गायीचे दूध, गोमूत्र, इ.
मला पडलेला एक प्रश्न असा आहे की, गायीच्या दुधाचे - आणि तुपाचे, गोमूत्राचेही - जे फायदे वर्णन केले जातात त्यात खरोखरच काही तथ्य आहे की त्या सर्व गप्पाच hearsay असतात?
शोध घेतला तर असे समजते की गायीच्या दुधात जे प्रोटीन्सचे molecules (रेणू?) असतात ते म्हशीच्या दुधातल्याहून आकाराने लहान असतात त्यामुळे गाईचे दूध पचायला जास्त सोपे असते. बाकी अन्य प्रकारच्या दुधापेक्षा त्यात काही खास गूण नाहीत.
ह्याहून अधिक माहिती मला तरी मिळालेली नाही.
बाकीचे सर्व फक्त सिद्ध न झालेले दावेच आहेत का? उदा. माझा एक कोकणातील मित्र म्हणाला की, गायीच्या शेणाने जर जमीन सारवलेली असेल तर तिथे मुंग्या येत नाहीत. तेच जर म्हशीचे शेण असेल तर एक दिवसातच मुंग्या लागतात. हे असे दावे मी तरी पुरेशा पुराव्याच्या (empirical डेटा) अभावी केवळ दावे म्हणून सोडून देतो.
जेव्हा म्हैस भारतात आली नव्हती, तेव्हा फक्त गायीचेच दूध होते. आणखी काही असतील: शेळीचे, गाढविणीचे, इ. त्यामुळे जर आयुर्वेदात गायीचे दूध असा उल्लेख असेल तर तो स्वाभाविकच म्हणावा लागेल. परंतु तो काही पुरावा होत नाही.
ह्याबद्दल कुणा मिपाकरांना काही अधिक माहिती असेल तर ती शेअर करावी, ही विनंती.
ह्या विषयावर पूर्वी चर्चा झाली असल्यास संपादकांनी हा धागा उडवावा, ही विनंती. (पण माझे कुतूहल शिल्लक राहीलच.)
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गायीचं दूध व उंच डच
वैदिक या अवैदिक.
माहित नाही.
गाय
नुकतेच माझा कट्ट्यावर
सर टोबींना जेवढ्या गाई मारल्या गेल्या तेवढी नोबल पारितोषिके
आता कुणी मोठे रोग झाल्यावर
गोमूत्राचा औषध म्हणून वापर
गोमुत्राचे अतीसेवन ??????????
अतिसेवन म्हणजे वैद्याचा सल्ला
गायीचे दूध, गोमूत्र, इ.
गोमुत्र, त्रिफळा काढा, वगैरे
कृपया मार्गदर्शन करावे.
नुसते गोमूत्र विकून काही
जर कुणाला गोमुत्राच्या
फक्त देशी गायीचंच मूत्र वापरा
खरंतर
गोमुत्राच्या फळझाडांवर
माफ करा, सदरील लेखात अनेक