ति........................

उम्मि's picture
उम्मि in काथ्याकूट
9 Nov 2008 - 7:30 pm
गाभा: 

पहिल्यान्दा ति मला दिसली तेव्हा मी ओफ़्फ़िस ट्रान्सपोर्टसाठी पिकअप पोइन्ट्वर उभा होतो. (तशी ति जागा मोक्याचि व स्टेशननजिक असल्यामुळे बरेच आय.टि वाले, बि.पि.ओ वाले, आणि बेन्केत काम करणारे आम्हि एकमेकान्चि सोबत करत बसची वाट पहात होतो.) आमच ओफ़्फ़िस एकच आहे, हे ति माझ्याच बसमध्ये चढ्ल्यावर समजल. मी तेव्हा नविनच जोइन केलेल.

ति दिसायला अतिशय मोहक. वर्णाने निमगोरि.. नाकि-डोळि निटस... नाजुक चणीची.... मध्यम बान्ध्याची.....रेखिव चेहरयाची......त्या दिवशी बस ओफ़्फ़िसला पोहचेपर्यत मी एकटक तिच्याच कडे बघत होतो. तिच्यासोबत तिचि मैत्रिण होती, अस वाटत होत कि ओफ़्फ़िस येवुच नये, आणि बस अशिच चालत रहावी.

मला समजल कि तिच व मला दिलेल डीपार्टमेन्ट एकच आहे. मी ओथरायझर म्हणुन सीलेक्ट झालेलो. डीपार्टमेन्टचा टि.एल. मला काम समजवण्यासाठी एका हसरया चेहरयाच्या मुलिकडे घेवुन आला, व ओळख करुन निघुन गेला. ती तिची मैत्रिण होती. माझी नजर सहजच तिला शोधु लागली, अन तिचि नि माझी नजरानजर झाली. तिने स्मित हास्य केले, मी हि तिला ठेवणितल स्माइल दिल.....

नन्तर हळुहळु मला तिच्याबद्द्ल एकेक गोष्ट कळु लागली, तिचि हुशारि, तिचा सहकारयाशी वागतानाचा मनमिळावुपणा, तिचा शालिनपणा, नविन काम घेतानाचि उत्सुकता, तिचा हळ्वेपणा, तिचि गाण्याचि आवड, तिचा साधेपणा, तिची निरभिडव्रुत्ति, आणि कितिहि दुख असले तरि चेहरयावर येवु न देण्याचा व दुसरयास सहजासहजी न सान्गण्याचा हेकेखोरपणा..........

तिच्याबद्द्ल मला वाटणारे आकरषण दिवसागणिक वाढु लागले, आम्ही येता-जाता एकमेका हाय- बाय करु लागलो, एकत्र टी- कोफी घेवु लागलो, जेवणहि एकत्रच करु लागलो, एकमेकान्च्या नकळत एकमेकाकडे पाहु लागलो.हळुह्ळु समजल कि तिच्या व माझ्या बरयाच आवडी-निवडि जुळताहेत,एव्हाना दोघानाहि एकमेकाबद्द्ल वाटनारे आकरषण उमगले होते.

हळुहळु आम्हि एकमेकाना कामात मद्त करु लागलो, मि माझे पर्सनल प्रोब्लेम तिच्याकडे शेअर करु लागलो तशि ति हि अधिक मोकळि होत तिच्या अडचणी, सुख-दुखे मला सान्गु लागली..तिचा माझ्याप्रतिचा विश्वास वाढत होता, अन माझा तर तिच्यावर स्वतापेक्शाही जास्त विश्वास होता.

आम्हाला एकमेकान्च्या भावना कळत होत्या, पण...................

जवळ-जवळ दिड वर्षानन्तर मला दुस्ररिकडे चान्गल्या नोकरिचि ओफर आलि, आणि मी रेसिग्नेशन टाकले, तिला हे कळ्लावर ति माझ्यापाशि येवुन बरिच रडलि, पण नन्तर स्वताला सावरुन मला कोन्ग्रेट्स केल व शुभेच्चा दिल्या...............

माझ्या नोटिस कालावधित तिने मला चान्गली कम्पनि दिलि. आता भेट होनार नाहि, नेहमिचा चेहरा दिसनार नाहि,याच दुख दोघानाहि वाटत होत......

आज ३-४ महिने होउन गेलेत, पण अस वाटतय जणु ति रोजच मला भेट्तेय़........या जन्मात तरि तिला विसरणे मला जमेलस वाटत नाहि बुवा !!!

( अरे मन्ड्ळी,एक गोष्ट तिच्याबद्द्लचि सान्गायलाच विसरलो, जि पहिल्याच दिवशि माझ्या ध्यानात आलि होति,तिच लग्न झालेल होत, मी त्या निखळ,निरागस मैत्रिला गालबोट लावण्याचे पातक करु शकलो नाहि. तिचा माझ्याप्रतिचा विश्वास मला जास्त मोलाचा होता. )

आपला निरागस,

उम्मि

प्रतिक्रिया

पण लिखाणात तुला अजुन सुधारना केल्या पाहिजेत.बाकी सर्व छान जमले आहे.
वेताळ

कपिल काळे's picture

9 Nov 2008 - 9:27 pm | कपिल काळे

र्‍हस्व, दीर्घ, जोडाक्षरे काळजीपूर्वक बघायला हवी होती.
ती, मी हे शब्द दीर्घ लिहावेत.
ओफ़्फ़िस, भेट्तेय,तिच्याबद्द्लचि,बरिच ,मैत्रिला ह्याऐवजी ऑफिसला, भेटतेय, तिच्याबद्दलची, बरीच, मैत्रीला असे शुद्ध लिहावे. नाहीतर वाचताना अडखळल्यासारखे होते.

http://kalekapil.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Nov 2008 - 9:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

निरागस शब्द वाचल्यावरतर खात्रीच पटली की हा ही आणखी मानसिक बाहेरख्यालीपणाचा नमुना असणार!
असो, हे माझं मत झालं वाचल्यावर. पु.ले.शु.

(इरसाल) अदिती

कशिद's picture

10 Nov 2008 - 1:31 am | कशिद

तिच लग्न झालेल होत

टारझन's picture

10 Nov 2008 - 3:12 am | टारझन

या या !!! अंमळ णविण दिसताय ... ह्या प्रकारची ही पाचवी कथा असावी !!(आता पिडांनी हाणला नाय म्हणजे झालं, स्वारी हो पिडाभौ .. ) बरं झालं छोटंस लिवलं .. एक मिंटात वाचुन संपलं .... बाकी काय बोलू... मौन व्रत

ता.क. : काळे साहेबांच्या सुदलेकनाचं मनाव नाय घेतलं तरी बी चालल पण त्ये वाचताना तरास व्हईल इतकं माइंदळ नगा हुन देऊ .. बाकी कै नै भौ

- (अंमळ खडूस)
टुर्योधन