आमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - २)

वैभव.पुणे's picture
वैभव.पुणे in भटकंती
4 Sep 2019 - 9:40 pm

इमिग्रेशन - टेक ऑफ - बाय बाय मुंबई

झालं तर मग, धास धुस, घाबरत घाबरत एकदाचे एअरपोर्ट मध्ये घुसलो. कुठे काय असते, कुठे नाही, काहीच कळायला मार्ग नाही, मार्गदर्शक होते, ते निघायच्या आधी यू ट्यूब वर बघितलेले काही व्हिडिओज फक्त!

तिकिटावर आलेले गेट नंबर म्हणजे तरी काय असते याचाच पत्ता नाही, तिकिटावर होते गेट नंबर ४०, आम्ही आपलं बाहेरच हुडकून बेजार बाबा गेट नंबर कुठाय नेमकी, शेवटी तिथल्या पोलीस कर्मचाऱ्याला विचारल, तेव्हा कुठं कळलं की, ट्रमिनल च्यां आत मध्ये गेल्यावर, जिथून विमान उड्डाण करत, ती जागा म्हणजे गेट नंबर!

हुश्श!

पटकन ऐरलाईन काऊंटर वरून बोर्डिंग पास घेतला, आणि मनातल्या मनात तिथल्या व्यक्तीला(आणि पूर्ण मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ला) सांगितलं की, बाबा आलोय आम्ही, आणि आता आमचं विमान येऊ द्या मलेशिया च!!

ईमिग्रेशन ला बराच वेळ बाकी होता, तोपर्यंत बॅग चे सिक्युरीटी चेक करून ट्रमीनल - २ आतमधून यथेच्छ न्ह्याहलले. काय ते अवाढव्य रूप, काय ती व्हीं आय पी स्वच्छता! हे भले भले डिस्प्ले लावलेले, आमचं विमान येतय ना वेळेत याची खात्री त्या डिस्प्ले वर करून घेतली. ड्युटी फ्री, रेसटॉरंट्स, एक्सचेंज काऊंटर, मदत हवी का केंद्र, याचं भरपूर अध्ययन केलं.

कुणी बाहेरचे सिम कार्ड विकत होत, तर कुणी ट्रॅव्हल इन्शुरन्स!

आम्ही माहिती काढली होती, तिथं गेल्यावर ट्रॅव्हल सिम कार्ड भेटत, त्यामुळे लक्ष नाही दिले.

२ तास आधी म्हणल घाई नको, म्हणून पटकन इमिग्रेषण करून घेतलं, वाटल आता ह्यो बुवा काय काय विचारतो काय माहित फाड फाड, कशाला चालला न कुठे न कशासाठी! इथ तर उल्टच सगळ, चक्क मराठीतून चौकशी झाली, ती फक्त, जन्म गाव कुठलं आणि परत कधी येणारे भारतात!

मी अवाकच!

सगळी भीती एका क्षणातच निघून गेली.. म्हणलं हे तर फारच सोपं दिसतंय गड्या! आपणच ट्रीप अरेंज केली, त्यामुळे, आता विश्वास आणखी वाढला की, आपण आपलं टार्गेट टू क्वालालंपूर फिरून येणे अगदी सहज करणार!

ऑफिसर एकदम साधे आणि टेंशनहो केलं!!

आता फक्त वाट होती ती, कधी एकदा त्या गेट नंबर ४० च्या बाहेर आमचं विमान दिसतय आणि आम्ही कधी एकदा त्यात बसतोय!

तोपर्यंत अख्खा T-२ चे फोटो काढ, व्हिडिओ काढ, सगळ करून घेतलं!

तोंड धुतलं, आवरा आवर केली, आणि सज्ज झालो, विमानात बसायला!

दे दणादण!! एअरलाईं क्रू कडून स्वागत झालं, आपली आपली सिट पकडली, थोडी घबरट कमी होईना, धाकधूक वाढली आता. आता पुढे काय होतय आणि काय माहित.. हे देवाचा धावा केला! बाबारे नीट विमान उडू दे, तिकड नीट होऊ दे, आणि नीट वापस येऊ दे आम्हा दोघांना!

आनौन्स्मेंट झाली, सिट बेल्ट लावले, आणि जय हरी करत एकदाच विमान टेक ऑफ झाले!

काय ती मुंबई, अबब!!!

विमान रात्रीचे असल्यामुळे, टेक ऑफ झाल्यावर, मुंबईचे अती विहंगम ते दृश्य!! नुसती दिवाळी ला आकाशात आतशबजी, तशी आता खाली मुंबईत दिसत होती, बघता बघता विमानाने दिशा बदलली, आणि १० मिनटात झगमगती मुंबई गायब झाली....

.... टू बी कण्टिण्यू इन भाग - ३....

प्रतिक्रिया

तमराज किल्विष's picture

4 Sep 2019 - 9:48 pm | तमराज किल्विष

मस्त. माझा पहिला विमान प्रवास आठवला. पण मी सराईतासारखा वागलो होतो. जसा रोजच विमानाने हिंडतो.

वैभव.पुणे's picture

4 Sep 2019 - 9:53 pm | वैभव.पुणे

:,-):,-)कुठे होता पहिला परदेश दौरा?

तमराज किल्विष's picture

4 Sep 2019 - 10:28 pm | तमराज किल्विष

पहिला विमान प्रवास भारतातच मुंबई ते दिल्ली असा केला होता. :-)

वैभव.पुणे's picture

4 Sep 2019 - 11:56 pm | वैभव.पुणे

मस्तच !

रायनची आई's picture

4 Sep 2019 - 10:38 pm | रायनची आई

नवी नवलाईच वर्णन सुंदर ...

वैभव.पुणे's picture

4 Sep 2019 - 11:54 pm | वैभव.पुणे

मनापासून धन्यवाद!! आपल्या छोट्याशा कमेंट्स, खूप कौतुक करत आहेत!

भंकस बाबा's picture

4 Sep 2019 - 11:37 pm | भंकस बाबा

पुढचा भाग लवकर येउद्या

वैभव.पुणे's picture

4 Sep 2019 - 11:56 pm | वैभव.पुणे

येणारच! अशाच कमेंट्स येऊ द्या, लवकर लवकर टाकेल.. धन्यवाद कौतुक केल्याबद्दल!

श्वेता२४'s picture

7 Sep 2019 - 12:03 pm | श्वेता२४

पु.भा.प्र.

सोत्रि's picture

8 Sep 2019 - 5:33 pm | सोत्रि

आधि माहिती असतं तर एक कट्टा केला असता की कौलालंपूरात!

- (मलेशियावासी) सोकाजी

वैभव.पुणे's picture

8 Sep 2019 - 11:59 pm | वैभव.पुणे

कुठे आहात सध्या? क्वालालंपूर का?