काही वैयक्तिक कारणांमुळे मला तातडीने माझ्या गावी जावे लागत आहे. त्यामुळे उद्याचा पाताळेश्वर येथील अंक वितरण कट्टा रद्द करत आहोत.
अंक मिळण्याबाबत अधिक माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.
अंक वितरण कट्टा
नमस्कार मंडळी आताच पहिलावहिला छापील दिवाळी अंक माझ्या हाती आला आहे. पुण्यातील मिपाकरांचा सोयीसाठी दिवाळी अंक वितरण कट्टा शनिवारी दि. २६/१०/२०१९ रोजी १०:३० ते १२:३० वाजे दरम्यान आयोजित करत आहोत.
ठिकाण: आपले नेहमीचेच
पाताळेश्र्वर मंदिर, जंगली महाराज रोड.
अंकाबाबत अधिक माहिती:
स्पॉन्सर, जाहिराती आवर्जून न घेता पहिला अंक काढला आणि अत्यंत मर्यादित प्रती आहेत
ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन-तीन एक्स्क्लुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार पूर्वप्रकाशित गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्रही ठेवण्यासाठी. विशेषतः पहिला अंक, आणि कदाचित अग्रणी मराठी संकेतस्थळांपैकी छापील अंकाचा पहिलाच प्रयोग यासाठी या अंकाचं महत्त्व असेल.
एकूण लेख: ४५
पृष्ठ संख्या: १४०
किंमत: २५०₹
प्रशांत:
प्रतिक्रिया
24 Oct 2019 - 11:07 pm | बाबा योगिराज
मला एक हवा. पहिला छापील अंक संग्रही हवाच. सगळा व्यवहार मी दिवाळी नंतर करेन. येत्या सोमवारी फोन करून प्लॅन कळवतो.
25 Oct 2019 - 1:00 am | एकुलता एक डॉन
ब्यनि बघा
25 Oct 2019 - 5:00 am | फारएन्ड
पण मी पुण्यात सध्या नसल्याने तेथे येउ शकत नाही. राखून ठेवू शकाल काय? मी नंतर पिक अप करेन.
25 Oct 2019 - 6:33 am | श्रीरंग_जोशी
अंकाच्या विमोचनाचे फेसबुक लाइव्ह द्वारे प्रक्षेपण थेट प्रक्षेपण करावे ही विनंती.
25 Oct 2019 - 6:34 am | सुक्या
मी अमेरिकेत आहे. इथे अजुनही काही लोक परदेशात अन्क कसा मिळेल असे विचारत असतील.
व्यवहार ओन लाइन होउ शकतो. परन्तु अन्क कसा मिळेल?
25 Oct 2019 - 9:15 am | श्रीरंग_जोशी
अमेरिकेत मागवायचा टपाल खर्च खूप अधिक होईल. यामुळे मी माझ्या भारतात राहणार्या आप्तांना अंक घेऊन ठेवण्यास सांगितले आहे. तसेही अंक ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. मिपाचा पहिला छापील दिवाळी अंक संग्रही असावा हाच उद्देश आहे भले त्यासाठी काही महिने अथवा वर्षे विलंब का होईना.
25 Oct 2019 - 8:49 am | विजुभाऊ
मुम्बैकरांसाठी कसा आणि कुठे मिळू शकेल अंक?
कोणा एकाकडे गठ्ठा पाठवला तरी तो इतरांकडे पोहोचवता येईल
26 Oct 2019 - 10:48 am | पाषाणभेद
एक करता येवू शकते.
एक शेवटची तारीख ठरवा. येथेच कळवा. अन त्या तारखेपर्यंत बुकींग घ्या. आधी पैसे घ्या. ( ते महत्वाचे आहे. परमार्थ नंतर.)
तेवढ्या प्रती छापा.
(आणि खूप विलंबही नको.)
अन मुंपुठानानाको ( मुंबई-पुणे-ठाणे-नाशिक-नागपूर) असा हब करा.
त्या त्या ठिकाणच्या मिपाकराला तेवढ्या प्रती पाठवा. (नाशकात मी जबाबदारी घेईन अन अंक द्यायला त्यांच्या घरीही जाईन (अन दिवाळीचा फराळ हादडेन!))
तो मिपाकर इतरांशी संपर्क करून एकमेकांत बोलणे होवून अंक हातोहात देतील.
आणि मिपाकरांच्या दिवाळी अंकाच्या हार्डकॉपीची पहिली खेप असल्याने मिपाकर तेवढे सहकार्य करतील.
बघा. कसं जमतंय ते!
25 Oct 2019 - 11:04 am | मनिष
व्यनि केला आहेच, उद्या येतो कट्ट्याला.
25 Oct 2019 - 1:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
युके मधल्या मिपाकरांपैकी माझ्या व पद्मावती तैं व्यतिरीक्त अजुन किती जणांनी छापील प्रत राखुन ठेवायला सांगितली आहे?
26 Oct 2019 - 11:36 am | ज्ञानोबाचे पैजार
हा मेसेज उशीरा पाहिला, पाताळेश्वराला पोचल्यावर
पैजारबुवा,
26 Oct 2019 - 8:35 pm | सुखी
काय राव, आत्ता बघितले, आता मिळू शकेल का?
Exclusivity maintain करायची हे कळू शकत, पण ज्यांना इच्छा असून मिळू शकलेला त्यांनी काय करायचं?