू किती काळ हे पाहुया !

अजित दादा राजकीय कुचंबणा झाली पण काही फायलींच्या गाठी औट घटकेच्या राज्यात मंत्रालयात न जाताही सुटू शकल्या अशी वृत्ते आहेत. फायलींना नवीन गाठी पाडण्यास नवी आघाडी मोक्ळी आहे.

चौकस२१२'s picture

26 Nov 2019 - 6:46 pm | चौकस२१२

पण भाजप आणि त्यात अमित श सार्ख्यानं खरंच राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे कि नाही हे पडताळून कसे पहिले नाही? मूर्खपणा

जॉनविक्क's picture

26 Nov 2019 - 7:42 pm | जॉनविक्क

दुसरं काय.

माझ्या दृष्टीने भाजपाला धडा मिळणे या निवडणुकीत आवश्यक होते की सत्ता मोदींपुण्याइवर न्हवे तर कामे करून राखता येते. आणी हा धडा म्हणजे सत्तेबाहेर होणे असे अजिबात न्हवे तर सेनेच्यावचका खाली घुसमटणे होय.

परंतु ज्या अहंकाराने जनादेश दुर्लक्षित करत भाजपाने सेनेला लाथाडले ते पाहून मला उर्मट भाजपाची दयासुद्धा करावीशी वाटेनाशी झाली. गप शहाण्या भावाप्रमाणे वाटण्या मान्य करून मायबाप जनतेच्या सेवेत रुजू होणे सोडून यांना अत्यन्त विपरीत बुद्धी झाली आणी महत्वाचे म्हणजे सर्व पर्याय खुले आहेत असे बोलून सेनेने लगेच हिंट दिलेली होती पण मोदीकरिष्म्याने काहीही मुमकिन्न होउ शकते हा भ्रम जनादेशापेक्षा मोठा असल्याने महाराष्ट्र भाजप नेतृत्व राजकीय आघाडी, मराठी जनतेच्या भावना या दोन्ही पातळीवर कोणासोबतही स्पृश्य होण्यास पात्र उरले नाही.

चौकस२१२'s picture

26 Nov 2019 - 7:52 pm | चौकस२१२

यात भाजपचा काय उद्दाम पण होता? १०५/५६ असताना सेनेने वेडा हट्ट धरला आणि त्रास दिला .. आता हा असा विचित्र विजय जर आपण जनादेश आहे असे समाजात असाल तर धन्य

चर्चेचा तूर्त विषयच मिटला

चौकस२१२'s picture

27 Nov 2019 - 4:58 am | चौकस२१२

मिटवता कशाला उत्तर द्या कि साहेब
- माझे २० तुमचे ८० , १०० चे घेऊ चणे पण मी खाणार ८० त्यातले चालेल?
- उभे केलेले उमेदवार आणि जिकंलेले याची टक्केवारी ७०% भाजपचं, ४०-५०% सेनेचा
५६, ५४, ४५ यापेक्षा १०५ जवळ जवळ ८० ते १००% टक्के जास्त
हे गणित काय कळत नाही कि कळून घायचा नाही

आता म्हणाल कि कोल्ह्याला द्राक्षे आंबटm सत्ता मिळाली का नाही ना वैगरे
येथे त्याचा संबंध नाही आणि ना संबंध आहे कोणाचा भक्त वैगरे असण्याचा
केवळ प्रामाणिक पणे बघता येईल का "भक्ती" वैगरे बाजूला ठेवून
भाजपने शेवटी मूर्खपणा केलं अजित पवरांवर आंधळा विश्वास ठेऊन हे खरेच ,

निवडणुकी पूर्वीची युती याला काही तरी अर्थ असतो , लोकांनी ५६/५४/४५ अशा पूर्व घोषित युती ला मत दिली नाहीत दिली असतील तर १०५+५६ आणि ५४+४५ यांनाच
पण हे लक्षातच घ्याचे नसेल तर काय बोलणेच खुंटले

"परिपक्व लोकशाही" वैगरे ज्या वल्गना केलाय जात आहेत ते बघून हि हसू येत...जगात वेस्टमिनिस्टर पद्धतीचं लोकशाही मध्ये असे त्रिशंकू मतदान होणे नवीन नाही परंतु जो काही तमाशा महाराष्टार्त ३.५ पक्षाने ( ३ महाआघाडीच्या आणि ०.५ भाजपचा शेवटचा) दिसला तो जर जागतिक mapदंडाने बघितला तर लाज वाटते.. असो तो एक वेगळाच विषय आहे

तर चर्चेचा विषयच मिटला.

चौकस२१२'s picture

26 Nov 2019 - 7:55 pm | चौकस२१२

हिंदुत्व म्हणून संघ पेक्षा हि जास्त उर बडवणारी सेना आता काँग्रेस छाया मांडीला मांडी लावून बसणार.. परत धन्य झालो हे ऐकून ,

मदनबाण's picture

26 Nov 2019 - 9:27 pm | मदनबाण

अशी धन्यता मेहबुबा जवळ करण्यात वाटली न्हवती का ?

सध्य स्थितीवर भाष्य :-
सध्या जी काही सर्कस आपण सर्वांनी पाहिली, ऐकली आणि अनुभवली त्याच मुख्य कारण दिले गेले होते ते म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळा साहेब ठाकरे यांना दिलेल वचन !
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसैनिकाला बसवून दाखवतो हे माझे शिवसेना प्रमुखांना वचन आहे ! इति :- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे
तर शिवसैनिक म्हणजे सेनेच्या भाषेतच सांगायचे झालं तर त्यांचे मर्द मावळे ! तर मावळ्यांच्या प्रमुखाने त्यांच्या तिर्थरुपांना एका मावळ्याला मुख्यमंत्रीपदी बसवण्याचे वचन दिले होते.
या वचना अर्थ लक्षात घेता मावळ्यांच्या प्रमुखाने स्वतः मुख्यमंत्री न होता त्यांच्या मावळ्यां पैकी एकाला मुख्यमंत्री केले जाइल असा होतो ! पण आता मावळा प्रमुखच मुख्यमंत्री होणार असेल तर त्यांनी दिलेल्या आणि जगजाहिर केलेल्या वचनाचे काय ? :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- साथिया बिन तेरे दिल माने ना, क्या कहूं क्या करूं कुछ जाने ना... :- Himmat

जॉनविक्क's picture

27 Nov 2019 - 11:31 am | जॉनविक्क

मुफ्ती म्हटल्यावर कलम 370 चा उल्लेख होणार माहीत होते :) आणी अजूनही अनेकांचा हा समज आहे की त्याशिवाय 370 घडू शकले नसते असो.

शिवरायांचे सेनापती म्हणजे शिवरायांचा मावळा न्हवे अशी काही चर्चा अपेक्षित असेल तर दुसरा धागाच हवा.

मदनबाण's picture

28 Nov 2019 - 8:52 pm | मदनबाण

महाराष्ट्राच्या नविन मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !

मुफ्ती म्हटल्यावर कलम 370 चा उल्लेख होणार माहीत होते :) आणी अजूनही अनेकांचा हा समज आहे की त्याशिवाय 370 घडू शकले नसते असो.
आपण राजकारणातले तज्ञ दिसता, ३७० युती शिवाय बिना कागदपत्र मिळवता कसे घडु शकले असते ते समजुन घ्यायला आवडेल.

शिवरायांचे सेनापती म्हणजे शिवरायांचा मावळा न्हवे अशी काही चर्चा अपेक्षित असेल तर दुसरा धागाच हवा.
लिखाणीतील खोच आपल्या लक्षात आलेली दिसत नसल्याने ती स्पष्ट करतो... मावळा मुख्यमंत्री झाल्यास सेनापतीला स्वत:च्या हातात रिमोट ठेवुन कोणत्याही जवाबदारी / बांधिलकी न स्विकारता कारभार करता येतो, तसेच अनेक गोष्टी उघड करण्याचे बंधन असत नाही ! जे सेनापतींच्या तिर्थरुपांनी आजन्म मोठ्या चातुर्याने आणि कौशल्याने साध्य केले होते. आता स्वतः चे उत्पन किती हे देखील सेनापतींना उघड करावे लागेल बहुधा. :) आदेश देउन कामे करता येणार नसुन आता विविध बैठका, दौरे इं अनेक सोपस्कार सातत्याने पार पाडावेच लागतील ज्याचा अनुभव सेनापतींकडे नाही. या गोष्टी ठावूक असल्यानेच मावळ्याला सेनापती करण्याचे वचन दिले गेले होते, परंतु पाठिंबा देणार्‍यांनी या पदासाठी फक्त सेनापतींचा आग्रह धरल्याने दुसरा पर्याय शिल्लक उरला नाही आणि रिमोट मात्र तेल लावलेल्या पैलवानाच्या हातात गेला, नव्हे तर तर ती त्यांचीच खेळी होती असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे मावळ्याला मुख्यमंत्री करता आले नाही आणि वचन दिल्याचा खरा फायदा उठवता आला नाही.
असो... महाराष्ट्रातील खड्ड्यात गेलेल्या जनतेचे आणि निसर्गाच्या अवकॄपेचे धनी झालेल्या शेतकरी वर्गाचे प्रश्न नविन सरकार प्रामाणिकपणे सोडवेल अशी अपेक्षा करुया.

जाता जाता :- व्यक्तीश: एक मतदार म्हणुन मला दोन्ही पक्षांचा राग आहे, कारण मत दिले ते युती होती म्हणुनच ! मतदारांच्यामुळे आपण राज्य करतो याचा विसर सर्वच राजकारणी पक्षांना पडला आहे हे आता ठळकपणे दिसले, कुठेतरी मतदारांची उघड फसवणुक भासते. तर पंचतारांकित हॉटेलातील वास्तव्यात मौज मजा करुन आमदार मंडळींनी या पुरोगामी महाराष्ट्राच्या संकॄतीची लाज खुंटीला टांगली हे देखील याच राज्याच्या सामान्य जनतेने पाहिले आणि ते त्यांना आवडलेले नाही. कोट्यावधीची हॉटेलची बिले करण्यासाठी सर्व पक्षांकडे बक्कळ पैसा होता पण सामान्य जनतेच्या हितासाठी मात्र यांचे खिसे हलके होताना कधी दिसलेच नाही.
कालाय तस्मै नम:॥

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जब हम जवाँ होंगे जाने कहाँ होंगे लेकिन जहाँ होंगे वहाँ पर याद करेंगे तुझे याद करेंगे... :- Betaab

जॉनविक्क's picture

29 Nov 2019 - 12:24 pm | जॉनविक्क

आपण राजकारणातले तज्ञ दिसता, ३७० युती शिवाय बिना कागदपत्र मिळवता कसे घडु शकले असते ते समजुन घ्यायला आवडेल.

तज्ञ तर आपणच दिसता, तेंव्हा नेमकी कोणती कागदपत्रे मिळत न्हवती हे कृपया स्पष्ट करावे.

कारण मत दिले ते युती होती म्हणुनच

अगदी अगदी.

सेनापती मावळ्याचा मुद्दा कळाला.

तज्ञ तर आपणच दिसता, तेंव्हा नेमकी कोणती कागदपत्रे मिळत न्हवती हे कृपया स्पष्ट करावे.
छे, मी काही तज्ञ वगरै नाही... वरती भांउच्या व्हिडियोत भाउंनी उल्लेख केला आहे म्हणुन तसे म्हणालो. तज्ञ असतो टिव्हीवर जाउन बरीच बडबड मात्र नक्की केली असती ! :))) अन् राजकारणी असतो तर बुडाखाली फोर्च्युनर ठेवुन रान रेडा पळतो तशी पळवली असती ! :)))
बादवे राजकारणात रिसेशन वगरै काही नसते, शिवाय कोणतेही काम न करता आयुष्यभर बक्कळ पेंशन मिळण्याची सोय देखील होते ! राजकारण्यांना राज्याची आणि देशाची काही पडलेली नसते ! सगळी घराणी बघा नुसती हपापल्या सारखी गिळत आहेत, वर बोंब ठोकायची आमच्या पक्षात घराणेशाही नाही, आमच्या बाब्याला तुम्ही म्हणजे जनतेने स्विकारले आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आवारापन बंजारापन एक ख़ला है सीने में हर दम हर पल बेचैनी है कौन बला है सीने में... :- JISM

सुबोध खरे's picture

29 Nov 2019 - 8:09 pm | सुबोध खरे

बाण राव
इतके परखड (सत्य असले तरी) लिहू नये

लोक नाराज होतात.

ओक्के डॉक, यापुढे काळजी घेतो. धन्यवाद.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आवारापन बंजारापन एक ख़ला है सीने में हर दम हर पल बेचैनी है कौन बला है सीने में... :- JISM

शाम भागवत's picture

26 Nov 2019 - 9:22 pm | शाम भागवत

जबरदस्त ध्रुविकरण झालय.
महाराष्ट्रात आता भाजप व भाजप विरोधी असे दोनच पक्ष शिल्लक राहिले आहेत.

श्रिपाद पणशिकर's picture

26 Nov 2019 - 11:58 pm | श्रिपाद पणशिकर

एकंदर घडणार्या घटनाचे आकलन मेंदू ने त्याच्या मध्ये संचित असलेल्या व्यक्ति सापेक्ष माहिती च्या आधारे करुन आम्हास जे सार दिले ते आम्ही शब्दबध्द केले आणि स्वत: चा पोपट करुन घेतला.
आणखी एक गोष्ट आज नोटिस केलिय जी आणखी बर्याच महानुभावांनी केलि असेल, माझा मोठ भाउ आज ते रीपब्लिक समिट बघत होता तेंव्हा त्याने " ये चिंट्या हे बघ की मोदीचा चेहरा बघ तो अर्णब तिकडे स्तुति करतोय पण ह्यांचे लक्षच नाहिये" मोदि सरकार वर गेल्या सहा वर्षात अनेक कठिण प्रसंग आलेत पण मनातलि चलबिचल आणि क्रोध ह्या व्यक्ति ने कधी चेहर्यावर नाही दिसु दिला जो आज स्पष्ट दिसत होता.
पाच वर्षात केंद्र सरकार ने विरोधी पक्षातल्या
जवळपास सर्व प्रमुख नेत्यांविरोधातल्या केसेस मध्ये ऐविडंस गोळा करुन मजबुत अशा केसेस तयार करण्याचा सपाटा लावला होता / आहे आतापर्यंत त्याला Vindictive असे स्वरुप येउ नये म्हणुन मोदी 1.0 शांततेत गेले आणि "बदला नंबर वन" हा चित्रपट आपल्याला मोदी 2.0 मध्ये पहायला मिळेल ह्या आशेत भक्तजन असतांना आजच्या घडामोडी ने एका Catalytic Agent चे काम केलेय असा माझा कयास आहे. त्यामुळे काहि दिवस शांततेत जातील... मग सुरु होईल सुडनाट्य वड्याचे तेल वांग्यावरच नाही पण आणखी इतर भाज्यांवर हि निघेल. साहजिकच हा माझा अंदाज आहे आणि तो आजच्या सारखाच चुकिचा ठरो परमेश्वरा कारण शेवटी ह्यात आपण सामान्य जनताच भरडलि जाणार आहे.

कह रहा है शोर ए दरीया से समंदर का सुकुत
जिसका जितना जर्फ है उतना ही वो खामोश है

चौकस२१२'s picture

27 Nov 2019 - 4:44 am | चौकस२१२

फेकं फेक न्युज
-एक पक्षाचे लोगो वैगरे बदलण्याचे टेंडर काढण्यात येत आहे
माझी कंपनी खालील सादर करीत आहे आपण पण करा
- रंग बदलवून भगव्याचा पांधरा करणे किंवा मिळमिळीत पिवळा
- वाघाचे चिन्ह काढून कोणता प्राणी घाव्या? मांजर तर साहजिक आहे पण त्यापेक्षा तरस किंवा लांडगा ? किंवा प्राण्याऐवजी उगारलेला हात + खंजीर असे असावे काय?
किंवा रडणारे पण रागीट दिसणारे बाळ ! ( नो pun इंटेंडेड )
- ब्रीदवाक्य = आला आजी सोनियाचा दिनू
- उप्ब्रिदवाक्य = संजय उवा च ( जोडशब्द नाही वेगळे शब्द)
तसेस काही गोष्टी गुंडाळून ठेवण्या साठी मोठया पेटाऱ्याची आवश्यकता आहे
- कडवे हिंदुत्व
- सावरकर हा शब्द आणि त्याबरोबर चे सगळे
- पुरंदरेंना दिलेले पाठिंबा वैगरे वैगरे
- तसेच वांद्रे ते दिल्ली व्हाया बारामती अशी नवीन विमानसेवा करण्यात येणार आहे ती जोरात चालणार आहे त्या कंपनी मध्ये शेअर विकण्याचे आहे , ग्यारंटीड नफा पुढली १५ वर्षे ( विश्वास बसत नसेल तर tridant मधील पदवी समारंभ बघा विडियो बघा .. १५ वर्षे जगणार म्हणत्यात )

प्रसाद_१९८२'s picture

27 Nov 2019 - 5:50 pm | प्रसाद_१९८२

"ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव दैनिक"

हि सामनाची टॅगलाईन आता बदलणार की काढून टाकणार आता शिवसेना.

माहितगार's picture

27 Nov 2019 - 7:22 pm | माहितगार

उद्धवजींनी हिंदुत्वाची नवी व्याख्या केली आहे!

चौकस२१२'s picture

27 Nov 2019 - 6:19 pm | चौकस२१२

ह लेख उत्तम प्रश अचुक उत्तर नहित
https://www.esakal.com/saptarang/political-article-about-maharashtra-gov...