गाभा:
http://ibnlive.in.com/blogs/sanjayjha/652/52782/why-raj-thackeray-blew-i...
राज ठाकरे यांच्या आंदोलनाशी संबंधित एक लेख. इंग्रजी आहे क्षमस्व. मी या लेखातील अनेक गोष्टींशी सहमत आहे.
मिपाकरांनी आपली मते मांडावीत असं मला वाटतं.
आय बी एन तसा बराच उत्तर धार्जिणा आहे पण लेख चांगला आहे.
जर हे मिपाच्या धोरणात बसत नसेल तर कृपया काढून टाका. फक्त कुठल्या धोरणात बसत नाही हे सांगावं त्याप्रमाणे पुढे काळजी घेता येइल.
प्रतिक्रिया
10 Nov 2008 - 11:19 am | विसोबा खेचर
आयबीएन?? माय फूट...!
हा एक नंबरचा मराठी आणि महाराष्ट्रद्वेष्टा चॅनल आहे...!
संजय झा च्या आदर्श राज्याच्या अन् देशाच्या गप्पा वाचल्या. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला त्याच्याकडून काहीही शिकायची गरज नाही..!
आलेत मोठे आम्हाला शिकवायला! चूतमारिचे...!
जय महाराष्ट्र...!
तात्या.
10 Nov 2008 - 12:44 pm | इनोबा म्हणे
तात्यांशी सहमत
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
10 Nov 2008 - 11:19 am | मराठी_माणूस
ह्या लेखात एका गरिब बिचार्या बिहार्याची दिनचर्या दिलेलि आहे, ह्या लेखकाला सगळे मराठी माणसे काय ऐषोआराम करतात असे वाटते का ?
लेखाच्या शेवटी लेखक सरसगट सगळ्या र्बिहार्यांचे वर्णन "most humble, soft-spoken and down-to-earth people" असे करतो आणि लेखाच्या पहिल्याच प्रतिसादात (जो एका बिहार्याचाच आहे) असे म्हटले आहे कि भागलपुर मधुन बंगाली लोकाना ह्याच बिहारी लोकानी हाकलुन दिले.
10 Nov 2008 - 11:39 am | विसोबा खेचर
लेखाच्या शेवटी लेखक सरसगट सगळ्या र्बिहार्यांचे वर्णन "most humble, soft-spoken and down-to-earth people" असे करतो
हेच तर त्या लेखातील सर्वात विनोदी वाक्य आहे! आणि ह्या वाक्यामुळे सदर लेखकाची बैद्धिक दिवाळखोरी जाहीर होते..!
तात्या.
10 Nov 2008 - 11:46 am | सुक्या
त्या संजय झा ला पहील्या प्रतीसादात त्याच्याच प्रांताच्या धीरज सिन्हा ने कानात मारली आहे. बिहारी गुंडा गर्दी, क्राइम घेउन येतात अन जिथे जातात तिथे घाण करतात हेच त्याने लिहीले आहे. शेवटची ओळ तर राज ठाकरेंच्या आंदोलनाचे समर्थनच आहे. "गुंडा लोकांना ठोकलेच पाहीजे .. अन् सगळीकडेच ठोकले पाहीजे". बाकी आय्.बी.एन, आज तक, झी यांना आम्ही पायजवळही जागा देत नाही.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
10 Nov 2008 - 12:08 pm | नाम्या झंगाट
च्या मायला..!!
ह्या आयबीएन वाल्यांना एकदा मराठी इंगा दावलाचं पाहिजे....
पोटापाण्याचा धंदा आमच्या मातीत आणि कामे मात्र महाराष्ट्र द्रोहाची......!
कुछ सोचना पडेगा.... ;-)
(आमचाचं महाराष्ट्र, आमचीच माती आणि आमचीचं माणसं ) नाम्या झंगाट
10 Nov 2008 - 12:19 pm | वेताळ
आमचे एक रिकामे घर एक बिल्डरने त्याच्या कामगारांसाठी राहयला भाड्याने घेतले होते. दोन खोल्या व व्हरांडा असे ते घर आहे.त्यात ज्यादातर ६-७ जण दाटीवाटीने राहु शकतात. पहिल्यांदा तिथे ६ बिहारी राह्यला आले. १५ दिवसानंतर तिथे १० जण रहत होते. एकदा वेळ मिळाला म्हणुन मी संध्याकाळी तिकडे गेलो अन पहातो तो काय तिथे चक्क १५ बिहारी रहात होते नंतर त्या बिल्डरला घर खाली करुन द्यायला सांगितले.४ महिन्यानी त्यानी घर खाली केले.तिथे बिहारयानी चक्क उकिरडा केला होता. चुलीवर जेवण करुन छत काळे केले होते.फाटके कपडे व इतर बरिच घाण तिथे करुन ठेवली होती.शेजारयनी सांगितले शेवटी शेवटी तिथे २०/२२ जण रहत होते. एकाद्या चांगल्या गोष्टीची कशी वाट लावायची हे बिहारयाच्या कडुन शिकायला पाहिजे.
वेताळ
10 Nov 2008 - 12:32 pm | मैत्र
मला फार वेगळ्या प्रतिक्रिया अपेक्षित नव्हत्या. आणि सुरुवातीला खूप आश्वासक वाटलेला आय बी एन हा आज तक च्या वाटेने गेला आहे. राजदीप चे आणि बरखा चे ब्लॉग्ज किंवा स्टोरीज विलक्षण एकांगी असतात. गुजरात निवडणूकांच्या आधी मोदींवरची मालिका आणि असे अनेक लेख व बातम्या.
पण या पोस्ट मधील दुसर्या बाजूचा विचार व्हावा असं मला वाटतं.
माझ्या एका मित्राच्या आइ वडिलांना मुंबइत रस्त्यात मनसे च्या काही लोकांनी त्रास दिला कारण ते हिंदीत बोलत होते.
पन्नाशीचे साठिचे लोक हे काय वाइट करणार महाराष्ट्राचं? सगळे बिहारी चांगले नसतात पण बरेच बरेही असतात.
प्रमाण दुसर्या वाइट बाजूला झुकतं हे खरं .. . २६ जुलै च्या महापुरात बिहारी लोकांनीही मदत केली असेलच ना? का तेव्हा भाषा पाहीली होती?
सकाळ मध्ये काल एक चांगला लेख होता. बिहार च्या अगदी आत्ताच्या स्थितीचे अतिशय धक्कादायक वर्णन आहे.
http://www.esakal.com/esakal/11102008/Saptarang9CBFA12E31.htm बिहार - यहा जिंदगी लगती है गाली
ही दुसरी बाजू आहे या पूर्ण राजकारणाची..
रेल्वे भरती हा इतका मोठा मुद्दा आहे का?
वीज, शेतकर्यांच्या आत्महत्या, रस्ते, पाणी हे इतके मोठे प्रश्न आहेत आणि इतक्या भयानक स्थितीत आहेत की परप्रांतीयांचा मुद्दा त्यापुढे फार छोटा आहे. महत्त्वाचा नाही असं नाही ... पण प्रायॉरिटी लावायची तर बराच खाली येइल..
10 Nov 2008 - 12:34 pm | अनामिका
संजय झा माझ्या माहिती प्रमाणे चेंडुफळीच्या खेळाचे समिक्षक आहेत्.आता यांना राजकारणात पडायला कुणी सांगितले देव जाणो..? #o
राजच्या आंदोलनाच्या निमित्त्ताने सध्या बर्याच जणांना आपल्या अतॄप्त भावनांना वाट मोकाळी करुन देण्याच कारण मिळाल आहे.कालच दिलीप चित्रे यांचा म टा मधिल लेख वाचला.वाचुन हसाव की रडाव तेच कळेना?
एका बिहारी व्यक्तीच्या दिनचर्येच वर्णन करताना तो किती बिचारा, असाहाय्य, गरिब ,कष्टकरी वगैरे असल्याच चित्र झा यांनी रंगवलय.पण मुळात मुंबईत राहणारा कुठ्लाही नोकरीपेशा स्त्री अथवा पुरुष अश्याच प्रकारचे आयुष्य जगत असतो.मग त्याला बिहारी अथवा अन्य कुणि कसा अपवाद असु शकेल?आणि इतका त्रास होतो तर मग रहा आपल्याच प्रांतात.कोण सांगत इथे यायला?आपापल्या प्रदेशात जी काही मिठ भाकर्री मिळेल ती खा आणि रहा आपापल्या कुटुंबासमवेत आनंदाने.पण यांच्या खाण्यासाठी यांच्याच प्रिय लालुसारख्या थोर नेत्यांनी काही शिल्लक तरी ठेवायला हवे की नाही?
बिहारी गरिब माणुस दिवसात फक्त चार तास झोपतो तर अखंड मुंबई देखिल फक्त ४ तासच झोपते.
इथल्या पायाभुत सुविधांवर भार पडतोय म्हणुन तर पहाटे लवकर उठून पाणी भरुन ठेवण्याचे कष्ट समस्त मुंबईकरांना घ्यावे लागतात. जे इतर करतात तेच गरीब बिहारी देखिल करतात त्यात नवल ते काय?
१९९० साली महाविद्यालयीन शिक्षण सुरु असताना व त्यासाठी मुंबईत रेल्वेने प्रवास करताना प्रथम श्रेणीचा पास काढुन देखिल कधी "बुड" टेकायला मिळाल्याच माझ्या तरी स्मरणात नाही. रेल्वेच्या डब्यातुन गुरामेंढरांसारखी कोंबलेल्या अवस्थेत आपापले अवयव सांभाळत लोक तेंव्हा आणि आत्ता देखिल प्रवास करतच आहेत्?पण हे सगळ कशामुळे बाहेरुन आलेले लोंढे वाढल्यामुळेच ना?मग इथे मुंबईत रहाताय तिथे गावात "बंबई मा रहते है"चा टेंभा मिरवता आणि इथल्या व्यवस्थेमुळे त्रास होतो याची रड कुणाला तर इथल्या स्थानिकांनाच सांगता? मग काय कराव म्हणताय राव तुमच्या साठी पायघड्या पसरायच्या का आम्ही स्थानिकांनी?
झा पुण्यात वास्तव्यास होते असे त्यांच्या त्या लेखा वरुनच समजत .मराठी लिहिता वाचता येत असेल अशी आशा करायला हरकत नाही त्यांच्याकडुन? मिसळपावने जाहिर आमंत्रण द्यावे त्यांना मिसळपाववर हजेरी लावण्यासाठी सर्वसामान्यांची मते वाचुन तरी स्वतःच्या वैचारीक दिवाळ खोरीच प्रदर्शन बंद करतील अशी आशा करायला हरकत नाही............!
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
"अनामिका"
10 Nov 2008 - 12:58 pm | इनोबा म्हणे
अनामिका फार छान प्रतिक्रीया दिलीस.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
10 Nov 2008 - 1:38 pm | मैत्र
अनामिका, प्रतिक्रिया चांगली आहे.. धन्यवाद.
10 Nov 2008 - 3:23 pm | सुनील मोहन
the Chatursinghi annual mela, family picnics in Shivaji park, and Joshi's inimitable batata vada.
पुण्यात कौटुन्बिक सहली "शिवाजी पार्क " येथे होतात बरे का पुणेकरहो.
10 Nov 2008 - 4:26 pm | अनामिका
तमिळभाषक "मराठी'च्या पाठीशी
तमिळनाडूची राजधानी चेन्नईतील एका राष्ट्रीय हिंदी भाषिक दैनिकात गेली सुमारे साडेचार वर्षे काम करणाऱ्या अभिषेक चौधरी या तरुणानेही चेन्नईत राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल नाराजी नसल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार राज ठाकरे आज जी भूमिका मुंबईत मांडत आहेत, तोच भाषाविचार तमिळनाडूसह दक्षिणेत कधीचाच स्वीकारला गेला आहे. त्यामुळे तमीळ अस्मितेशी मिळतीजुळती अशीच राज यांची भूमिका असल्याचे सर्वसामान्य तमीळ माणसाला वाटते आहे.
बातमी सकाळ मधिल आहे!!!!!!!!
"अनामिका"
10 Nov 2008 - 9:41 pm | कपिल काळे
अरे त्या झा ला चांगला धुतला, त्याच्या ब्लॉगावरच!!
बिहारयांनो , गांडीत दम असेल तर असामी, बंगाली, तामिळी ह्यांच्याबद्दल काही बकून दाखवा की.
मी ह्याबद्दल माझ्या ब्लॉगावर आवाज उठवला आहे. त्याचा दुवा दिला आहे. मी सर्व मिपाब्लॉगर्सना विनंती करतो की त्यांनी आपल्या ब्लॉगावर, बिहारयांबद्दल आवाज उठवावा. हिंदी ब्लॉगजगत ज्यापद्धतीने गरळ ओकत आहे, ते पाहून आपणही त्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे आहे.
http://kalekapil.blogspot.com/2008/10/blog-post_28.html
http://kalekapil.blogspot.com/2008/10/blog-post_2238.html