कानोसा पाकिस्तानचा १ - दि १२ ऑक्टोबर २०१९

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in राजकारण
13 Oct 2019 - 1:36 am

मित्रांनो,
भारतीय राजकारणात अनेक बदल होत आहेत. त्याचे पडसाद शेजारी पाकिस्तानवर पडणे अटळ आहे. म्हणून तिथे भारताबद्दल काय बोलले जाते, त्यांच्या अतर्गत घटनांचा आपल्या रजकारणावर काही प्रभाव पडतो का? यावर टीव्ही माध्यमातील चर्चेच्या अनुरोधाने काही लिखाण सादर. त्यात म्हटले गेलेले बोल जसेच्या तसे नसले तरी सार रूपाने समजून घ्यायला सोपे जावे म्हणून दिले आहेत.
सदर आवडले तर पुढे चालू ठेवता येईल...

मोबाईलवरून पहायला सोईचा आकार ठेवता आहे. याबाबत काही सुचना असतील तर त्यांचे स्वागत.

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

13 Oct 2019 - 4:17 am | श्रीरंग_जोशी

>>मोबाईलवरून पहायला सोईचा आकार ठेवता आहे. याबाबत काही सुचना असतील तर त्यांचे स्वागत.

सध्याचे मिपा डिव्हाइसनुसार इंटरफेस स्वतः अ‍ॅडजस्ट करते. यासाठी लेखन प्रकाशित करणार्‍यांना काही वेगळे करायची गरज नाहीये.

शशिकांत ओक's picture

13 Oct 2019 - 12:31 pm | शशिकांत ओक

नमस्कार, आपण म्हणता तशी जुळवणी धाग्यातील पहिल्या परिच्छेदात दिसून येते. त्यानंतर जे लिखाण चौकटीतून दिसते त्यास उद्देशून म्हटले आहे. अजूनही काही प्रमाणात दुरुस्त करून हवे आहे. संपादक मंडळाचे सदस्यांनी ते करायला मदत केली तर आवडेल.

हे सर्व न्युजनेशन , एनडिटिवी, अशा चानेलांवरून सतत चालूच असते. आपली मते हवीत.

शशिकांत ओक's picture

13 Oct 2019 - 12:43 pm | शशिकांत ओक

जे वेगवेगळ्या माध्यमातून पाकिस्तानी घडामोडींवर लक्ष देतात. त्यांना ते माहित असणे अपेक्षित आहे. या शिवाय असे कोणी असतील ज्यांना समजून घ्यायला आवडेल अशांना ते माहितीपूर्ण वाटावे.
या धाग्यावर मी माझे मत मांडायपेक्षा इतरांनी आपले मत प्रदर्शित केले तर चांगले आहे. कदाचित नंतरच्या चर्चेत सहभागी व्हायला आवडेल.

शशिकांत ओक's picture

15 Oct 2019 - 12:23 am | शशिकांत ओक

चीन सोडवणार काळ्या यादीच्या घशात जाण्यापासून... हिलालीना खात्री वाटते...

शशिकांत ओक's picture

15 Oct 2019 - 12:32 am | शशिकांत ओक

इथे दिसणारे मोर्चात सामिल हजारो इंतेहा पसंद तरूण आता हातात दंड लाठ्या घेऊन पिवळ्यारंगाचा गणवेश धारण करून इस्लामाबादच्या सडकांवर दिसणार आहेत...!

शशिकांत ओक's picture

18 Oct 2019 - 11:28 pm | शशिकांत ओक

नाव आले नाही म्हणजे जणू आपण FATF वर विजय मिळविला आहे असे त्यांचे वर्तन आहे

जेम्स वांड's picture

13 Oct 2019 - 12:33 pm | जेम्स वांड

रोज उठून नेटवर बघितलं तरी पाकिस्तानातील बातम्या कळतीलच की, त्यावर काही विश्लेषण असते तर मजा आली असती वाचायला.

शशिकांत ओक's picture

20 Oct 2019 - 2:39 pm | शशिकांत ओक

जे अपेक्षित होते ते सुरू झाले.
पहले आप म्हणून दोघांनी एकमेकांना दोषी ठरवून तोफाबारी चालू करायची. नंतर त्यांनी सुरवात केली वगैरे वगैरे कांगावा करीत सुटायचे...
यात आतंकवादी तळाला संरक्षण देणार्‍या पाकिस्तानी तळावर हल्ले करून ते आतंकवादी तळ नष्ट केल्याचे सांगितले जाते आहे. एका बाजूला श्रीनगरमध्ये काही भागात फास ढिला करायचा व बॉर्डरवर आग ओकायची हे तंत्र अपेक्षित वाटचाल करीत आहे.

निवडणूक प्रचारावावेळी हे युद्ध झाले असते तर बरीच प्रचारसभा गुंडाळाव्या लागल्या असतात
आचारसंहिता संपल्यावरच हे सुरु होणे म्हणजे गजब टाईमिंग आहे

Rajesh188's picture

21 Oct 2019 - 11:45 pm | Rajesh188

पाकिस्तान च्या चार पट
भूमी नी मोठा असणारं.
लोकसंख्येत पाकिस्तान पेक्षा ७/८ पट मोठा असणारा भारत .
दरडोई utpadanat.
मात्र पाकिस्तान पेक्षा जास्त मोठा नाही .

योगविवेक's picture

22 Oct 2019 - 12:04 am | योगविवेक

दरडोई utpadanat.
मात्र पाकिस्तान पेक्षा जास्त मोठा नाही .

अशा कागदी उत्पन्नाला काही अर्थ नाही हो.
अहो, त्यांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे जर डोई किती आहे... याचा विचार करता का? ते मात्र कागदावर नाही प्रत्यक्ष आहे.

Rajesh188's picture

22 Oct 2019 - 12:38 am | Rajesh188

स्वतंत्र मिळाल्या नंतर भारत,पाकिस्तान,बांगलादेश हे तिन्ही देश जास्त प्रगती करू शकले नाहीत.
भारत पाकिस्तान आणि बांगला देश पेक्षा जास्त प्रगत नाही.
आणि नेमके हेच सत्य आपण
स्वीकार त नाही.
उलट पाकिस्तान आपल्याला प्रगती मध्ये
कधी ही varchad ठरेल
अशी अवस्था आहे .
इंडस्ट्रियल क्रांती नंतर
जगातील सर्व च देशात फरक पडला आहे ..
पण भारतीय उपखंड
जगाची बरोबरी करू शकला नाही
खरे मान्य करून
पुढील मार्ग स्वीकारणे शहाणपण आहे .
भ्रमात राहणे चुकीचे आहे

भारताचे प्रश्न वेगळे आहेत. एकदम साठ कोटी जनतेला पुढे नेणे अवघड आहे.
चीनचे म्हणाल तर त्यांनी कॉम्युनिझम जवळपास सोडली आहे. रशियाने केव्हाच.
इतर छोटे देश पर्यटनाच्या माध्यमातून डॉलर्स कमावत आहेत. त्यांंच्याकडे उद्योग नाहीत. महिला अत्याचार घटनांमुळे या वर्षाचा आपला पर्यटन व्यवसायही धोक्यात आहे.
आपल्या औद्योगिक उत्पादनाला चीनची टक्कर आहे.

भारत, पाकिस्तान, बांगलादेश हे तिन्ही देश जास्त प्रगती करू शकले नाहीत.

भारतीय उपखंड जगाची बरोबरी करू शकला नाही

खरे आहे... पण कारणांची यादी पाहिली तर ते स्वाभाविक होते असे वाटते...

पाकिस्तान आपल्याला प्रगती मध्ये कधी ही varchad ठरेल
अशी अवस्था आहे .

अहो हे जरा मान्य होणे अवघड आहे. आपण अणुशक्तीची शस्त्रांची प्रगती म्हणाल तर ते एक वेळ मान्य आहे. पण अन्य बाबतीतील प्रगतीत जीवनमरणाचा प्रश्न बनलेल्या भयानक करबुडव्या, परदेशात माया केल्यामुळे कारागृही बसवलेल्या जरदारी, नवाज शरीफ पंतप्रधानांची पत, काश्मीरच्या प्रश्नातील गोंधळाची अवस्था, इमरानखान यांचे डळमळीत स्थान यामुळे अर्थव्यवस्थेची वाट लागलेली असताना ते वरचढ ठरतील म्हणणे साहसी आहे हो.

पाकिस्तानमधे रोजच्या रोज काहीतरी विचित्र घडामोडी घडत असतात.
सध्याच्या काळात पाकिस्तान आर्मी चीफ यांच्या सेवा मुदतीत वाढ करण्यात झालेल्या गोंधळातून बाहेर पडे पर्यंत आता मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा ठोठावल्यामुळे आर्मीचा संताप वाढलाय. ती शिक्षा रद्द करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. ती मानली नाही तर सिव्हिलियन हुकूमतला खतरा येतो. इम्रान खान यांच्या डुगडुगत्या संख्या प्राबल्यावर परिणाम होणार आहे हे दिसते आहे. अदलिया म्हणजे जुडीशियरीला नाराज करण्याशिवाय इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाला पर्याय नाही!
या घरातील वातावरणात राज्य करणे दुरापास्त झाले आहे यात आणखी एका परराष्ट्र धोरणाच्या फजितीची भर पडली आहे. कौलालंपूर, मलेशियाच्या राजधानीत एका नव्या मुस्लिम गटाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यात शरीक व्हायला इम्रान खान १८, १९ डिसेंबर रोजी जाणार आहेत याच्या मोठमोठ्या पाट्या, जाहिराती झळकल्या आहेत. आता एकदम मी येऊ शकत नाही असे त्यांनी मलेशियाच्या पंतप्रधान मोहातिर यांना कळवले गेले! यावर रुष्ट झालेल्या मलेशियाने मग तुमचे डेलिगेशन पण पाठवू नका म्हणून सुनावले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सौदी अरेबियाने इम्रान खान यांना रियादला बोलावून खान यांचे कान पिळले. 'खबरदार तिथे गेलात तर' ... म्हणताच पैसे देणार्‍याचे गाढव पण रागदारीत खिंकाळते असे म्हणत. मलेशियाच्या निमंत्रणाला येऊ शकत नसल्याचे स्पष्ट सांगितले.
मलेशिया, तुर्कस्तान, इराण, कतार यांनी काश्मीरच्या प्रश्नावर पाकिस्तानला सहानुभूती दाखवली होती...
आपल्याला काय वाटते पुढे काय होणार हे समजून घेण्यासाठी उत्सुक.

परवेझ़ मुशर्रफ यांना जिथे असतील तिथून जरी ते मेले असतील तरी त्यांची लाश रस्त्यावरून घसीटकर पाकिस्तानात आणावी. इस्लामाबादच्या डी चौकात तीन दिवस लटकवून ठेवून नंतर फाशी द्यावी. अशी शिक्षा दिली गेली.
अशी शिक्षा कुराणात सुद्धा नाही! हां माणूस जीवंत असे पर्यंत त्याला दगडांनी ठेचून मारले, कोडे लगावले तर ते चालतात कारण शरीया कायद्याने त्याला मान्यता मिळाली आहे. पण 'लाश' झाल्यावर तसे मारणे अमानुष अत्याचार आहे...!
जीवंत माणसांवर जर अशी अमानवी वागणुक केली तर काहीच चूक नाही. कारण कुराणात त्याला मान्यता आहे ! हे 'दिव्य सात्विक विचार' पाकिस्तानी स्कॉलर व सरकारी वरिष्ठ अधिकारी ओराया मकबूल यांनी मांडले आहेत...!! ऐकून कान तृप्त झाले!