"कारण"मिमांसा

शा वि कु's picture
शा वि कु in काथ्याकूट
28 Oct 2019 - 6:16 pm
गाभा: 

आज आपण जे काही शिक्षण घेतो, जे काही करतो, जे काही महत्वाचे वैश्विक ज्ञान आपण मिळवले आहे, ते सगळे आपल्या चिकित्सक वृत्ती आणि कारणमीमांसा यामुळे आहे. प्रत्येक विचारी मनुष्य आपले कार्य एका आधारस्थंभावर करत असतो, तो आधारस्थंभ म्हणजे एक गृहीतक (presumption) आहे- प्रत्येक गोष्टीची प्रत्येक स्तिथी जशी आहे, ती तशी असण्याला काहीतरी कारण आहे. प्रत्येक गोष्टीचे कारण आपल्याला माहित नाही, पण ते शोधणे कायम चालूच असते.
एखाद्या गोष्टीचे कारण सापडले, तर त्या कारणाचे कारण शोधणे सुरु होते, त्यानंतर त्यानंतर त्या कारणाच्या कारणाचे कारण and so on.
त्यापुढे, काही कारणं हि तात्पुरती (शोध असलेल्या गोष्टीपुरतीच) असतात,तर काही कारणं आणखी व्यापक असतात (प्रश्नाचे केंद्र नसणाऱ्या संबंधित किंवा असंबंधित गोष्टींची उत्तरे सुद्धा मिळतात).
उदा.-
Carcinogenic गोष्टीच्या सेवनाने कर्करोग होतो, हे कर्करोगाच्या अनेक कारणांपैकी एक आहे. हे का होतं ? तर ह्या गोष्टी पेशींमध्ये mutation घडवून आणते. हे mutation पेशीविभाजनास सतत हिरवा कंदिल देत राहते आणि पेशींची त्यामुळे अनियंत्रित वाढ होते. हे mutation का होतं, तर (उदा.) सिगरेट मध्ये असलेल्या निकोटिन, टार सारख्या घटकांमुळे. निकोटीन मुळे हे का होतं ? तर त्याच्या रासायनिक रचनेमुळे आणि पेशींमधले घटक आणि निकोटिन मधले घटक ह्यामध्ये होणाऱ्या प्रक्रियांमुळे. याही पुढे गेल्यावर आपल्याला मुख्य कारण सापडेल ते म्हणजे निकोटिन आणि त्या गटातील रसायनांचे वागणे. आणि हि वागणूक केवळ कर्करोगापर्यंत नाही, तर इतर गोष्टींचे सुद्धा स्पष्टीकरण देते (उदा- निकोटिन मुळे मिळणारी आनंददायी संवेदना).
जर हे एका tree diagram मध्ये काढले तर सिगारेट ओढणे हीं सर्वात खालची शाखा असेल, पेशींचे mutation त्यावर, आणि निकोटीनचे गुणधर्म त्यावर असेल. पेशींच्या mutation मधून इतरही शाखा निघतील (उदा.- उत्क्रांतीमध्ये होणारे बदल). तसेच, निकोटिन आणि समान रसायनांच्या गुणधर्मातून सुद्धा परिणामांच्या अनेक शाखा निघतील. (उदा- निकोटिन मूळे मिळणारी आनंददायी संवेदना).

आता मुख्य मुद्द्यावर. जर प्रत्येक कारणांच्यावर कारणे असतील तर खालील दोन शक्यता आहेत:
1) अंतिम सत्य- वरील उदाहरणात दाखवल्या प्रमाणे, पुढील कारणे हि आधीच्या कारणांपेक्शा अधिक व्यापक आहेत. प्रश्नाचा केंद्रबिंदू सोडून आणखी बऱ्याच गोष्टींचे हे कारण आहेत. त्यामानाने खालील शाखांची कारणे प्रश्नाचा केंद्र सोडून भटकत नाहीत. तस जर असेल, सर्व कारणांमागे एक किंवा अनेक (finite) अंतिम कारणे आहेत, ज्याच्या पुढे काही कारण नाही, आणि ते dictated आहे. थोडक्यात, ते अंतिम सत्य आहे. हे एकच असेल असे नाही, तर अनेकही असू शकतात. या अंतिम सत्यांच्या परस्पर संबंधातून सम्पूर्ण tree structure बनते.
पण जर हे असे असेल, तरी आपलं presumption कि प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे हे खोटं ठरलं. तर मग विज्ञानाचे क्षेत्र केवळ या अंतिम सत्यांमध्ये खेळून भौतिक फायदा करून घेणे इतपतच मर्यादित राहील. ज्ञानपिपासू विज्ञान अर्थहीन होऊन जाईल.

2) अनंत कारणांची शिडी-
यात अंतिम सत्य नाही. प्रत्येक गोष्टीमागे कारण असणारच. पण हे असे जग आपल्याला तर बुवा imagine करता येत नाही.

तुम्हाला काय वाटत ?

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

28 Oct 2019 - 6:33 pm | जॉनविक्क

ते जाणून घ्यायचे काय कारण?

शा वि कु's picture

28 Oct 2019 - 6:35 pm | शा वि कु

टाईमपास हो

आपुलेची द्वैत आपणासी

एक गोष्ट लक्षात आली का गीता प्रेस गोरखपूर म्हणते तसे आपला द्वैतभाव जगाशी अजिबात नाही आहे, थोडे सुक्ष्म निरीक्षण करा मग लक्षात येईल की हा आपला द्वैतभाव फक्त आणी फक्त आपल्या शरीराशी मर्यादित आहे आणखी कशाशी नाही.

हेच बघाना,
समजा मी आग आहे तर, तर मला भाजेल का ? अर्थातच नाही कारण आग आगीला कितीही गरम असली तरी थोडंच भाजून काढते ? ती तर त्यांना भाजू शकते जे आग नाहीत, अन्यथा आगीने सर्व प्रथम स्वत:लाच थांबवायचा प्रयत्न केला नसता का चटके बसतात म्हणून ? आणी तसे झाले तर ती प्रज्वलीत होऊन दुसऱ्याला जाळणार कशी ? म्हणजे आग स्वतःला भाजू शकत नाही हे नक्की, मग ती किती का गरम असेना...

थांबा खूप सोपं आहे, म्हणूनच निसटून जाते आणी आपण अवघड समजतो.

आता वरील न्यायाने मी म्हटले मी रागावलो आहे तर मला खरेच राग आलेला असेल का ? अर्थातच नाही कारण जर मी रागावलो असेन तर तो राग मला अनुभवाला येणार नाही कारण मी रागावलोय तर मग तरीही मी रागाचा अनुभव कसाकाय करतोय? हे शक्यच नाही, मी वेगळा आणी राग वेगळा हे नक्की, अन्यथा मी रागाचा अनुभव करूच शकलो नसतो. क्या बात है अन इतके दिवस मी चिडतो याच भ्रमात होतो की मी, किती संतापलेलो आहे असे समजायचो मी स्वतःला (रागाचे हे विवेचन आंनद, निराशा वगैरे वगैरे वगैरे मनाच्या सर्व भावनांना लागू).

असो राग तसेही मनाचे आचरण आहे जे सूक्ष्म आहे, म्हणून गोष्ट अजून सुलभ करूया.

आता हा हात माझा आहे म्हणालो तर तो हात मी आहे असे म्हणता येईल का ? अर्थातच नाही कारण जर मी च हात आहे तर त्याला माझा म्हणायचे द्वैत मी निर्माण करेन कशाला ? मी सरळ सरळ मीच हात आहे इतके म्हणून मोकळा होईन ना, माझा कशाला म्हणेन मी *त्याला* :)
म्हणजे जी जी गोष्ट मी माझी आहे म्हणू शकतो ती गोष्ट मी नाही हे सूत्रही पक्के झालेकी. मग ती गोष्ट माझ्या जन्मजात शरीराचा भाग का असेना....

अरे झाली ना गंम्मत, मी *माझ्या शरीराचा* भाग असा उल्लेख केला ना ? जर हातच मी नाही तर ते आख्खे शरीर तरी मी कसे असेन (उगाच का ते सोडून जायचे आहे एक दिवस ?)

बस नेमका हाच मुद्दा आहे, एकदा का हे आपले शरीर म्हणजे आपण न्हवे हे सुसंगतपणे सामोरे आले की आता फक्त माझा माझ्या शरीराशी द्वैतभाव का आहे या एकमेव प्रश्नाचे उत्तर येणे बाकी उरते ते समजले की सारे द्वैत समाप्त झाले की :)

कारण जेजे द्वैत म्हणून माझ्या अनुभवास येत आहे त्या सर्वच्या सर्व माझ्या शरीरातिल पचेंद्रियांच्या अनुभूती आहेत, आणी मुळात माझे शरीरच मला द्वैत आहे तर त्याद्वारे आलेल्या कोणत्याही अनुभूती मला कायमच द्वैतच असणार ना ? म्हणून म्हणतो या जगात आपला द्वैत भाव हा फक्त आणी फक्त आपल्या शरीराशी आहे इतर कशाशी नाही, आणखी कोणी काही म्हणत असेल तर ते फक्त बोलणे समजावे. हे शरीर द्वैत म्हणून त्याच्या पंचेंद्रियांमार्फत अनुभवत असलेलेहे जग व बाकी सर्वकाही आपल्याला आपल्याहून विलगच भासत होते, आहे व भासत राहणारच. कितीही अध्यात्मिक प्रगती करा जन्माला आलेले कोणीही सदेह वैकुंठाला गेलेले नाही, द्वैत देहाचा तो धर्मच नाही मग सो कॉल्ड अध्यात्मिक अधिकार काहीही असुदे, असो...

आणी हो फक्त शरीरच न्हवे बरे का तर आपले विविध भावनांवर हिंदकोळणारे जागृत मनही आपण नाही, कारण ते शरीराचा भाग आहे आणी त्यातील भावना आपण अनुभवूही शकतो जसे की वर उदा रागाचे दिले, तसेही आपले आपल्या मनाशी द्वैत नसते तर इतरांशी अथवा जे द्वैत आहे त्यांच्याशी संपर्क करायला निर्माण झालेली ही बोली भाषा आपण एकांतात असो वा नसो स्वतःशीच बोलायला मनातल्या मनात कशाला वापरली असती ? भाषा हे इतरांशी संपर्काचे माध्यम आहे तर वेड्यासारखे आपण स्वतःशी भाषेचा आधार घेऊन का सगळे विचार करतो अन मग फसत राहिलो भावनांच्या द्वैत चक्रव्युव्हात तर आश्चर्य कसले ?

म्हणून प्रयत्न करुया भाषेशीवाय संवाद स्वतःशी नक्की सुरू होईल , अगदी जन्मापासून सर्वांनी, आई बाबांनी, गुरुजनांनी आपल्याला उठसुठ भाषेच्या वापराचीच जी सक्ती व सवय ज्ञानार्जनापासून व्यक्त होण्यापर्यंत सगळीकडे करायला लावलीयना म्हणून हे घडू शकते हा विचारही करायला जड जाते आहे इतकेच, एखादा स्नायू व्यायामा शिवाय राहिला की तो कमकुवत व कुचकामी होतो म्हणजे असे नाही की तो त्याच्या क्षमता योग्य व्यायामाने पुन्हा तयार करू शकणार नाही, जरा प्रयत्न करूया, या द्वैत असलेल्या शरीराच्या व त्याच्या अधिष्ठानावर उभे असलेल्या जागृत मनाच्या मायारुपी सागरात भरकटलेल्या मनाचे आपल्याशी असलेले द्वैत ओलांडून जाऊया. बाकी काही करायचे उरतच नाही
_/"\_

प्रचंड साधं सोपं आहे म्हणून समजून घ्यायचे निसटून जातं इतकंच. सतत घडणाऱ्या श्वासोच्छ्वासाची जशी खरी किंमत तो अडकला की लक्षात येते तसेच हे साधं सोपं मर्म उमजायला लागले त्याची खरी अनुभूती प्रकट व्हायला सुरुवात होते

थोडक्यात समोरील व्यक्ती म्हणजे मी नाही, तो आणी मी वेगळा आहे याचा अनुभव आपण करतो याचे मूळ कारण आपुलेची द्वैत आपणासी हेच आहे.

शिप ऑफ थिसीअस ची आठवण झाली.
अजून पूर्ण समजलं नाहीये.
आपण शरीरही नाही आणि मनही नाही तर मग आपल्याला भौतिक अस्तित्व काय ? कारण आपली अस्तित्व कल्पना पूर्ण भौतिकशास्त्रावरच आधारलेली आहे.

मग आपल्याला भौतिक अस्तित्व काय ? कारण आपली अस्तित्व कल्पना पूर्ण भौतिकशास्त्रावरच आधारलेली आहे.

समजून करणार काय ह्याचे उत्तर द्या, मनोरंजनच असेल तर एखादा विनोदी चित्रपट का बघत नाही. बरेचदा आपण असे प्रश्न उपस्थित करतो उत्तरे हुडकत फिरतो जे मुळात प्रश्नच नसतात बाकी स्वानुभवापलीकडे कसलेही खरे ज्ञान अस्तित्वात नाही हे नक्की समजा.

मनोरंजनात वाइट काय असेही म्हणाल, तर मनोरंजन ही एक किक आहे उत्तेजना आहे आणी कोणताही शोध घ्यायचा असेल तर विषयाप्रती खरे प्रेम असणे आवश्यक असते जे आपला उत्साह निर्मिती करते आणी वाटेत निर्माण झालेल्या अडचणींमुळे आपल्याला विचलीतही होऊ देत नाही...

...आज प्रत्येकजण प्रत्येक बाबतीत इतक्या घाईमधे आहे की आपण नेमकं कुठे आहोत आणी आपल्याला कुठे जायचे आहे याचे भानही आपल्याला येत नाही, आणी अश्या कमालीच्या कृत्रिम वेगवान स्पर्धायुक्त म्हणूनच उथळ जगात जगताना आपल्या मनाला सतत कार्यरत राहण्यासाठी, ताजेतवाने ठेवण्यासाठी उठसूट कोणत्या ना कोणत्या तीव्र उत्तेजनांची किकची गरज पुन्हा पुन्हा लागत आहे, अन्यथा हे आयुष्य फार कठीण, कंटाळवाणे वा निरस होउन नैराश्य वा पराकोटीच्या व्यसनाधीनतेचा फार मोठा धोका आपल्या समोर उभा राहतो. म्हणूनच भौतिक जगाची खरी व्याख्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे जग न्हवे तर सतत कोणत्या ना कोणत्या उत्तेजनांवर स्वार होउन त्यांच्या ग्लानीमधे आयुष्य कंठणारे विश्व अशी करता येईल.

उदा. मद्य उत्तेजना आहे, कामवासना उत्तेजना आहे, साधं झोपेच्या गोळ्याही झोप येण्यासाठीची उत्तेजनाच आहे, विविध भडक रहस्यकथा वाचणे उत्तेजना आहे, अगदी गुरू हुडकणेसुद्धा उत्तेजना बनू शकते. पण खरी आध्यात्मिकता ही उथळ भौतिक भावनिक उत्तेजनांची न्हवे तर खोल अनुभवांची बाब आहे. म्हणूनच जोपर्यंत आपण आपल्या मनाला उत्तेजनांच्या उथळ जगात भटकू देत राहू आपण कधीही भौतिकता समग्रपणे समजू शकणार नाही.

शा वि कु's picture

1 Nov 2019 - 6:12 pm | शा वि कु

प्रश्न अध्यात्माचा नव्हताच मुळात.

जॉनविक्क's picture

1 Nov 2019 - 6:44 pm | जॉनविक्क

ति समजुन घ्यायला आधी त्यापासुन वेगळ होणे आवश्यक आहे.

शा वि कु's picture

1 Nov 2019 - 6:19 pm | शा वि कु

उदा. मद्य उत्तेजना आहे, कामवासना उत्तेजना आहे, साधं झोपेच्या गोळ्याही झोप येण्यासाठीची उत्तेजनाच आहे, विविध भडक रहस्यकथा वाचणे उत्तेजना आहे, अगदी गुरू हुडकणेसुद्धा उत्तेजना बनू शकते. पण खरी आध्यात्मिकता ही उथळ भौतिक भावनिक उत्तेजनांची न्हवे तर खोल अनुभवांची बाब आहे.

हे खोल अनुभव पण एक प्रकारची उत्तेजना नाहीका? मग सिनेमा बघून मिळणारी उत्तेजना आणि यात फरक काय ?

जॉनविक्क's picture

1 Nov 2019 - 6:47 pm | जॉनविक्क

खोल अनुभव हि उत्तेजना नाही. उत्तेजना तत्कालिक असतात म्हणून त्या उत्तेजना असतात.
तुम्हाला अगदी ध्यान करुन खोल अनुभव वगैरे वगैरे आला आणी काहि क्षणानी तो नाहिसा होत असेल तर ति उत्तेजनाच होय.

शा वि कु's picture

1 Nov 2019 - 7:00 pm | शा वि कु

अर्थात तुम्ही कुठं म्हणाला नसला तरी दीर्घ चांगलं आणि तात्कालिक वाईट असा आशय वाटला. तसं तरी का ? कारण शेवटी दीर्घ काळ म्हणजे जास्तीत जास्त तुमचा जीवनकाल. जर तोच जीवनकाल सतत तात्कालिक समाधान मिळवत घालवला तर यात तुलना कोणत्या पायावर होणार ?

तो अर्थ घेतला तर दीर्घ शब्दाची योजनाच विरोधाभासी ठरेल.

बाकी सतत काही मिळवत राहण्यात प्रॉब्लेम इतकाच आहे की सतत तीच गोष्ट हळू हळू कमी पडू लागते आणि त्यासाठी ऊर्जा बरीच खर्च करते म्हणजे उत्तेजना हवी कंटाळा जावा म्हणून व त्या उत्तेजनानेच कंटाळा तयार होऊन मन अजून वैतागते

शा वि कु's picture

1 Nov 2019 - 10:13 pm | शा वि कु

पण म्हणून काही तत्कालीन समाधानाला कमी लेखण्याचे कारण नाही. वेगवेगळ्या मार्गाने तो मिळू शकतोच. आता ऑफ ट्रॅक गेलोच आहोत तर...
माझ्या मते मानवी आयुष्याचे उद्दिष्ट हे हव्याहव्याश्या संवेदना मिळणेच आहे. (आणखी समर्पकपणे म्हणलं तर pleasant sensations).
या संवेदना व्यक्तिसापेक्ष बदलतात. दारुड्यासाठी नशा, साधुसाठी भक्तीची गुंगी, धडपड्या व्यवसायिकासाठी व्यवसायातले थ्रिल इत्यादी. काही वेळा या संवेदना bizarre फॉर्म घेऊ शकतात, ज्या बहुतांश लोकांना उमगत नाहीत. उदा- स्वतःची कीव करत राहणे आणि स्वतःच्या जखमा मोजत आपलं दुःख किती महान आहे याचा विचार करणे, स्वतःला शारीरिक इजा पोहोचवणे,इत्यादी.
अध्यात्मिक सुख जे तुम्ही म्हणत होता ते ही एक हवीहवीशी संवेदनाच. मानवाचे सगळे शोध, पराक्रम, सगळे काही दोनच गोष्टींसाठी झालं असं म्हणता येईल (objectives can be boiled down to two things)
1. मानवी आयुष्य वाढवणे, सुखकर करणे, मूलभूत गरजा पूर्ण करणे
2. आनंददायी संवेदना मिळवण्याचे नवीन मार्ग शोधणे (आयुष्य वाढवण्याचे कारण पण हेच. आनंददायी संवेदना मिळवण्यासाठी आणखी वेळ मिळवणे)
तुम्ही जसं म्हणता, कि सतत तीच गोष्ट मिळण्याने त्याचा कंटाळा येतो, ते योग्यच आहे. पण जेव्हा असं होईल, तेव्हा माणसाची हव्यहव्याश्या संवेदनांची व्याख्या बदलेलच, आणि तो त्याप्रमाणे आपले मार्गही बदलेल.

आता समजा तो लय फेवरीट आहे आणी वॉर चित्रपट बघायची तीव्र उत्तेजना आहे.

मला आवडतो, मी वॉर चित्रपट बघितलाही आहे आणी तुम्ही मला तो कसा अफलातून आहे आणी मी एकदा बघितला असूनही पुन्हा पुन्हा कसा त्याच उत्साहात मी तो बघणे कमी महत्वाचे का नाही यावर लोभस प्रवचन लिहीत आहात, उद्या माझ्या जागी तुम्हीही असाल आणी तुमच्या जागी दुसरा तुम्ही

शा वि कु's picture

2 Nov 2019 - 6:58 am | शा वि कु

तुम्ही जसं म्हणता, कि सतत तीच गोष्ट मिळण्याने त्याचा कंटाळा येतो, ते योग्यच आहे. पण जेव्हा असं होईल, तेव्हा माणसाची हव्यहव्याश्या संवेदनांची व्याख्या बदलेलच, आणि तो त्याप्रमाणे आपले मार्गही बदलेल

झालंच तर टर्मिनेटर डार्क फेट पण.

जॉनविक्क's picture

2 Nov 2019 - 3:32 pm | जॉनविक्क

प्रॉब्लेम आंनद न उरण्यात आहे, म्हणून तो पुन्हा पुन्हा निर्माण करावा लागतोय.

शा वि कु's picture

2 Nov 2019 - 7:16 am | शा वि कु

चित्रपटातून मिळणारा आनंद हा तर आपण परत परत घेतोच कि.

जॉनविक्क's picture

2 Nov 2019 - 3:29 pm | जॉनविक्क

आणी नंतर नंतर तो आंनदही उरत नाही, म्हणून अजून जोमाने तो मिळवायचा प्रयत्न करतो हाच तर प्रॉब्लम आहे.

तर उभ्या आयुष्यासाठी एकच चित्रपट पुरेसा होता. तो ही एकदाच बघणे

उत्तेजना म्हणून बघत आहात आंनद फार दूर राहिला आहे

कारण जेजे द्वैत म्हणून माझ्या अनुभवास येत आहे त्या सर्वच्या सर्व माझ्या शरीरातिल पचेंद्रियांच्या अनुभूती आहेत,

हे वाचून...

M

याची आठवण झाली... आणि परत मी , प्रगाढ निद्रेत परतलो....

ट्री सट्रक्चरनंतर एकदम हा खालचा निष्कर्ष कसा काय काढलात?

पण जर हे असे असेल, तरी आपलं presumption कि प्रत्येक गोष्टीमागे कारण आहे हे खोटं ठरलं. तर मग विज्ञानाचे क्षेत्र केवळ या अंतिम सत्यांमध्ये खेळून भौतिक फायदा करून घेणे इतपतच मर्यादित राहील. ज्ञानपिपासू विज्ञान अर्थहीन होऊन जाईल.

- (लेखातला मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करणारा) सोकाजी

शा वि कु's picture

28 Oct 2019 - 7:08 pm | शा वि कु

अंतिम सत्याला पुढे काही कारण नाही. ते आहे तसं पचवायच आहे. आपलं गृहीतक होतं की प्रत्येक गोष्टीला कारण आहे.

हे गृहीतक नसुन हेच अंतीम सत्य आहे.

तसं बघितलं तर संपूर्ण ट्री स्टक्चर अंतीम सत्यानेच ओतप्रेत भरलं आहे... किंबहुना अंतीम सत्याचीच ति रुपं आहेत. आपल्याला प्रश्न पडतो "हे असं का?". आणि हा प्रश्न तिथेच संपतो. "का?" प्रश्नाचं विश्लेषण "कसं?" मेथेडॉलॉजीने सुरु होतं आणि मग "का?" वेगवेगळ्या रुपात भेटत राहातो... कारण आपण "का?" शोधतच नाहि... आपण केवळ "कसं?" शोधु शकतो.

"अंतिम सत्याचं अस्तित्व" ipso facto "प्रत्येक गोष्टीला कारण आहे " हे बाद करत नाही का ?

अर्धवटराव's picture

3 Nov 2019 - 4:31 am | अर्धवटराव

प्रत्येक गोष्टीला अंतीम सत्यच एकमेव कारण आहे. ति गोष्ट तिथेच संपते.

गामा पैलवान's picture

1 Nov 2019 - 7:14 pm | गामा पैलवान

जॉनविक्क यांचे हे प्रतिसाद तुफान म्हणजे तुफ्फान आवडले :

१. https://www.misalpav.com/comment/1052232#comment-1052232
२. https://www.misalpav.com/comment/1052240#comment-1052240

-गा.पै.