केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दि. १५ ऑक्टोबर २०१९ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार देशभरातील सर्व शाळांमध्ये परसबाग उभारणे अनिवार्य केले आहे. या सुचना देण्यामागचे उद्देश
- ताज्या भाजीपाल्याच्या उपलब्धतेने बालकांमधील कुपोषण व जीवनसत्वाची कमतरता हटविणे
- शालेय वयोगटात बागकाम प्रात्यक्षिक व निसर्गपूरक जीवनशैलीची आवड जोपासणे
- शालेय वयोगटात पोषणमूल्य असलेल्या नैसर्गिक आहारीय पदार्थांची ओळख होणे
मुलांचं वारंवार आजारी पडणं, त्यांचं वर्गात मन न लागणं, सुट्टीच्या बहाण्याने शाळेतून पळून जाणं, हे सगळंच नियमित चित्र आहे . शाळेच्या आवारात सेंद्रिय पध्दतीने बियांची लागवड केली तर मुलं स्वतः परसबाग फुलवण्यात गुंतलील. भाज्या वाढू लागल्या आणि मध्यान्ह भोजनात त्यांचा वापर होऊ लागेल. विविध भाज्यांमुळे आहार रूचकर होऊ लागेल. स्वावलंबनाचे धडे मुलांना सहज देता येतात, हेही या परसबागेच्या प्रयोगातून साध्य होईल. कमी वेळात, कमी खर्चात सकस आणि संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने भाज्यांचं उत्पादन आरोग्यासाठी खूप उपयोगी पडते .
या समुहात हा विषय मांडायचा उद्देश असा की कोणत्याही इतर शासकीय उपक्रमासारखाच हा अजून एक उपक्रम होऊन जावू नये म्हणून आपण काय करू शकतो याची चर्चा घडवून आणणे . मी एक प्रस्ताव इथे मांडतो . चर्चेनुसार जे ठरेल तसे पुढे जावू या. .
- काही शाळा आपण या उपक्रमासाठी निवडू.
- एकाकडे एका शाळेची जबाबदारी
- आतापर्यंत इथेच वेगवेगळया पोस्टद्वारे मिळालेले ज्ञान, कदाचित बियाणे यांचा वापर करून त्या शाळेतील परसबाग वर्षभर सक्रीय राहील या करीता आवश्यक ते प्रयत्न करणे , यात प्रत्यक्ष शाळा भेट, व्याख्यान , मार्गदर्शन सामील आहे.
- त्या शहरातील डॉक्टर संघटनेच्या मार्फत वर्षभरातून एकदा बालकांची आरोग्य तपासणी करून घेणे (या कमी मी स्वत: राज्यभर समन्वय करू शकेन)
या विषयावर चर्चा होवून काहीतरी ठोस उपक्रम उभा राहील याबाबत मला विश्वास आहे. केंद्र शासनाची मार्गदर्शक तत्वे कोणास वाचावयाची असतील तर कृपया vcdatrange@gmail.com या इमेल आय डी वर मेल करा .