अक्कलकोट मठ आणि संस्थान

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
23 Sep 2019 - 9:52 pm

अक्कलकोट काय आहे बघू म्हणून प्रथमच गेलो होतो. भरपूर पाऊस असल्याने गाड्या वेळेवर जातील का शंका होती.
बऱ्याच जणांनी सोलापुरला रेल्वेने जाऊन पुढे बसने जा असा सल्ला दिला. अक्कलकोट रोड नावाचे स्टेशनही आहे आणि तिथे जाण्यायेण्याच्या वेळा ( १० वाजता सकाळी. चेन्नई मेल, उद्यान एक्सप्रेस) चांगल्या वाटल्याने तीच तिकिटं काढली. सध्या तमिळनाडूत तीव्र पाणी टंचाई आणि इतर ठिकाणी फार पाऊस यामुळे गाड्यांची तिकिटं सहज मिळाली.

जाण्याचे पर्याय -

अ) अक्कलकोट स्टेशन मार्गे.

अक्कलकोट स्टेशनला डावीकडे बाहेर (मुंबईकडून येताना) पडल्यावर बस् स्टॉप आहे. कर्नाटकच्या बसेसही असतात. या बसेस मुख्य बस स्ट्ँडला जातात.(१२ किमि) . गावात शिरताना राजेराय मठ स्टॉपपासून उजवीकडे नवीन गाणगापूर रोडवर दीड किमिवर 'स्वामी मंदीर' स्टॉप आहे. बस स्टँडवरून परत रिक्षाने स्वामी मंदीरला यावे लागते.

सिक्स सीटर ओटो असतात त्या स्टेशनवरून थेट स्वामी मंदीर'ला सोडतात (३०/-)

ब) सोलापूर मार्गे -
सोलापूर स्टेशनला सर्वच एक्सप्रेस ट्रेनस थांबतात. तिथून बसने अक्कलकोट बस स्टँड ३५ किमि. काही बसेस पुढे स्वामी मंदीरपर्यंत येतात. येथून तुळजापुरलाही जातात.

क) गाणगापूर -
अक्कलकोट बस स्टँड - स्वामी मंदीर - मैंदर्गी -अफजलपूर -गाणगापूर (५० किमि) कर्नाटक बसेस आहेत भरपूर.

--------------------

अक्कलकोट गावातली स्थळे -
स्वामींशी संबंधीत -
१) समाधी मठ
हा बस स्टँडमागेच आहे. दाट वस्तीत आहे. पार्किंगला फारशी जागा नाही. चोळप्पा शिष्याकडे आलेला.
२) गुरुमंदीर
बाळप्पा नावाच्या शिष्याकडे आलेला. हा वाडा पाहण्यासारखा आहे. स्वामी मंदीरापुढे फतेहसिंग चौकाच्या उजवीकडे भारत बोळात.
३) स्वामी मंदीर / वटवृक्ष स्वामी मंदीर
मुख्य मठ म्हणतात. याच्यासमोरच अन्नछत्र मंडळ परिसर आहे तो जन्मेजय राजे भोसले यांनी प्रस्थापित केला.
४) राजेराय मठ
या नावाचे एक वतनदार होते हैदराबाद संस्थानात. त्यांनी बांधला. भक्त निवास आतच आहे.
५) बेलानाथ मठ
क्र ४च्या समोरच आहे.
( या सर्व ठिकाणी फोटोग्राफी बंदी आहे.)

६) अक्कलकोट संस्थानाच्या इमारती

- जुना राजवाडा,किल्ला. यात कॉलेज आहे.
-नवा राजवाडा. यातली एक खोली पाहता येते. त्यात हत्यारे ठेवली आहेत. खरंतर सर्वच वाडा दाखवायला हवा.
भोसल्यांचे एक वंशज यांचे अक्कलकोट वतन. अर्धे गाव यांच्या मालकीचे आहे. आता कुणी राहात नाहीत इथे. पुण्यात राहतात.

७)वाडे
जुन्या पद्धतीचे वाडे आणि बोळ.

सर्व दोन किमिटरांत आहेत. रिक्षा, बस भरपूर.

काही अनुभुती येण्याइतकी माझी प्रगती नाही परंतू राजवाडे फारच आवडले.

गेली तीन वर्षे इथे धरण भरेल असा पाऊस झाला नाही. कुठून लांबून ट्यांकरने पाणी येते.

फोटो १
नकाशा . सोलापूर, अक्कलकोट,गाणगापूर.

फोटो २
बस वेळापत्रक, अक्कलकोट बस स्टँड.

फोटो ३
श्री वटवृक्ष स्वामी मंदीर - जुना राजवाडा - नवीन राजवाडा - अक्कलकोट बस स्टँड मार्ग. नकाशा.

________________________

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ परिसरात
महाप्रसाद भवन,( महाप्रसाद दुपारी १२-३, ८-९:३०, नि:शुल्क),
दोन नाश्ता हॉटेल्स खासगी,
यात्री निवास,( एकट्यासाठी आणि गटासाठी.३००/-),
यात्री भुवन,( रुम दोघांसाठी शुल्क ८००/-),
अतिथी निवास,
गणेश मंदीर,
शिवशिल्प प्रदर्शन,
जिम,
लहान मुलांसाठी बालवाटिका ( मंगळ - बुधवार बंद),
बसेस आणि कारसाठी पार्किंग.

फोटो ४
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ

फोटो ५
नवीन राजवाडा_१. प्रवेशद्वार.

फोटो ६
नवीन राजवाडा_२

फोटो ७
नवीन राजवाडा_३

फोटो ८
जुना राजवाडा_१. एक दरवाजा.

फोटो ९
बुरुज, जुना राजवाडा_२.

फोटो १०
बालवाटिकेतले प्राणी_१

फोटो ११
बालवाटिकेतले प्राणी_२

फोटो १२
बालवाटिकेतले प्राणी_३, फुलपाखरु

फोटो १३
विठ्ठल मंदीर

फोटो १४
नवीन राजवाडा_४

--------------
सेवा आणि देणगीसाठी
फोटो १५

फोटो १६

(( १८ - १९ सप्टेंबर २०१९ ( भाद्रपद कृष्ण चतुर्थी पंचमी, शके १९४१, मंगळवार - बुधवार.) यावेळची गोळा केलेली माहिती यावर आधारित लेखन. चुका दुरुस्ती, सूचनांचे स्वागत. ))

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

24 Sep 2019 - 7:49 am | यशोधरा

मस्त भटकंती करता कंकाका.

प्रचेतस's picture

24 Sep 2019 - 8:15 am | प्रचेतस

व्वा...!
छोटेखानी भटकंती खूप आवडली.

श्वेता२४'s picture

24 Sep 2019 - 11:20 am | श्वेता२४

अक्कलकोटला लग्नाआधी वरचेवर जाणे व्हायचे. लग्नानंतर मी व नवरा दर्शनाकरीता गेलो त्यानंतर जाणे झाले नाही. राजवाडा व इमारती पाहण्यात नाही किंबहुना असे काही पाहता येईळ हा विचारच नसायचा कारण केवळ देवदर्शन हाच हेतू असायचा. आता गेले तर हे सर्व पाहीन. बालोद्यान वगैरे अलिकडील सुधारणा वाटते. मस्त सचित्र माहिती कंजुसजी.

थोड्याबहुत शुद्धलेखनाच्या चुका आहेत ,त्या मी देखील करतो पण मिपा वर ट्रॉल खूप असल्याने व चुका लगेच दिसणाऱ्या असल्याने लौकर सुधारावा हि विनन्ती

तसेच लहानपणी अक्कलकोट ला ब्राह्माण भोजनालय मध्ये जेवलो होतो ते अजून असेल का? तसेच मोठ्या आकाराच्या पोळ्या मिळायचा एक ठिकाणी आता असतील का ?

६) अटलकोट संस्थानाच्या इमारती

कंजूस's picture

24 Sep 2019 - 2:51 pm | कंजूस

करतो बदल.
एक 'जोशी खानावळ' आहे तिथे चांगल्या पोळ्या मिळाल्या.

जालिम लोशन's picture

24 Sep 2019 - 4:31 pm | जालिम लोशन

छान

Rajesh188's picture

24 Sep 2019 - 10:05 pm | Rajesh188

अक्कलकोट चे अन्नछत्र चालवले जाते ते खूप चांगल्या पद्धतीने .
जेवण मुफ्त असते आणि जेवणाचा दर्जा सुधा अती उत्तम .
मी गेलो होतो मला खूप आवडले .

अरिंजय's picture

25 Sep 2019 - 11:18 am | अरिंजय

जेवण सर्वांना मोफत असते. साधेच परंतु छान असते. अक्कलकोटला कुठेही न जेवता इथेच जेवावे. येथे इच्छा असल्यास सेवा पण देऊ शकतो. म्हणजे स्वयंपाकात, वाढण्यात मदत देखील करू शकतो. आणि सर्वांसाठी मोफत असल्यामुळे येथे सढळ हस्ते देणगी द्यायला काही वाटत नाही.

Rajesh188's picture

25 Sep 2019 - 1:51 pm | Rajesh188

देवस्थानं चे व्यापारीकरण झाल्या मुळे कुठेच देणगी देण्याची माझी इच्या होत नाही .
पण मी अक्कलकोट ला
अन्न छत्र बघितलं आणि मी खूप प्रभावित झालो एक दिवस मुक्काम सुद्धा वाढवला आणि सेवा आणि देणगी दोन्ही सुद्धा दिली

लहानपणी सारखे जाणे व्हायचे.
आता रस्ता बरा आहे का?
काही वर्षांपूर्वी गेलेले तेव्हा तुळजापुर-अक्कलकोट आणि सोलापूर-अक्कलकोट दोन्ही रस्ते वाईट अवस्थेत होते.

शेजारचे आमच्याबरोबरच बस स्टँडला आले तेव्हा विचारुन घेतलं. ते सोलापुरवरूनच आलेले. दोन लेन्सचा उत्तम रस्ता आहे, एक तासात जातो म्हणाले.

दुर्गविहारी's picture

25 Sep 2019 - 10:45 am | दुर्गविहारी

खुपच छान आणि उपयोगी माहिती. बालोद्दान नवीन झालेले दिसतयं.

खरे आहे काय ? तेथे बरेच मनोरुग्ण आणून सोडले जातात व स्वामींच्या कृपेने ते बरेही होतात.

अवांतर:- एक मिपा ट्रिप आयोजित करायची काय ? कट्टे बरेच झाले.

अवांतर शब्द टाकल्याबद्दल धन्यवाद

Rajesh188's picture

25 Sep 2019 - 1:22 pm | Rajesh188

गांगणापुर हे दत्ताचे स्थान आहे अक्कलकोट पासून जवळच तिथे भूत उतरवले जाते .
पण कर्नाटक आणि महारष्ट्र ह्यांच्या भांडणात तिथे रस्ता चा विकास झाला नाही

जॉनविक्क's picture

25 Sep 2019 - 1:25 pm | जॉनविक्क

अक्कलकोटला मनोविकार असे ऐकून आहे

Rajesh188's picture

25 Sep 2019 - 1:23 pm | Rajesh188

गांगणापुर हे दत्ताचे स्थान आहे अक्कलकोट पासून जवळच तिथे भूत उतरवले जाते .
पण कर्नाटक आणि महारष्ट्र ह्यांच्या भांडणात तिथे रस्ता चा विकास झाला नाही

प्रसाद_१९८२'s picture

29 Sep 2019 - 8:48 pm | प्रसाद_१९८२

तुम्ही का नाही एकदा गाणगापूरला जाऊन येत ?

तिथे फरक नाही पडला तर मग गाणगापूर असाही विचार करता येईल की.

सुबोध खरे's picture

1 Oct 2019 - 7:00 pm | सुबोध खरे

भूत चढतंच कसं?

जॉनविक्क's picture

2 Oct 2019 - 12:09 am | जॉनविक्क

॥श्री स्वामी समर्थ॥