चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१९

धर्मराजमुटके's picture
धर्मराजमुटके in काथ्याकूट
1 Oct 2019 - 10:25 am
गाभा: 

नमस्कार !
चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१९ च्या नव्या पानावर आपणा सर्वांचे स्वागत !
या महिन्यात नवरात्र, दसरा, दिवाळी सारखे सण आपण साजरे करणार आहोत त्यामुळे एकंदरीत महिना आनंदाचा असेल अशी आशा बाळगतो. वैयक्तीक रित्या मला स्वतःला हा महिना नेहमीच त्रासाचा जातो. व्यवसाय करणार्‍याला अनेक जणांना खुश ठेवावे लागते. दिवाळी हा महिना ग्राहकांना भेट देण्याचा महिना असतो. त्यामुळे घरातील खरेदी, ग्राहकांना द्यायच्या भेटींची खरेदी ह्यात आर्थिक नियोजनाचा कस लागतो. बरेचसे ग्राहक कॉर्पोरेट क्षेत्रातील असल्यामुळे देण्यात येणार्‍या भेटवस्तू देखील त्या दर्जाच्या असाव्या लागतात. बर्‍याच उद्योगांच्या पॉलीसीनुसार कर्मचार्‍यांना आपल्या विक्रेत्यांकडून एका ठराविक प्रकारच्या / किमतीच्या वरच्या भेटवस्तू घेता येत नाहीत. बर्‍याचशा उद्योगांनी आपल्या कर्मचार्‍यांना अशा भेटी स्वीकारू नयेत असे धोरण बनविलेले असते मात्र हे सगळे असले तरी भेटवस्तू न देण्याच्या पर्याय अजूनतरी भारतीय विक्रेत्यांना १००% उपलब्ध आहे असे म्हणता येणार नाही. भेटवस्तू स्वीकारणारे देखील उघड अपेक्षा ठेवत नाहीत मात्र दिवाळी आली की मनातून अपेक्षा ही असतेच. हितसबंध जपणे हा भेटवस्तू देण्यामागचा मुळ उद्देश्य असला तरी काही ग्राहक खरोखरीच इतके चांगले असतात की त्यांना भेटवस्तू देता यावी असे व्यावसायिकांना मनापासून वाटते. भेटवस्तू विकत घेताना डोक्याला खुपच ताण द्यावा लागतो. ती वस्तू अगदी हलकी वाटली नाही पाहिजे, अगदी महाग नको, आपल्या खिशालाही परवडली पाहिजे, एकंदरीतच उभयतांना आनंद झाला पाहिजे ह्यासाठी खुपच कसरत करावी लागते. अगदी वर्षभर नियोजन केले तरी शेवटच्या क्षणी मन म्हणेल आणि खिसा होकार देईल अशीच वस्तू खरेदी केली जाते. पुर्वी मिठाई वाटण्याचा प्रघात होता मात्र विषबाधेच्या वाढत्या बातम्या, भेसळ इत्यादींमुळे मिठाईचे मार्केट सध्या कमी झाले आहे.त्याची जागा विविध आकर्षक चॉकलेटसने घेतली आहे. सुंदर सुंदर वेष्टनांत पॅक केलेली चॉकलेटस मनाला भुरळ पाडतात. वेष्टन मोठे आणी आतमधे कमी प्रमाणात माल असलेली चॉकलेटस भेट देणे हाच मला सध्या योग्य पर्याय वाटतो.
ग्राहकाला भेट देताना कर्मचार्‍यांना विसरुन चालत नाही. मी प्रथमपासूनच कर्मचार्‍यांना नियुक्त करतांना माझ्याकडे बोनस मिळत नाही हे सांगूनच कामाला ठेवतो त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा निर्माण होत नाही मात्र दिवाळीत भेटवस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करतो. मागील काही वर्षांपासून मी स्वतःच १०-१२ वस्तू निवडून एक "गिफ्ट हँपर" बनवतो. त्यातील वस्तू रोजच्या उपयोगातील पण थोड्याश्या 'लक्झरी' वर्गातील असतील अशा असतात.

आधी ग्राहक, मग कर्मचारी यांच्यानंतर आई-वडील, बहीण,भाचा, मुलगा आणि बायको आणि यांचा अनुक्रम येतो. त्यांची खरेदी झाल्यावर मग पैसे उरलेच तर स्वतःची दिवाळी असा क्रम असतो. कधीतरी (केवळ) दुसर्‍यांच्या आनंदातच आपला आनंद सामावलेला असतो या उक्तीचा आनंद घेता येतो. मी स्वतःबद्द्ल लिहिले असले तरी थोड्याफार फरकाने प्रत्येक कुटूंबप्रमुखाची हीच कथा असते यात शंका नसावी.
धागा चालू घडामोडींचा असला तरी दिवाळी निमित्ते भावनावेगाने फारच अवांतर झाले. आता मुद्यांकडे येऊया....

१. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचे दोन केंद्र शासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. आजपासून त्यांच्या सुनावणी सुरु होतील.

२. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील काही तरतुदी शिथील करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल बहुधा आज लागेल. ऐन निवडणूकीच्या वेळेत निकाल लागला तर कोणत्या पक्षाला फायदा आणि कोणाला तोटा होईल हे बघणे रोचक ठरेल.

३. सरकारने कांदा महाग झाल्यामुळे त्याची निर्यात थांबविण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधकांनी हे सरकार शेतकरीविरोधी आहे असा आरोप केला आहे. एकंदरीत कधी कधी सरकार चालविणार्‍या पक्षापेक्षा विरोधी पक्षात बसणे मजेचे असते असे वाटते.

४. देशभरात मंदीची ओरड चालू असताना मारुती रोज नवेनवे मॉडेल बाजारात उतरवत आहेत, मॉरीस गॅराज, किया सेल्टोज सारख्या नवीन कंपन्या भारतात येत आहेत. मॉरीस गॅराज ने तर मंदीच्या काळात देखील आपल्या हेक्टर या गाडीची किंमत २०,००० रुपयांपासून वाढविली आहे असे वाचनात आले.

५. देशात सध्या आर्थिक मंदीचं वातावरण असून वस्तूंच्या मागणीतही घट झाल्याचं म्हटलं जात आहे. अशातच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी मात्र आपल्या फेस्टिव्ह सेलच्या माध्यमातून मोठी कमाई केल्याचं समोर आलं आहे. शनिवारपासून ॲमेझॉनच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ची सुरूवात झाली. यादरम्यान केवळ 36 तासांमध्ये ॲमेझॉनकडून 750 कोटी रूपयांचे मोबाईल विकल्याचा दावा करण्यात आला आहे. तर फ्लिपकार्टनंही सुरू केलेल्या ‘बिग बिलियन डे’ च्या पहिल्याच दिवशी दुपटीपेक्षाही अधिक नफा मिळवल्याचा दावा केला आहे.
हे ७५० कोटी रुपयाचे मोबाईल खरेदी करणारे कोण आहेत ? मी सरकारच्या पक्षाचा किंवा विरोधक नाहीये पण मला खरोखरीच प्रश्न पडतो की खरोखर मंदी आहे काय ? एकीकडे लोक ७५० कोटीचे मोबाईल २ दिवसात खरेदी करत आहेत पण ऑटॉ सेक्टर वाले रडत आहेत. नक्की मंदी आहे की रस्त्यांची दुर्दशा, सार्वजनिक वाहनांची वाढती उपलब्धता यामुळे ग्राहक ऑटॉ सेक्टर पासून दूर जात आहे ? माझ्याकडे देखील स्वतःची गाडी आहे पण आजकाल गाडी रस्त्यावर काढायची हिंमत होत नाही, खड्डे, ट्राफिक जाम मुळे मुंबईच्या कोणत्याही एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जायचे तर कमीत कमी २-२.३० तास सहज निघून जातात. खिशात पैसे असले तर ओला उबेरचा वापर केला जायचा मात्र सध्या शहरात सिटीप्लो, गोक्रुझ, शटल सारख्या वातानुकुलीत बसेसचा पर्याय उपलब्ध झाला आहे. १००-१२५ रुपयात घरापासून बर्‍याच ठिकाणी प्रवास करता येतो त्यामुळे हा पर्याय जास्त आकर्षक वाटतो आहे. मेट्रोचा प्रवास हा देखील एक आरामदायक पर्याय आहे. सध्या त्याचा आवाका कमी असला तरी ४-५ वर्षात बर्‍याच ठिकाणी मेट्रोचे जाळे पसरले असेल तेव्हा गाडीची गरज कितपत भासेल ही शंका आहे.

असो. तर नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
ता. क. दिवाळी विशेषांकाची वाट पाहत आहे. दिवाळी विशेषांक आला रे आला की मी नेहमी एक प्रश्न विचारतो की आता याची पीडीएफ आवृत्ती कधी ? सं.मं. यावर्षी सुरुवातीलाच पीडीएफ अंक प्रकाशित करुन आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्का देईल काय ? पीडीएफ अंक जपून ठेवणे, ऑफलाईन वाचता येणे, मित्रमंडळींना पाठवून मिपाचा प्रसार करणे या कामी उपयुक्त ठरतो.

प्रतिक्रिया

जालिम लोशन's picture

1 Oct 2019 - 11:24 am | जालिम लोशन

सहमत

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1824768451000194&id=12447923...

भक्ताभक्त ठिगळ नकाराधिकार लागू.

जव्हेरगंज's picture

2 Oct 2019 - 6:49 pm | जव्हेरगंज
कंजूस's picture

2 Oct 2019 - 10:05 pm | कंजूस

खजिना आताच्या वारसाला /भारताला मिळू शकतो. त्यावर पाकचा अधिकार पोहोचत नाही म्हटलय.

जॉनविक्क's picture

2 Oct 2019 - 10:35 pm | जॉनविक्क

आणि किती सरकारजमा होणार यावर जाणकार प्रकाश टाकतील काय ?

कंजूस's picture

2 Oct 2019 - 10:05 pm | कंजूस

लेख पटलाय हो.

ShikhaSharma's picture

3 Oct 2019 - 12:06 pm | ShikhaSharma

Get Packers and Movers Jaipur List of Top Reliable, 100% Affordable, Verified and Secured Service Provider. Get Free ###Packers and Movers Jaipur Price Quotation instantly and Save Cost and Time. Packers and Movers Jaipur ✔ ✔ ✔ Reviews and Compare Charges for household Shifting, Home/Office Relocation, ***Car Transportation, Pet Relocation, Bike SHifting @ Packers And Movers Jaipur

हा प्रतिसाद उडवण्यात यावा अशी संपादकांना विनंती.

स्वलिखित's picture

3 Oct 2019 - 1:39 pm | स्वलिखित

मला पण माझी टपरी शिफ्ट करायचीय

गामा पैलवान's picture

3 Oct 2019 - 1:19 pm | गामा पैलवान

धर्मराजमुटके,

स्वगत आवडलं. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर द्यायचा यथाशक्ती प्रयत्न करतो :

एकीकडे लोक ७५० कोटीचे मोबाईल २ दिवसात खरेदी करत आहेत पण ऑटॉ सेक्टर वाले रडत आहेत. नक्की मंदी आहे की रस्त्यांची दुर्दशा, सार्वजनिक वाहनांची वाढती उपलब्धता यामुळे ग्राहक ऑटॉ सेक्टर पासून दूर जात आहे ?

माझ्या मते मोदींच्या नावे बोंबाबोंब करण्यासाठी मंदीची आवई उठवण्यात आली आहे. मोदींनी भ्रष्टाचार कमी करून राखीवपेढीची शिल्लक वाढवली. त्यामुळे विरोधकांच्या डोळ्यासमोर भरदिवसा तारे चमकले आहेत. मग कुठेतरी खोत काढायला हवी ना!

पण विरोधकांना हे कळंत नाही की भारत म्हणजे अमेरिका नव्हे. अमेरिकेतला वाहनोद्योग तिथल्या तेजीमंदीचा निर्देशक असतो, तसा भारतातला नाही. भारतात मंदी येते ती पाऊस नीट पडला नाही तर. पण त्यासाठी तर मोदींना जबाबदार धरण्याची सोय नाही. मग काय करायचं? तर काढा वाहनोद्योगाच्या नावाने गळे. हा मेकॉलेछाप बथ्थडपणाचा नितांतरद्दड अविष्कार आहे.

स्वत:चा स्वतंत्र असा काही विचारंच करायचा नाही. आणि ढोल मात्र विचारस्वातंत्र्याचे बडवायचे. मज्जाणु लाईफ.

आ.न.,
-गा.पै.

दुर्गविहारी's picture

3 Oct 2019 - 4:36 pm | दुर्गविहारी

सहसा मी चालु घडामोडीचे धागे उघडत नाही, पण तुम्ही सुरवातीला जे स्वगत लिहिले आहे, ते भिडले. घरचे आधी आणि मग आपली दिवाळी, हे मलाही लागू होते. खूप छान लिहिलं आहे.
बाकी चालु घडामोडीचे धागे म्हणजे विध्यमान सरकारच्या आरत्या याखेरीज काहीही नसते. जे लोक "मंदी नाही", असे म्हणतात, त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, "जर मंदी नाही तर सरकार उपाययोजना कशासाठी करते आहे "
असो.

धर्मराजमुटके's picture

4 Oct 2019 - 10:07 am | धर्मराजमुटके

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !
खरे तर राजकारणी चर्चांचा मलाही कंटाळाच आला होता. मागे बर्‍याच धाग्यांवर मी तसे उघडपणे लिहिले देखील होते. काही दिवसांपुर्वी राजकारणावर फारच कंठाळी आणि तिडीक आणणार्‍या चर्चा झाल्या होत्या. कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास हरकत नाही पण समोरच्याचा योग्य तो आदर राखला गेला पाहिजे. मागे कोणीतरी मिपावर लिहिले होते की "आय एम नॉट हिअर टु मेक फ्रेन्डस !" नसेना का पण आपण येथे शत्रु बनण्यासाठी नक्कीच आलेलो नाही एवढे लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे.
असो. स्वगत लिहिण्याचे कारण की आपण वर्षाचे जवळजवळ सगळेच महिने काही ना काही सण / उत्सव साजरा करत असतो. त्यांची नोंद चालू घडामोडींमधे घेणे देखील गरजेचे आहे असे मला वाटले म्हणून लिहिले. बर्‍याच जणांनी स्वगत आवडल्याचे लिहिले आहे त्यांचे देखील आभार !

सुमो's picture

3 Oct 2019 - 5:15 pm | सुमो

दिवाळी विशेषांकाची वाट पाहत आहे

मी सुद्धा...

पिडीएफ मला वाटतं २०१२ च्या अंकाची उपलब्ध आहे. नंतर नाही.

मिपा दिवाळी 2018 च्या अंकाची पिडीएफ हवी असेल तर
इथून डाउनलोड करा

गूगल ड्राइव लिंक आहे.

जेम्स वांड's picture

4 Oct 2019 - 8:17 am | जेम्स वांड

ही माझी जुनी कॉमेंट

तत्कालीन उदाहरणे तर्कपूर्ण पद्धतीने खंडित केल्यामुळे मी त्यावेळी "तूर्तास तुमचा मुद्दा मान्य करतो" असे श्रीगुरुजी ह्यांना म्हणालो होतो, माझ्या विधानाचा आशय हा होता की

ब्राह्मण मते ही भाजपने कायमच गृहीत धरलेली असतात, एकंदरीत त्यांना ब्राह्मणांची गरज नाहीये, असलीच तर ब्राह्मणांना भाजपची गरज आहे

त्यावेळी उदाहरणे द्यायला उशीर झाल्यामुळे माझ्याकडे उदाहरणे नाहीत आणि मी नुसतेच ठोकून देतोय काहीतरी असे एक प्रसाद१९८२ नावाचे सभासद बोलले होते, तर प्रसादजी कधी वाचलात तर हा प्रतिसाद खास तुमच्यासाठीसुद्धा बरंका, उत्तम चर्चेला पट्टीचे भिडू हाकाट्या घालून जमवलेले बरे असते.

हा तर माझा मुद्दा नीट सिद्ध झालेला आहे असे वाटते.

नितेश राणेंचा भाजप प्रवेश झाला ही बातमी, थेट तरुण भारत मधूनच घेतलीये हो

भाजपच्या ह्या युवा नेत्याचे हे मत आहे सावरकरांवर

.

त्याशिवाय,

आमचे श्रीगुरुजी तर म्हणत होते की ब्राह्मण अन मध्यमवर्ग हे भाजपचे पारंपरिक मतदार आहेत त्यांना नाराज करणे भाजपला भारी पडू शकते. पण भाजपच्या ऍक्टिव्हिटी पाहता असे काहीसे वाटत नाहीये तूर्तास,

चक्क कोथरुडात मेधाताई कुलकर्णींसाठी काहीही विचार न करता सीट देऊन टाकली की चंद्रकांत दादा पाटलांना, असे काय बरं बुआ झाले असावे की चक्कचक्क "ब्राह्मण महासंघाला" डावलून चंद्रकांत दादांना कोथरूडमध्ये स्थापन केले ? ते ही कोथरूड मध्ये? म्हणजे हे नेमकं भाजप काय करते आहे? ब्राह्मणांना "आम्हास तुमची गरज नाही" सांगतेय की कसे??

जेम्स वांड's picture

4 Oct 2019 - 8:25 am | जेम्स वांड

मी इथे भाजपचे नवीन युवा नेते नितेशजी राणे ह्यांची ब्राह्मण समाजाबाबत केलेली विधाने उद्धृत केली नाहीयेत, कारण ती भाषा सभ्य खचितच नाही, पण इच्छूक ती विधाने गूगल करू शकतील आवड अन हौस अन वेळ असल्यास.

आता एकंदरीत चित्र कसं आहे बघा कोकणातली मालवण /कणकवली सिंधुदुर्ग सीट इतकी महत्वाची वाटली की त्याकरता पारंपरिक मातब्बर ब्रह्मवृंद मतदार डावलून टाकले भाजपनं, नुसते डावलले असते तरी काही नाही पण चक्क ब्राह्मण त्यातही स्त्री उमेदवार अव्हेरून आयातीत ब्राह्मणेत्तर उमेदवार दिला कोथरुडात, अजूनही म्हणाल काय भाजप ब्राह्मणांना नाराज करणार नाही वगैरे ??

शाम भागवत's picture

4 Oct 2019 - 8:44 am | शाम भागवत

विधानसभा निवडणुकीचा वेगळा धागा आहे. तिथे या कॉमेंटस टाकणे संयुक्तिक ठरले असे वाटते

शाम भागवत's picture

4 Oct 2019 - 8:45 am | शाम भागवत

विधानसभा निवडणुकीचा वेगळा धागा आहे. तिथे या कॉमेंटस टाकणे संयुक्तिक ठरले असे वाटते

जेम्स वांड's picture

4 Oct 2019 - 9:05 am | जेम्स वांड

मला कल्पना नव्हती, मागे चर्चा झाली होती ती ताज्या घडामोडी धाग्यावर झाली होती, त्यानंतर मी बऱ्यापैकी अंग काढून घेतलं होतं राजकीय चर्चातून, अजूनही पुनरागमन करायचा मानस असा नाहीये पण आपण बांधलेले राजकीय आडाखे बऱ्यापैकी स्टॅन्ड घेत असल्याचे पाहण्यात एक आनंद नक्कीच आहे, म्हणून मी इथे कॉमेंट केली.

तरीही आता तो धागा शोधून तिकडे ह्याची लिंक देतो

दुरुस्ती करून दिल्याबद्दल आपले आभार.

शाम भागवत's picture

4 Oct 2019 - 9:34 am | शाम भागवत

अहो सर काय म्हणताय? शाम म्हणालात तरी चालेल. जेष्ठ नागरिक असल्याने हवंतर काका म्हणा.:)

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Oct 2019 - 11:44 am | ज्ञानोबाचे पैजार

राजकारण जाउ दे चूलीत. डॉ दिक्षीत नवे काही म्हणाले असतील तर ते सांगा.
त्यांच्या युट्यूबिय भाषणचा मला भरघोस फायदा झाला / होतो आहे.
पैजारबुवा,

शाम भागवत's picture

4 Oct 2019 - 12:31 pm | शाम भागवत

:)
त्यांची प्रणायाम पध्दती करून पाहिली का?
खऱ्या अर्थाने सुखासन वाटते ते. श्वासोश्वासालाही उत्तम.

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Oct 2019 - 7:42 am | ज्ञानोबाचे पैजार

या बद्दल काहिच माहिती नाही, मी शोधतोच पण...
जर एखादी लिंक असेल तर द्या ना, नाहितर तुम्हीच लिहा डिटेलवार,
पैजारबुवा,

मागच्या वर्षी परदेशी पर्यटक गोव्यात कमी झाले. आता काय होणार आणि ते का टाळतात हे शोधणार. बीच श्याक उर्फ वाळू किनाऱ्यावर झावळ्यांचे स्टॉल उभे करायला अजून परमिशन दिली नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Oct 2019 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झुंडबळीविरोधात मोदींना पत्र लिहिणा-यांवर राजद्रोहाचा गुन्हा...!

आता तशी बातमी छापली म्हणून लोकसत्तावरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल होणार काय ?

-दिलीप बिरुटे
(उत्सुक)

गामा पैलवान's picture

6 Oct 2019 - 12:09 am | गामा पैलवान

काहीही हं प्राडॉ !

अहो हा खटला सुधीरकुमार ओझा यांनी दाखल केला असून तो खाजगी खटला आहे. सरकारशी याचा सुतराम संबंध नाही.

बातमी : https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/ramchandra-guha-mani-...

आ.न.,
-गा.पै.

कंजूस's picture

6 Oct 2019 - 5:08 am | कंजूस

असा प्रकार आहे तर.
- कंजूस
( (इच्छुक))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2019 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

असं करायला सरकारच लागतं, सरकारातील लोक लागतात.. हे माहिती नव्हतं.

आभार...!

-दिलीप बिरुटे

मराठी_माणूस's picture

5 Oct 2019 - 2:49 pm | मराठी_माणूस

https://mumbaimirror.indiatimes.com/opinion/columnists/shobhaa-de/its-ti...
चांगलेच ठणकावले आहे.

बाकी मंबई मिररने पीएमसी चे प्रकरण चांगलेच लावुन धरले आहे. सामान्य माणसांच्या वेदना व्यवस्थित मांडल्या आहेत.
बाकी बराचसा मिडीआ (टीव्ही धरुन) निवडणूकांच्या उन्मादात दंग आहे.

मराठी_माणूस's picture

6 Oct 2019 - 2:59 pm | मराठी_माणूस

https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/leade...

अंतर्मुख करायला लावणारे वास्तव.

जॉनविक्क's picture

6 Oct 2019 - 11:59 pm | जॉनविक्क

भारत पेट्रोलियम ही सरकारी कंपनी
अंबानी अदानी ग्रुप ला देऊन खाजगी करण्याचे सरकार चे प्रयत्न सुरू झाले आहेत त्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे पण कुठलाही चॅनल ही बातमी दाखवत नाही आहे ?

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Oct 2019 - 1:36 pm | श्री गावसेना प्रमुख

तुमच्या अश्या अजेंड्याने काहीही फरक पडणार नाही...बीपीसीएल चे ५२% शेयर विकायला काढले आहेत आनि हे घ्यायला पवन हंस ही सरकारी कंपनी ही रेस मध्ये आहे..तुम्हाला नवरत्नांची एव्हढीच काळजी असेल तर तुम्हीही रेस मध्ये येउ शकतात..

पडत असता तर वाईट वाटले असते. असो मोठा भार उतरवलात. बाकी रेसमधे पळण्यापेक्षा जिंकणे महत्वाचे असते आणी कोण जिंकतय हे लवकरच समजेलच.

डँबिस००७'s picture

8 Oct 2019 - 11:24 am | डँबिस००७

SPG सुरक्षा मिळालेल्या VVIP ना आता परदेशात सुद्धा SPG कमांडोंना बरोबर घेउन जायला लागणार आहे. त्या शिवाय परदेशातल्या कार्यक्रमाची पुर्व कल्पना सरकारला लिखीत स्वरुपात द्यावी लागणार आहे. हे नियम पुर्वी सुद्धा होते पण अंमलबजावणी होत नव्हती.
आता रागा सोगा ना लपुन चीनी मंत्री मंडळाला भेट ता येणार नाही. ना स्विस बॅंकेतुन पैसे काढता येतील !!

डँबिस००७'s picture

8 Oct 2019 - 11:26 am | डँबिस००७

>>>>>भारत पेट्रोलियम ही सरकारी कंपनी अंबानी अदानी ग्रुप ला देऊन <<<<<

हा अंबानी अदानी ग्रुप कोणता ?
नवीन सुरु झालाय ?

धर्मराजमुटके's picture

9 Oct 2019 - 8:17 am | धर्मराजमुटके

इंटरनेटविना मनोरंजन करण्यासाठी मध्य रेल्वेने 'कंटेट ऑफ डिमांड' अंतर्गत लोकलमध्ये वायफाय बसविण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईकरांना ही सुविधा वापरता येणार आहे.

सर आम्हाला मनोरंजन नको आहे. कृपया आहेत त्या ट्रेन वेळेवर सोडाल काय ? आणि हो, त्या तेजस ट्रेन प्रमाणे आम्हालाही ट्रेन उशीरा आली तर भरपाई द्यावी. अगदी २५० रुपये नको अगदी एका फेरीमागे एक रुपया जरी दिला तरी वर्षअखेर चांगला बँक बॅलन्स होऊ शकतो.

आणि हो रस्ते बांधणार्‍या खात्याला कोठे लिहिता येईल ? माझ्याकडे एक मौलिक सुचना आहे.
१. जेव्हा कधी रस्ते, हायवे बांधायचे असतील तेव्हा ते सिमेंट किंवा डांबराचे न बनविता पहिल्यापासूनच पेव्हर ब्लॉक चे बांधायचे. म्हणजे खड्डे पडल्यावर दुरुस्ती सोपी होईल. तुमच्या सगळ्याच ठेकेदारांना पेव्हर ब्लॉक चे रस्ते बनविण्याचा एव्हाना चांगलाच अनुभव गाठीशी जमा झाला असेल ना ?
२. खड्डे पडलेले रस्ते दुरुस्त करण्याची मुळात गरजच नाहीये. रस्त्यावर थोडे खड्डे पडल्यामुळे रस्ता उंचसखल होतो. त्याऐवजी थोडी अजून वाट पाहायची. अजून खड्डे पडून द्यायचे. असे पुर्ण रस्त्यात खड्डे पडले की मग रस्ता आपोआपच एकसमान पातळीवर येईल.

माझ्याकडे अजून असे खूप मौलिक विचार आहेत. पण ते नंतर कधीतरी. जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

उपयोजक's picture

10 Oct 2019 - 2:21 pm | उपयोजक

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलने महाराष्ट्राबाहेर सीमोल्लंघन करून आसाममध्ये मोठा प्रकल्प हाती घेतला. आसाममधील सिबसागर या जिल्ह्याजवळ 'स्वर्गदेव सीउ का फा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल.' या नावाने नवीन हॉस्पिटल आकाराला येत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था नसणाऱ्या या भागातील नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.

औरंगाबाद येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित डॉ. हेडगेवार रुग्णालयाची महती आता केवळ मराठवाडयापुरती सीमीत राहिलेली नाही. सेवाभावी वृत्तीच्या डॉक्टरांनी तीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या प्रकल्पाचा वटवृक्ष झाला आहे. केवळ रुग्णालयच नव्हे, तर अन्य समाजोपयोगी प्रकल्प आणि उपक्रम राबवून या रुग्णालयाने समाजजीवनात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. नाशिक येथे असणारे श्रीगुरुजी रुग्णालाय हा संस्थेचा औरंगाबाद शहराबाहेर असणारा मोठा प्रकल्प. वास्तविक वैद्यकीय क्षेत्रात सेवावृत्ती मनात कायम ठेवून प्रकल्प चालविणे तसे अवघडच. पण संस्थेतील डॉक्टरांनी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मनातील सेवाभावनेला तडा बसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्यातूनच महाराष्ट्राबाहेर आसामात सिबसागर या जिल्ह्याजवळ संस्थेचा नवा प्रकल्प आकाराला येतो आहे - 'स्वर्ग देव सीउ का फा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल.'

आसामाचा प्रकल्प हा तसा अनपेक्षितरीत्या समोर आला. संस्थेच्या अजेंडयावर प्रकल्प नव्हता. संघाचे आसामात काम करीत असलेले प्रचारक सुरेंद्र तालखेडकर हे मूळ परभणीचे. ते एकदा औरंगाबादला आले असताना त्यांनी डॉ. हेडगेवार हॉस्पिटलला भेट दिली. आसामसारख्या राज्यात असे एखादे हॉस्पिटल तुम्ही का सुरू करीत नाही? असा प्रश्न त्यांनी प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. अनंत पंढरे यांना विचारला. एवढया दूर हॉस्पिटल सुरू करण्याची संस्थेची ताकद नाही असे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्या सिबसागर भागात हॉस्पिटल सुरू करण्याचा ओएनजीसीचा प्रस्ताव आहे, त्यासाठी प्रयत्न करावे असे सुचविले. त्यासाठी त्यांनी संस्थेकडे पाठपुरावा सुरू केला. संघाच्या प्रचारकाने याबाबत आग्रह धरल्यानंतर विश्वस्तांच्या बैठकीत त्यावर चर्चा झाली. ईशान्य राज्यंात आरोग्यसेवेची गरज आहे, त्या अनुषंगाने प्रकल्पावर प्राथमिक विचार करावा, त्यासाठी त्या भागाला भेट द्यावी आणि मग निर्णय घ्यावा, असा संस्थेचा निर्णय झाला. त्यानंतर संस्थेतील काही डॉक्टर्स सिबसागर जिल्ह्यात भेटीसाठी गेले. भेटीच्या वेळी सिबसागर परिसरात असणारी दैन्यावस्था लक्षात आली. खेडयापाडयात प्राथमिक आरोग्य केंद्राची व्यवस्था नव्हती. नियोजित प्रकल्पाजवळ असणाऱ्या एका खेडयाला डॉक्टरांनी भेट दिली. तेथे जलशुध्दीकरण केंद्र असूनही त्याचे उद्धाटन झाले नव्हते. त्यामुळे त्या गावात डायरियामुळे वर्षभरात 22 जणांचा मृत्यू झाला होता. ही भेट डॉक्टरांचे डोळे उघडणारी ठरली. तेव्हाच डॉक्टरांनी मनोमन ठरविले की प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करायचे. पण हे काम तसे सोपे नव्हते. ओएनजीसीच्या सहकार्याने प्रकल्प राबवायचा होता. त्यांनी संस्थेकडे काही तांत्रिक माहिती

मागितली. संस्थेची उलाढाल, मालमत्ता, मिळालेला नफा आदी पैशाच्या भाषेतील कॉलम त्यात होते. पण संस्थेचा हेतू सेवेचाच असल्यामुळे तशी माहिती फार देणे शक्य नव्हते. हा फॉर्म ओएनजीसीकडे गेल्यानंतर त्यांनी आक्षेप घेतला. तुम्हाला हे काम मिळणारच नाही असे सांगितल्यावर संस्थेने स्पष्टपणे सांगितले की पैसा मिळवावा हा त्यामागे काही हेतू नाहीच. सिबसागरसारख्या ठिकाणी सामाजिक काम करावे असे वाटत असल्याने प्रकल्प चालविण्याची तयारी आहे, असे संस्थेच्या पदधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्यावर ओएनजीसीचे अधिकारीही भानावर आले. अखेरीस ओएनजीसीने हेडगेवार हॉस्पिटल पाहण्यासाठी पंधरा जणांचे पथक पाठविले. त्यांना देण्यात आलेली माहिती, प्रेझेंटेशन आणि काही प्रकल्पांची पाहणी केल्यानंतर ते सर्व जण प्रभावित झाले. सर्वंानी एकसुरात डॉ. हेडगेवार हॉस्पिटलनेच हा प्रकल्प सुरू करावा असे सांगितले. 'अब ना नही कहनेका..' असे एका अधिकाऱ्याने स्पष्टपणे बजावले. मुख्य कार्यालयाला तशी शिफारस करण्यात आली. त्यानंतर ओएनजीसीने नियोजित प्रकल्पाचा आराखडा मागितला. आराखडा तयार करण्याचे काम पीडब्लूसीला (प्राइसवॉटरहाउस कूपर्स) या नामांकित एजन्सीला देण्यात आले. पीडब्लूसीने 55 लाख रुपये लागतील असे कळविल्यानंतर ओएनजीसीची तेवढे पैसे देण्याची तयारी नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी 22 लाख रुपये दिले. दरम्यानच्या काळात पीडब्लूसी, ओएनजीसीतील अधिकाऱ्यांशी बराच संपर्क आला. संस्थेचा सेवाभाव त्यांच्याही लक्षात आला. एके दिवशी डॉ. पंढरे यांना पीडब्लूसीच्या दिल्लीतील वरिष्ठांचा फोन आला. त्यांनी आराखडा मोफत करून देण्याचे ठरविले. फक्त प्रवास आणि निवास, भोजन खर्च द्यावा अशी विनंती केली. पीडब्लूसीचा हा खर्च आला दोन लाख वीस हजार. ओएनजीसीने दिलेल्या रकमेतून दोन लाख वजा करून सर्व रक्कम संस्थेने परत केली. आराखडा ओएनजीसीला सादर करण्यात आल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत प्रेझेन्टेशन करण्यात आले.

''आसामसाठीच पैसा खर्च करू''

ओएनजीसीच्या 22 संचालकांसमोर नियोजित प्रकल्पाचे प्रेझेन्टेशन सादर करताना एक किस्सा घडला. पीडब्लूसीने सविस्तर माहिती दिल्यानंतर आयोजकांनी डॉ. पंढरे यांना बोलण्यास सांगितले. ''प्रकल्पाचा सर्व खर्च ओएनजीसी करणार आहे आणि आसामात प्रकल्पाची गरज आहे, सेवेची संधी मिळाली आहे, त्यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही'' असे डॉक्टरांनी सांगितले. प्रारंभीच्या काळात येणारा तोटा ओएनजीसी स्वीकारण्यास तयार असेल, तर आम्ही आव्हान स्वीकारू असे डॉक्टरांनी म्हटल्यावर सीएसआर फंडाचे काम पाहणाऱ्या प्रमुखाने आम्ही तोटा सहन करणार नाही, असे सांगितले. रुग्णालयाला फायदा झाला तर तुम्ही घेऊन जाणार आणि तोटा मात्र आम्ही सहन करावयाचा? असे या संचालकांचे म्हणणे होते. या प्रश्नावर डॉ. पंढरे यांनी स्पष्टीकरण दिले की ''अशा प्रकल्पाला सुरुवातीला तोटा येणारच. आम्ही फायदा घेऊन जाण्याचे काही कारणच नाही. फायदा झाला तर तो पैसा आसामासाठीच खर्च केला जाईल, त्या रुग्णालयात नव्या योजना राबविल्या जातील.'' तरीही संचालक मात्र साशंक होते. एका नामांकित खासगी वैद्यकीय संस्थेने प्रकल्पाला प्रारंभीच्या काळातील 25 कोटी तोटा गृहीत धरून अगोदर रकमेची मागणी केली होती, हे उदाहरण त्यांच्यासमोर होते. मात्र डॉ. पंढरे यांनी फायदा रुग्णालयासाठीच पुन्हा खर्च केला जाईल असे ठासून सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने तुमच्या कार्याला सलाम अशा आशयाचे उद्गार काढले आणि प्रकल्पाला क्षणात मान्यता मिळाली.

या प्रकल्पासाठी ओएनजीसीने 317 कोटी रुपये मंजूर केले आहेत. सिबसागरपासून 12 कि.मी. अंतरावर असलेल्या राजाबारी भागात प्रकल्पाची जागा आहे. मार्च 2018मध्ये प्रत्यक्ष बांधकामाला प्रारंभ झाला. अडीच लाख चौ.फू. जागा असणाऱ्या जागेपैकी 35 हजार चौ.फू. जागेवर काम जवळपास पूर्ण झाले. हे काम नियोजित कालावधीच्या दीड वर्ष अगोदर पूर्ण झाले आहे. 2020पासून रुग्णसेवा देण्याचे ठरविले होते, पण या कामाला वर्षभर अगोदरच, म्हणजे एप्रिल 2019पासून प्रारंभ झाला. औरंगाबादहून तज्ज्ञ डॉक्टर्स ठरावीक दिवसांकरिता तेथे जातात. याशिवाय त्या भागातील डॉक्टर्स, कर्मचारी असे मिळून 160 जणांचा स्टाफ आहे. मागील सहा महिन्यांत गुंतागुंतीच्या अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. महिन्याला पन्नास ते साठ शस्त्रक्रिया तेथे होतात. हजारावर सोनोग्राफी झाल्या असून, उत्कृष्ट सेवा देणारे रुग्णालय अशी ख्याती आसामात झाली आहे. प्रकल्पासाठी संघाचे क्षेत्र प्रचारक उल्हास कुलकर्णी, सुरेंद्र तालखेडकर याशिवाय प्रांत कार्यकर्ते निरुपम बउआ यांचे नेहमीच मार्गदर्शन असते. आगामी काळात रुग्णालयाचा आणखी विस्तार करण्याचे संस्थेने ठरविले आहे. लवकरच हॉस्पिटल 250 बेडचे होणार आहे. मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून परिसरात आरोग्यसेवा वाढविण्याचाही विचार आहे.

चीन सरकारलाही उत्सुकता

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची गतवर्षी एका परिषदेच्या निमिताने चर्चा झाली होती. या वेळी झालेल्या चर्चेत चीनच्या अध्यक्षांनी ''तुम्ही सामाजिक क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी काय नवीन करीत आहात?'' असा प्रश्न विचारला. त्यावर मोदी यांनी सार्वजनिक-खासगी भागीदारीला (Public-private partnershipला) प्रोत्साहन देत काही उपक्रम राबवीत असल्याचे सांगितले. त्यावर तीन-चार प्रकल्पांची माहिती अभ्यासासाठी मिळू शकेल का? असे विचारण्यात आल्यावर मोदी यांनी सिबसागर प्रकल्पाची माहिती दिली. ओएनजीसी आणि डॉ. हेडगेवार रुग्णालय एकत्रितपणे प्रकल्पावर काम करीत असून तुम्ही चिनी अधिकाऱ्यांना तेथे पाठवावे, असे मोदी यांनी सुचविले. या चर्चेच्या वेळी मोदी यांच्यासह चीनमधील भारतीय दूतावासातील प्रशांत लोखंडे नावाचे अधिकारी होते. ते ओएनजीसीत सहसचिवपदावर काम करीत होते. कालांतराने त्यांची दूतावासात बदली झाली. त्यांच्याशी डॉ. हेडगेवारच्या विश्वस्तांचा संपर्क आला होता. त्यांनी तातडीने डॉ. पंढरे यांना फोन करून प्रकल्पाची माहिती मागितली आणि चीन सरकारला सादर केली.

आसामातील लोक सांस्कृतिकदृष्टया उत्साही आहेत. पण काम थोडे उशिराने करावे याकडे त्यांचा कल असतो. कदाचित त्यासाठी तेथील हवामान हे कारण असावे. त्यामुळेच आसामी भाषेत ''लाहे लाहे..'' (हळूहळू) हे शब्द लोकप्रिय आहेत. तेथे कोणी कोणाला काम लवकर कर म्हटले की समोरच्याचे उत्तर ठरलेले असते, ''लाहे लाहे..'' पण प्रकल्पावर काम करणाऱ्या डॉक्टर्सनी व इतर मंडळींनी या शब्दाचा अर्थ पार बदलून टाकला आहे. कामाचा झपाटा आणि गती पाहून परिसरातील अनेक जण स्तंभित झाले आहेत. औरंगाबाद येथे असणाऱ्या डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे सीमोल्लंघन खऱ्या अर्थाने सर्वांनाच प्रेरणादायक ठरणारे आहे.

- कृष्णकुमार

नाखु's picture

10 Oct 2019 - 2:31 pm | नाखु

सामाजिक बांधिलकी यावरून न जोखता एखाद्या कार्यकर्ते याच्या विधानावर राळ उडवून एकूणच संघावर यथेच्छ तोंडसुख घेणारे इथे फिरकणार नाहीत याची पूर्ण खात्री आहे.
चांगले आणि विधायक बघण्याची आणि त्यासाठी काही ठिकाणी तरी कौतुक करावे हेच त्यांच्या संस्कारात नक्कीच नसावे.

खुलासेदार नाखु वाचकांची पत्रेवाला

चारु राऊत's picture

11 Oct 2019 - 9:33 pm | चारु राऊत

आरे येथिल झाडे तोड्लि उच्च्मध्यम वर्गियाने खुपच विरोध केला नक्कि काय आहे हे प्रकरन? थोडि माहिति द्या?

जॉनविक्क's picture

12 Oct 2019 - 11:37 am | जॉनविक्क

फॅसिजमसाठी मोदींना नो एन्ट्री ?

चायला शी जिनपिग काय आधुनिक लोकशाहीचे प्रणेते आहेत की काय म्हणून त्यांना प्रेमाने स्वागत करताय ? एव्हडे आवडत असती शी तर चीन मधे चालते व्हा...

कहर आहे भारत म्हणजे.

गोंधळी's picture

12 Oct 2019 - 11:00 am | गोंधळी

जागतिक बँकेने भारताचे नाव चीन, रशिया सारख्या देशांच्या यादीतून काढून घाना, पाकिस्तान, बांगला देश अशा दुय्यम देशांच्या यादीत टाकले.

https://www.livemint.com/news/india/despite-stable-score-india-slips-to-...

गामा पैलवान's picture

12 Oct 2019 - 10:35 pm | गामा पैलवान

जॉनविक्क,

ही नेमकी कसली यादी जाब्याने प्रकाशित केली आहे? मला भारताची बदली झाल्याच्या अर्थाचा मजकूर दिसला नाही.

आ.न.,
-गा.पै.

जॉनविक्क's picture

12 Oct 2019 - 11:55 pm | जॉनविक्क

India slipped sharply by 10 notches to 68th position in the Global Competitiveness Index, 2019, released by the World Economic Forum (WEF) on Wednesday.

डँबिस००७'s picture

13 Oct 2019 - 1:48 am | डँबिस००७

>>>>>जागतिक बँकेने भारताचे नाव चीन, रशिया सारख्या देशांच्या यादीतून काढून घाना, पाकिस्तान, बांगला देश अशा दुय्यम देशांच्या यादीत टाकले.<<<<
ह्या वरच्या वाक्याच्या संदर्भात एकही वाक्य् दिलेल्या बातमीत नाही. सदर बातमी कंपेटेटीव्ह ईंडेक्स बद्दल बोलत आहे.
भारताच्या मालाची गुणवत्ता फारच खालच्या दर्जा असल्याने त्यात सुधार करण गरजेच आहे. ह्यात सरकारचा हस्तक्षेप असत नाही.

जेम्स वांड's picture

13 Oct 2019 - 7:28 am | जेम्स वांड

मालाची गुणवत्ता फारच खालच्या दर्जा असल्याने त्यात सुधार करण गरजेच आहे. ह्यात सरकारचा हस्तक्षेप असत नाही.

हे विधानच चूक आहे, माल निहाय दर्जा पारिभाषित करणाऱ्या संस्था ह्या सरकारीच असून मालाचा दर्जा काय असावा ह्याचे नियम त्यांनीच बनवलेले असतात, काही उदाहरणे.

.
आयएसआय मार्क (संस्थेचे नाव हल्ली बीआयएस, ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड्स), हेल्मेट ते गॅस शेगड्या अन इस्त्री ते इलेक्ट्रिक पंखा गुणवत्तेचा दर्जा आयएसआय मार्कवरूनच ठरवतात की, ही एक सरकारी संस्था.

.
बीआयएसचे गोल्ड मार्किंग अन होलोग्राम सोन्याची शुद्धता पारखायला स्थापित आहे.

.
गाड्यांमध्ये बीएस स्टेजेस ठरवण्यात जबाबदार खाती म्हणजे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड आणि पर्यावरण मंत्रालय.

.
तयार खाद्यपदार्थात, खानावळी हॉटेल मधील जेवणात, पॅक फूड मध्ये स्टॅण्डर्ड्स ठरवायला संस्था आहे एफएसएसएआय (फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड्स असोसिएशन ऑफ इंडिया).

.
डाळ, तांदूळ, तेल, मसाला, सुकामेवा इत्यादी मध्ये स्टॅण्डर्ड सर्टीफाय करायला ऍगमार्क हा मार्क असून विपणन व तपासणी निदेशनलाय, भारत सरकार हे तो मार्क देत असतात (विविध मालाला).

त्यामुळे सरकारचा हस्तक्षेप असत नाही हे म्हणणे चूक वाटते, दर्जा सुधारायला हवा हे मान्य पण मग सरकारने मानकन देणे कडक करावे दर्जा आपोआप वाढेल की, चांगले काही झाले का सरकारने केले अन काही घसरते असले का सरकारचा हस्तक्षेप नाही म्हणणे, हे काही बरे नव्हे.

डँबिस००७'s picture

13 Oct 2019 - 1:10 am | डँबिस००७

चायनाचे प्रेसीडेंट शी जींग भारत भेटीला आलेले असताना त्यांना भेटण्यासाठी भा क प च्या सिताराम येचुरींनी विनंती केलेली होती. आपल्या मालकाला भेटण्याची व्याकुळता दिसली पण ही विनंती धुडकावुन लावण्यात आली. भारतातले कम्युनिस्ट
चीनला आपला मालक समजत असुन चीनशी ते स्वामीभक्त असतात हे बर्याच वेळेला उघड झालेल आहे!!

जॉनविक्क's picture

13 Oct 2019 - 11:14 am | जॉनविक्क

डँबिस००७'s picture

13 Oct 2019 - 8:46 am | डँबिस००७

रामजन्म भुमी विवादावर आता सु को चा निर्णय येऊ घातलेला आहे, अजुन आलेला नाही ! भारतीय जनतेच्या अस्मितेचा प्रश्न असलेल्या ह्या प्रकरणासाठी गेली ८० वर्षे कोर्टात लढा सुरु आहे.
ह्याच प्रकरणावर आत मुस्लिम फाॅर पीस नावाच्या संघटनेने नविन पवित्रा घेतलेला आहे. त्यांचे म्हणणे आहे की,
" सु को आता बाबरी मस्जिदला स्विकारुन राम जन्म भुमिच्या लढ्याला विराम देणार आहे. तरी सुद्धा ह्या सरकारात बाबरी मस्जिद परत उभारणे शक्य नाही. त्यामुळे मुस्लिमांनी मोठ्या मनाने हिंदुंना राम जन्म भुमिची जमिन भेट म्हणुन द्यावी. त्यामुळे दोन्ही समाजात सलोखा राहील व मथुरा काशी सारख्या ४० हजारावर मंदीर तोडुन मस्जिद बांधलेली आहेत त्यावर हिंदुंना दावा करता येणार नाही. "
ह्या सर्वामागे मुस्लिम समाजातले उच्चभ्रु लोक शामिल आहेत. त्यात नसीरुद्दीन शहाचा भाउ जमिर उद्दीन शहा सुद्धा आहे. आता सामाजिक सलोख्याच्या बाता मारणार्या जमिर उद्दीन शहाने गुजराथ दंग्यावर भडकवणारे पुस्तक लिहीलेले आहे!
गेली ८० वर्षे बाबरी — राम जन्म भुमी विवाद कोर्टात लढला गेला , आता हरायची वेळ आलेली आहे आणि आता ह्यांना ती जमिन हिंदुंना भेट द्यायची आहे.

जेम्स वांड's picture

13 Oct 2019 - 9:32 am | जेम्स वांड

१७ नोव्हेंबर पर्यंत बाबरी केसचा निकाल लागला तर तो एक चमत्कारच म्हणावा लागेल असं सुप्रीम कोर्ट म्हणतंय.

अन हो, नसिरुद्दीन शहाचा भाऊ नाव लिहिताना "लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शहा" लिहिले असते तर बरे ! भारतीय थल-सैन्याचा उप-प्रमुख, प्रणाली आणि मनुष्यबळ (सिस्टिम्स अँड पर्सोनेल) म्हणून निवृत्त झालेला शिपाई आहे तो, उगाच अपमानास्पद उल्लेख करायचा असेल तर पूर्वी केलेली देशसेवा विसरू नये इतकेच म्हणणे..

डँबिस००७'s picture

13 Oct 2019 - 9:16 pm | डँबिस००७

पूर्वी केलेली देशसेवा
ईतक्या मोठ्या पुंजीवर पुढे काही करण्याची परवानगी मिळते हे माहीती नव्हते !!

GST might have flaws देशातल्या मोठ्या सुधाणेत (जो खुप good and simple आहे) त्रुटी आहेत. अखेर मान्य केल.

https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/gst-might-have-...

अयोध्येत जमावबंदीचा आदेश लागू झालाय का?

गामा पैलवान's picture

14 Oct 2019 - 1:54 pm | गामा पैलवान
उपेक्षित's picture

16 Oct 2019 - 12:47 pm | उपेक्षित

मंडळी शरद पोक्षेंची माझा कट्ट्यावरची मुलाखत पाहा आवर्जून, कर्करोगावर मात करून पुन्हा हा पठ्ठ्या प्रयोगाला उभा राहणार आहे.
यांना उदंड आणि सुधृड आयुष्य मिळो हि प्रार्थना.

जाता जाता - माझा कट्ट्यावरचा तो खांडेकर मुलाखत घेताना समोरच्याचा अपमान होईल असा का बसतो ते त्यालाच माहित आणि प्रश्न सुद्धा इतके विचित्र प्रकारे विचारतो कि असे वाटते कि चौकशी करतोय भाऊ.

नाखु's picture

16 Oct 2019 - 11:01 pm | नाखु

ए बी पी वाले स्वतः ला अगदी न्यायाधीश वगैरे समजतात, सावरकराबाबत केलेल्या कार्यक्रम सादर केला त्यावेळीच त्यांची पातळीवर, हेतू आणि अक्कल दिवाळखोरी समजून आली आहे.
पत्रकारीतेमधील सर्वात विकणारी (वारांगनेसही लाजवील) पातिव्रत्य आव आणणारी वाहिनी आहे ही!!!

दूरदर्शन प्रेक्षक पांढरपेशा नाखु

जालिम लोशन's picture

17 Oct 2019 - 3:50 pm | जालिम लोशन

ABP हे एक कम्युनिस्ट वार्तापत्र आहे. आणी त्यांचे ऊद्दिष्ट समाजात समानता आणणे आहे. ती समानता म्हणजे सर्व समान गरीब असायला हवे आहे. अश्या वाहिन्याना बघुन त्यांचा TRP न वाढवणे ऊत्तम . कंबोडिआ माॅडेल त्यांना भारतात अप्लाय करायचे आहे.

गोंधळी's picture

16 Oct 2019 - 1:36 pm | गोंधळी

काहीही म्हण्जे काहीही

ईथे सगळ सुरळीत चालु आहे, कोटींचे फोन विकले जातायत, सिनेमावाले करोडोंचा व्यवसाय करतायत, लवकरच ५ ट्रिलीयनची अर्थव्यवस्था होणार आहे.

हे आकडे का नाही बघत हे लोक?

https://timesofindia.indiatimes.com/india/india-falls-to-102-in-hunger-i...

सुबोध खरे's picture

16 Oct 2019 - 8:13 pm | सुबोध खरे

एकीकडे भारतात अन्नधान्याचे मुबलक उत्पादन होत असताना त्याच्या असमान वितरणामुळे मोठ्या प्रमाणावर आदिवासी आणि खेड्यापाड्यात बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न अधिकच गंभीर होत आहे.

वितरण व्यवस्था आमूलाग्र सुधारणे आणि लोकसंख्या वाढीच्या भस्मासुराला आळा घालणे या दोन्ही गोष्टी युद्धपातळीवर करणे आवश्यक झाले आहे.

जालिम लोशन's picture

17 Oct 2019 - 3:56 pm | जालिम लोशन

अन्नधान्य साठवण्यास आणखी जागा नसल्यामुळे भारत अफगणिस्तानला पंधरा लाख टन गहु भेट म्हणुन देणार आहे. संदर्भ इंडीअन एक्सप्रेस.

दोन महीन्यापुर्वी भयंकर मदीची लाट भारतात आलेली होती. पार्ले बिस्किट आपल्या १०,००० कामगारांना कामावरुन काढणार होता. जनतेला ५ रु बिस्किटही विकत घेता येत नाही ईतकी कडक मंदी भारतात आलेली आहे असा प्रचार केलेला होता अस समोर आलेल आहे.
त्याच पार्ले बिस्किट कंपनीला ह्या वर्षी ४५० कोटी चा नफा झालेला आहे. गेल्या वर्षी हाच नफा ३७० कोटी होता.
पार्ले बिस्किट कंपनीची उलाढाल ह्या वर्षी ९०५० कोटी ची असुन ६.२% ने त्यात वाढ झालेली आहे.
https://youtu.be/HRsFXmlven0

त्यामुळे ही बातमी अत्यन्त रोचक वाटतेय

थॉर माणूस's picture

18 Oct 2019 - 12:26 am | थॉर माणूस

युट्यूबवर पृथ्वी सपाट आहे हे "सिद्ध" करणारे व्हिडीओ पण आहेत... पण तिथे दाखवले आहे म्हणजे मंदी नाही हे खरेच असणार.

https://economictimes.indiatimes.com/parle-industries-ltd/quarterly/comp...
ह्या आकड्यांची काळजी करायचे काहीच कारण नाही मग... हे त्या व्हिडीओ पेक्षा खरे थोडीच असणारेत?

.Mar'19Jun'19Jun'18
Total Income1.371.321.94

बाकी ते व्हिडीओमधले रीझल्ट्स १८-१९ चे आहेत आणि सध्या १९-२० चालू आहे. आत्ता मंदी येऊ शकते त्यावर उहापोह करणे आवश्यक आहे, तेव्हा मंदी नव्हती हे दाखवून काय उपयोग?

भारत मंदीच्या लाटेत गेला आहे का? - नाही
मंदीसदृश परीस्थीती आहे का? - हो
जगभरात मंदीचे सावट दिसत आहे का? - हो
भारताने परीस्थीती मान्य केली नाही तर नजीकच्या काळात भारतामधे मंदी येऊ शकते का? - हो

पण असा उहापोह करण्यात काय हशील? आपण मनाशी पक्के ठरवायचे हो किंवा नाही ते आणि गुगलबाबाला सांगायचे की बाबा मला माझ्या मताशी जुळणार्‍या लिंका काढून दे मग त्या व्हेरीफाईड सोर्स असोत की नसोत. झाले काम. :)

त्यात ही तिमाही उत्सवांची असल्याने थोडी सुधारणा अपेक्षीत आहे रिझल्टस मधे. ते एकदा आले की कुठे आहे मंदी म्हणायला आपण सगळे मोकळे! अजून एखादा पिक्चर २०० कोटी मारून जाईल किंवा कुठे १००० कोटी च्या सेलची बातमी येईलच मग काय बहारच बहार!

जॉनविक्क's picture

18 Oct 2019 - 2:36 am | जॉनविक्क

युट्यूबवर पृथ्वी सपाट आहे हे "सिद्ध" करणारे व्हिडीओ पण आहेत...

फ्लॅट अर्थ थिअरी ही सिद्ध झालेली नाही ( आणी होणारही नाही हे सांगायला नकोच) या बिंडोकाना अजूनही बीबीसी सारखी वहिनी फुटेज देते हे खरे दुःख आहे कारण पृथ्वी बशी सारखी आहे असे बायबल व बहुतेक कुराण देखील म्हणते आणी यांमुळे यांना मिळणारा पैशाचा ओघही आटत नसावा की हे लोक इतकी महागडी अविज्ञानीक कॅम्पेन चालवतात

महेश हतोळकर's picture

18 Oct 2019 - 9:54 am | महेश हतोळकर

Flat earth society has thousands of followers ROUND THE GLOBE.

अलकायदाचेही हजारो फॉल्लोवेर्स आहेत मग काय म्हणता ? खरे तर याक्षणी इंटरनेटही बंद पडले असते पृथ्वी बशी सारखी सपाट असती तर, वाईट इतकेच वाटते BBC सारखी वहिनी याना फुटेज देते. यांचा प्रमुख बलून मधे बसून उडाला आणी खाली आल्यावर म्हणतो की मी पुरेसे उंच गेलो न्हवतो नाहीतर खात्रीने सांगितले असते ती चेंडू सारखी गोल आहे की बशी सारखी सपाट व पसरट. नासा इस्रो बिंडोक आहेत जे पृथ्वी गोल समजून साटेलाईट प्रक्षेपण करतात

गोंधळी's picture

17 Oct 2019 - 10:32 pm | गोंधळी

माझ्या मते तरी मंदी आलेली नाही पण ती पुढे येउ शकते याची लक्षण मात्र दिसत आहेत.

काही आकडेवारी बघितली उदा. टॅक्स कलेक्षण कमी झाले आहे , ईन्डस्ट्रियल प्रोडक्षण तळात गेलेल आहे , वाहन उद्योगात सध्या मंदी अस्ल्यामुळे त्या संलग्न असलेल्या उद्योगांवर त्याचा परीणाम झाला आहे , रियल ईस्टेट क्षेत्रात मागील काही कालापसुन स्लोडाउन असल्यामुळे व बँकिंग क्षेत्राला अनुत्पादीत मालमत्तांचा प्रश्न भेडसावद असल्यामुळे रोख तरलतेची समस्या मार्केटमधे आहे. त्यात नवीन रोजगार निर्माण होत नाहि आहेत. ह्या सगळ्याचा परीणाम म्हणुन जीडीपी मल्टी ईयर लो वर आला आहे.

ही मंदी सद्रुष्य परीस्थिती आहे असे म्हणु शकतो. यावर योग्य उपाय योजना न केल्यास मात्र मंदी येउ शकते.

डँबिस००७'s picture

18 Oct 2019 - 1:14 am | डँबिस००७

>>>>>ही मंदी सद्रुष्य परीस्थिती आहे असे म्हणु शकतो. यावर योग्य उपाय योजना न केल्यास मात्र मंदी येउ शकते. <<<<<<

अर्रे व्वा !!
मंदी सद्रुष्य परीस्थिती आहे असे म्हणु शकतो ?
आता पर्यंत अगदी ठाम पणे म्हणत होते तुम्ही !!
अश्या वागण्याने देशातल्या व बाहेरच्या शत्रुलाच मदत होते !! देशातले शेअर बाझार हे खुप संवेदनशील असतात . अश्या अफवांमुळे शे. बाझार खाली जाउ शकतो, ज्याच्या मुळे परत मंदी सदृृृृृृष्य परिस्थिती तयार होते ज्यामुळे भारतात परदेशी गुंतवणुकीचा दर मंदावतो, विकास मंदावतो.

पार्ले बिस्किट सारख्या कंपन्यांनी अफवा पसरवुन स्वःताच नुकसान करुन घेतलेल आहे. जेंव्हा १०,००० कामगार कामावरुन काढणार अशी बातमी आली त्यावेळेला पार्ले बिस्किट कंपनीने प्रेस काॅंफेंरेंस घेउन बातमी खोडली पाहीजे होती. अशी खोटी बातमी पसरवुन पार्ले बिस्किट कंपनीला काय फायदा झालेला आहे ह्याचा शोध पत्रकारांनी लावला पाहीजे !

गोंधळी's picture

18 Oct 2019 - 11:03 am | गोंधळी

अर्रे व्वा !!
मंदी सद्रुष्य परीस्थिती आहे असे म्हणु शकतो ?
आता पर्यंत अगदी ठाम पणे म्हणत होते तुम्ही !!

ओ भक्त डँबिस००७ साहेब मी असे कुठे म्हणालो होतो दाखवाल का???

ओ आपल्या भारताची अर्थ्व्यवस्था export oriented नाही आहे तर Domestic consumption वर जास्त करुन चालणारी आहे.

आपल्या देशात खुप सण साजरे केले जातात जे खरेदीला प्रोस्ताहन देतात. त्यामुळे भारतात सध्या स्लो-डाउन असले तरी मंदी येण्याची शक्यता कमी आहे.

सध्याच्या स्लो-डाउन मध्ये सरकाचा वाटा ५० टक्के आहे कारण की नोटबंदीचा चुकलेला निर्णय व घाईत केलेली सदोष GST ची अंमलबजावणी. ह्या दोन निर्णयाने
आपल्या अर्थ व्यवस्थेला फटका बसलेला आहे.

डँबिस००७'s picture

19 Oct 2019 - 4:45 pm | डँबिस००७

UP DGP, OP Singh said, "A joint team of UP and Gujarat Police has detained 3 persons & interrogating them. Their names are Maulana Mohsin Sheikh, Faizan, & Khurshid Ahmed Pathan. Two other accused were also detained but released later, they are being monitored." The gruesome murder of the president of a little-known Hindu Samaj Party at his home in Khurshed Bagh in Lucknow has created outrage with demands for swift justice and allegations of police inaction. Kamlesh Tiwari was brutally murdered at his home at Khursheda Bagh in Lucknow on Friday

डँबिस००७'s picture

19 Oct 2019 - 4:46 pm | डँबिस००७

शांतता प्रिय धर्माच्या लोकांनी कमलेश तिवारीला ठार मारले !
पण अर्बन नक्षली पत्रकारांना काही दिसत नाही . त्या सोनम कपुरला , स्वरा भास्करला काहीच दिसत नाही.

डँबिस००७'s picture

19 Oct 2019 - 4:46 pm | डँबिस००७

शांतता प्रिय धर्माच्या लोकांनी कमलेश तिवारीला ठार मारले !
पण अर्बन नक्षली पत्रकारांना काही दिसत नाही . त्या सोनम कपुरला , स्वरा भास्करला काहीच दिसत नाही.

डँबिस००७'s picture

19 Oct 2019 - 5:24 pm | डँबिस००७

शांतता प्रिय धर्माच्या लोकांनी कमलेश तिवारीला ठार मारले !Maulana Mohsin Sheikh, Faizan, & Khurshid Ahmed Pathan. ह्यांना सुरत मधुन पकडल आहे.

NDTV : ह्या निष्पाप मुसलमान लोकांना निष्कारण अडकवले जात आहे.

कमलेश तिवारी विरूद्ध सुरतच्या मौलवीने फतवा जारी केलेला होता की ईस्लाम बद्दल अल्ला बद्दल अपशब्द काढलेले असल्याने कमलेश तिवारी मृृृृृत्युदंड दिला पाहीजे. लगेच कार्यवाही करण्या साठी काही लोक पुढे येतात.
हेच हिंदु देव देवतां बद्दल बोलल तर मात्र स्वःता हिंदु सकट कोणालाच फरक पडत नाही.

गामा पैलवान's picture

19 Oct 2019 - 9:03 pm | गामा पैलवान

डँबिस००७,

प्रश्न : आपण काय करू शकतो या बाबतीत?

उत्तर : मत कोणाला द्यायचं ते कळतं यातनं. २१ तारखेपासनं मतदान आहे ना. जे पक्ष मुस्लिमांचं नेहमी लांगूलचालन करतात त्यांना उखडून टाका. जे पक्ष भ्रष्टाचारास प्रोत्साहन देतात त्यांना उखडून टाका. जे पक्ष हिंदूंमध्ये दुही माजवतात त्यांना उखडून टाका.

शिवाजीमहाराज दादोजी कोंडदेवांचा उल्लेख आदरपूर्वक करतात. पण ते केवळ ब्राह्मण असल्याने त्यांच्याविरुद्ध नाहक चिखलफेक करणारी दंभाजी ब्रिगेड ही संघटना कोणाच्या पाठींब्यावर चालते? हे पापी अपत्य कोणाचं? त्यांना उखडून टाका. भेकडकसब,अफजल गुरु यांच्या अवलादी ज्यांच्यामुळे पुष्ट होतील त्यांना उखडून टाका. इक्बाल मिरची या कुप्रसिद्ध दहशतवादी गुंडाला मालमत्ता देणाऱ्या प्रफुल्ल पटेलांना आणि त्यांच्या पक्षाला फुल्लपणे उखडून टाका.

बाकी सुज्ञांस अधिक सांगणे नलगे.

आ.न.,
-गा.पै.

उपेक्षित's picture

19 Oct 2019 - 7:50 pm | उपेक्षित

२ प्रकारचे व्यवसाय करत असल्यामुळे मंदी आहे हे (हि तर सुरवात आहे असे आमच्यातले मोठे मासे म्हणत आहेत) १००% खरे आहे आणि त्याचा स्वतः अनुभव घेत आहे.

साधारण ५/६ दिवसांपूर्वी business whats up ग्रुप वर (सर्व भाषिक/धार्मिक ग्रुप आहे हा) मी सहज मला येत असलेल्या अडचणींबद्दल विषय काढला आणि अहो काय आश्चर्य धडा धड सगळे सेम बोलायला लागले, आमच्या व्यवसायातील प्रस्थापित लोक सुद्धा अन्य करत आहे कि सध्या कठीण कल चालू आहे आणि तो लवकरच सरेल म्हणून.

नंतर ४/५ जणांनी माझे अभिनंदन केल कारण मी उघडपणे हि गोष्ट ग्रुप वर कबुल केली कि हो धंदा मंदा है.

सो मंदी आहे पण त्यावर उपाय सुद्धा लवकरच होतील अशी आपण सगळे आशा करू.

डँबिस००७'s picture

20 Oct 2019 - 1:36 am | डँबिस००७

आंतरराष्ट्रीय मंदी

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा माल पुरवणे ईतकाच स्कोप भारतातले निर्यातक करत असतात. फार तर कृृृृृृषी माल भारतातुन निर्यात होतो ज्याला मंदीची झळ कधीही बसत नाही.
भारतातला तयार मालाला जागतिक बाजारात उचल नाही कारण त्याची खालच्या दर्ज्याची गुणवत्ता. अर्थात बर्याच युरोपीयन अमेरीकन कंपन्यांनी भारतात उत्पादन सुरु केलेल आहे त्याचा अपवाद !! काही भारतीय उत्पादक चीनी कंपन्यांना आपला माल हा त्या कंपन्यांसाठी कच्चा माल म्हणुन द्यायचे. चीनी मालाला अमेरीकेच्या आयात प्रतिबंधामुळे मोठा फटका बसलेला आहे. भारतीय हीरा उद्योगाला अचानक मार बसलेला आहे.

देशांतर्गत मंदी :
भारतीय मालाला फार तर चीनच्या आयात केलेल्या मालाची प्रतिस्पर्धा आहे. भारतीय कृृृृृृषी मालाला मंदीची झळ कधीही बसत नाही. भारतात देशांतर्गत दळणवळणाच्या सुविधा चांगल्या व स्वस्त नसल्याने माल देशाच्या दुरवरच्या प्रदेशात पोहोचु शकत नाही.
नेसले, युनिलीव्हरचा माल पोहोचु शकतो कारण ह्या मोठ्या कंपन्यांची ताकद !
पार्ले बिस्किटचे उदा सर्वांनी बघितलेले असेलच. काही महिन्यां पुर्वी ह्याच कंपनीला १०,००० कामगार कमी करावे लागणार अशी अफवा होती. दोन महीन्यां नंतर त्याच पार्ले बिस्किट कंपनीला ४५० कोटी चा फायदा झाला. वार्षिक उलाढाल ९०५० कोटीची झाली.
गेल्या वर्षी वार्षीक फायदा ३७० कोटींचा होता.

उपेक्षित's picture

20 Oct 2019 - 5:07 pm | उपेक्षित

दादानू जागतिक पातळीवरचे मला खरच माहीतही नाही आणि रसही नाही त्यात आपल्या इथे आजूबाजूला काय परिस्थिती आहे ते मी सांगत आहे, कारण आज मलेशियाला कसा इंगा दाखवला आणि पाकडे कसे तोंडावर पडले ह्या बातम्या म्हणून ऐकायला ठीक वाटतात पण स्थानिक पातळीवर याचा काहीही फरक पडत नाही. तसेच यात फ़क़्त आणि फ़क़्त सरकारचा दोष आहे हेही मी म्हणत नाहीये.

आपण समजून घ्याल अशी आशा आहे.

इतकेच

आज मलेशियाला कसा इंगा दाखवला आणि पाकडे कसे तोंडावर पडले ह्या बातम्या म्हणून ऐकायला ठीक वाटतात पण स्थानिक पातळीवर याचा काहीही फरक पडत नाही.

हे विधान सत्य आहे.

डँबिस००७'s picture

20 Oct 2019 - 2:52 pm | डँबिस००७

जागतीक पातळीवर पाकिस्तानला पाठिंबा देणार्या तुर्की व मलेशीयाला भारताने चांगलाच ईंगा दाखवलेला आहे. तुर्कीची जागतीक पातळीवर चांगलीच नाचक्की भारत करत आहे. तुर्की सायप्रस ग्रीस सारख्या देशांवर हूकुमत गाजवायचा प्रयत्न करत आहे. भारताने त्याला जोरदार आक्षेप घेतलेला आहे. त्या शिवाय तुर्की कंपनी बरोबर होऊ घातलेला २.३ बिलीयन $ चा सौदाही रद्द केलेला आहे.

मलेशीयाला तर पुर्णच नागवल आहे. पाम तेल निर्यातीत ईंडोनेशियाच्या खालोखाल मलेशियाचा नंबर लागतो. भारत हा जगातला एक नंबरचा जगात पाम तेल खरेदी करणारा देश आहे. भारत पाम तेल मलेशीयाकडुन तसेच ईंडोनेशीया कडुन खरेदी करतो. मलेशियाने युएन मध्ये कश्मिर संबंधात पाकिस्तानच्या बाजुने वक्तव्य केल्यानंतर परराष्र्टीय मंत्रालयाने जलद गतीने मलेशिया विरुद्ध मोर्चे बांधणी सुरु केली. मलेशियावरुन येणार्या पाम तेलावर ५% आयात कर वाढवला. भारतीय व्यापांर्यांनी लगेच मलेशिया पाम तेल उत्पादक / विक्रेत्या कडुन पाम तेल विकत घेणे तातडीने थांबवले. आता भारतीय व्यापांर्यांनी पाम तेल ईंडोनेशिया कडुन विकत घेण्याचे सुरु केलेले आहे. ईंडोनेशियाने सुद्धा ह्याच संधीचा फायदा घेत पाम तेलाच्या बदल्यात भारता कडुन साखर व म्हशीचे मांस विकत घेऊ अशी काँऊटर ऑफर भारताला केलेली आहे.

डँबिस००७'s picture

22 Oct 2019 - 8:48 am | डँबिस००७

राम मंदिर बाबरी मस्जिद विवादावर सु को केस चालु आहे. केस वरील पक्ष प्रती पक्षाच्या बाजु मांडण्यासाठी दिलेला वेळ संपलेला आहे. केसचा निकाल हा हिंदु समाजाच्या बाजुने लागण्याची शक्यता लक्षात घेऊन ह्या केस मधिल मुस्लिम पक्षाने नविन डाव आज खेळलेला आहे. ह्या मुस्लिम समाजाच्या दोन्ही बाजुने ईंग्लिश मिडीया, डावे पक्ष तसेच अर्बन नक्षलींचा भक्कम आधार आहे.
आज मुस्लिम पक्षकारांकडुन सीलबंद पाकीटात Moulding of Relief पेटीशन सु कोर्टाच्या सरन्यायाधीशां कडे दिल. Moulding of Relief चा अर्थ यदा कदाचीत मुस्लिम पक्षकार ही केस हरले तरी कोर्टाने उदारता पुर्वक विचार करुन दुसर्या पक्षासाठी सुद्धा काही तरी तजविज करावी.
बंद पाकिटाकडे बघत सर न्यायाधिशांनी मुस्लिम पक्षकारांकडे पहात विचारल की हे अती गोपनिय पत्र तुम्ही मला दिल आहेत पण हेच पत्र आजच्या ईंडीया टाईंम्सच्या पहील्या पानावर छापलेल आहे.
आजच्या ईंडीया टाईंम्स सकट ईतर
English Mediaच्या पहील्या पानावर अस काय छापलेल होत ?
सु को भारतीय संविधानाच्या मुल्यांचा विचार करुन योग्य तोच निर्णय घेईल.
भारतात अनेक धर्मांचे लोक रहातात त्यामुळे एका धर्मांच्या लोकांवर अत्याचार होउ नये.
सर न्यायाधिशां कडे बंद पाकिटात पत्र, तेच पत्र खुल्या मिडीयात पहील्या पानावर !! कश्या प्रकारे न्याय व्यवस्थेवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहेत हे लोक !!
हिंदु समाज नेहमी प्रमाणे गाफील, बेदरकार, बेपर्वा आहे.
https://youtu.be/2l4Nq__si2w

डँबिस००७'s picture

22 Oct 2019 - 8:49 am | डँबिस००७

देशात ४०,००० पेक्षा जास्त अत्युत्तम हिंदु मंदिरे तोडुन तिथेच मशीदी बनवल्या गेल्या ।
अहमदाबादेत एक मोठी मशीद आहे, "जामा मशीद " नावाची. श्रद्धा कपुरच्या एका सिनेमात ही मशीद दाखवली होती. अर्ध्या मिनीटाच्या त्या मशीदीच्या
पिक्चरायझेशन मध्ये मला हे लक्षात आल की ही मुळात मशीद नव्हतीच तर तिथे एक भव्य दिव्य मंदीर होत. ईंटरनेट वर सर्च केल्यावर समजल की तिथे प्राचीन भद्रकाली मंदिर होत. माझ्यासाठी ही माहीती नविन होती.
खुद्द मक्का मदिना मध्ये रस्ता रुंदीकरण किंवा अश्या कोणत्याही कारणाने मशीदी तोडतात. जिथे ईस्लाम आला तिथे मशीदी तोडु शकतात पण भारतात मशीदी तोडु नये अस चलन आहे ?
मायबोलीवर सुद्धा बरेच पुरातत्व भागाचे विद्वान आहेत पण कोणालाही ह्या विषयावर बोलायची हिंम्मत नाही.
रहाता राहीला प्रश्न हिंदुंच्या सांस्क्रुतीक समस्यांवर ईंग्लिश मिडीया, डावे, लिबरल , अर्बन नक्षली एकत्र का येतात ? नेहमी हिंदुंनीच का नमते घ्यावे ?
राम मंदीरा साठी कोर्टाकडुन आदेश मिळाल्याने पुरातत्व विभागाने संशोधन करुन अहवाल सादर केला की तिथे राम मंदीर होते जे तोडुन बाबरी मशीद बांधली गेली. त्या वेळी ह्या वरच्या सगळ्यांनी पुरातत्व विभागावर दबाव आणला होता की मंदीर नाही असा अहवाल द्या !! समाजीक सलोखा वैगेरे साठी सत्यमेव जयतेचा खुन करायचा ? मग कश्याला अशी मोठी मोठी वाक्य वापरायची ?
हिंदु समाजाने गेली १००० वर्षे हाल अपेष्ठा सोसली . पण आता नाही. हिंदु समाजाने जाग्रुत व्हायलाच पाहीजे. आपल्या धर्माबद्दल, समाजाच्या रक्षणा बद्दल जागरुक व्हायलाच हव !! जो काळा ईतिहास डाव्या लोकांनी आपल्या गळी उतरवला तो पुसुन नवा ईतिहास लिहायला पाहीजे !!
हिंदु समाजाचा कोणीही मित्र नाही ही वस्तुस्थिती आहे.

भंकस बाबा's picture

22 Oct 2019 - 8:24 pm | भंकस बाबा

40000 मंदिराचे काय घेऊन बसला आहेत?
इथे तुमच्या आमच्यासमोर मशिदि उभ्या रहात आहेत. आणि हिंदू धर्माला पाठिंबा देणारे सरकार डोळे झाकुन बघत आहे. भाजपाचा हिंदू एजेंडा फक्त आणि फक्त निवडणुका पाहुनच रेटला जातो .

विजुभाऊ's picture

23 Oct 2019 - 12:49 am | विजुभाऊ

मॉटो सेक्टर मधल्या मंदीचे कारण वेगळे आहे. लोक हायब्रीड मॉडेल चा विचार करत आहेत. इलेक्ट्रीक कार्स चा विचार करत आहेत.
पेट्रोल डिझेल वरच्या गाड्या या येत्या तीन चार वर्षात ऑट डेटेड होणार आहेत असा एक प्रवाद लोकाम्मधे आहे.
तीन चार वर्षात गाडी फुंकून टाकणारी जनता भारतात तरी अजून फार मोठ्या प्रमाणात नाहिय्ये

थॉर माणूस's picture

25 Oct 2019 - 3:48 am | थॉर माणूस

काही अंशी खरे असले तरी हा तर्क पुर्ण ऑटो सेक्टरला लागू होत नाही. पॅसेंजर कार्स सेक्टर गेल्या सहामाहीमधे गेल्या वर्षीच्या सहामाहीपेक्षा ३५% ने खाली आहे. तिथे हे लॉजिक लागू पडले तरी मग त्याच कालावधीसाठी दुचाकी १६%, व्हॅन्स ३५%, जड ते मध्यम वाहतूकीची वाहने ३५% तर हलक्या वाहतूकीची वाहन विक्री १४% खाली आलेली आहे. तिथे हे लॉजिक लागू होत नसताना इतकी मोठी उतरण कशामुळे असेल? फक्त इथेच नाही तर मालवाहतूकीच्या व्यावसायिकांना सुद्धा गाड्यांच्या खेपांची मागणी १५% हून जास्तने कमी झालेली दिसत आहे. (ज्याचा परीणाम कदाचित जड माल वाहतूक वाहनांच्या मागणीवर दिसतोय?)

गोंधळी's picture

17 Nov 2019 - 11:04 am | गोंधळी

नोटबंदी कशी यशस्वी झालेली आहे हे जाणुन घ्यायचे असेल तर खालिल लेख वाचलाच पाहिजे.

https://www.loksatta.com/vishesh-news/demonetization-note-ban-pm-narendr...

यातुन आपल्याला कळेल की आपल्या देशात सर्वात जास्त बकरी,गाढव, मेंढ्या राहतात ते. आता जीथे मेंढ्या,बकरी तिथे लांडगे असणारच.

(अंध)भक्तांनी वाचु नये.

नोव्हेंबर मधे ज्या घडामोडी घडल्या त्यावर अगोदरच बरेच धागे निघाले आहेत. डिसेंबर मधे नवीन धागा नक्की काढतो.