मिसळपाव updates आणि त्या सोबत एक गोष्ट मोफत: कॉपी टू कॉपी - माशी टू माशी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
17 Oct 2019 - 8:04 am
गाभा: 

(कॉपी टू कॉपी - माशी टू माशी)

बरेच लोक मिसळ खातात पण खाण्याच्या गडबडीत तर्री ऑर्डर करायची विसरून जातात म्हणून हा एक धागा
तसेच ह्या वेळी सोलापूर मध्ये करमाळा येथे १० रुपयाला १ मसाला पाव आहे
कोणी फीडबॅक देऊ शकेल?
ह्या भागात ह्या वर्षी खाद्यजत्रा लागली होती का ?

---------------------------------------
(अनेक बाबतीत लिहीता आले असते. पण टंकाळा केला. तुम्ही लिहा मात्र.)

कॉपी टू कॉपी - माशी टू माशी - आजच्या पिढीसाठी गोष्ट (हेच नविन साहित्य आहे.)

एका शाळेत वर्गशिक्षकांनी मुलांना गृहपाठ करायाला सांगितला होता. एका हुषार मुलाने तो करून आणला. मग शाळेत त्याची वही एका सामान्य मुलाने घेतली अन घाईघाईत त्याचा उतारा केला. त्यातली वाक्ये जशीच्या तशी होती. गृहपाठ करतांना त्या हुषार मुलाच्या पानावर शाई ओली असतांना माशी बसली होती. त्या माशीच्या
पायाला शाई लागली अन ती माशी त्या पानावर जशी फिरली तशी नक्षी उमटत गेली.

वरताण म्हणजे या सामान्य मुलानेदेखील तशीच नक्षी उतारा मारतांना आपल्या वहीत काढली होती असे वर्गशिक्षकांना वह्या तपासतांना लक्षात आले.
मग ते म्हणाले "कॉपी टू कॉपी - माशी टू माशी."

अशी ही कथा.

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

17 Oct 2019 - 3:40 pm | जालिम लोशन

ओरिजनल लक्षात आले नाही! सांगळे सरांचे लिखाण आहे का?

चाणक्य's picture

17 Oct 2019 - 3:43 pm | चाणक्य

.

आनन्दा's picture

17 Oct 2019 - 10:02 pm | आनन्दा

उशीरा कळला अर्थ!