निम्मी

चाणक्य's picture
चाणक्य in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

निम्मी

निम्मी छळत राहते अधूनमधून
..
सगळं काही सुरळीत चाललेलं असताना
एखाद्या वळणावर अचानक निम्मी भेटते
आणि मग....
सगळं अंधुक होत जातं
दिसत राहते ती फक्त निम्मी
ऐकू येतो तो फक्त तिचाच आवाज
जाणवत राहतं ते फक्त तिचंच अस्तित्व
तिचा तो जीवघेणा सुगंध,
पुढच्या कित्येक रात्री बरबाद करत राहतात
सतत चाहूल... भास... भ्रम
..
निम्मी साली छळत राहते अधूनमधून
..
निम्मी एखाद्या श्वापदापेक्षा कमी नाही
तिचं नुसतं बघणं,
सावजावर स्थिरावलेली नजर वाटते
तिच्या साध्यासाध्या हालचाली,
शिकारीसाठी घेतलेले पवित्रे वाटत राहतात
त्यातून तिचं ते बोलता बोलता मध्येच ओठ आत मुडपून घेणं
किंवा
एखादं वाक्य बोलून गर्रकन गिरकी घेऊन वळणं
कुणालाही जागच्या जागी खलास करू शकतं
..
निम्मी सुंदर आहे
लहरी आहे
निडर आहे
हट्टी आहे
प्रसंगी निर्दयी आहे,
पण ढोंगी नाही
भरकटणं तिचा स्थायिभाव आहे
आणि कितीही नाही म्हटलं
तरी आपणही भरकटतोच तिच्यामागे
का तिलाही तेच हवं असतं... कुणास ठाऊक
.....निम्मीला सांभाळणं सोपं नसावं
..
निम्मी अप्राप्य वाटते.. असेलही... आहे
त्यामुळेच कदाचित,
तिचं जबरदस्त आकर्षण वाटत राहतं
तिच्याकडून नक्की काय हवंय
हे कळत नाही
पण,
तिच्या सतत आसपास राहावसं वाटतं
तिला हात लावून बघावासा वाटतो
कदाचित,
लांबून वाटते त्यापेक्षाही तलम असेल ती
तिचे लांबसडक केस छेडावेसे वाटतात... सतारीच्या तारांसारखे
पण,
सतारीपेक्षाही त्यांतून सारंगीचेच स्वर यायची शक्यता अधिक
..
निम्मीचे डोळे म्हणजे धरणाची भिंतच जणू
पलीकडे प्रचंड पाणी असणारे
त्या लोंढ्यात वाहून जायची तयारी असेल
तरच तिच्या नजरेला नजर द्यावी.
निम्मी अथांग आहे,
तिच्या डोळ्यातल्या पाण्याइतकीच
आणि स्वतःच स्वतःच्या तळाशी आहे
वर दिसतात ते फक्त तिचे तरंग
..
निम्मी एक वादळ आहे
मन मानेल तिथे जाते, वाटेतलं सगळं भिरकावून देते
आणि दूर कुठेतरी जाऊन शांत होते.
..
निम्मी एक धुमसणारी आग आहे
कधी हळूहळू पसरत जाते, कधी एकदम भडकते
तर कधी असह्य धग देत राहते.
..
निम्मी हळूहळू गर्द होत जाणारं रान आहे
सुरुवातीला पायवाटा स्पष्ट दिसतात
नंतर मात्र वाट चुकत जाते.
..
निम्मी एकदा का तुमच्या आयुष्यात आली
की तुमची तिच्यापासून सुटका नाही
ती छळत राहणार.. अखंड... मरेपर्यंत
..
निम्मी एक जहाल विष आहे
पण एक ना एक दिवस मरायचंच आहे
तो यह जहर ही सही...

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 2:00 pm | यशोधरा

अचाट, अफाट, सुंदर.

कुमार१'s picture

27 Oct 2019 - 9:07 pm | कुमार१

छान आहे. आवडली .
दिवाळी शुभेच्छा !

जॉनविक्क's picture

27 Oct 2019 - 11:50 pm | जॉनविक्क

पण मजा आली.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Oct 2019 - 4:35 am | मिसळलेला काव्यप्रेमी

माया मेमसाब आठवली

मनिष's picture

30 Oct 2019 - 1:55 am | मनिष

निम्मी एक जहाल विष आहे
पण एक ना एक दिवस मरायचंच आहे
तो यह जहर ही सही...

अफाट. सुंदर.
बिली जोएलचे she's always a woman to me हे आवडते गाणे आठवले.

She can kill with a smile
She can wound with her eyes
She can ruin your faith with her casual lies
And she only reveals what she wants you to see
She hides like a child
But she's always a woman to me

पद्मावति's picture

30 Oct 2019 - 5:04 am | पद्मावति

जबरदस्त!

चाणक्य's picture

31 Oct 2019 - 2:33 pm | चाणक्य

निम्मी लिहिली याचं श्रेय यशोधरा यांना आहे. खरं तर मला ठरवून लिहिणं...विशेषतः कविता ..जमत नाही. माझी मर्यादा. त्यामुळे सहसा मी दिवाळी अंकासाठी कविता लिहायचा प्रयत्न करत नाही. पण यावेळी यशोधरा यांनी दिवाळी अंकासाठी आठवणीने व्यनि केला तेव्हा ठरवलं की लिहायचं.
एक विषय आणि एक ओळ बरेच दिवस डोक्यात घोळत होती. काही महिन्यांपूर्वी 'मकबूल' बघून झाल्यावर त्यातल्या निम्मीने (तब्बूचं पात्र) भूरळ घातली होती. पण ती निम्मी शब्दात उतरवण्यासाठी सापडत नव्हती. यशोधरांचा दिवाळी अंकासाठीचा व्यनि आल्यावर मग परत दोनदा पाहिला मकबूल...निम्मीच्या शोधात. साहेब बीबी आैर गुलाम पण पाहिला कारण त्यातली माधवी देवी (माही गिल) पण त्याच जातकुळीतली आणि वर मिका म्हणाला तसं माया मेमसाबपण अशीच. मला या दोन्ही कॅरेक्टर्स मधे काही समान धागे जाणवले. म्हणजे त्या सेल्फ काॅन्फिडंट आहेत पण सेल्फ डिस्ट्रक्टीव्ह ही आहेत. त्या एकनिष्ठ नाहीत पण प्रामाणिक आहेत. आपण चूक करतोय हे त्यांना माहिती आहे आणि ते त्या अॅक्सेप्ट करतात. शालीनतेचा, संस्कृतीचा कसलाही सो काॅल्ड बुरखा न पांघरता. दोघी कमालीच्या आकर्षक आहेत, ईतक्या की सर्वसामान्य माणसाला अप्राप्य वाटाव्यात. त्यांचं सामाजिक स्थानही खूप वरचं आहे. पण तरीही त्यांचे कुठल्यातरी सामान्य पुरूषाशी काहीतरी धागे जुळलेले आहेत. त्यांची स्वतःची अशी काही दुःखं आहेत...कदाचित त्यामुळेच त्या सेल्फ डिस्ट्रक्टीव्ह आहेत. त्या लहरी आहेत, हट्टी आहेत...अगदी हेकट म्हणण्या ईतक्या. करारी आहेत पण आहे त्या परिस्थितीतून त्या बाहेर येऊ शकत नाहीत. स्वतःला वर उचलू शकत नाहीत, स्वतःला स्वतंत्र करू शकत नाहीत. परिस्थितीशी दोन हात करण्याची धमक, कुवत त्यांच्यात नाही. त्यांची ती मर्यादा आहे. किंवा त्यांना करायचं नाहीये.... हे सगळं मला कवितेत उतरवायचं होतं, फारशी ग्रे शेड न देता. पण ती निम्मी काही केल्या सापडत नव्हती. यशोधरांचा व्यनि आल्यावर नेटाने शोधलं मग निम्मीला आणि सापडली मग थोडीफार.

तर अशी ही निम्मीची जन्मकथा.

समीरसूर's picture

31 Oct 2019 - 2:36 pm | समीरसूर

आणि कविताही लाजवाब!

यशोधरा's picture

31 Oct 2019 - 7:57 pm | यशोधरा

निम्मीची जन्मकथा भावली.
दिवाळी अंकासाठी लिहिण्याच्या विनंतीला मान देऊन तुम्ही निम्मी लिहून काढलीत ह्यासाठी तुमचे अनेक आभार. लिहीत राहा, आम्ही आहोतच वाचायला.

तुषार काळभोर's picture

31 Oct 2019 - 8:11 pm | तुषार काळभोर

कमाल कविता आणि तितकीच रोचक जन्मकथा..

श्वेता२४'s picture

31 Oct 2019 - 9:50 pm | श्वेता२४

खूप आवडली

अलकनंदा's picture

19 Nov 2019 - 1:46 pm | अलकनंदा

सुरेख कविता!