गाभा:
मानसीक छळ म्हणजे दूस-याच्या एखाद्या कृतीने खुप त्रास होऊन देखिल काहीही करू न शकणे
(जाणकारांनी आपापल्या परीने व्याखेत बदल करावा)
तूमचा कधी मानसीक छळ झाला आहे काय ?
माझा होतो. कित्येक वेळा. उदा
१) हिमेश रेशमीयासाहेबांची सलग पाच गाणी न थकता एकणे
२) ड्राय डे ला बायकोने आक्खी चपटी बेसीनमधे ओतणे
३) श्रीमान तात्या अभ्यंकरांनी रोशनी पूर्ण न करणे
४) वळणदार मुलींनी काका म्हणणे
५)कामावरुन घरी गेल्यावर कंपल्सरी बालाजी सिरीयलस पहायला लागणे
तूमचा कधी झाला असल्यास बोर्डावर येऊदे ना !
मानसीक छळातून सुटका नसलेला
मिथुन काशिनाथ भोईर
प्रतिक्रिया
9 Nov 2008 - 11:36 am | जैनाचं कार्ट (not verified)
>>>४) वळणदार मुलींनी काका म्हणणे
=))
जल्ला हा छळ माझा लईच होत आहे आज काल ;)
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ
9 Nov 2008 - 4:08 pm | टारझन
जवा बाल्या आगरी सोडून नागरी मराठीत लिहीतो .. तेंव्हा आमाना लै माणशिक तरास व्हतो
- टार्या आगरीकर
9 Nov 2008 - 11:50 am | विसोबा खेचर
२) ड्राय डे ला बायकोने आक्खी चपटी बेसीनमधे ओतणे
हा हा हा! :)
४) वळणदार मुलींनी काका म्हणणे
क्या बात है! "वळणदार" हा शब्द खूपच रसिक वाटला! जियो रे भोईरा.. :)
तूमचा कधी झाला असल्यास बोर्डावर येऊदे ना !
नुकतीच तुझी एक प्रतिक्रिया कुणा संपादकाने उडवली असं मला कळलं. कुणी उडवली, का उडवली हे मला खरंच माहीत नाही. तरीही मिपावर तुझ्यासारख्या निखळ आनंद देणार्या सभासदाची प्रतिक्रिया उडवली गेली याचा त्रास झालाच. मनापासून क्षमस्व..!
मला वाटतं पंतांनीच उडवली असणार तुझी वृत्ताच्या लेखातली प्रतिक्रिया!
असो,
तात्या.
9 Nov 2008 - 12:02 pm | वेताळ
आजकाल पोरीना कुणाला पन काका ,मामा करायची सवय हाय.चांगल न्हव ह्ये... तुला गाण एकुन हिमेसचा राग आला पण ज्यानी त्याचा कर्ज पिक्चर बगितला असेल त्या लोकाच काय?
वेताळ
9 Nov 2008 - 1:38 pm | बिपिन कार्यकर्ते
३) श्रीमान तात्या अभ्यंकरांनी रोशनी पूर्ण न करणे
आपलं मत या पर्यायाला. :)
***
१) हिमेश रेशमीयासाहेबांची सलग पाच गाणी न थकता एकणे
मूळात लोक ऐकतातच का पुढची ४ गाणी? पहिल्या गाण्याच्या पहिल्या २ ओळीतच त्यांना कळले पाहिजे की पहिले गाणे सुद्धा पूर्ण ऐकू नये. त्यामुळे माझ्या त्यांना केवळ शुभेच्छा. गेट वेल सून.
२) ड्राय डे ला बायकोने आक्खी चपटी बेसीनमधे ओतणे
आज पर्यंत हा प्रसंग कधी ओढवला नाही माझ्यावर. ;)
४) वळणदार मुलींनी काका म्हणणे
सवय झाली आता. आणि म्हणलं त्यांनी काका तर काय फरक पडतो. आपण आपलं काम चालू ठेवायचं. ;)
५)कामावरुन घरी गेल्यावर कंपल्सरी बालाजी सिरीयलस पहायला लागणे
आमच्या कडे 'मराठीचा बोलबाला' आहे. त्या मुळे भयानक बालाजी सिरीयल्सचा संबंधच नाही. पण मराठीत पण आजकाल एकता कपूरला जबरदस्त स्पर्धा देणारे महाभाग यायला लागले आहेत. :(
बिपिन'काका' कार्यकर्ते
9 Nov 2008 - 9:26 pm | सूर्य
आणि म्हणलं त्यांनी काका तर काय फरक पडतो. आपण आपलं काम चालू ठेवायचं
सहमत. ;)
10 Nov 2008 - 10:26 pm | सुमीत
३) श्रीमान तात्या अभ्यंकरांनी रोशनी पूर्ण न करणे
तात्यांनी अगदी भरल्या ताटा वरून उठवले हो
तात्या, आता तरी पूर्ण करा "रोशनी" :)
9 Nov 2008 - 4:43 pm | विनायक प्रभू
ब-याच दिवसानी मुहूर्त जूळुन यावा. उत्साहाने घरी जावे.
१. सासू घरी आलेली असावी.किंवा
२. गंगा आली रे अंगणी गाणे अयकावे लागणे. एवढा मानसिक छळ मल नाय वाटत दुसरा कुठला असेल.
9 Nov 2008 - 5:45 pm | टारझन
२. गंगा आली रे अंगणी गाणे अयकावे लागणे. एवढा मानसिक छळ मल नाय वाटत दुसरा कुठला असेल.
अरेरेरे अशी 'पाळी' नको यायला कुणावर ..... बाकी प्रभुदेवा ... तुम्ही ही सासूकडे मुक्काम ठोकत जाकी मन्ग ...
नाही तर आपल्यातलाच कोणीतर डोकेफोड माणूस तिकडे पाहुणा म्हणून पाठवायचा (बरेच दिवस) .. अन वर ताकिद द्यायची.... खातिरदारी नीट झाली पाहीजे
10 Nov 2008 - 6:41 am | भास्कर केन्डे
खातिरदारी नीट झाली पाहीजे
--- सासू म्हणील जा उडत. मग झाले का ;)
10 Nov 2008 - 10:40 pm | टारझन
सासू म्हणील जा उडत. मग झाले का
अर्रे वा ... हे तर सोन्याहुन पिवळं झालं मग .... आणि हाच तर हेतु आहे ना ... एकदा का आपल्याला उडवून लावलं की ती कोणत्या तोंडाने येउन बसल आपल्या हितं ... :)
- (मानाचा गम्पती)
टारुशेट हलवाई
10 Nov 2008 - 10:54 pm | मुक्तसुनीत
गंगा आली रे अंगणी गाणे अयकावे लागणे. एवढा मानसिक छळ मल नाय वाटत दुसरा कुठला असेल.
हे क्रिप्टीक वाटते. जे आम्हाला समजले तेच क्रिप्टीक आहे का आय ऍम रीडींग टू मच इन्टू धिस ???
10 Nov 2008 - 11:13 pm | सर्किट (not verified)
प्रभू तेरी दया है अपार..
आजवर प्रभुकृपेचा आस्वाद घेतल्याने आम्हाला जे कळले आहे,, तेच तुम्हालाही कळलेले आहे. तोच खरा अर्थ आहे.
बहिणाबाईंनी प्रभूंचे समुपदेशन घेतले असते, तर
मन गटार गटार
केस कुरळे अपार (थोडे आमचेही क्रिप्टिक)
किती हाकला हाकला
पुन्हा येतं मिपावर
ही अष्टाक्षरी लिहिली असती.
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
11 Nov 2008 - 9:57 am | विनायक प्रभू
मला कळले बरे तुमचे क्रिप्टिक सर्किट राव.
11 Nov 2008 - 9:22 pm | अनंत छंदी
३) श्रीमान तात्या अभ्यंकरांनी रोशनी पूर्ण न करणे
ब्रिटिश सायबानु ह्यां बाही खरा असा, तात्या रोशनी कधी पुरी करशात, तां एक देवाक म्ह्यायती.
13 Nov 2008 - 12:45 pm | मिसंदीप
मि अनुभवलेला मानसिक छळ म्हणजे,
एखाद्याने मोबाईल चे कि सांउड ऑन ठेवणे व आपल्या जवळ बसुन त्या वरुन सारखे मेसेज करणे.
16 Mar 2019 - 11:09 am | मुक्त विहारि
ह्या पेक्षा जास्त मानसिक त्रास नाही....
पैसे परत येतात....पण आपलाच माणूसकी वरचा विश्वास उडायला लागतो....
16 Mar 2019 - 11:58 am | नावातकायआहे
बाडिस.