राज ठाकरेंनी छेडलेल्या आंदोलनाची झळ

निमीत्त मात्र's picture
निमीत्त मात्र in काथ्याकूट
9 Nov 2008 - 2:02 am
गाभा: 

राज ठाकरेंनी अवलंबलेला मार्ग किती चुकिचा आहे हे आता दिसुन येत आहे. हरयाणातील मराठी बांधवांना वाचवायला आता राज ठाकरे तिकडे जातील का? सकाळमध्ये आलेली ही बातमी वाचा.

-------------------------
चंदीगढ- राज ठाकरेंनी छेडलेल्या आंदोलनाची झळ आता इतर प्रांतात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांनाही बसू लागली आहे.

हरियाणातील करनाल येथे राहणाऱ्या विजय सुर्यवंशी यांच्या घरी बुधवारी रात्री काही सशस्त्र गुंड घुसले आणि त्यांना "महाराष्ट्रात परत जा अन्यथा तुम्हाला संपवून टाकू' अशी धमकी दिली. या प्रसंगानंतर विजय सुर्यवंशी आणि त्यांच्या कुटुंबाल प्रचंड धक्का बसला आहे. गेली १५ वर्षे करनाल मध्ये राहत असलेल्या सुर्यवंशी कुटुंबियांना हा प्रकार अतिशय अनपेक्षित असाच होता.

हा राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचाच परिणाम असल्याने "आता आम्हाला वाचवायला राज ठाकरे येणार आहेत का', असा प्रश्‍न सुर्यवंशी यांच्या पत्नी कल्पना यांनी केला आहे.

केवळ आम्ही महाराष्ट्रीयन असल्यामुळे आमच्यावर असा प्रसंग पहिल्यांदाच आला आहे, असे कल्पना सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. तसेच आम्ही येथून कुठेही जाणार नाही कारण हा "आमचा देश' आहे. आणि देशात कोठेही राहण्याचा आणि काम करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. राज ठाकरेंची भूमिका पूर्णपणे चुकीची आहे, असे मतही कल्पना यांनी व्यक्त केले.

करनालमध्ये सुमारे ५०० मराठी कुटुंबं आहेत. या घटनेचा धसका या सर्वांनीच घेतला आहे.

केवळ करनाल किंवा हरियाणाच नाही तर झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतील मराठी लोकांनाही आता आपल्यावरही असाच प्रसंग येणार नाही ना, अशी भीती वाटत आहे.

प्रतिक्रिया

शैलेन्द्र's picture

9 Nov 2008 - 9:20 am | शैलेन्द्र

राज ठाकरेंचा मार्ग चुकिचा नाहि, त्याच हिंदी वाहिन्यांनी केलेल विश्लेशन चुकिच आहे. राज ठाकरेंनि कुणालाहि परत जा अस सांगितलेल नाहि.

आणि जर खरोखरच अस होनार असेल तर इथेहि बरेच परप्रांतिय आहेत, त्यांच काय करायच ते आम्हि ठरवू.

कलंत्री's picture

9 Nov 2008 - 10:05 am | कलंत्री

आजच्या लोकसत्ताच्या वृत्तानुसार या कुटुंबीयानी पोलिसांकडे जाण्याऐवजी सरळ वर्तमानपत्राकडे जाण्याचा मार्ग स्विकाराला. माध्यमाना अश्या वार्ताची निकडच असते आणि नकळतच अतिशयोक्त कल्पना उभ्या राहतात.

भारतात कायद्याचे राज्य आहे. कोणत्याही प्रातांत अश्या धमकावणीच्या घटना असल्यास स्थानिक पोलिसांची मदत घ्यायला हवी.

अश्या बातम्या आनि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्या..
छान मनोरन्जन झाले.
खरेतर हरयाना मधिल लोकान्चा ह्यात काहिही सम्बन्ध नाहि तरीही फुकटची प्रसिद्धि मिळ्वन्याचि टिव्ही वर चमकन्याची
ही सुवर्णसन्धि कोन वाया घालवणार. ह्या गोष्टी फक्त आणि फक्त प्रसिद्धी साठिच होतात हे लक्षात घ्या, आणि ह्यात विस्त्वावर
फुन्कर घालण्याचे काम विघ्नसन्तोशि मिडीयावाले करतात. बस बाकि ह्यात काहि अर्थ नाहि.