घारगे

गणपा's picture
गणपा in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

घारगे

साहित्य :
२ वाट्या लाल भोपळा सोलून त्याचा कीस
१ वाटी किसलेला गूळ
कणीक आणि तांदळाचं पीठ (अंदाजे कणकेच्या निम्मं) हे लागेल तसं.
तळणासाठी तेल
पिठीसाखर
साजूक तूप
चवीनुसार मीठ

कृती :
एका कढईत २ चमचे तूप गरम करून त्यात भोपळ्याचा कीस घालून परतून घ्या. नंतर त्यावर झाकण लावून कीस चांगला वाफवून घ्या.

कीस शिजून मऊ झाला की त्यात गूळ घाला. गूळ वितळला आणि मिश्रणाला चांगली उकळी आली की आच बंद करा आणि हे मिश्रण गार करत ठेवा.

मिश्रण गार झाल्यावर त्यात मावेल तेवढी तांदळाची पिठी आणि कणीक यांचं मिश्रण घाला. हे प्रमाण अंदाजानेच घ्या, साधारण पुरीसाठी भिजवतो तितपत घट्ट पीठ भिजवा.

पुरी एवढ्या आकाराचे गोळे करून घारगे लाटून घ्या.

कढईत गरम तेलावर घारगे लाल रंगावर खरपूस तळून घ्या.

गरमागरम घारग्यांवर चहा गाळणीतून पिठीसाखर भुरभुरा.
आवडीनुसार वरून साजूक तूपाची धार सोडा.

IMG-20190621-124936

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Oct 2019 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंबर एक. आवडली वेगळी पाककृती. अजून पाककृती करते राहा..!!

-दिलीप बिरुटे

पद्मावति's picture

26 Oct 2019 - 1:10 pm | पद्मावति

आहाहा..मस्तंच!

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 1:21 pm | यशोधरा

छान.

सुमो's picture

26 Oct 2019 - 3:54 pm | सुमो

छानच...
पण
गणपा टच मिसल्यासारखं वाटतय

२ वाट्या लाल भोपळा सोलून त्याचा कीस

इथे बाsरिक किसलेल्या लाल भोपळ्याचा फोटो

असे पाकृच्या प्रत्येक कृतीचे कलात्मक फोटो हीच गणपा यांची खासियत आहे.

अथांग आकाश's picture

27 Oct 2019 - 1:03 am | अथांग आकाश

लई भारी !
0

हरिहर's picture

29 Oct 2019 - 8:49 am | हरिहर

मस्त पाकृ.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2019 - 9:03 am | प्रकाश घाटपांडे

आसावरी घारगे ला कॊम्पिटीशन गणपा घारगे :)

चला काका तुमचं आपलं काहितरीच.
याला काय अर्थ ये का?
ए शेंगदान्या, इकडं ये. काका काय म्हनतेत पाहिलं का? तुला रे काय घारग्यांची चव कळती का? गाढवच ए नुसता. व्हय तिकडं!

टर्मीनेटर's picture

4 Nov 2019 - 8:00 pm | टर्मीनेटर

आवडली रेसिपी...घारगे हा खाद्यप्रकार मनापासून आवडतो!

घारगे हा प्रकार आवडत नाही पण गणपाचं सादरीकरण मस्तच.

पाषाणभेद's picture

6 Dec 2019 - 1:38 am | पाषाणभेद

मंग पयल्या तळणीचा माल ये हा.
तोंडात टाका फक्त. लगेच पानी व्हईन बघा.

आता याला काय अर्थ ये का?

श्वेता२४'s picture

4 Nov 2019 - 9:56 pm | श्वेता२४

याला आम्ही घार्या म्हणतो. पण लाटावे एवढे पीठ घालत नाही. हाताने लहान आकाराच्या गोल घार्या (नीट टाईप होत नाहीय हा शब्द) थाप तो. जरा जाडसर असतात व टुम्म फुगतात. याच्यावर आम्ही लोणी लाऊनच खातो. अहाहा आता करतेच.

मुक्त विहारि's picture

23 Nov 2019 - 9:36 am | मुक्त विहारि

आता मी पण फोटो शिवाय पाक कृती टाकू शकतो.