आमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - १)

वैभव.पुणे's picture
वैभव.पुणे in भटकंती
4 Sep 2019 - 11:50 am

७-८ दिवसांची सुट्टी, कपल, फिरायला जायचय, पुण्याजवळ जायचं का कोकणात, का मध्य प्रदेश, का गुजरात, काहीच कळेना.

ठिकाणे शोधून हैराण, एप्रिल महिना, थंड ठिकाणी जावे का प्लॅन पुढे न्यावा, नुसता गोंधळ!

७-८ दिवसाचं बजेट काढल, विमानी जावे का ट्रेन नी, चांगल्या हॉटेलात राहावे का साधे, यंदाची ट्रीप चांगलीच करायची होती, २ रूपे जास्त गेले तरी चालतील, पण गैरसोय काही नको!

महिना गेला कुठे आणि कधी जायचं...

असच विचार आला, पासपोर्ट तर आहे, बघायचं का चक्क फॉरेन! तेही इथल्या काढलेल्या बजेट मध्ये? अबब!!! काय तो विचार आणि काय ते फॉरेन !

शोधाशोध केली, ही एजन्सी, ती वेबसाईट, ते ट्रीप प्लॅनर अॅपस!! अबब!! माणशी ४०-५० हजार रूपे, तेही ५ दिवसाचे!

गेलं बजेट डोंबल्यात!

विचार केला, अख्या भारतात, कोणताही प्लॅनर किवा ट्रॅव्हल एजन्सी न घेता फिरलोया, आपणच फॉरेन ट्रीप प्लॅन करू, आपल्या सोयीनुसार आणि बजेट मध्ये!

झालच मग.

ठिकाणे आणि माहिती काढली, मलेशिया, हाँगकाँग, दुबई, आणि बाली!

अजुन शोधाशोध केली, पहिली फॉरेन ट्रीप, दोघच जन(कपल), इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा कधी जनमात बघितलं नाही!

हे बघ ते बघ, इंडियन ला कुठे सेफ आहे, जेवण भेटेल का नीट, हॉटेल आहे का व्यवस्थित, एअरफेर कुठे कमी आहे, सिझन आहे का चांगला.

हुर्रे, सगळा परफेक्ट बसल, मलेशिया!!!!

वुहु!!!

मलेशिया ट्रुली एशिया!!

टिव्ही वर यू ट्यूब वर बऱ्याच जाहिराती कितीतरी वेळा डोळ्यासमोरून गेल्या होत्या, पण आपणच आता मलेशिया ला जाणार!! वूहू!!!

आनंदाला पाराच नव्हता..

सर्वात आधी विमान तिकीट बघितलं किती आहे ते,

वोहो! मलेशिया ला कळलं काय आम्ही येणारे ते! तिकीट चक्क रूपे ३९९९/- फक्त वन वे, म्हणजे जाऊन येऊन, ८०००/-, दोन जन १६,०००/- !!!

आता तर काही लिमिटच नव्हती साधं, पुणे ते दिल्ली किंवा जयपूर एवढं लागत होत, इथं तर थेट क्वालालंपूर!!!!

झालं तर मग, पाहिले ते तिकीट काढून ठेवलं (१० दिवस आधी, एअरलाईन सेल !).
तिकीट काढलं, स्वतःच मलेशिया च्या ऑफिशियल साईट वर जाऊन विसा काढून ठेवला, हॉटेल बुकिंग केली ( रिव्ह्यू वाचूनच आणि बजेट मध्ये असणारी ).
आता फक्त जायचं होत ते मुंबई, कारण फ्लाईट तिथूनच होती, मुंबई - क्वालालंपूर आणि वापस.

पुण्यातल्या थॉमस कुक वालयांकडून थोडी मलेशिया ची करन्सी ( मलेशियन रिंग्गीत) एक्सचेंज करून घेतली. (काहीच माहीत नसल्याने आधी थोडे तिकडचे पैसे जवळ ठेवले, तू ट्यूब वरून कळले होते की एमिग्रेशन ला विचारतात पैसे आहे का नाही/जवळ असू द्यावे).

(***नोट : आपल्याला इथूनच करन्सी एक्सचेंज करता येईल, किंवा एअरपोर्ट वर करता येईल, किंवा, सगळ्यात सोपा ऑप्शन म्हणजे, जवळ क्रेडिट कार्ड आणि इंटरनॅशनल डेबिट कार्ड असू द्यावे, जेव्हा गरज भासेल तेव्हा तिकडे atm मधून काढून घ्यावे.***/पण काहीतरी कॅश जवळ बाळगणे कधीही चांगले.)

झाली, बॅगची अवरा आवर झाली, दोघांनी कमीत कमी सामान घेतले आवश्यक ते, जास्त ओझे करायचे नव्हते आणि सुट सुटीत पहिला वाहिला फॉरेन प्रवास करायचा होता. दोन बॅकपॅक घेतल्या प्रत्येकी ७-७ किलो (केबिन बाग्गेज रुल).

पुणे ते मुंबई, थेट मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट, ट्रमिनल-२ गाठल.

काय ते भव्य एअरपोर्ट!! आपण इथेच फॉरेन ला आलो की काय असे वाटले!

कोणीतरी आपण व्ही आय पी माणूस झालो अशी जबरदस्त फिलिंग येऊन गेली!

चक्क फॉरेन, मलेशिया, अजूनही विश्वास बसत नव्हता!

.... टू बी कण्टीण्युड इन भाग - २....

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2019 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरुवात ! पुभाप्र.

वैभव.पुणे's picture

4 Sep 2019 - 9:54 pm | वैभव.पुणे

मनापासून धन्यवाद!!

अनिंद्य's picture

4 Sep 2019 - 12:18 pm | अनिंद्य

पहिलटकरांचे अनुभव वाचायला मिळणार, बेस्ट !

पु भा प्र

वैभव.पुणे's picture

4 Sep 2019 - 9:54 pm | वैभव.पुणे

धन्यवाद !!

संजय पाटिल's picture

4 Sep 2019 - 1:46 pm | संजय पाटिल

अरे व्वा...
पहिलाच परदेश प्रवास... तो ही सेल्फ प्लॅन्ड...
येऊद्या लवकर पुढचा भाग....

वैभव.पुणे's picture

4 Sep 2019 - 9:54 pm | वैभव.पुणे

येतोय !!

कंजूस's picture

4 Sep 2019 - 4:05 pm | कंजूस

लवकर लिहा.

वैभव.पुणे's picture

4 Sep 2019 - 9:55 pm | वैभव.पुणे

लिहितोय!!

तमराज किल्विष's picture

4 Sep 2019 - 8:50 pm | तमराज किल्विष

जल्दी लिखिए आगे की कहानी. आवडेश. धन्यवाद.

वैभव.पुणे's picture

4 Sep 2019 - 9:55 pm | वैभव.पुणे

आवडेश! थँकेश !!

स्मिता दत्ता's picture

7 Sep 2019 - 7:57 am | स्मिता दत्ता

छान लिहीलंय...