नमस्कार संजय अभ्यंकर साहेब,
तात्या, जे.पी. असोसिएट्स, का कोसळ्ला?
तो कितीने स्प्लीट होतोय?
संजय अभ्यंकर
आपल्या वरील प्रश्नाबद्दल धन्यवाद. परंतु केवळ एका कंपनीच्या समभागाकरता स्वतंत्र चर्चाविषय नको असे वाटले म्हणून सर्वच कंपन्यांच्या समभागाकरता हा सामाईक चर्चाविषय आम्ही इथे सुरू करत आहोत. म्हणजे इतरही कुणाला अन्य एखाद्या कंपनीच्या समभागाबद्दल इथे लिहिता येईल किंवा काही विचारता येईल, त्याबाबत चर्चा करता येईल.
असो, आता आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करतो..
आमच्या माहितीप्रमाणे जे पी असो. हा कोसळला नसून स्प्लीट झाला आहे. पूर्वी याचे दर्शनी मूल्य हे दहा रुपये प्रति समभाग होते ते आता २ रुपये प्रति समभाग इतके झाले आहे..
आपला,
(आडनांव बंधू) तात्या.
अवांतर - आपल्या परवानगी शिवाय आपल्या ह्या चर्चाविषयात बदल केले आहेत त्याबद्दल क्षमस्व! परंतु आणिबाणीत आम्हाला इतपत तरी सूट असावी असे वाटते! :)
प्रतिक्रिया
17 Dec 2007 - 11:20 pm | संजय अभ्यंकर
तात्या,
आपण केलेला बदल, हा स्वागतार्ह आहे.
त्याची सान्गड आणिबाणीशी घालू नाका.
आपल्या सारख्या तज्ञ व्यक्तिने समभाग या विषयावर स्तंभ सुरू केला हे उत्तम झाले.
संजय अभ्यंकर
17 Dec 2007 - 11:36 pm | संजय अभ्यंकर
तात्या,
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद.
जे.पी. असोसिएट्स, हा मी घेतलेला अलिकडल्या काळातला उत्क्रुष्ट समभाग, त्याने मला केवळ ८ महिन्यात २३०% परतावा दिला होता. आज त्याचा भाव पाहुन हादरलो (रॅनबॅक्सीची आठवण झाली).
आपण केलेला खुलासा दिलासा देऊन गेला.
संजय अभ्यंकर.
19 Dec 2007 - 9:16 am | जुना अभिजित
खुलासा दिलासा देऊन गेला.
वाह!! वाक्यात नाद आहे.
संजय तुम्ही आय्सीआय्सीआय डायरेक्ट वापरत असाल तर पोर्टफोलिओ मध्ये स्वतः शेअरची संख्या आणि किंमत बदलावी लागेल.
सध्या तुम्हाला जुनीच खरेदी किंमत दिसत असेल. तुमच्या डीमॅट अकाउंटला स्प्लिट झालेले शेअर म्हणजे २ असतील तर एकूण दहा असे १ महिन्यात जमा होतील.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
20 Dec 2007 - 10:13 am | अवलिया
आय एफ सी आय कोसळ्ला
माझ्याकडे १२ रु चे १००००
१८ चे ५००० आहेत
काय करु?
20 Dec 2007 - 12:12 pm | विसोबा खेचर
पैशांची निकड नसेल तर राहू द्यात, नका विकू!
किंवा अगदीच जर काही प्रमाणात प्रॉफिट बुक करायचा असेल तर अर्धा माल विका. मी तुमच्या जागी असतो तर अर्धा माल विकून टाकला असता.
तात्या.
3 Jan 2008 - 10:25 pm | संजय अभ्यंकर
अल्पकालीन गुन्तवणुकीला बरेच सल्लागार भेटतात. हल्ली टी.वी. वर यांचा सुकाळ आहे.
बहुदा त्याना या कामाचे बरेच पैसे मिळत असावेत.
एकाहून आधिक अर्थविषयक चॅनल्स पाहिल्यास हि मंडळी आपल्याला गोन्धळात टाकतात असे अनुभवास येते.
अल्पकालिन गुन्तवणुकीला, बाजाराचे उत्तम ज्ञान, गाठीशी पुरेसा पैसा आणि प्रसंगी जबर नुकसान सहन करायची क्षमता असावी लागते.
तसेच, योग्य सल्लागार (broker) जोडिशी असावा लागतो. अन्यथा लाखाचे बाराहजार व्हायला वेळ लागत नाही.
जनसामन्य, शेअर बाजाराला जुगार मानतात, कारण, अशी नुकसानीत गेलेलि अनेक उदाहरणे समाजात आहेत.
माझ्या मते, सामान्य गुन्तवणुकदारानी दीर्घ कालिन गुन्तवणुक करावी. अश्या गुन्तवणुकीत, बाजाराच्या रोज होणार्या चढ उताराचे फारसे चटके आपल्याला बसत नाहित.
पुन्हा एकदा मी Peter Lynch ची पुस्तक वाचायची शिफारस करेन.
पीटर लिन्च हा दीर्घकालीन गुन्तवणुकीचा खंदा पुरस्कर्ता आहे.
मी दी.का. गु. ची सतत प्रचीती घेत आहे. मी १९८६ सालापासुन समभाग खरेदी करित आहे. त्यातले काही समभाग आजहि (काही अपवाद वगळता) विकलेले नाहीत. आज हेलकावणारा बाजार, माझ्या गुन्तवणुकीवर व नफ्यावर फारसा परिणाम करित नाहीत.
संजय अभ्यंकर
15 Jan 2008 - 11:47 pm | अव्यक्त
मला क्रुप् या मार्गदर्शन कराल काय....
maajhya kade hotel leela....infotech entertain, patni ashe thakele scrip aahet jyamule maajhe paise adakale aahet....kaay karu me...?
15 Jan 2008 - 11:03 pm | संजय अभ्यंकर
हा रिलायन्स पॉवरचा परिणाम कि बाजारात आलेला सुधार (correction)?
NSE चा पी/ई अजुनहि २७ च्या वर आहे. म्हणजे बाजार फारच वर आहे!
संजय अभ्यंकर
16 Jan 2008 - 4:01 pm | बहुरंगी
इतके दिवस धोंडोपंत मगे लागले होते .... शेअर मार्केटचा अभ्यास कर, पैसे गुंतव, आणि फायदा करुन घे. याच संदर्भातील मिपा वरची मागील चर्चा वाचली आणि मनाशी ठाम निश्चय केला. इतके सगळे साथीला असताना शेअर मार्केटची भिती का बाळगायची. आजच icicidirect.com वर खाते उघडले आहे. आणि काही दिवसातच ते कार्यान्वित देखिल होईल. सध्या बरेचसे शब्द डोक्यावरुन जात असले तरी हळु हळु यांची पण माहिती कळायला लागेल.
आपण सगळे माझ्या ज्ञानात भर टाकालच.
आपला,
बहुरंगी मिसळे
16 Jan 2008 - 4:19 pm | अवलिया
इतके दिवस धोंडोपंत मगे लागले होते .... शेअर मार्केटचा अभ्यास कर, पैसे गुंतव, आणि फायदा करुन घे. याच संदर्भातील मिपा वरची मागील चर्चा वाचली आणि मनाशी ठाम निश्चय केला. इतके सगळे साथीला असताना शेअर मार्केटची भिती का बाळगायची. आजच icicidirect.com वर खाते उघडले आहे
धोंडोपंताचे एवढे जर ऐकता तर कर असताना नवीन काम सुरु करु नये हे त्यांचे वाक्य विसरले काः)
असो
बुधवारची लक्ष्मी तुम्हाआम्हाला प्रसन्न होवो
नाना
16 Jan 2008 - 4:32 pm | संजय अभ्यंकर
बहुरंगीजी,
आपण स्वतःस अज्ञानी समजु नये. फारतर आपण शिशुवर्गात आहोत असे समजावे.
खाली काही सुचना देत आहे, त्या केवळ अनुभवावर आधारीत आहेत. इतरांच्या सुचनाही अभ्यासाव्यात.
१) केवळ कोणी टिप दिली म्हणुन एखाद्या समभागात पैसे गुन्तवू नये. शेअर बाजाराच्या सुचकांका पेक्षा कंपनीचा ताळेबंद ज्यास्त महत्वाचा.
२) कंपनीची तिमाहि, सहामाहि, वार्षिक प्रगती याचा अभ्यास पैसे गुन्तवण्यापूर्वी करावा.
३) कंपनीच्या जबाबदार्या, देणी, येणी व करोत्तर नफा अभ्यासावा.
४) कंपनीचा प्रामाणिकपणा, बोनस, लाभांशाचा इतिहास आदी पडताळावेत.
५)एकाच कंपनी विषयी किमान दोन अथवा तीन वेबसाईट्सचे मत पहावे.
६) उत्पन्ना बद्दल दीर्घकालिन उद्दिष्टे ठेवावित. उठसुट समभाग विकु नयेत.
संयमाने फायदा होतो. योग्यकाळ नफ्यासाठि थांबावे.
७) समभाग या विषयावर जितके वाचाल तितके थोडे.
८) समभाग सल्लागार हा भविष्यवेत्ता नव्हे, त्याचा सल्ला हा त्याच्या अभ्यास व अनुभवावर आधारित असतो.
त्याचा सल्ला वरिल निकषांवर घासावा. आपणांस पटल्यास त्या समभागात पैसे गुन्तवावे.
शेवटी:
दोन चारदा आपटल्या शिवाय शहाणपण येत नाही. ती क्लासची फी समजावि.
आपणास सुयश लाभो!
संजय अभ्यंकर
16 Jan 2008 - 4:49 pm | बहुरंगी
धन्यवाद संजय अभ्यंकर
<<आपण स्वतःस अज्ञानी समजु नये. फारतर आपण शिशुवर्गात आहोत असे समजावे.
मान्य .... अगदी पहिल्या पायरी वर आहे.
<<खाली काही सुचना देत आहे, त्या केवळ अनुभवावर आधारीत आहेत. इतरांच्या सुचनाही अभ्यासाव्यात.
जरुर ....
पंत, तात्या, संजय, मोठा डॉन, नाना इ. यांच्या मुळे .... या मायजालात उतरलो तर आहे .... आपटलो किंवा उडालो तरी आपणांस कळेलच.
आपला,
बहुरंगी मिसळे
16 Jan 2008 - 10:20 pm | संजय अभ्यंकर
अमेरिकन समाज सर्व क्षेत्रात प्रगतिशील आहे. ह्याचे एक कारण म्हणजे, जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हा त्यांच्या जीवनपद्धतिचा एक अविभाज्य भाग आहे. अनेकविध विषयात त्या त्या क्षेत्रातिल तज्ञ व्यक्ति लेखन करतात.
समभाग ह्या क्षेत्रातही अमेरिकन लोक विपुल लेखन करतात.
Peter Lynch च्या पुस्तकांची शिफारस मी पुर्वी केलेली आहे.
त्या शिवाय समभाग बाजारातला गुरु Warren Buffet ह्याने स्वतः काहि लेखन केलेले नजरेस पडले नाही. परंतु, याच्या कार्य पद्धतिबद्दल इतरांनी लिहिलेलि काही पुस्तके उपलब्ध आहेत.
शेअर महर्षि Benjamin Graham (हा Warren Buffet चा गुरु) ह्याने मैलाचे दगड ठरतिल अशी दोन पुस्तके लिहिलि. पैकी पहिले पुस्तक Security Analysis फार दुर्मिळ आहे. दुसरे Intelligent Invester उपलब्ध आहे. मला अलिकडेच त्याची नविन आव्रुत्ती (टिके सहित) डेक्कनच्या फुटपाथवर सापडलि.
संजय अभ्यंकर
17 Jan 2008 - 12:07 pm | अवलिया
अमेरिकन समाज सर्व क्षेत्रात प्रगतिशील आहे. ह्याचे एक कारण म्हणजे, जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हा त्यांच्या जीवनपद्धतिचा एक अविभाज्य भाग आहे.
जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे
माफ करा पण आमचा या विधानास आक्षेप आहे
पेटंट, लायसन्स, प्रोप्रायटरी कोड वगैरे अमेरिकेने दिलेला रोग आहे
जे आपणास ठावे ते इतरांस शिकवावे हि हिंदु संस्कृती आहे
समभाग ह्या क्षेत्रातही अमेरिकन लोक विपुल लेखन करतात.
प्रत्येक देशाची खासियत असते आपल्याकडे धार्मिक विषयांवर प्रचंड (विपुल विपुल असे अनेक वेळा म्हणजे प्रचंड ) लेखन होत असते
युरोपात सुद्धा विविध भाषांमधे समभागां विषयी लेखन होत असते व ते कित्येक वेळेस अमेरीकन लोकांपेक्षा जास्त दर्जेदार असते.
कदाचित तुम्हाला आंग्ल भाषा वगळता उर्वरीत परकिय भाषांचे ज्ञान नसल्यामुळे तो आनंद मिळाला नसेल.
असो
बाकि तुमचे म्हणणे योग्य आहे
(जर्मन, फ्रेंच, स्पेनीश) नाना
18 Jan 2008 - 10:14 am | संजय अभ्यंकर
नाना,
आपले मुद्दे बरेचशे पटणारे आहेत. परंतु, पेटंट इ. प्रकार सोडले तर आंग्ल लेखनाने मला बरेच काही लाभले.
मी जर्मन भाषा बर्यापैकी वाचु व समजु शकतो (बोलण्याचा सराव नाही).
भारतात (अथवा महाजालावर) विविध विषयावरील जर्मन साहित्य कोठे उपलब्ध आहे (काही वानगीदाखल उदाहरणे?).
(फ्रेन्च, स्पॅनीशशी माझा दुरन्वयेही संबंध नाही).
धन्यवाद!
संजय अभ्यंकर
18 Jan 2008 - 10:45 am | अवलिया
भारतात (अथवा महाजालावर) विविध विषयावरील जर्मन साहित्य कोठे उपलब्ध आहे (काही वानगीदाखल उदाहरणे?).
तुम्ही न्याहाळख उघडा ( आय.इ किंवा फायरफोक्स)
गुगल.कौम वर जा
लैग्वेज टुल्स वर टिचकी मारा किंवा सरळ इथे क्लिक करा
पुढे बघा सुचना बघा तुम्हाला कमीतकमी श्रमात भरपुर हव्या त्या भाषेतील पाने मिळतील
नाना
21 Jan 2008 - 1:23 am | संजय अभ्यंकर
नानाजी,
पुन्हा एकदा धन्यवाद.
संजय अभ्यंकर
16 Jan 2008 - 6:27 pm | यशोदेचा घनश्याम
रिलायंस पेट्रो मधे सट्टेबाजारी होवू नये याकरता तो Futures & Options Ban मधे आहे, अशी बातमी कळाली.
माझ्याकडे आर. पी. एल. चे समभाग आहेत. (ईक्विटि मार्केट मधून घेतलेले)
Futures & Options Ban मुळे काय परिणाम होतो?
आर. पी. एल. चे भवितव्य काय?
कोणी याबद्दलचे मत / माहीती शेअर कराल?
13 Feb 2008 - 1:46 pm | अनिकेत
Theoritically, derivatives market हे spot market वर अवलम्बून असते. (अनुस्वार कसा देतात ?)
पण, derivatives च्या किमतीवरून आपण short-term spot च्या trend बद्दल अन्दाज करू शकतो.
आर पी एल ban झाला कारण त्याच्या derivative market open position (खरेदी/विक्री झालेली contracts) market capitalization च्या तुलनेत खूप जास्त होती.
याचा काही अर्थ काढायचा तर असा काढता येईल की आर पी एल नजिकच्या भविश्यात (New to Devnagri typing) खूप volatile असेल.
16 Jan 2008 - 9:59 pm | संजय अभ्यंकर
मला त्या फ्युचर्स आणि ऑप्शन्स बद्दल काही कळत नाहि.
त्या बाबतित वाचनहि नाहि.
ह्या विषयावर सविस्तर वाचन आवश्यक आहे.
संजय अभ्यंकर
17 Jan 2008 - 9:00 am | संजय अभ्यंकर
रिलायंस पॉवरच्या समभागांकडे लोकांची झुम्बड उडाल्याच्या बातम्या व्रुत्तपत्रात येत आहेत.
हे कळपाच्या मनोव्रुत्तीचे एक उदाहरणा आहे.
लोक असलेले समभाग विकुन, रि.पॉ. घेत आहेत. ह्या मुळे बाजार खाली उतरायला हातभारच लागत आहे.
मी रि.पॉ. वर एक कपर्दिकहि खर्चलेली नाही.
जेव्हा जेव्हा असे मेगा ईश्यु येतात, तेव्हा तेव्हा ही कळप मनोव्रुत्ती दिसुन येते.
काही वर्षांपुर्वी, इन्डो गल्फ फर्टिलायझरचा मेगा इश्यु आला होता, तेव्हाहि लोकांनी तो शेकड्याने घेतला.
आज इन्डो गल्फ कुठे आहे?
ह्या वेळेस, बाजार खालि आल्याचा फायदा घेवुन, रि.पॉ. च्या मागे न धावता, चांगले समभाग कमी किमतित विकत घेणे हा शहाणपाणाचा मार्ग ठरेल असे माझे मत आहे. बाजारात नोन्दणी झाल्यावर, बहुदा, रि.पॉ. खालि येइल, तेव्हा तो घेणे इष्ट.
संजय अभ्यंकर
17 Jan 2008 - 9:46 am | विसोबा खेचर
अभ्यंकर साहेबांच्या वरील मताशी मी पूर्णत: सहमत आहे...!
तात्या.
अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे...
तात्या.
17 Jan 2008 - 10:47 am | यशोदेचा घनश्याम
अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे...
---- आम्ही प्रतिक्षेत आहोत.
-- यशोदेचा घनश्याम
17 Jan 2008 - 12:13 pm | अवलिया
अवांतर - फ्युचर्स ऍन्ड ऑप्शन्स बद्दल सवडीने लिहायचा विचार आहे...
तात्या सवडीने म्हणजे कधी?
कारण तुमची सवड म्हणजे कपिलाषष्ठी प्रमाणे दुर्मिळ आहे.
सह्या बोलावुन ठेवल्या म्हणे सवडीने सांगतो ... अजुन काय मुहुर्त नाही.
रोशनी दोन तीन महिन्याने एक झलक.... पुढे .. आनंद
त्यामुळे न मागता एक सल्ला
कुठलीहि वाच्यता न करता गुपचुप लिहा व प्रसिद्ध करा.
तुम्ही सांगता आता लिहित आहे... आम्ही वाट पहात रहातो टांगुन... पार चक्का होतो पण ... सवड मिळेल तर शपथ..
असो
राग मानु नका
नाना
18 Jan 2008 - 11:33 am | मनिष
दीर्घकालीन गुंतवणुकीकरता हे समभाग चांगले आहेत
(1) TTML (Tata Teleservices (Mah) Ltd. -- 54-56
(2) India Cements - 260 - 265
(3) Tata Steel - 800-820
निदान १ वर्ष तरी गुंतवणुक करावी. ३ वर्षात खुप फायदा होईल असा अंदाज आहे!
13 Feb 2008 - 1:24 pm | संजय अभ्यंकर
मित्रहो,
शेअर बाजार गडगडतोय. लोकही हवालदिल झालेत.
परंतु दीर्घकालिन गुंतवणुक करणार्यांनी शांत रहावे.
जे लोक दीर्घकालिन गुंतवणुक करत नाहीत, त्यांनी त्याकडे वळावे म्हणुन पिटर लिंचचे वाक्य खाली उद्धृत करत आहे.
आपले पुस्तक One Up on Wall Street च्या प्रस्तावनेत त्याने हा उतार लिहिला आहे.
"The basic story remains simple and never-ending. Stocks aren't lottery tickets. There's a company attached to every share. Companies do better or they do worse. If a company does worse than before, its stock will fall. If a company does better, its stock will rise. If you own good companies that continue to increase their earnings, you'll do well. Corporate profits are up fifty-five-fold since World War II, and the stock market is up sixtyfold. Four wars, nine recessions, eight presidents, and one impeachment didn't change that."
Peter Lynch
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
13 Feb 2008 - 1:59 pm | अनिकेत
No offence, but I remember reading in one up on wall street or beating the street, by Peter Lynch himself where he admits, की जे २९ मधे जे आपले शेअर पकडून बसले होते, त्यान्चे नुकसान भरून निघायला ४० वर्शे [:)] लागली. स्वत: लिन्च ने काय ८७ मधे शेअर विकले नाहीत?
दीर्घकालीन गुन्तवणुकदार जर risk-averse असतील तर अश्या crash मध्ये कसे गप बसणार?
This reminds me of when I was a kid and played cricket with big boys. They'd always made me field all day while they batted and bowled. I think the situation of retail investors is the same now, and is always going to be the same :D :D