body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}
/* जनरल */
h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}
.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}
.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}
.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}
#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}
.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}
.page-header { padding-top:16px !important;}
.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
width:600px;
}
मिपा दिवाळी अंक २०१९
अनुक्रमणिका
थरार - पेंच व्याघ्र अभयारण्य
गेले वर्षभर पेंच अभयारण्यातल्या वाघांचे फोटो सोशल मीडियावर रोज कुणी ना कुणी पोस्ट करतच होते. ते बघून मे महिन्यात पेंचवारी करायचीच, हा निश्चय झाला होता. फेब्रुवारीमध्येच सफारी आणि हॉटेल बुकिंग करून ठेवलं. लगेचच मुंबई-नागपूर-मुंबई प्रवासाचंही बुकिंग केलं.
पेंच राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातल्या सिवनी आणि छिंदवाडा जिल्ह्यांत विभागलं गेलं आहे. पेंच नदी ह्या जंगलातून उत्तर-दक्षिण वाहते. ह्या नदीमुळेच ह्या जंगलाला पेंच नाव पडलं. ही पेंच नदी ह्या जंगलाला पूर्व आणि पश्चिम अशा जवळपास दोन समभागांत विभागते. १९७५ साली ह्या जंगलाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला, पण १९६५ सालीच हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित झालं होतं. १९९२ साली हे उद्यान १९वं व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित केलं गेलं. ह्या जंगलाची दक्षिण सीमा महाराष्ट्राला लागून आहे. ह्या जंगलात सफारीसाठी मध्य प्रदेशातून ५, तर महाराष्ट्रातून ६ प्रवेशद्वारं आहेत.
ह्या जंगलाचं मुख्य आकर्षण अर्थातच वाघ. पण वाघाशिवाय चितळ, सांबर, नीलगाय, रानडुक्कर, अस्वल, लांडगा, कोल्हा, जंगली कुत्रे, चौशिंगा, भेकर हेही प्राणी आढळतात. ह्या जंगलात विपुल प्रमाणात पक्षी आढळतात. जंगल सफारीचा कार्यक्रम असा होता - शुक्रवारी संध्याकाळी रिसॉर्टवर पोहोचायचं, शनिवारी सकाळ-संध्याकाळ आणि रविवारी सकाळ-संध्याकाळ अशा ४ सफारी करायच्या. चारही सफारी खुरसापार आणि टौरिया गेटवरच्या आधीच बुक करून ठेवल्या होत्या. हे अशासाठी की गाइड्सकडून कोणत्या गेटला साइटिंग चांगलं होतंय हे कळल्यावर ऐन वेळेस बुकिंग मिळणं अशक्य असतं. अशा वेळेस दोन्ही गेट्सवरचं सफारी बुकिंग अगोदरच केलं असेल तर उपयोगी पडतं. नागपूरहून शुक्रवारी रात्री रिसॉर्टवर पोहोचायला ११ वाजले. गेल्या गेल्या मॅनेजरकडून कोणत्या गेटवर साइटिंग चांगलं होतंय ह्याची माहिती घेतली. त्याप्रमाणे खुरसापार गेटला शनिवार सकाळ-संध्याकाळ सफारी करायची, हे ठरवूनच झोपलो.
शनिवारी सकाळी ५ वाजता उठून तयार झालो. जिप्सी रिसॉर्टवर आलीच होती. जिप्सीने रिसॉर्ट ते गेट पोहोचायला अर्धा तास लागणार होता. पावणेसहाला गेटवर पोहोचलो. गाइड आणि सफारी बुकिंग कन्फर्म करून मी गेट उघडायची वाट बघत जिप्सीमध्ये बसून राहिलो. ठीक ६ वाजता जिप्सीज नंबरप्रमाणे जंगलात सोडायला सुरुवात झाली. आमची १२व्या नंबरची जिप्सी सव्वासहाच्या सुमारास जंगलात शिरली.
१०-१२ कि.मी. आत गेल्यावर पुढच्या सगळ्या जिप्सीज थांबलेल्या दिसल्या. थोड्याच अंतरावर 'बिंदू' गवतात बसली होती.
(वनविभाग त्या त्या अभयारण्यातल्या वाघांना T-1, T-2, T-3 असे क्रमवार नंबर देतात, तर गाइड्स आपल्या आवडीची नावं देतात. खुरसापार गेटच्या जंगलात बिंदू, बारस ह्या वाघिणी दिसतात. ही त्यांची टेरिटरी.) बिंदू आमच्याकडे पाठ करून बसली होती. कॅमेरा सज्ज ठेवून जिप्सींच्या ताफ्याकडे कधी बघतेय ह्यावर नजर ठेवून होतो.
एवढ्यात 'बिंदू' उठली आणि सरळ पुढे चालायला लागली. सगळा जिप्सींचा ताफा तिच्या मागे ठरावीक अंतर राखून होता. एका वळणावर 'बिंदू' रस्ता सोडून जंगलात घुसल्यावर जिप्सी थोडी पुढे घेऊन काही 'हेड ऑन' फोटो काढले.
'बिंदू' जंगलात दिसेनाशी झाल्यावर गाइड म्हणाला की पुढे असलेल्या वॉटरहोलला आपल्याला 'बारस' दिसण्याचे चान्सेस आहेत. सगळ्याच जंगलात काही नैसर्गिक पाणवठे असतात, तर काही ठिकाणी वन विभाग कृत्रिम पाणवठे तयार करतं. स्थानिक गाइडस ह्या पाणवठ्यांना वॉटरहोल्स असं संबोधतात. वॉटरहोलजवळ पोहोचलो, तर आधीच ६-७ जिप्सीज थांबलेल्या होत्या. गाइडला म्हटलं की आता इथेच थांबून 'बारस'ची वाट बघत बसू.
एव्हाना सकाळचे साडेसात वाजले होते. सकाळच्या सफारीची वेळ सकाळी ६ ते ०९:३० अशी असते. साडेनऊपर्यंत गेटवर पोहोचणं अपेक्षित असतं. वॉटरहोलच्या स्पॉटपासून गेटला पोहोचायला २० मिनिटं लागणार होती. ह्या हिशोबाने जवळपास पावणेदोन तास हातात होते. अर्धा तास काहीच मूव्हमेंट दिसेना, त्यामुळे इतर जिप्सीही निघून गेल्या. आता आमचीच जिप्सी तिथे उभी होती.
अचानक झाडाआडून 'बारस' उगवली. आजूबाजूचा कानोसा घेत सरळ पाण्यात जाऊन बसली. सहसा जंगलात वाघाची मूव्हमेंट होऊ लागली की कॉल सुरू होतात. कॉल म्हणजे वाघाची मूव्हमेंट सुरू झाली की भेकर, सांबर, लंगूर वगैरे प्राणी एक विशिष्ट आवाज काढून इतर प्राण्यांना सावध करतात. 'बारस'च्या बाबतीत असं काहीच कॉलिंग झालं नव्हतं आणि अचानकच ती झाडाआडून अवतीर्ण झाली होती.
म्हणजेच ती वॉटरहोलपासून जवळच कुठेतरी बसून होती आणि थोडी शांतता होण्याची वाट बघत होती. अर्थात जंगलात अशी सरप्राइजेस मिळतातच. आपल्याकडे सफारीला लोकांचा कलकलाट एवढा असतो की आपण जंगलात आलो आहोत आणि आपल्या आवाजाने जंगलातले प्राणी विचलित होतील, असा विचार कधीही करत नसतो. १५-२० मिनिटं पाण्यात बसून झाल्यावर 'बारस' पाण्यातून बाहेर येऊन सावलीत बसली.
फोटो मनसोक्त मिळत होते. ९ वाजत आले होते. गाइडला म्हटलं की "दहा मिनिटांत निघू या परत."
एवढ्यात जिप्सीच्या मागच्या बाजूच्या जंगलातून मोराच्या ओरडण्याचा आवाज आला. जंगलात मोराचा, इतर पक्ष्यांचे आवाज तसेही येत असतातच. सहज मागे वळून बघितलं तर एक भेकर वॉटरहोलच्या दिशेने जाताना दिसलं. 'बारस'नेही भेकर बघितलं होतंच. ह्या वॉटरहोलची जागा किंचित उंचावर होती. 'बारस' जिथे बसून भेकराला न्याहाळत होती, ती जागा थोडी सखल होती. 'बारस'ला भेकर अगदी व्यवस्थित दिसत होतं, पण भेकराचं मात्र 'बारस'कडे अजिबात लक्षं नव्हतं. तसंही वाघ जंगलात बसून असेल तर पटकन नजरेस पडत नाही. जंगलातल्या गवताच्या रंगाशी तो इतका बेमालूमपणे मिसळून जातो की त्याला शोधायला सराईत नजर लागते. भेकराने वॉटरहोलला पोहोचून सावधपणे आजूबाजूला बघितलं, पण काहीच धोका दिसला नाही. आता भेकराने नि:शंकपणे पाणी प्यायला सुरुवात केली. तशी 'बारस'ने stalking position घेऊन १-२ मिनिटं भेकराचा अंदाज घेतला. अचानक उसळी घेऊन 'बारस' भेकराच्या दिशेन झेपावली.
भेकर पाणी पीत होतं, तरी सावध होतंच. भेकराने २-३ उड्या मारत वेगाने पळण्याचा प्रयत्न केला. पण 'बारस'ने घेतलेल्या वेगापुढे भेकराचा वेग खूपच कमी पडला. 'बारस'ने ३-४ उड्यांमध्येच भेकराला गाठलं आणि त्याची मान जबड्यात धरली. वाघाच्या जबड्यात मान धरली गेल्यावर केवळ ४-५ सेकंदात भेकराचा जीव गेला. 'बारस'ने तसंच भेकराला जबड्यात धरून वॉटरहोलपर्यंत खेचत आणलं. भेकराला तिथेच टाकून 'बारस' थोडा वेळ दम खात तिथेच बसून राहिली. काहीतरी अॅक्शन होणार ह्या अपेक्षेने ड्रायव्हरने जिप्सी चालूच ठेवली होती, लगेचच जिप्सी मागे घेऊन 'बारस'ने केलेल्या शिकारीचे फोटो काढले.
पेंचच्या ह्या ट्रीपला माझ्याबरोबर शीतल तळेकर होती. टायगर सफारीला जायची तिची ही पहिलीच वेळ. भेकर वॉटरहोलला चाललंय हे दिसल्याक्षणी तिला म्हटलं होतं की "काहीतरी निश्चित घडेल. फोटो मी देईन तुला, पण तू व्हिडिओ शूट कर." हा सल्ला मानून शीतलने 'बारस'ने केलेल्या शिकारीचा व्हिडिओ मात्र झकास शूट केला. गाइडने सांगितलं की ०९:२५ झालेत, आता कॅमेरे सांभाळा, गेटवर पोहोचायला हवं वेळेत. गेटवर पोहोचेस्तोवर पावणेदहा झाले होते.
पहिल्याच सफारीला अशी जबरदस्त बोहनी झाल्यावर पेंच ट्रिप अपेक्षेहूनही यशस्वी झाली होती. कधी कधी ५-६ सफारी करूनही वाघाचं नखही दृष्टीस पडत नाही, तर कधी ध्यानीमनी नसताना वाघ डोळ्यासमोर शिकार करताना दिसतो. नशीब जोरावर असणं म्हणजे काय, याचा अशा वेळेस प्रत्यय येतो.
प्रतिक्रिया
26 Oct 2019 - 4:15 pm | यशोधरा
अफलातून!! शिकारीचा व्हिडिओ, बाकीचे फोटो सारेच भारी!
पेंच ट्रिप भलतीच यशस्वी झाली की!
27 Oct 2019 - 3:00 pm | रुस्तुम
वाह!! मस्त अनुभव...किल बघायला मिळणे म्हणजे नशिब आहे.
असाच साधारण अनुभव आम्हालाही आला. त्या वॉटर होलवर बारस असताना एकदा भेकर आणि एकदा जंगली डुक्कर वॉटर होलवर येत होते. बारसने दोन्ही वेळा स्टॉकिंग पोझिशन घेतली होती आणि ते टप्प्यात यायची वाट बघत होती. ..पण दोघांना धोक्याची चाहूल लागली अन आमचा थरार थोडक्यात हुकला. पण जेवढा वेळ तीने स्टॉकिंग केलं तो सगळा वेळ कमालीचा उत्कंठावर्धक व तणावपूर्ण होता.
30 Oct 2019 - 2:55 pm | टर्मीनेटर
वर्णन, फोटो, व्हिडिओ सगळंच भारी...लेख आवडला!
30 Oct 2019 - 5:30 pm | सुधीर कांदळकर
आपण स्तब्धता छान पाळली आहे. दोन दोन वाघिणींचा डबल धमाका. अनेक अनेक धन्यवाद.
आम्ही दांडेली अभयारण्यात गेलो होतो तेव्हा बिबट्याच्या पावलाचा ठसा गाईडने दाखवला होता. नंतर जंगली कुत्र्यांचा कळपच आला. फारच चपळ देखणे सुदृढ कुत्रे. त्याची आठवण करून दिलीत.
30 Oct 2019 - 8:36 pm | जॉनविक्क
31 Oct 2019 - 9:40 pm | बरखा
शिकार करताना फोटो अथवा व्हिडिओ मिळण तसं अवघडच असते. जंगल सफारीचा आनंद आम्ही कान्हा येथे घेतला. सकाळीच ऊठून त्या जीप मधे बसून आजूबाजूला गाईड सांगत असतो त्या प्रमाणे आपल्या नजरा फिरवत रहायच्या. काही दिसेल या अपेक्षेने दिलेल्या वेळेत फिरत रहायच्,यात नशीबावान असणार्यांनाच व्याघ्र दर्शन होते. पण एकूणच हा अनुभव फार सूंदर असतो.
अनेकदा लोकांना सुचना देऊनही काही हौशी मंडळी कधी कधी या संधिचे सोने करायचे सोडून त्यात व्यत्यय आणतात.
31 Oct 2019 - 10:37 pm | पद्मावति
भन्नाट.
6 Nov 2019 - 1:28 pm | श्वेता२४
फोटो आणि व्हिडिओ छानच.
6 Nov 2019 - 6:56 pm | मित्रहो
बघायला मिळणे यासारखे नशीब नाही. जंगलात वाघ दिसतच नाही आणि दिसला तर दूर कुठे तरी दिसतो त्यात तो शिकार करताना दिसणे म्हणजे नशीब. मी कितीतरी जंगलात गेलो पण कुठे वाघ दिसला नाही अपवाद ताडोबा. जवळ जवळ सतरा ते अठरा मिनिटे वाघ दिसला. त्यानंतर दोन वाघाची पिल्ले देखील दिसले.
12 Nov 2019 - 8:27 am | प्रचेतस
काय देखणं जनावर आहे हे. व्हिडिओ सुद्धा खूप भारी.
20 Nov 2019 - 10:28 pm | मुक्त विहारि
नशीबवान आहात.
30 Dec 2024 - 6:26 pm | diggi12
मस्त
3 Jan 2025 - 8:23 am | MipaPremiYogesh
कमाल थरार head on आणि मग kill..vishay..